अजूनकाही
शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांची ३ सप्टेंबर ही जयंती, तर १२ डिसेंबर ही पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांचे सहकारी आणि पत्रकार-संपादक विनय हर्डीकर यांनी त्यांच्या विचारविश्वाची करून दिलेली ही व्हिडिओ ओळख... त्यांचं हे भाषण ५४ मिनिटे आणि ११ सेकंद इतक्या कालावधीचं आहे. आवर्जून ऐकावं असं...
.................................................................................................................................................................
“नमस्कार, शेतकरी भावांनो आणि बहिणींनो…
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ बनून आलेले, प्रतिभावान शेतकरी नेते, आपल्या सगळ्यांचे आवडते, आदरणीय शरद जोशी यांना जाऊन आता सात वर्षं झाली. मी ३ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस आणि १२ डिसेंबर हा त्यांचा निर्वाण दिवस, या दोन्ही दिवशी त्यांच्याबद्दल आपल्याशी काही ना काही बोलत असतो.
आज मी अंगारमळा (मु. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) इथून आपल्याशी बोलतो आहे. माझ्या उजवीकडे शरद जोशींचं छायाचित्र आहे आणि पाठीमागे दोन्ही बाजूला त्यांचा ग्रंथसंग्रह आहे. आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात इतका विचार करणारा नेता आलेला नव्हता. आपण सगळ्यांनीच आपल्या वाढत्या वयात अनेक प्रकारचे नेते पाहिले. परंतु ज्या नेत्याच्या सबंध जडणघडणीमध्ये तत्त्वज्ञान आणि विचार यांना सगळ्यात जास्त महत्त्व होतं, अशी व्यक्ती बहुतेकांच्या बाबतीत शरद जोशीच होते.
आज मी तुमच्याशी बोलायला नेहमीचा विषय टाळून शरद जोशींच्या आपल्या आयुष्यामध्ये सूत्र होऊन गेलेल्या काही वाक्यांवर बोलणार आहे…”
संपूर्ण भाषणासाठी पहा -
..................................................................................................................................................................
लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.
vinay.freedom@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment