चॅट जीपीटी : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या या साधनाचा सगळ्या मोठा दुष्परिणाम लेखनकलेवर होऊ शकतो. ही कलाच संपुष्टात येऊ शकते
पडघम - तंत्रनामा
सलील जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 13 December 2022
  • पडघम तंत्रनामा चॅट जीपीटी Chat GPT

गेल्या दोन-अडीच दशकांतली तंत्रज्ञानाची प्रगती स्तिमित करणारी आहे. इंटरनेटचा उदय, संगणकाची घरोघर उपलब्धता, त्यात दर काही वर्षांतच झपाट्यानं वाढणारी संगणकाची क्रियाशक्ती, मोबाईलचा उदय, माणशी एक या प्रमाणात वाढत जाणारी मोबाईलची संख्या, या मोबाइलचं संगणकाला आव्हान आणि सरते शेवटी मोबाइलचा रोजच्या व्यवहारांकरता आपण करत असलेला उपयोग.

गेल्या काही वर्षांतल्या वैज्ञानिक प्रगतीमुळे आपल्या राहणीमानात झालेला बदल बघता, आपण या युगात जगतोय याचंच आश्चर्य वाटायला लागतं समाजमाध्यमं आणि मूठभर कंपन्यांच्या उत्पादनांनी आपल्या जीवनात बळकावलेलं स्थान, हे आपण तंत्रज्ञानाच्या पूर्णपणे आहारी गेल्याचं लक्षण आहे. आणि ही अधिनता भीतीदायक ठरू लागली आहे.

तंत्रज्ञानाच्या येत्या काळात येऊ घातलेल्या अशाच एका नव्या अध्यायाचं नाव आहे- ‘चॅट जीपीटी’ (Chat GPT). या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या प्रणालीत मानवी संभाषणाची कला अंतर्भूत करण्यात आली आहे. म्हणजे ही संगणकीय प्रणाली वापरकर्त्याला परस्परसंवादाचा आभास आणि काही प्रमाणात संवादाचा दर्जा देऊन लिखित मजकूर तयार करू शकते. ही प्रणाली Open AI फाउंडेशन व टेस्ला, ट्विटर आदी कंपन्यांचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांच्या आर्थिक सहकार्यानं तयार करण्यात आली आहे. 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सगळ्याच आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे चॅट जीपीटी वापरणंसुद्धा अतिशय सोपं आहे. सर्वप्रथम वापरणाऱ्यास Open AIच्या इंटरनेट साईटवर एक खातं उघडावं लागतं. त्याकरता वापरकर्त्याचा ई-मेल व फोननंबर आवश्यक असेल. खातं उघडलं की, आपण जशी इतर माध्यमं वापरून चॅट करतो, तसंच चॅट जीपीटीसुद्धा वापरता येतं.

कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग यांचा वापर करून ही प्रणाली कुठल्याही प्रश्नाचं उत्तर संभाषण कला वापरून तयार करू शकतं. हे उत्तर चॅट-जीपीटी इंटरनेटवर २०२१पर्यंत उपलब्ध असलेली माहिती वापरून देतं. प्रश्न कुठल्याही प्रकारचे असू शकतात. उदाहराणार्थ – ‘न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम काय?’ किंवा ‘दुसऱ्या महायुद्धात मित्र पक्षांनी जर्मनी व जपानवर लादलेले निर्बंध कोणचे?’ वगैरे वगैरे. चॅट जीपीटी देत असलेल्या उत्तराचं स्वरूप संभाषण-सदृश असल्यामुळे मूळ प्रश्नाला एखादा प्रतिप्रश्न विचारला तरी त्याचा संदर्भ पुढील उत्तरात दिसतो. 

चॅट जीपीटीचं एक प्रणाली म्हणून एखाद्या इंजिनिअरला कौतुक वाटणं साहजिक आहे. ही प्रणाली वापरून एखाद्या विषयावर निबंध लिहिताना लागणारे संदर्भ इंटरनेटवरून चटकन ज्या सुसूत्र पद्धतीनं काढून दिले जातात, ते आश्चर्यकारकच आहे. या प्रणालीचा उपयोग ग्राहक सेवा देण्यासाठी किंवा ग्राहकांच्या तक्रारींना उत्तरं देण्यासाठी अतिशय प्रभावीपणे करू घेता येईल. जिथं म्हणून मानवी हस्तक्षेपाची गरज नसेल, अशा प्रत्येक व्यवसायात या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकेल.

मात्र या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या साधनाचा सगळ्या मोठा दुष्पपरिणाम लिहिण्यावर म्हणजे लेखनकलेवर होऊ शकतो. चॅट जीपीटी हे साधन वापरून कोणीही विनासायास कुठल्याही विषयावर निबंध लिहू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःचा म्हणून खपवू शकतो. आजघडीला इंटरनेटवर अनेक साधनं आहेत, ज्याचा उपयोग करून विद्यार्थी अभ्यास करू शकतात. पण प्रत्यक्ष लिहायची वेळ आली की, विद्यार्थ्याला स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करूनच लिहावं लागतं. चॅट जीपीटीमुळे लिहिण्याची ही कलाच संपुष्टात येण्याची भीती आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ही एक माझी सुंदर कविता पहा -

The rain falls softly in the night

A gentle sound that brings delight

The sweet smell of earth and flowers

Fills the air for many hours

The monsoon has arrived once more

Bringing life and growth to the shore

The parched land drinks in the rain

And blossoms once again

The trees sway in the breeze

As the rain washes over the leaves

The sound of thunder in the distance

Adds a sense of mystery and suspense

The monsoon is a time of renewal

A chance for the land to start anew

So let us dance in the pouring rain

And celebrate the beauty once again

ही कविता वाचनाच्या आग्रहातील ‘सुंदर’ या शब्दामुळे कदाचित वाचकांस आवडू शकेल. कदाचित एखाद्या जाणकारास किंवा साहित्यसमीक्षकाला या कवितेत दर्जेदार यमक, अनुप्रास, अलंकार सापडणार नाहीत, किंवा ही कविता पारंपरिक सुंदर कवितेच्या परिमाणातही बसणार नाही, पण तरीही कवितावाचनाची साहित्यिक दृष्टी नसलेल्या बहुतांश लोकांना ही कविता ‘सुंदर’ वाटू शकते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आता गौप्यस्फोट : पण ही संपूर्ण कविता चॅट जीपीटीने ‘मॉन्सून’ हा विषय दिल्यावर उत्तरादाखल लिहून दिली आहे, त्यात माझ्या पदरचा एकही शब्द नाही. म्हणजे मी या कवितेचा एकही शब्द लिहिलेला नाही.

यावरून चॅट जीपीटी ही प्रणाली नेमकी काय आहे आणि भविष्यात ती काय उत्पात घडवणार आहे, याची कल्पना येऊ शकते. 

आपल्याकडच्या बहुतांश शाळांमध्ये लिहिण्यावर जास्त भर दिला जातो. लिहिणं मुलांना अगदी प्राथमिक शिक्षणापासून – खरं तर नर्सरी-बालवर्गापासूनच – शिकवलं जातं. अक्षरं गिरवून, घोटून मुलांना लिहायला शिकवलं जातं. ती जसजशी वरच्या वर्गांत जातात, तसंतसं त्यांना लेखीपरीक्षेत प्रश्नांची उत्तर, निबंध लिहायला लागतात. मात्र भविष्यात मुलं चॅट जीपीटीचा वापर करून कुठल्याही प्रश्नाचं उत्तर किंवा कुठल्याही विषयावर निबंध लिहू शकतील. अर्थात चॅट जीपीटीच्या मदतीनं लिहिली जाणारी उत्तरं, निबंध किंवा इतर कुठल्याही प्रकारचं लेखल हे कृत्रिम वाटू शकतं. उदाहरणार्थ, मी चॅट जीपीटीला विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांच्या उत्तरात मूळ प्रश्नातील एक-दोन शब्द वापरले गेले होते.

उदाहरणार्थ, हे पहा -

या प्रणालीचा वापर पत्रकारितेत आणि स्वतंत्र लेखनात सर्वाधिक प्रमाणात केला जाऊ शकतो, आणि अतिशय धोकादायक ठरू शकतो. सध्या राजकीय विषयांसाठी समाजमाध्यमांचा वापर करणं, त्यावर चुकीची माहिती पेरणं, हा एक पायंडाच पडला आहे. बातमी लवकरात लवकर देण्याच्या नादात, त्यातील सत्य-असत्याची शहानिशा न करता आहे ते लिहून टाकलं जातं. इंटरनेटवरची माहिती जितकी निर्दोष असेल, तितकं चॅट-जीपीटीचा वापर करून केलेलं लेखन निर्दोष असेल, निदान सत्याच्या पातळीवर. पण हीच माहिती जितकी चुकीची, विपर्यस्त, दिशाभूल करणारी असेल, तितकं चॅट जीपीटीचा वापर करून केलेलं लेखनही चुकीचं असेल.

आणि हाच सर्वांत मोठा धोका आहे, या प्रणालीचा. राजकीय पक्ष, त्यांचे नेते, तथाकथित समाजकंटक, अपप्रचारक या प्रणालीचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना शह देण्यापासून सर्वसामान्यांची दिशाभूत करण्यापर्यंत कशाही प्रकारे करू शकतात. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मुद्रित वा दूरचित्रवाणीवरील बातम्यांमध्ये वाक्यरचनेच्या व व्याकरणाच्या चुका असतात. मुद्रित माध्यमांतल्या बातम्यांवर तर समाजमाध्यमांवरील लेखनाचा खूप प्रभाव आढळून येतो आहे. चॅट जीपीटीने दिलेल्या उत्तरातसुद्धा एक प्रकारचे कोरडेपण, कृत्रिम भाव दिसून येतात. स्वतः लिहिताना लेखक एखादा वेगळा शब्द, म्हणी, वाक्प्रचार, अवतरणं यांचा चपखल वापर करून आपला लेख खुमासदार, रंजक आणि वाचनीय करू शकतो. भाषिक प्रयोग करू शकतो, वाक्यरचनेची प्रचलित पद्धत बाजूला सारून किंवा तिचा क्रम बदलून लिहू शकतो. व्यक्तीगणिक लेखनाची शैली बदलते, ती अशा वेगवेगळ्या प्रयोगामुळे. या गोष्टी चॅट जीपीटी प्रणालीच्या साहाय्यानं लिहिलेल्या लेखनात कदाचित शक्य होणार नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे येत्या काळात जेव्हा वर्तमानपत्रांत, मासिकांत किंवा ऑनलाईन माध्यमांतलं लेखन चॅट जीपीटी प्रणालीचा वापर करून केलं जाईल, प्रत्यक्षात त्याचं श्रेय कुणीतरी घेईल, तेव्हा काय होईल? ती संबंधित लेखकाची लबाडी असेल आणि वाचकांची मोठी फसवणूक. अर्थात ही प्रणाली प्रसारमाध्यमांमध्ये बातम्यांसाठी जास्त प्रमाणात वापरली जाण्याची शक्यता आहे. ती वापरून लिहिलेले लेख तेवढे सरस नसतील, तर ते ज्यांच्या नावानं छापून येतील, त्यांची प्रतिमाही खराब करतील आणि वाचकांचा त्या संबंधित माध्यमावरच्या आणि त्या लेखकावरच्या विश्वासाला तडा जाईल. पण या प्रणालीचा वापर ब्लॉग, सोशल मीडिया, व्हॉटसअ‍ॅपवरील लेखन, यांसाठी जास्त प्रमाणात होण्याची, गैरकारणांसाठी होण्याचा मोठा धोका आहे.

सध्या ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. ती वापरताना मिळणारा डेटा तिच्यात सुधारणा करण्याकरता वापरला जाणार आहे. सध्या हे संशोधन प्राथमिक अवस्थेत असलं, तरी त्यात उद्याच्या भयावह धोक्याच्या पाऊलखुणा दिसताहेत.

.................................................................................................................................................................

लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.

salilsudhirjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......