टिंबाएवढा दिसणारा इस्त्राईल नावाचा देश आपल्या ‘मोसाद’ या गुप्तचर संघटनेच्या जोरावर जगावर अधिराज्य गाजवतोय…
पडघम - विदेशनामा
अनिरुद्ध राम निमखेडकर
  • इस्त्राईलच्या ‘मोसाद’चे बोधचिन्ह
  • Mon , 20 February 2023
  • पडघम विदेशनामा मोसाद इस्त्राईल

जानेवारी २०१३च्या शेवटच्या आठवड्यात इराणमधील इस्फहान शहरातील एका लष्करी कारखान्यावर ड्रोनने हल्ला करून तो उदध्वस्त करण्यात आला. हा हल्ला इस्त्राईलने केल्याचा दावा अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने केला. सध्याची परिस्थिती पाहता यात तथ्य दिसते. कारण युक्रेन-रशियाच्या युद्धात आता इराणचा प्रवेश झाला आहे. आर्थिक प्रतिबंध लादल्यामुळे इराणला हत्यारे विकण्यावर जागतिक पातळीवर बंदी आहे. तसेच संयुक्त राष्ट्राचे सदस्य इराणकडून हत्यारे विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे  रशिया आणि इराण यांच्यामध्ये हा गुप्त समझोता असल्याचे नाकारता येणार नाही. पण इस्त्राईलने आधीच धमकी दिली आहे की, तो इराणची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही. या हल्ल्याच्या एक दिवस आधी इस्त्राईलने जगासमोर पुरावा ठेवल्याचा दावा केला. त्यात त्याने रशियाजवळ ‘शाहिद १३६ द्रोण’ असल्याचे आणि ज्या कारखान्यावर हल्ला झाला, त्यात रशियासाठी द्रोण बनवले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे इस्त्राईलने परत इराणची पोलखोल केली, असंच म्हणावं लागेल. कारण जगासाठी इराण विरुद्ध इस्त्राईल संघर्ष नवीन नाही.

२००९मध्ये ‘द टाइम्स’ या ब्रिटिश वर्तमानपत्रात इराण सरकारचे काही गुप्त दस्तावेज प्रसिद्ध झाले. त्यातून हे सुस्पष्ट झाले की, इराण सरकार एक आण्विक हत्यार तयार करण्यावर काम करत आहे. हे धक्कादायक होते. खासकरून अमेरिका आणि इस्त्राईल यांच्यासाठी. त्यांनी हा आण्विक कार्यक्रम उदध्वस्त करण्याचे ठरवले. या दोन्ही देशांची नजर पडली इराणीयन अणुवैज्ञानिक मोसिन फक्रजादे यांच्यावर. ते १९९३ ते २००३पर्यंत इराणच्या या आण्विक कार्यक्रमाचे नेतृत्व करत होते. त्यांची हत्या करण्याची योजना सोपी नव्हती, कारण ते साध्या गुप्तचर संघनेचे काम नव्हते. त्यामुळे या हत्येच्या योजनेत इस्त्राईलची गुप्तहेर संस्था ‘मोसाद’चा प्रवेश झाला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अमेरिका आणि इस्त्राईल यांना खूप प्रयत्नानंतर कोविड काळात, २०२०मध्ये मोसिन फक्रझादे यांच्यावर नजर ठेवण्यात मोसादला यश आले. आठ महिने त्यांच्या प्रत्येक हालचालीवर मोसादकडून नजर ठेवण्यात आली. आणि २७ नोव्हेंबर २०२० रोजी मोसादने त्यांची हत्या केली. एका महामार्गावर एक ट्रक उभा करण्यात आला. त्यात सॅटेलाईटद्वारे चालवता येणारी FN MAG Machine Gun ठेवण्यात आली. जेव्हा मोसिन फक्रजादे त्या रस्त्यावर जात होते, तेव्हा मोसादच्या एजंटने हजारो मैल दूरून, इस्त्राईलमधून त्या ट्रकमधील मशीन गन चालवत मोसिन फक्रजादे यांच्यावर १३ गोळ्या झाडल्या. त्याही कशा, तर बाजूला बसलेल्या त्यांच्या पत्नीला दुखापत न करता. फक्रजादे यांचे सुरक्षारक्षक त्या ट्रकच्या दिशेने धावले, तेव्हा मोसादने तो ट्रक बॉम्बने उडवून नष्ट केला.

ही योजना इतक्या चोख पद्धतीने राबवली गेली, जे अमेरिकेलाही शक्य झाले नसते.

खरे तर इस्त्राईल हा देश आपल्या भारतातल्या मेघालय राज्यापेक्षाही छोटा आहे. मात्र त्याची मोसाद ही गुप्तचर संघटना जगातल्या आघाडीच्या पहिल्या पाच गुप्तचर संघटनेपैकी एक आहे. तिचे नाव ऐकताच मध्य-पूर्व देशांमधील आतंकी संघटना आजही घाबरतात.

१९४८मध्ये इस्त्राईल देश म्हणून स्थापन झाला, तेव्हा तो परावलंबी होता. त्या वेळी अमेरिकेने त्याला आर्थिक साहाय्य केले, आणि आजही अमेरिका त्याला मदत करते. सुरुवातीला मध्य-पूर्वमध्ये जेव्हा इस्त्राईलला आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे होते, त्या वेळी त्याला मजबूत सुरक्षा यंत्रणेची गरज होती. त्यामुळे १९५१ साली ‘मोसाद’ची अधिकृतपणे स्थापना झाली. पण मोसादने आपली ताकद सिद्ध करण्यासाठी बराच काळ थांबावं लागलं. ही संधी तिला १९६७मध्ये लाभली. तेव्हा इजिप्त, सिरिया, जॉर्डन, इराक अशा सहा बलाढ्य अरब देशांनी इस्त्राईलविरुद्ध युद्ध सुरू केले. हा जगासाठी धक्का होता, पण इस्त्राईलसाठी नव्हता. त्याच्या वायुसैनिकांना आधीच याचा सुगावा लागला होता. त्यांच्याकडे अरब देशांच्या ३२ बेसची संपूर्ण माहिती होती. त्यामुळे फक्त सहा दिवसांत इस्त्राईलने हे युद्ध तर जिंकलेच, पण अरब देशांच्या जमिनींवरही कब्जा करायला सुरुवात केली. हा इतका मोठा विजय होता की, साऱ्या जगाची नजर इस्त्राईलकडे रोखली गेली. पुढे मोसादने इस्त्राईलला निराश न करता अनेक मोठमोठ्या योजना राबवल्या. त्यापैकी एक म्हणजे ॲडॉल्फ ऐचमनच्या अपहरणाची.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हिटलरच्या निधनानंतर काही नाझी कमांडर मारले गेले, काही भूमिगत झाले. त्यातला एक होता ॲडॅाल्फ ऐचमन. त्याला १९६०मध्ये मोसादने अर्जेंटिनामध्ये शोधून काढले. नंतर त्याच्यावर नजर ठेवण्यात आली आणि त्याच्याच घरासमोरून त्याचे अपहरण करून इस्त्राईलमध्ये आणण्यात आले. नंतर त्याच्यावर ज्यु लोकांच्या हत्येसंदर्भात खटला चालवला गेला, पण हा आश्चर्यकारक भाग नव्हता. आश्चर्यकारक हे होते की, त्याच्या अपहरणाचा सुगावा अर्जेंटिनाच्या सरकारला लागला नव्हता.

नंतर १९७२मध्ये ‘Wrath of God ऑपरेशन’ झाले. ज्याने मोसादीची वेगळी ओळख निर्माण झाली. या वर्षी इस्त्राईलचे खेळाडू म्युनिचमध्ये ऑलिम्पिकसाठी दाखल झाले होते. तिथे काही पॅलेस्टिनी अतिरेकी सुरक्षा यंत्रणेला धोका देत दाखल झाले आणि त्यांनी इस्त्राईलच्या ११ खेळाडूंना गोळ्या घालून ठार केले. या घटनेनंतर इस्त्राईल कसा शांत बसणार? मोसादने या मारेकऱ्यांना जगभरात शोधून काढून मारले. काही मारेकऱ्यांच्या पलंगाखाली बॉम्ब लावले, तर काहींच्या डोक्यात १२ गोळ्या घातल्या. ११ गोळ्या त्या ११ खेळाडूंच्या स्मृतीसाठी आणि एक गोळी इस्त्राईल सरकारकडून. यात त्यांचा संदेश स्पष्ट होता- ‘ईट का जवाब पथ्थर से’.

अशा प्रकारे १९७६चे आपरेशन थंडरबोल्ट, १९८१चे ऑपरेशन ओपेरा, १९८५चे ऑपरेशन मोसेज, अशा अनेक योजना मोसादने यशस्वरित्या पार पाडल्या. त्यामुळे जगातील शक्तिशाली देशांची नजर मोसादवर पडली. यापैकी एक म्हणजे अमेरिका. खरे तर १९५१ पासूनच अमेरिकेची मोसादवर नजर होती, पण १९५९मध्ये या दोन्ही देशांनी पहिल्यांदाच एकत्रितपणे एक योजना आखली, ती म्हणजे ‘ऑपरेशन डायमंड’. सोव्हिएत युनियनने त्या वेळेचे अत्याधुनिक युद्धविमान ‘मिग २१’ यशस्वीरित्या तयार केले होते. जगातल्या सर्व विकसित देशांची नजर या विमानावर होती. त्यामुळे अनेकांनी हे तंत्रज्ञान चोरण्याचा प्रयत्न केला, पण मोसादचा प्रवेश होईपर्यंत कोणालाही ते जमले नाही.

मोसादने योजना ‘ऑपरेशन डायमंड’ ही योजना आखली. १९६६ साली मोसादने ‘मिग २१’च्या एका वैमानिकाला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवले आणि अतिशय योजनाबद्ध रितीने ‘मिग २१’ विमान इस्त्राईलच्या वायुसेनेच्या अड्ड्यावर आणले. नंतर अमेरिकेच्या मदतीने त्याचा संपूर्ण अभ्यास केला. त्यामुळे सोविएतने चिडून मध्य-पूर्व देशांना भडकवून अतिरेकींना पाठबळ देणे सुरू केले. पुढे या अतिरेकी संघटनाचा मध्य-पूर्व हा अड्डा बनला. त्यांचे लक्ष होते इस्त्राईल.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अमेरिकेवर या आतंकी संघटनांनी छोटे छोटे हल्ले केले होते, पण मोठा हल्ला केला तो २००१मध्ये. तो आता ‘९/११’ म्हणून ओळखला जातो. या हल्ल्याने संयुक्त राष्ट्रंसुद्धा हादरले. यात दिवसाढवळ्या दोन विमाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींवर आदळली. त्याची भनक अमेरिकी गुप्तचर संघटना सीआयए आणि एफबीआयलादेखील नव्हती. त्यामुळे अमेरिकेचे पित्त खवळले. २००३मध्ये अमेरिकेने संयुक्त राष्ट्रे, ऑस्ट्रेलिया, इटली, स्पेन, पोलंड यांच्यासोबत ‘Librate Iraq campaign’ सुरू केले. त्या अंतर्गत अतिरेकी कारवाई समर्थन करणाऱ्या सद्दाम हुसेन सरकारला रोखण्याची योजना आखण्यात आली. पण त्यासाठी प्रशिक्षणाची गरज होती. हे प्रशिक्षण देण्याचे काम मोसादने केले. अमेरिकेने इस्त्राईलकडून युद्ध तंत्रज्ञान शिकून घेतले. जानेवारी २००३मध्ये अमेरिकेचा एक चमू इस्त्राईलच्या तेल अविवला पाठवण्यात आला. मोसादने आणि इस्त्राईलच्या आर्मी कमांडरने त्यांना प्रशिक्षण दिले. म्हणजे असे म्हणता येईल की, इस्त्राईलने सुरुवातीला अमेरिकेकडून घेतलेली मदत व्याजासहित परत केली.

२०२०मध्ये अमेरिकेने परत मोसादची मदत घेत मध्य-पूर्वच्या मिल्ट्री ऑपरेशन पाहणाऱ्या कासीम सुलेमानी याची हत्या केली. त्याची बगदाद विमानतळाबाहेर एका मिसाईलद्वारे हत्या करण्यात आली. कासिम सुलेमानीने त्या दिवशी आपले मोबाईल सीमकार्ड तीन वेळा बदलले, पण मोसादने इस्त्राईलमध्ये बसून त्याचे लोकेशन शोधण्यात अमेरिकेची मदत केली, आणि ही योजना यशस्वीरित्या पूर्ण केली. ही घटना इराणी लोकांसाठी इतकी दुखःद होती की, त्यांनी तीन दिवस शोक पाळला.

या सगळ्यामुळे असे म्हटले जाते की, एकदा का एखादे नाव मोसादच्या हिटलिस्टवर आले की, त्याचे जिवंत राहणे कठीणच असते. तर असा हा जगाच्या नकाशावर टिंबाएवढा दिसणारा इस्त्राईल नावाचा देश आपल्या ‘मोसाद’ या गुप्तचर संघटनेच्या जोरावर जगावर अधिराज्य गाजवतोय...

.................................................................................................................................................................

लेखक अनिरुद्ध राम निमखेडकर एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात.

aniruddhanimkhedkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......