‘टू मच डेमोक्रसी’ : कुठेही आक्रमक आणि आक्रस्ताळा नसलेला हा लघुपट भिडत जातो; समाजाबद्दल, स्वतःबद्दल आणि सत्ताधाऱ्यांबद्दल विचार करायला लावतो
कला-संस्कृती - चलत्-चित्र
विजय तांबे
  • ‘टू मच डेमोक्रसी’ या लघुपटाची पोस्टर्स
  • Tue , 15 November 2022
  • कला-संस्कृती चलत्-चित्र टू मच डेमोक्रसी Too Much Democracy वरुण सुखराज Varrun Sukhraj शेतकरी आंदोलन Farmers Protest शेती सुधारणा बिल Farm Reform Bill लोकशाही Democracy

करोनाच्या काळात २०२०-२१मध्ये भारतात शेतकऱ्यांचे अभूतपूर्व आंदोलन झाले. वरुण सुखराजला आतमध्ये कुठेतरी हे आंदोलन धक्का देते. त्यातून या लघुपटाच्या प्रवासाला सुरुवात होते. महाराष्ट्रातील तरुण मंडळींनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासोबत वर्षभर राहून बनवलेली ही गोष्ट आहे.

सत्ताधाऱ्यांचे निर्णय मान्य नसतील, तर सामान्य माणसाला विरोध करण्याचा अधिकार असतो. सामान्य माणूस जेव्हा हा अधिकार सशक्तपणे बजावतो, तेव्हा सत्ताधाऱ्यांना त्यांचे म्हणणे ऐकावे लागते. ही भूमिका या लघुपटाचा गाभा आहे.

आंदोलनाचे प्रश्न मांडायला आंदोलनातील नेत्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम इथे नाही. गोष्ट कशी सुरू झाली, ठिणगी कुठे पेटली, हे आंदोलनातील कार्यकर्ता दृष्टान्त देत, आपल्या सर्वांना समजेल असं बोलतो, तर पत्रकार, शेतीतज्ज्ञ पी. साईनाथ आपल्याला तीन शेती कायद्यांच्या प्रश्नाची नेमकी जाण करून देतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या गोष्टीत कॅमेरा लोकांच्यात मिसळतो. शहरात राहणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया टिपतो. समाजमाध्यमातून आंदोलनविरोधी वातावरण कसे पसरवले जाते, हे चटकन आपल्याला कळते. नंतर कॅमेरा आपल्याला आंदोलनाच्या ठिकाणी घेऊन जातो. तिथे एक शहर वसलेले आहे. वर्षभर ठिय्या मारून बसलेल्या महिला, मुले, पुरुष यांच्या या शहरातील दैनंदिन जीवनात आपण कॅमेऱ्यासोबत सहभागी होतो. दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व महामार्गांवर ही शहरे वसली होती. त्यातील तंबू समोरील जागा म्हणजे अंगण होतं. दररोज सकाळी ते साफ करून कामाला सुरुवात होई. एका टँकरमधून तंबूंमध्ये दुधाचे वाटप होई, लंगरमध्ये नाश्ता आणि जेवणाची तयारी सुरू होत असे. तिथे पुस्तकांचे स्टॉल होते.

आपण एका लायब्ररीत शिरतो. तरुण मुलं-मुली पुस्तक वाचतात, असं तिकडे काम करणारा सांगतो. एका प्रशस्त टेन्टमध्ये वर्तमानपत्राचं ऑफिस असतं. नाव ‘ट्रॉली टाईम्स’. आंदोलनाची दररोजची खबरबात तिथून प्रकाशित होत होती. तिथं काम करणाऱ्या तरुणांचा रवीश कुमार हा पत्रकारितेचा आदर्श असतो. कॅमेरा आपल्याला आंदोलनातील लोकांमध्ये घेऊन फिरतो. म्हातारी मंडळी, आजीबाई, सुना, तरुण, तरुणी सगळे आपल्याला भेटतात. एका मोठ्या टेंटमध्ये मॉल तयार केलेला. बहुतेक सगळ्या वस्तू तिथं विकत मिळतात. आंदोलनात सामील झालेली मराठी माणसेही या लघुपटात भेटतात.

किसान आंदोलनातील महत्त्वाचे टप्पे या गोष्टींमध्ये गाळलेले नाहीत. सगळ्यांचे फुटेज मिळवून गोष्ट खरी करत नेलेली आहे. सत्ताधारी अधिकाधिक आक्रमक आणि विधिनिषेध शून्य बनणे, २६ जानेवारीचे भीषण प्रसंग, त्यानंतर मनोधैर्य खचणे आणि एका क्षणी टिकैत यांच्या डोळ्यात अश्रू आल्यावर आंदोलनामध्ये अभूतपूर्व जान येणे, हे सगळं फुटेज आणि टिकैत यांची मुलाखत घेऊन छान जुळवून आणलं आहे. तरीही कुठल्याही नेत्याला महान बनवण्याचा जराही प्रयत्न नाही. टिकैत यांची पार्श्वभूमीसुद्धा आपल्याला काही वाक्यांत सांगितली जाते आणि प्रेक्षक सजग होतो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

हे सगळं चालू असतानाच, दिल्लीतील एक निवृत्त वृद्ध प्राध्यापक आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन लोकांशी चर्चा करताना आपल्याला भेटतात. तुमची लढाई ही गांधीमार्गाने चालली आहे, अशी सुरुवात करून गांधींच्या जीवनाची, विचारांची ओळख करून देतात. त्यांची संवादाची पद्धत, त्यांचे विचार हे सगळं आपण त्यांच्या बाजूला बसून ऐकतो. लघुपटाच्या सुरुवातीला ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’च्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर गांधींच्या फोटोला गोळी मारून रक्ताची पिशवी फोडणे, ही घटना दाखवलेली आहे. सुरुवातीला याचा पटकन संदर्भ लागत नाही किंवा नाही दाखवलं असतं तरी चाललं असतं, असं वाटतं. मात्र आपण कोणत्या काळात आहोत आणि देशात आक्रमक समजले जाणारे शीख आणि हरियाणवी लोक शांततामय मार्गाने आंदोलन करत आहेत, हे भान आपल्याला निवृत्त प्राध्यापक आणून देतात.

या गोष्टीचा नायक म्हणजे आपण आहोत म्हणजेच कॅमेरा आहे. गोष्ट तो पुढे सरकवत नेतो आणि आपण त्याचे बोट धरून चालत असतो. लघुपटाच्या सुरुवातीलाच एक सूचना येते, यामधील सर्व दृश्य ही वास्तविक आणि नैसर्गिक आहेत. ही सूचना त्याचे वेगळेपण अधोरेखित करते. भारतातल्या आंदोलनांबद्दल असंवेदनाक्षम असलेला समाज कसा वागतो, समाजमाध्यमे, टीव्ही चॅनल आगीत तेल घालण्याचे काम कसे करतात, आंदोलनविरोधी ‘किसान मजदूर संघा’च्या नेत्यांची सविस्तर टीकाटिप्पणी, हे सगळं आपल्याला खूप स्पष्ट करून जातं.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

इतके असूनही देशभरातील शेतकरी शांततेने आंदोलन करतोय हेही कॅमेऱ्याची दृश्येच सांगतात. यातील अनेक दृश्ये प्रेक्षकांची चक्क दाद घेतात. कुठेही आक्रमक आणि आक्रस्ताळा नसलेला हा लघुपट भिडत जातो; समाजाबद्दल, स्वतःबद्दल आणि सत्ताधाऱ्यांबद्दल विचार करायला लावतो.

ही गोष्ट रंगवण्यात संगीताचा मोठा वाटा आहे. ‘गुरु ग्रंथसाहेबा’तील पठणापासून रॅप गाण्यापर्यंत संगीताचे अनेक प्रकार यामध्ये आहेत. आंदोलनाच्या ठिकाणीच आंदोलकांनी गाणी तयार केली आणि गायली. त्या गाण्यांचा अतिशय उत्कृष्ट वापर या लघुपटामध्ये केला आहे. हे आंदोलन आहे की, हक्कांचा उत्सव असा प्रश्न प्रेक्षकाला पडतो. मला लस्सी आवडते, मला गरम डाळ चावल आवडतो, त्याप्रमाणे ठामपणे प्रश्न मांडणेसुद्धा आवडतं, इतकं सगळं सहज इथं आहे. आणि हासुद्धा माझा भारत आहे, जो मला माहिती नाही किंवा त्याला माझ्यापर्यंत कोणतेही माध्यम पोचवतच नाहीये, हे प्रेक्षकाला उमगते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

या लघुपटाला तरुणांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. याचे मुख्य कारण बनवणारी सगळी टीम ही वयाने आणि मनाने तरुणच आहे. एकमेकांपासून तुटलेपण येणे आणि असंवेदनाक्षम असणे म्हणजे नक्की काय हे या टीमला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी तरुणाईची नेमकी नस पकडली आहे. या संदर्भात वरुण सुखराज यांनी सांगितलेला प्रसंग मला महत्त्वाचा वाटतो. “वरुणला मेसेज आला - मी कुठल्याही संघटनेशी, संस्थेची संबंधित नाही. समाजकार्याचा मला अनुभव नाही. आपण केलेली फिल्म बघितली. मी अस्वस्थ झालो. आता मी राहुल गांधींच्या पदयात्रेत सामील होण्याच्या निर्णय घेतला आहे.”

तुटलेपण संपवून जोडून घेणे, संवेदनाक्षम होणे, दुसऱ्याच्या दुःखाने हळवे होणे, या माणूसपणाच्या  पहिल्या पायऱ्या आहेत. पराग पाटील, वरुण सुखराज आणि त्यांच्या टीमने हे माणूसपणाचे काम नेमके केले आहे.

.................................................................................................................................................................

हेही पहा-वाचा-अनुभवा : 

‘टू मच डेमोक्रॅसी’ हा ज्यांच्या संतापाचा विषय असतो, त्यांना हेच म्हणायचे असते की, ‘आपल्याकडे लोकशाही लई माजलीय’! - रवि आमले

.................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......