‘द स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाईड’ : दुष्ट प्रवृत्तींचा विजय झाला, तर मग माणूस काय किंवा समाज काय, सर्वनाश होणारच…
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नितीन साळुंखे
  • ‘द स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईड’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 10 February 2023
  • ग्रंथनामा शिफारस द स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईड The Strange Case of Dr. Jekyll and Mr Hyde रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन Robert Louis Stevenson

मानवी मनाला गूढ गोष्टींचं कायम आकर्षण वाटत आलेलं आहे. ज्यांचा कार्यकारणभाव, परिणाम निश्चित माहीत नसतो, ते दुरून का होईना, पण निरखणं बहुतेकांना आवडतं. यामागे असलेली औत्सुक्याची भावना, काही वेळा मात्र सुरक्षेची सीमारेषा ओलांडायला माणसाला भाग पाडतं.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, मानसशास्त्र आताइतकं विकसित झालं नव्हतं, तेव्हापासून ते अगदी आजही मानवी मनोव्यापार समजावून घेण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे एखाद्या अंधाऱ्या गुहेच्या गूढ काळोखात डोकावण्यासारखंच आहे. सामाजिक नीतीनियम पाळत, मन मारत जगणारं एक मन असतं. आणि समाजाला धुडकावून स्वतःला हवं तसं जगू पाहणारं एक मन असतं. प्रत्येक व्यक्तिमत्त्वात हे द्वैत असतं. चांगल्या आणि वाईट अशा दोन मनांचा संघर्ष सतत चालू असतो. शक्यतो सामाजिक नियमांच्या चौकटीत चालण्याचा बहुतांश लोकांचा प्रयत्न असतो. पण काही लोक कधीतरी दुसऱ्या मनाच्या आहारी जातात. आणि मग सुरू होते अनपेक्षित, अतर्क्य घटनांची मालिका. सुरुवातीला त्या व्यक्तीला उन्मुक्त जगण्याचा आनंद मिळाला, तरी कालांतरानं हा आनंद ओसरत जातो. आणि त्या व्यक्तीसह तिच्या सहवासात आलेल्या अनेकांच्या वाट्याला येते असीम वेदना.

जगात सर्वांत जास्त अनुवाद ज्यांच्या लेखनाचे झाले आहेत, ‘वर्ल्ड क्लासिक्स’मध्ये ज्यांच्या लिखाणाचा समावेश होतो, अशा निवडक लेखकांपैकी एक, स्कॉटिश लेखक रॉबर्ट लुई स्टीव्हनसन. रोजचं जगणं जगत असताना प्रत्येक व्यक्तीच्या आत चांगल्या आणि दुष्ट प्रवृत्ती यांच्यात एकमेकांवरील प्रभावासाठी चालत आलेल्या आदिम झगड्याचं अंगावर येणारं चित्रण ‘द स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाईड’ या रूपककथेच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे. तरल, संवेदनशील लेखिका आणि वक्त्या सोनाली नवांगुळ यांनी या पुस्तकाचा त्याच नावानं अक्षरशः खिळवून ठेवणारा अनुवाद केला आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

अकरा प्रकरणांच्या या लघुकादंबरीच्या सुरुवातीला, ज्यांना घेऊन ही गोष्ट पुढे सरकत राहते, त्या अटरसन वकिलांची  ओळख होते. आणि ती कथा जेथे घडते, त्या वातावरणाचीसुद्धा. वातावरणसुद्धा या पुस्तकात प्रतीकात्मक रीतीनं वापरलं आहे. या वेळी ज्या उपमा वापरल्या आहेत, त्या वाचताना जी.ए. कुलकर्णी यांची आठवण येते. अर्थात, जीएंच्या उपमा म्हणजे घनदाट काळोखात बघण्याच्या प्रयत्नानं डोळ्यांच्या खाचा व्हाव्यात आणि चाचपडताना हात खरवडून रक्ताळावेत, आणि मग आपल्याच आतून एक अंधुक कवडसा बाहेर पडून पायाखालचा अणकुचीदार रस्ता क्षणभरासाठी झळाळून उठावा, असं वाटायला लावणाऱ्या असतात.

संपूर्ण काळ्या रंगात रंगवलेला, माणसाच्या मनातल्या वाईट प्रवृत्तींचा प्रतिनिधी, या गोष्टीतला खलनायक, एका रहस्यमय घरातून बाहेर पडणारा मि. हाईड याचा उल्लेख अटरसन आणि त्यांच्याबरोबर रस्त्यावर फेरफटका मारायला आलेले त्यांचे मित्र, या दोघांच्या बोलण्यात येतो. त्याच्याबद्दलच्या एकाच घटनेच्या वर्णनानं हा इतरांप्रमाणे करड्या नाही, संपूर्ण काळ्या, अमानुष मनोवृत्तीचा आहे, हे लक्षात येतं.

दुसऱ्या प्रकरणात ओळख होते चांगल्या प्रवृत्तीचे प्रतिनिधी, समाजात आदराचे स्थान असलेले डॉ. जेकिल या, या गोष्टीच्या नायकाची. हाईडने डॉ. जेकिल यांना ब्लॅकमेल करण्याचा कसा प्रयत्न चालवला आहे, हे वाचताना वाचक हळूच गूढ काळोखात जाऊन उभा राहतो. तिथं त्याच्यासमोर उभं राहत जातं मि. हाईडने डॉ. जेकिल यांना कैचीत पकडल्यानंतर घडत जाणारं करुण नाट्य. त्याच्या शेजारी उभे असतात, हे गूढ सोडवून त्यांचा मित्र डॉ. जेकिल यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे अटरसन वकील.

अटरसन वकील त्यांचे दुसरे समान मित्र डॉ. लान्योन यांना भेटतात. डॉ. जेकिल गेल्या दहा वर्षांपासून चमत्कारिक वागताहेत. विज्ञानाचा आधार नसलेली निरर्थक बडबड करताहेत, अशी डॉ. लान्योन यांची तक्रार आहे. यातून एक धागा तर मिळाला. पण त्याचं दुसरं टोक कुठं जोडायचं, हे अटरसन वकिलांना समजत नाहीये. अखेर त्या घरावर पाळत ठेवून अटरसन या मि. हाईडला गाठतातच. पण यातून डॉ. जेकिल यांच्याबद्दल अटरसन यांना वाटणारी काळजी वाढतच जाते.

अटरसनची अखेर डॉ. जेकिल यांच्याशी भेट होते. ते हाईडपासून दूर राहण्याबाबत जेकिल यांना परोपरीने सांगत राहतात. पण जेकिल यांच्या हट्टापुढे मान तुकवून अखेर, त्यांच्या इच्छापत्रानुसार, जेकिल यांचे काही बरं-वाईट झाल्यास जेकिल यांची सर्व इस्टेट हाईड याला देण्याची जबाबदारी पूर्ण करण्याचं वचन देतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

यानंतर शहरातलं आणखी एक मोठं प्रस्थ या हाईडच्या हल्याला बळी पडते. या वेळी मात्र जेकिल अटरसन यांना सांगतात की, आता याउपर माझा आणि त्या हाईडचा काहीही संबंध नाही. पोलिसांनी हाईडचा भूतकाळ खणून काढला, तेव्हा त्याच्या क्रौर्याच्या, निर्दय हिंसेच्या अनेक भयंकर गोष्टी समोर आल्या. पण हाईड जणू अदृश्य झाला. त्याच्या सैतानी सावलीतून बाहेर आल्यामुळे जेकिलसुद्धा पुन्हा माणसांत रमायला लागतात.

पण दोनेक महिन्यांनी जेकिल यांनी स्वतःला जणू कोंडूनच घेतलं. यानंतर अतिशय वेगवान घटना घडतात. त्या वेगानं भोवंडलेला वाचक अटरसनबरोबर जेकिलच्या घरी जातो. आणि जेकिलच्या खोलीचे दार फोडल्यावर त्याला समोर येतो तो लोळागोळा झालेला देह. हाईडचा. आणि अटरसन यांच्यासाठी दोन पत्रे. जेकिलची. त्यातलं एक आहे, जेकिलने त्यांची सगळी संपत्ती अटरसन यांना दिल्याचं. आणि दुसरं आहे…

ते मुळातच पुस्तकात वाचायला हवं. गूढ उकलतानासुद्धा अखेरच्या काही ओळींपर्यंत ते कायम ठेवण्याचं, आणि तोवर वाचकाला त्या सगळ्या घटनाक्रमात स्वतःबरोबर फरफटत नेण्याचं लेखक आणि अनुवादक या दोघांचंही कसब लक्षात राहण्यासारखेच. यशस्वी कथेचं एक परिमाण म्हणजे, ती वाचल्यावरसुद्धा आणखी बराच काळ मनात रेंगाळत, मध्येच डोकावत राहणे. हा परिणाम तर इथं साधला जातोच, पण लक्षात राहतो तो रूपकांच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला मानवी मनातला सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा, त्या मनावर ताबा मिळवण्यासाठी सतत चाललेला संघर्ष.

माणसाच्या मनात आणि समाजातही त्यावर ताबा मिळवण्यासाठी असाच या दोन प्रवृत्तींमध्ये सतत संघर्ष चालू असतो. अशा वेळी चांगल्याच्या बाजूनं असणारे अटरसनसारखे लोक, प्रवृत्ती बरोबर असणं आवश्यक. तसे ते नसतील, आणि यात दुष्ट प्रवृत्तींचा विजय झाला तर मग माणूस काय, किंवा समाज काय, सर्वनाश होणार, हे ठरलेलंच.

‘द स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाईड’ : रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन

मराठी अनुवाद : सोनाली नवांगुळ | डायमंड पब्लिकेशन्स, पुणे | मूल्य : १२५ रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5376/The-Strange-Case-of-Dr.-Jekyll-and-Mr-Hyde

.................................................................................................................................................................

नितीन साळुंखे

salunkheneetin@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......