ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क : वैज्ञानिक दृष्टीकोनाचे सार्वत्रिकीकरण
पडघम - विज्ञाननामा
विवेक माँटेरो - गीता महाशब्दे
  • ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’चे बोधचिन्ह
  • Tue , 07 February 2023
  • पडघम विज्ञाननामा ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क All India Peoples Science Network एआयपीएसएन AIPSN महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation National Scientific Temper Day राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar

‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ या संस्थेला ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिकेचा)चा २०२२चा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ मिळाला. तो त्यांना नुकताच, म्हणजे २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यात ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात आला. त्यानिमित्ताने प्रसिद्ध विनोदी साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) : स्मरणिका २०२३’मध्ये प्रकाशित झालेला हा लेख...

.................................................................................................................................................................

आयसॉन धूमकेतूच्या निमित्ताने एक राष्ट्रीय विज्ञान मोहीम आखली जात होती. बंगलोरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’मध्ये त्याची कार्यशाळा चालू होती. ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’चे देशभरातले विज्ञानकर्मी तिथे एकत्र जमले होते. दिवस होता २० ऑगस्ट २०१३. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण हत्येची धक्कादायक बातमी त्या विज्ञान संमेलनात येऊन थडकली. त्या दिवशी एकीकडे पुण्यात डॉ. दाभोलकरांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं होतं, ‘आम्ही सारे दाभोलकर’चे नारे दिले जात होते, आणि दुसरीकडे बंगलोरच्या AIPSNच्या संमेलनात पुढील ठराव पारित केला जात होता-

‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांचे कार्य आणि ध्येय पुढे नेण्याची आम्ही प्रतिज्ञा करत आहोत. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना, दिशाभूलीला आणि धर्मांध दहशतवादाला विरोध करणं आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणं हे कार्य आम्ही नेटाने आणि जोमाने पुढे नेऊ. आपल्या देशाच्या अनेक भागांमध्ये आज धर्मांध दहशतवादी कारवाया चालू आहेत. त्यामागे असलेल्या शक्तींना विरोध करण्याचा आम्ही निर्धार करत आहोत. भारतीय राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टीकोन, धर्मनिरपेक्षता, समानता आणि लोकशाही मूल्ये मजबूत करून आपल्या देशातील प्रत्येक शाळेपर्यंत, गावा-खेड्यापर्यंत नेण्यासाठी आम्ही कार्यरत राहू.

ज्यांनी गांधीजींचा खून केला ते गांधीजींची तत्त्वे आणि विचार थोपवू शकले नाहीत. त्याचप्रमाणे डॉ. दाभोलकरांच्या या भ्याड खुनाने त्यांची मूल्ये आणि विचार थांबवता येणार नाहीत. ‘लोकविज्ञान चळवळी’त कार्यरत असलेले आम्ही सर्व जण जास्त निग्रहाने आणि जोमाने विज्ञान आणि वैज्ञानिक विचारपद्धतीचा प्रसार करू. चळवळ जास्त व्यापक करून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आम्ही प्रतिगामी सांप्रदायिक शक्तींना हरवू आणि ही विचारांची लढाई जिंकू.”

त्यानंतर दोन वर्षांनी एप्रिल २०१५मध्ये बंगलोरला AIPSNचं अधिवेशन होतं. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणं आणि त्याचं सार्वत्रिकीकरण करणं, यांतील फरकावर त्यात सखोल चर्चा झाली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

देशाच्या राज्यघटनेत वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्पष्ट उल्लेख असलेला कदाचित भारत हा एकमेव देश असावा. घटनेच्या ‘कलम ५१ अ’मध्ये भारतीय नागरिकांची कर्तव्यं दिलेली आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणं, हे एक कर्तव्य म्हणून त्यात नोंदलेलं आहे. या कलमासाठी न्यायालयात जाण्याची तरतूद नसली, तरीही ‘कलम २१ अ’ने गुणवत्तापूर्ण शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क म्हणून दिलेला आहे. त्यानुसार गुणवत्तापूर्ण विज्ञान शिक्षणाचं, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोनाचं सार्वत्रिकीकरण कायद्याने बंधनकारक झालेलं आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोनाचं सार्वत्रिकीकरण हे आता केवळ नागरिकांचं कर्तव्य नाही, तर ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांचा म्हणजे जवळपास २० कोटी भारतीय नागरिकांचा तो मूलभूत अधिकार झालेला आहे. म्हणजे आता ते अनिवार्य आहे.

परंतु सार्वत्रिकीकरण खरंच शक्य आहे का? ते शक्य केल्याचा, प्रत्यक्षात आणल्याचा अनुभव आपल्याकडे आहे. देवी, पोलिओ यांसारख्या भयानक रोगांचा आपण सार्वत्रिक लसीकरणाद्वारे संपूर्ण नायनाट केला आहे. अनेक देशांनी सार्वत्रिक साक्षरता साधलेली आहे. सर्व जातीधर्मांतील जवळपास प्रत्येक मुलगा आणि मुलगी आज शाळेच्या पटापर्यंत तरी पोहोचलेले आहेत. शाळेत प्रवेश घेणं सार्वत्रिक होण्याच्या टप्पात आलं आहे. त्यामुळे वरील प्रश्नाचं उत्तर ‘होय, सार्वत्रिकीकरण शक्य आहे!’ असं आहे. परंतु, वैज्ञानिक दृष्टीकोनाचं सार्वत्रिकीकरण शक्य आहे का?

त्यासाठी घटनेतलं वैज्ञानिक दृष्टीकोनाचं कलम आणि शिक्षण हक्काचं कलम एकत्रितपणे पाहणं आवश्यक आहे. ‘शिक्षण हक्क कायदा’ आणि ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५’ हे शिक्षण हक्कासंबंधीचे कायदेशीर दस्तावेज आहेत. यानुसार ‘प्रत्येक बालकाचं आठवीपर्यंतचं गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण होणं आणि मुलांना केवळ संधी नाही तर निष्पत्तीची समानता मिळणं’, याची शासनावर कायदेशीर सक्ती आहे. शाळेत प्रवेश घेण्याच्या फार पुढची आणि दमदार अपेक्षा आहे ही. या उद्दिष्टापासून आपण अजून कोसो दूर आहोत. तरीही सध्याच्या शासनाने घड्याळाचे काटे उलटे फिरवलेले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सार्वत्रिक निष्पत्तीची भाषा सोडून देऊन २०२०चं नवं शैक्षणिक धोरण केवळ प्रवेशाच्या संधीची भाषा बोलत आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोनाचं सार्वत्रिकीकरण राष्ट्रीय अजेंड्यावर आणण्यासाठी ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ आणि ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने मिळून डॉ. दाभोलकरांचा ‘शहीद दिन’ हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. ‘विचारा, का?’ (Ask Why) हे या मोहिमेचं घोषवाक्य आहे. आता अनेक संस्था, संघटना, शाळा, राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस साजरा करतात. त्यांच्या जाळ्यांद्वारे बहुतांश राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचे हजारो कार्यक्रम शाळांमध्ये, संस्थांमध्ये, गावांमध्ये, वस्त्यांमध्ये होतात. लाखो लोक यात सहभागी होतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ हे भारतभरातील लोकविज्ञान संघटनांचं नेटवर्क आहे. भारतातील लोकविज्ञान चळवळीचा पाया घातलेली ‘केरळ शास्त्र साहित्य परिषद’, प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांचं जाळं असलेल्या लाखोंची सदस्यसंख्या असलेल्या ‘विज्ञान संघटना’, अनेक राज्यांमध्ये असलेलं ‘भारत ज्ञानविज्ञान समिती’चं जाळं, काही नमुन्यादाखल नावं घ्यायची तर, ‘पश्चिम बंगाल विग्यान मंच’, ‘तामिळनाडू सायन्स फोरम’, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामधील ‘जनविग्यान वेदिका’, ‘कर्नाटक राज्य विज्ञान परिषद’, महाराष्ट्रातील ‘नवनिर्मिती गट’, ‘पाँडिचेरी सायन्स फोरम’, ‘मध्य प्रदेश विग्यान सभा’, ‘छत्तीसगड विग्यान सभा’, हिमाचलमधील ‘ग्यानविग्यान समिती’, बिहार, ओरिसा, राजस्थान, मणिपूर आणि नागालँडमधील ‘भारत ज्ञानविज्ञान समुदाय’, ‘हरयाणा विग्यान मंच’, ‘दिल्ली सायन्स फोरम’, ‘त्रिपुरा विग्यान मंच’, ‘आसाम साहित्य सभा’ आणि ‘एलोरा विग्यान मंच’... ही AIPSNच्या सदस्य संघटनांची फक्त काहीच नावं आहेत.

डॉ. दाभोलकरांचा ‘शहीद दिन’ हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस’ म्हणून निवडणं हे अगदीच आपसूक आणि समर्पक होतं. निसर्गविज्ञान शिकताना जरी आपण विज्ञानाची पद्धत शिकत असलो, तरीही वैज्ञानिक दृष्टीकोन हा केवळ निसर्गविज्ञानापुरता मर्यादित नाही. वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारणं म्हणजे आपलं आयुष्य अधिक चांगलं जगण्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाची पद्धत लागू करणं. मानवी आणि सामाजिक प्रश्नांकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहणं महत्त्वाचं. सामान्य जनतेबरोबर व्यापक स्तरावर काम करणं त्यासाठी आवश्यक आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोनाचं सार्वत्रिकीकरण करण्यासाठी कशा प्रकारे काम करायला हवं, याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर. ‘जेवढा पुरावा, तेवढा विश्वास’, ही वैज्ञानिक दृष्टीकोनाची त्यांनी केलेली चार शब्दांची व्याख्या. इतकी संक्षिप्त, नेमकी आणि प्रभावी व्याख्या दुसरी नसेल.

डॉ. दाभोलकरांची वैज्ञानिक दृष्टिकोनावरची दोन व्याख्यानं AIPSNने इंग्रजीत भाषांतरित केली. २०१८मध्ये पत्रकं किंवा पुस्तिका रूपात ही व्याख्यानं मल्याळम, तामिळ, तेलुगु, हिंदी, बंगाली, असामी अशा अनेक भाषांमध्ये वितरित केली गेली. डॉ. दाभोलकरांचे इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये डब केलेले व्हिडिओ, पण वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये ‘वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस’ साजरा होणं, हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. पण सार्वत्रिकीकरणाच्या कार्याच्या मानाने ते एक लहानसं पाऊल आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

‘विचारा, का?’ या घोषवाक्याचा वापर करून या मोहिमेद्वारे वास्तवाबाबतचे प्रश्न विचारायला नागरिकांना प्रोत्साहित केलं जातं. विद्यार्थ्यांमधील उपजत जिज्ञासेला खतपाणी घातलं जातं. वैज्ञानिक दृष्टीकोन हा विज्ञानाच्या पद्धतीवर आधारलेला आहे आणि प्रश्न विचारणं हा त्याचा गाभा आहे. आजच्या विषारी राजकीय वातावरणात शासनाच्या धोरणांबाबत प्रश्न विचारणं नाउमेद करणारं आहे, प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोही म्हटलं जात आहे.

या विपर्यासाला AIPSN कृतिशील ठाम उत्तर देत आहे. आपण देशभक्त असणं म्हणजे काय? तर नागरिकांसाठी आपल्या घटनेने घालून दिलेली कर्तव्यं पार पाडणं. ‘कलम ५१अ’ नुसार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडायचं असेल तर प्रश्न विचारले पाहिजेत. हीच खरी देशभक्ती आहे. आपल्या देशातली लोकशाही वाचवण्यात आणि ती बळकट करण्यात वैज्ञानिक दृष्टीकोनाचं सार्वत्रिकीकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणं हा चांगल्या विज्ञान शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण विज्ञान शिक्षणात यशस्वी होणं, ही वैज्ञानिक दृष्टीकोनाची पायाभरणी ठरेल. परंतु ‘शिक्षण हक्क कायद्या’ला दहा वर्षं होऊन गेली, तरीही देशात कोठेही शिक्षणातल्या गुणवत्तापूर्ण निष्पत्तीकडे लक्ष दिलं गेलेलं नाही.

आजच्या काळात ‘शिक्षण हक्क कायद्या’ची आणि ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५’ची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी पार पाडणं आणि पुढे नेणं हे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या सार्वत्रिकीकरणासाठी आवश्यक आहे. भारताच्या राज्यघटनेतील मूल्यांशी बांधीलकी मानणाऱ्या शाळा आणि त्यांच्या व्यवस्थापनांच्या सहकार्याशिवाय हे घडवणं अवघड आहे. या शाळांचं सहकार्य असेल, तर वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या बाबतीत मोठी प्रगती साधता येईल. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात आपण राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून हे काम पुढे नेऊया.

.................................................................................................................................................................

ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कविषयी...

१९८७च्या ‘भारत जनविज्ञान जथ्या’नंतर भारतभरातील विज्ञान कार्यकर्ते एकमेकांच्या जास्त संपर्कात राहून काम करू लागले आणि ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’चा जन्म झाला. साक्षरता मोहिमेत एआयपीएसएनचं जाळं वाढत गेलं. सूर्यग्रहणं, शुक्राचं अधिक्रमण, कॉमेट आयसॉन, शून्य सावलीचा दिवस यासारख्या खगोलीय घटनांच्या वेळी भारतभर आपण कार्यक्रम करतो. शिक्षण, आरोग्य, आत्मनिर्भर विकास, उपजीविका, समता, शेती, पर्यावरण व सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये AIPSN काम करते.

सविस्तर माहितीसाठी वेबसाईट व सोशल मीडिया हँडल्स पुढीलप्रमाणे :

Websites : www.aipsn.net, www.aipsn.in

Twitter - @gsaipsn

Facebook- https://www.facebook.com/theAIPSN

YouTube- AIPSN Media, @aipsnmedia841

Instagram- https://www.instagram.com/aipsnmedia/

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......