बा लेखका, कोणाचा घोडा नको होऊस! तुझ्यावरचा स्वार जिंकेल अन् तुला वाटेल तू जिंकलास!!
पडघम - साहित्यिक
जयदेव डोळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 27 January 2023
  • पडघम साहित्यिक लेखक लेखकराव कवी कवयित्री पुरस्कार प्रकाशन संस्था

येत्या ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान वर्ध्यात ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रसिद्ध लेखक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली भरते आहे. सत्ताधारी तिथे स्वातंत्र्य, बांधीलकी, दायित्व, निष्ठा यांची साद घालतील. अध्यक्षही ग्वाही देतील, पण लेखक निरनिराळ्या प्रवृत्तींनी वेढला गेलेलाय. त्या निमित्ताने....

.................................................................................................................................................................

काय भारी तत्त्वज्ञान सांगितलंय असं वाटेल कुणाला. तसं काही नाही. आपण काय तत्त्वज्ञान शिकवत नसतो. पाजळण्याची बातच नाही. पण एक लक्षात आलं म्हणून सांगावंसं वाटतंय. ते तत्त्वज्ञान वाटलं तर घ्या वाटून. प्रत्यक्षात तो एक अनुभव आहे. म्हणजे घोडा हे एक प्रतीक आहे. शर्यत हे एक वास्तव आहे. विजयी होण्यात एक राजकारण आहे. आता राजकारण कुठे नसतं? त्याला आपली हरकत नाही. लेखकसुद्धा राजकारण करतोच. कधी त्याच्या पात्रांमध्ये, कधी त्याच्या पात्रांकडून, तर कधी घटना घडवून अप्रत्यक्षपणे सूचवून. मात्र हे राजकारण वेगळं अन् लेखकानं स्वत:चा राजकारणात वापरू होऊ देणं वेगळं. म्हणून म्हणतो की, घोडा होणं, स्पर्धेत उतरणं अन् जिंकण्यासाठी भलतंसलतं करणं लेखकाला झेपत नसतं. त्याचा वापर केला जातो. त्यालासुद्धा मजा वाटते. पण जिंकत तो नाही, तर त्याला दौडवणारे, त्याच्यावर आपलं राज्य कायम राखणारे जिंकतात.

कोण असतात असे? असतात. खूप लोक आहेत. मराठी साहित्य व्यवहारात तर तसे पुष्कळ आहेत. प्रकाशक असतात. समीक्षक असतात. लेखक असतात. लेखकांचे चाहते वाचक असतात. लेखकाला घडवलं, असा दावा करणारे असतात. मित्र असतात. जातीचे, धर्माचे, गावचे, प्रदेशाचे असतात. झालंच तर सरकारी-बिनसरकारी साहित्यिक संस्थांवरचे मान्यवर असतात. राजकीय पक्ष, राजकीय विचार, राजकारणी असे सारे असतात.

बापरे! मग राहतं कोण मागं? बायको, मुलं, आई-वडील, नातलग, मित्र हेही असतात. परंतु या लोकांना आपला माणूस घोडा करावा, असं वाटत नसतं. उदाहरणार्थ, आपला मुलगा किंवा मुलगी अतिशय चांगली साहित्यिक असल्याचा प्रचार कोण्या परमपूज्य पित्यानं अथवा मातेनं केल्याचं ठाऊक आहे कुणाला? आपल्या लेकराच्या वाङ्मयीन वलयनिर्मितीसाठी मात्या-पित्यांनी चर्चासत्रं, परिसंवाद, निबंधस्पर्धा इत्यादी आयोजित केल्याच स्मरत नाही बुवा. हां, विख्यात साहित्यिकांच्या पोटी त्यांच्याइतकेच तोलामोलाचे साहित्यिक अपत्य निपजल्याचं महाराष्ट्रानं फार कमी वेळा पाहिलंय.

म्हणजे वंश, वारसा, परंपरा, घराणं असं वाङ्मयविश्वात फार दुर्मीळ. प्रकाशन व्यवसाय बऱ्यापैकी घराणेबंद आहे. पुस्तकविक्रीदेखील परंपरागत चालत आलेली, पण साहित्यनिर्मिती? नाही बुवा तसं काही सर्रास आढळत. उलट, लेखन हा दळभद्री धंदा असल्याचाच प्रत्यय पुढच्या पिढीला येतो अन् ती कधीही लेखन-वाचनादी व्यवहारात पडत नाही. म्हणजे लेखक या नात्यानं आपल्या घरात एखादं घोडं असावं अन् त्यानं पूर्वजांचं नाव आपल्या दौडीनं सतत सर्वतोमुखी करत राहावं, हे कुणीही अपेक्षिलेलं दिसत नाही. मुळात मराठी साहित्यव्यवहार तो केवढा अन् त्यातून होणारी कमाई ती केवढी!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मराठीत पूर्णवेळ लिखाण करून जगता येईल, अशी शक्यताच नाही. पुस्तकं विकत घेऊन वाचणारे किती अन् लेखक मानधनातून कमाई करतो किती, याचा काहीही पुरावा नाही. पुणे व मुंबई या दोन शहरांत लेखक म्हणून जगून दाखवणारे मूठभर सापडतील लोक. पण त्यातला कुणी बिनलग्नाचा, कुणी बायकोच्या नोकरीवर टिकून राहिलेला, कुणी वडिलोपार्जित संपत्तीच्या जिवावर, तर कुणी शेतीच्या उत्पन्नावर उभा ठाकलेला. लेखिका तर अशक्य. असल्याच कुणी तर त्याही अविवाहित, पूर्वसंचितावर जगणाऱ्या आणि व्याख्यानं, संपादनं, अनुवाद यावर कमाई करणाऱ्या. लिहिता लिहिता प्रकाशनाच्या धंद्यात शिरलेल्या बाया आणि बाप्ये यांची संख्याही बरी आहे. मग त्यांना लेखनामुळे ओळखणे कठीण होऊन जाते.

असो. लेखकाभोवती जगणाऱ्या काही गोष्टींची दखल आपण घेतली. लेखक जगतो कसा वगैरे बाबी समीक्षकांनाच औत्सुक्याच्या वाटत असतात. लेखन हा एक व्यवसाय असून तो अन्य व्यवसायांसारखा असतो, असे म्हणायची सोय मराठीत नाही. कारण तो किंवा ती शिक्षक, प्राध्यापक, बँकर, डॉक्टर इत्यादी मूळ व्यवसायातून वेळ काढून लेखन करत असतात. बहुतेक लेखक हौस म्हणून अथवा विरंगुळा, खाज अथवा जोडधंदा म्हणून लेखनात असल्याने त्यांचं जगणं तसंही कुणाच्या कुतूहलाचं कारण नसतं.

.................................................................................................................................................................

मग काय, दिवसभर अंगठ्यांची वाहतूक आणि पुढं धाडायची वरात चालू होते. या उपकरणांनी एकजात सारे ‘फॉरवर्ड’ बनतात, ‘बॅकवर्ड’ एकही नसतो! एवढंच नाही राहत. प्रतिध्वनींचा एक ऑर्केस्ट्रा तयार होतो. या वाद्यवृंदात दोन वाद्यं अनेक जणांच्या हात-तोंडात असतात. एक ढोल अन् दुसरं तुतारी! केवळ दोन वाद्यांचा ऑर्केस्ट्रा अन्य कुणाच्याही सुरेल सुरावटींचा सत्यानाश करू शकतो. आयताकृती त्या चपट्या पेटीत सारेच तज्ज्ञ असतात. उघड आहे, मग त्यांच्यापुढं खरेखुरे तज्ज्ञ ‘तज्ज्ञ’च नसतात!

.................................................................................................................................................................

मराठीमध्ये अशा लेखकांनी स्वत:बद्दल काही लिहिलं तरच लोकांना ते कळतं. अन्यथा लोक काही तुमचं आयुष्य आम्हाला उलगडून दाखवा ना, असा आग्रह धरत नाहीत. मी व्यावसायिक लेखक होणार, पूर्णवेळ लेखन करणार, अशी प्रतिज्ञा मराठीत कुणी करत नाही. मुलींना तर असा विचार करणंसुद्धा मना आहे. बहुतांश लेखक व्याख्याते म्हणून थोडीफार गुजराण करू शकतात. विषय कोणता का असेना, हे बोलणार आणि मराठीवरच्या प्रभुत्वामुळे श्रोते गुंगवून ठेवणार. पण तिथंही स्पर्धा तुंबळ!

तसं पाहता लेखक, कवी कवयित्री यांची वैयक्तिक, खाजगी आयुष्यं आणि त्यांच्या कलाकृती यांत अंतर ठेवण्याचा कटाक्ष मराठी वाचक पाळतो. व्यसनांपासून ते घरातल्या घडामोडींपर्यंत साहित्यिकांच्या व्यक्तिगत जीवनातल्या त्या साऱ्या बाबी असतात. त्यांचा अडसर त्या त्या साहित्यिकांच्या कलाकृतींच्या प्रसार-प्रचार यांना होऊ नये. जात, धर्म, जिल्हा, विवाह, मुले, नातेसंबंध, नोकरी आदी घटक लेखनकृतीच्या लोकप्रियतेसाठी वा विरोधासाठी करणं गैर आहे. इतक्या वैयक्तिक गोष्टी जर अपात्र असतील तर सत्ता, अधिकार, पक्ष, संघटना याही वर्ज्य असल्या पाहिजेत!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सबब, मराठी लेखक व लेखिका पूर्णपणे निर्जंतुक आणि पारदर्शक आशयनिर्मितीत उतरतात. या प्रकाराला तटस्थ, नि:पक्ष वगैरे विशेषणं ते चिकटवतात. एखाद्या ख्रिस्ती वा मुस्लीम लेखकानं काही लिहिलं की, असं म्हटलं जाणार की, ‘बघा, एक अल्पसंख्य भवतालाकडे कसं बघतो’. दुसऱ्यांदा ते असं म्हणणार की, ‘बघा, अल्पसंख्याक असूनही त्यांचा जगाकडे बघायचा दृष्टीकोन स्वच्छ व निधर्मी आहे’.

याच अंगानं लेखक-लेखिका यांच्या जाती आणि वर्ग यांकडे बोट दाखवलं तर खपेल का ते? म्हणजे, पहा, ब्राह्मण असूनही लेखक बहुजनांची समान दृष्टीनं हाताळणी करतोय. दुसऱ्या अंगानं असं म्हणता येईल की, लेखकाची सामाजिक उत्पत्ती त्याच्या निर्मितीमागे लख्ख दिसून येते. तो पक्क ब्राह्मणी दिसतो! अशा दुहेरी व दुटप्पी प्रतिक्रिया कायम उमटणार. त्यातही समीक्षक कुठलाय, कोणत्या जातीवर्गाचा या बाबतीत तर अटीतटीची वेळ येते.

गेल्या डझनभर वर्षांत भारतभर लेखक अमाप उत्पन्न झाले. त्यांना इंटरनेटजन्य लेखन-वाचन मंचांनी लेखक, वाचक, प्रचारक, विचारक, समीक्षक, परीक्षक, निरीक्षक, तत्त्वज्ञ, मर्मज्ञ, सर्वज्ञ, मीमांसक, अभ्यासक, संशोधक वगैरे विशेषणांनी ओळख प्राप्त झाली. त्यांना जे मंच मिळाले, त्यांना सोशल मीडिया असं म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात ते अवघे ‘कम्युनल’ असतात. ‘सोसायटी’पेक्षा ‘कम्युनिटी’ हे नाते त्यांना बांधून ठेवते.

लेखकांची एवढी उत्पत्ती म्हणजे केवळ मोठं लोकशाहीकरण, किती थोर विकेंद्रीकरण, अशी स्तुती करत या मंचांच्या मालकांनी आपली अफाट धन केलीय. पण थोड्याच दिवसांत ही लोकशाही अगदी भारतीय समाजव्यवस्थेप्रमाणे जात, पोटजात, धर्म, पंथ, गोत्र, गाव, जिल्हा, प्रदेश, भाषा, लिंग, वर्ग, पक्ष, गट, संघटना, शिक्षण, देवदेवता, नेते, राजकीय विचारसरणी, आदर्श, चाहते वगैरे छोट्या छोट्या घोळक्यांत खांडोळी झालेली आढळून येते.

पुन्हा थोड्या काळात ही लोकशाही ‘प्रतिध्वनी सभागृहां’त उठबस करू लागते. मग काय, दिवसभर अंगठ्यांची वाहतूक आणि पुढं धाडायची वरात चालू होते. या उपकरणांनी एकजात सारे ‘फॉरवर्ड’ बनतात, ‘बॅकवर्ड’ एकही नसतो! एवढंच नाही राहत. प्रतिध्वनींचा एक ऑर्केस्ट्रा तयार होतो. या वाद्यवृंदात दोन वाद्यं अनेक जणांच्या हात-तोंडात असतात. एक ढोल अन् दुसरं तुतारी! केवळ दोन वाद्यांचा ऑर्केस्ट्रा अन्य कुणाच्याही सुरेल सुरावटींचा सत्यानाश करू शकतो. आयताकृती त्या चपट्या पेटीत सारेच तज्ज्ञ असतात. उघड आहे, मग त्यांच्यापुढं खरेखुरे तज्ज्ञ ‘तज्ज्ञ’च नसतात!

.................................................................................................................................................................

बघ बाबा, लेखका, स्वार व्हायची धडपड! कशासाठी तर म्हणे घोड्यांच्या पाठी बसून सत्ताधाऱ्यांच्या अन् त्यांच्या राजकीय सिद्धान्तांच्या विरोधात जे जे असतील, त्यांची जिरवायची. उच्च साहित्य संसदेत म्हणे एका टोळीचा ताबा होता. ती डाव्यांची व समाजवाद्यांची होती! त्यांना ही उजवी मंडळी ‘पुरोगामी’ म्हणत हिणवतात. काय लबाडीय बघा, उजव्यांची मांड उच्च साहित्य संसदेवर बसावी म्हणून ती डाव्यांच्या कब्जात होती, असा कांगावा या लोकांचा! ते मोठमोठे लेखक काय दुसऱ्यासमोर बसून त्याचं डिक्टेशन घेत लिहीत होते? त्यांनी काय समाजवादाच्या प्रचार केला की, भांडवलशाहीला विरोध? ते काय काँग्रेसचे होते की, कामगार संघटनेचे? ज्यांना ज्यांना त्या उच्च साहित्य संसदेनं आजवर गौरवलं, ते काय क्रांतिकारक म्हणायचे की अतिरेकी?

.................................................................................................................................................................

आपलं मत हेच वैश्विक सत्य असून आपण त्या काचेवर बोटांच्या अग्रांनी जो अग्रलेख लिहितो, तो वज्रलेप असल्याची खात्री दणादण आलेल्या प्रतिध्वनींनी दिलेलीच असते. बिचारी मराठी भाषा! तिचा एकेक शब्द जिव्हाग्रांनी वेचून वेचून थुंकला जाताना, ती त्या भीषण अर्थफेकीत बेजार अन् कानकोंडी होऊन जाते. ‘हेच काय ते आपले सुंदर रूप? हीच काय ती माय मराठी?’ असा स्वत:बद्दल तिचा भ्रम होऊ लागतो. मग भ्रमिष्टावस्थेत तीही आपले सर्वस्व त्यागून नागवी उभी राहते. अणकुचीदार, धारदार आणि टणक शब्द टिपत तीही अंगावर तुटून पडते. ‘मार्च फॉरवर्डस’ची आज्ञा झाल्याप्रमाणे आता माघार नाही, आता दमायचं नाही, अशा तयारीनं आपली भाषामाय समोरच्याला पुरतं घायाळ केल्याशिवाय थांबत नाही. तिच्या अंगावर रक्ताचे थेंब उडाले तर तिची फेकाफेक चालूच राहते. तर्क, सूत्र, मुद्दा यांची शुद्ध केव्हाचीच हरपलेली असते. मायभाषाही जायबंदी झालेली असते. पण चवताळलेलं तिचं बेभान रूप तिला माघार घेऊ देत नाही. आणखी चेव आणून आणून तिची दगडफेक चालूच राहते.

बा लेखका, या लढाईत तू कुठायंस कळलं का तुला? तू शिकार करायचा तो ससाही होतोस अन् ज्याच्याकडून ती करायची तो शिकारी कुत्राही तूच. आपली शेपटी चावायला गरगरा फिरणारा एखादा कुत्रा पाहिलास कधी? स्वत:कडे पाहिलंस तर तुला समजेल की, या प्रचंड धुमश्चक्रीत लेखका, तुझा पुरेपूर वापर केला गेलेलाय. जखमी कोण कोण झालं? अरे, तूच लेका तूच! मारामारीच्या धुंदीत तुझं तुलाच उमजेना की, रक्तबंबाळ आपणच झालोयत.

ते तर झालंच, पण इज्जत? तिच्या तर चिंध्या चिंध्या झाल्या की रं बाबा! तुझा तो लेखकीय बाणा भावनांच्या भरात तू बाजूला ठेवलास अन जातीच्या, लोकप्रियतेच्या, भक्तांच्या आणि वाचकांच्या चिथावण्यांच्या आहारी गेलास. ते भुरटे प्रकाशक बघतोयसना ना? लेखक घडवल्याची घमेंड मिरवणारे ते भुक्कड? सावध रे बाबा, सावध. फुकटची दारू व सामीष खमंग जेवण यांसाठी ते तुझ्यासारख्या अनेक लेखक-कवींना उचकवत असतात कुणा कुणा विरोधात. लेखकाकडून पैसे घेऊन पुस्तकं खपवणाऱ्यांची एक टोळी निरनिराळ्या रूपांनी लेखकाला घेराव घालते. त्याला फशी पाडते, वश करते.

लेखकाला लुबाडून आपली जिंदगी फुलवणारे असे ‘मेंटर पब्लिशर’ रग्गड उगवलेत बाबा देशात! हे परप्रकाशित लुच्चे लेखकाला झुलवत ठेवतात. कसं? ‘तुमचं पुस्तक अमूकढमूक पुरस्कारासाठी पाठवलंय, समितीतला तो माझ्या बैठकीतला आहे, त्याला मी बोललोय! अमूकतमूक संस्थेचे अध्यक्ष आपल्याच जातीचे आहेत, ते कन्सीडर नक्की करतील तुमचं पुस्तक’, अशा बाता मारून हे बिनकामाचे, बिनकण्याचे लाचार लोक लेखकाला आजन्म ‘मामा’ बनवत राहतात.

.................................................................................................................................................................

तुझ्या लेखनातून आणि कधीमधी तुझ्या भाषणांमधून त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची तूच हजेरी घ्यावीस, असा खेळ ते खेळतात. तुझ्या खांद्यावर त्यांची बंदूक! त्यांचा निशाणा, तुझी शिकार. तुला आसुरी आनंद मिळू दिला एखादी शिकार केल्याचा की, ती तुझ्या नावावर जमा होऊन तुझा म्हणे लौकिक वाढणार! प्रत्यक्षात फायदा त्यांचा झालेला असतो. निंदा करायला त्यांना एक माणूस मिळतो. हे मागेच लपून राहतात. हळूहळू एक निंदक म्हणून, एक चिडखोर म्हणून आणि एक मत्सरी म्हणून तुझी प्रसिद्धी होते. पिछाडी मात्र प्रसन्न होते.

.................................................................................................................................................................

लक्षात असू दे लेखका! लेखकाचा ‘लेखकराव’ आणि लेखिकेची ‘सरस्वती’ करणारे असे खुशामतखोर हमखास संध्याकाळच्या सुमारास उगवतात. चहाड्या, लावालाव्या, कुरापती, किस्से, कुलंगड्या, भानगडी यांचा कुच्चरओटा तयार करतात. कल्पनाशक्तीचा खेळ करणाऱ्या नि:शंक, निरागस मनावर ईर्ष्या, त्वेष, स्पर्धा, मत्सर, तिरस्कार यांचा मारा करतात. शर्यतीचा घोडा असा त्यांच्या तबेल्यात तयार केला जातो. अशा बनावटांचा खरारा करवून घेणारा घोडा, मग धावायला सज्ज झाला की, त्याला आणखी एक तोबरा पेश केला जातो.

बा लेखका, लगेच ‘जजमेंटल’ व्हायचा स्वभाव असेल ना तुझा की, फावलेच बघ अशा झोंब्यांचं. तुला विचार करायला वेळच मिळू द्यायचा नाही, अशी चाल या लोकांची असते. कान भरणं झालं की, तुझ्या लेखनातून आणि कधीमधी तुझ्या भाषणांमधून त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची तूच हजेरी घ्यावीस, असा खेळ ते खेळतात. तुझ्या खांद्यावर त्यांची बंदूक! त्यांचा निशाणा, तुझी शिकार. तुला आसुरी आनंद मिळू दिला एखादी शिकार केल्याचा की, ती तुझ्या नावावर जमा होऊन तुझा म्हणे लौकिक वाढणार! प्रत्यक्षात फायदा त्यांचा झालेला असतो. निंदा करायला त्यांना एक माणूस मिळतो. हे मागेच लपून राहतात. हळूहळू एक निंदक म्हणून, एक चिडखोर म्हणून आणि एक मत्सरी म्हणून तुझी प्रसिद्धी होते. पिछाडी मात्र प्रसन्न होते.

तुझा कसला दमदार घोडा केलाय, असा जल्लोष हे लोक करू लागले की, तुही कदमतालच्या टापा वाजवत आनंद व्यक्त करतोस. जोरजोरात खिंकाळतोस. आयाळ हलवून दाखवतोस. कधी पुढचे पाय, तर कधी मागचे पाय हवेत भिरकावतोस. दुडक्या चालूनं रिंगणभर धावतोस. मग हे तुझे तथाकथित प्रेरणास्त्रोत व स्फूर्तीस्थानं आश्वस्त होऊन जातात.

पिल्लू आता चांगलंच हातात आलंय, याची खात्री त्यांना पटते. त्यांना त्यांचा सूड घ्यायला तुझा वापर करायचा असतो. त्यांचं लेखक म्हणून जाहीर झालेलं अपयश ते तुझ्या गौरवातून भरून काढतात. ज्यांनी त्यांना लेखक म्हणून नाकारलं त्यांच्या हातून तुझे सत्कार करवण्यात ते आपलं यश मानू लागतात. ज्या ज्या समीक्षकांनी त्यांची कलाकृती वाईट असल्याचं स्पष्ट सांगून टाकलं, त्यांना तुझं कोडकौतुक करायला ते भाग पाडतात.

असा परस्पर प्रशंसेचा घाट घालून तुझा पुरेपूर उपभोग ते घेतात. आपली फडतूस प्रकाशनसंस्था (सगळा कारभार हे एकटेच बघत असले, तरी त्या प्रकारास ते संस्थाच म्हणणार!) तुझ्या, बा लेखका, निमित्तानं नादी लागलेल्या हावऱ्या लेखक-कवींच्या गळी उतरवतात.

.................................................................................................................................................................

बा लेखका, या लढाईत तू कुठायंस कळलं का तुला? तू शिकार करायचा तो ससाही होतोस अन् ज्याच्याकडून ती करायची तो शिकारी कुत्राही तूच. आपली शेपटी चावायला गरगरा फिरणारा एखादा कुत्रा पाहिलास कधी? स्वत:कडे पाहिलंस तर तुला समजेल की, या प्रचंड धुमश्चक्रीत लेखका, तुझा पुरेपूर वापर केला गेलेलाय. जखमी कोण कोण झालं? अरे, तूच लेका तूच! मारामारीच्या धुंदीत तुझं तुलाच उमजेना की, रक्तबंबाळ आपणच झालोयत.

.................................................................................................................................................................

बघ लेखका, तू केवढा बहुउद्देशीय असतोस ते ध्यानी ठेव. एकेक अवयव सुटा करून जसा तपासावा, तसा तुझ्या एकेक वैशिष्ट्याचा वापर तुझ्या देखत केला जातो. तुला वाटेल की, किती मानपान करतात, हे आपले लोक, पण तसं नसतं बाबा. एक प्रथा फार लोभसवाणी असते, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात. तिची लागण तुला केव्हाही होऊ शकते. म्हणजे असं बघ, तुझं पुस्तक खूप गाजलं. विशेषत: नव्या पिढीला ते भावलं. लगेच विद्यापीठीय टोळ्या ते पुस्तक कोणत्या ना कोणत्या अभ्यासक्रमात चिकटवण्याच्या तयारीला लागतात. त्यातले काही चतुर तुझ्याभोवती घोळू लागतात. ते तुला असं भासवू लागतात की, केवळ त्यांच्या खटपटीनंच तुझा असा पुस्तकी अवतार हजारो विद्यार्थ्यांसाठी पूजनीय, वंदनीय होणार आहे. तेव्हा तुझी कृपादृष्टी आमच्यावरही पडावी! तुझे खिसे मोकळे होऊ लागतात. तुझा वेळ या टोळीच्या मनोरंजनासाठी खर्च होऊ लागतो.

असंही होऊ शकतं बरं का : तुझ्या मनात कुणी भरवतं की, ‘तुमचं पुस्तक खरंच खूप भारीय, पण ते अमूक लेखकाच्या राजकीय दबावापुढं मागं पडतंय अन् त्याचंच पुस्तक अभ्यासक्रमाला लागतंय’. मग तू पेटून उठतोस. चेकाळतोस. तुझा बराचसा वेळ आपल्या पुस्तकाच्या लॉबिंगमध्ये जाऊ लागतो. मग एक जण पुढं येईन सांगतो की, ‘आम्ही बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये मंजुरी देऊ. पण त्या पुस्तकाची स्वस्त आवृत्ती (विद्यार्थ्यांना परवडेल अशी) काढायची परवानगी तुम्ही आणावी’. झालं! बा लेखका, तुझ्या या अभ्यासक्रमिक अवताराच्या आगमनासाठी तुझा आटापिटा आरंभतो आणि तुझ्या तो विचारी, प्रगल्भ वगैरे लेखक आसुसलेला, आतुर आणि हावरट कधी बनतो, कळतही नाही.

.................................................................................................................................................................

बिचारी मराठी भाषा! तिचा एकेक शब्द जिव्हाग्रांनी वेचून वेचून थुंकला जाताना, ती त्या भीषण अर्थफेकीत बेजार अन् कानकोंडी होऊन जाते. ‘हेच काय ते आपले सुंदर रूप? हीच काय ती माय मराठी?’ असा स्वत:बद्दल तिचा भ्रम होऊ लागतो. मग भ्रमिष्टावस्थेत तीही आपले सर्वस्व त्यागून नागवी उभी राहते. अणकुचीदार, धारदार आणि टणक शब्द टिपत तीही अंगावर तुटून पडते. ‘मार्च फॉरवर्डस’ची आज्ञा झाल्याप्रमाणे आता माघार नाही, आता दमायचं नाही, अशा तयारीनं आपली भाषामाय समोरच्याला पुरतं घायाळ केल्याशिवाय थांबत नाही.

.................................................................................................................................................................

बरं का लेखकरावसाहेब, एवढी लांब नांदी ऐकवलीय ती कशासाठी अन् कशामुळे सांगतो आता. परवा आम्ही साहित्य संस्थेत जे बघितलं ते असं – एक गोलगरगरीत प्रौढ गृहस्थ आले. मोदी मुख्यमंत्री असताना जसा अर्ध्या बाह्यांचा लांब सदरा घालायचे, तसा सदरा, खाली पायजमा आणि चेहऱ्यावर अतिनम्र आदरभाव दाखवत तो संस्थाध्यक्षांच्या जवळ येऊन पायलागू केल्यावर त्यांच्या कानी काही कुजबुजले. मग दोघंही उठून बाहेर गेले. परतल्यावर आम्ही विचारलं. म्हटलं, ‘एवढ्या लगबगीचं काय प्रयोजन?’ तर म्हणाले, ‘ ‘उच्च साहित्य संसदे’मध्ये मराठी लेखकांच्या नव्या नेमणुका सुरू आहेत’. सरकारच्या बाजूचे कोण अन् विरोधातले कोण, अशी चौकशी करत होता हा गडी.

तो सरकारी म्हणजे सत्ताधारी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे त्या पक्षानं त्याला उच्च साहित्य संसदेत आपले राजकीय विरोधक नसावेत, अशी योजना आखायला सांगितलं. परंतु ते आता शक्य नाही. बव्हंश साहित्यिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आणि स्वतंत्र वृत्तीचे आहेत. त्यांची निवड झालेलीय. परंतु सरकारी अधिकारी राहिलेला एक लोकप्रिय लेखक सत्ताधाऱ्यांच्या हिताचा कैवारी होऊन त्या संसदेत महत्त्वाच्या जागेवर बसण्याची चिन्हं आहेत. यापुढे तोच कुणाला पुरस्कार द्यायचे अन् कोणत्या विषयावर चर्चासत्रं घ्यायची अन् कोणाची पुस्तकं छापायची, याचा कारभारी होणार आहे…

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

बघ बाबा, लेखका, स्वार व्हायची धडपड! कशासाठी तर म्हणे घोड्यांच्या पाठी बसून सत्ताधाऱ्यांच्या अन् त्यांच्या राजकीय सिद्धान्तांच्या विरोधात जे जे असतील, त्यांची जिरवायची. उच्च साहित्य संसदेत म्हणे एका टोळीचा ताबा होता. ती डाव्यांची व समाजवाद्यांची होती! त्यांना ही उजवी मंडळी ‘पुरोगामी’ म्हणत हिणवतात. काय लबाडीय बघा, उजव्यांची मांड उच्च साहित्य संसदेवर बसावी म्हणून ती डाव्यांच्या कब्जात होती, असा कांगावा या लोकांचा! ते मोठमोठे लेखक काय दुसऱ्यासमोर बसून त्याचं डिक्टेशन घेत लिहीत होते? त्यांनी काय समाजवादाच्या प्रचार केला की, भांडवलशाहीला विरोध? ते काय काँग्रेसचे होते की, कामगार संघटनेचे? ज्यांना ज्यांना त्या उच्च साहित्य संसदेनं आजवर गौरवलं, ते काय क्रांतिकारक म्हणायचे की अतिरेकी?

ही ‘बेशरम रंग’नीती झाली बरं का, लेखकराव. या नव्या साहित्यसांसदांचं म्हणणं असंय की, ती पुरस्कारवापसी, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचं रडगाणं आणि लोकांनी निवडून दिलेल्या सरकारची निंदा थांबवायची! त्यासाठी आता उच्च साहित्यसंसद काबूत ठेवायचीय. त्यासाठी वैचारिक लगाम, पुरस्कारांच्या तोबरा, विचारांची झापडं, राष्ट्राभिमान आणि सनातन संस्कृती यांचं खोगीर चढवायला लेखक-संशोधन चालूय. काही गावलेत त्यांना. तुम्ही सापडू नये, यासाठी एवढा खटाटोप केलाय बघा. सावध राहावं बाबा!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......