डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात
दिवाळी २०२२ - लेख
श्रीनिवास जोशी
  • ‘डेझी’ फुले आणि विल्यम वर्ड्स्वर्थ
  • Fri , 28 October 2022
  • दिवाळी २०२२ लेख विल्यम वर्ड्स्वर्थ William Wordsworth टु द डेझी To The Daisy लिरिकल बॅलडस् Lyrical Ballads रोमँटिसिझम Romanticism रोमँटिक चळवळ Romantic Movement

‘To Wordsworth’

Poet of Nature, thou hast wept to know

That things depart which never may return:

Childhood and youth, friendship, and love's first glow,

Have fled like sweet dreams, leaving thee to mourn.

These common woes I feel. One loss is mine

Which thou too feel'st, yet I alone deplore.

Thou wert as a lone star whose light did shine

On some frail bark in winter's midnight roar:

Thou hast like to a rock-built refuge stood

Above the blind and battling multitude:

In honoured poverty thy voice did weave

Songs consecrate to truth and liberty.

Deserting these, thou leavest me to grieve,

Thus having been, that thou shouldst cease to be.

कवी पर्सी बिश्शी शेली(Percy Bysshe Shelley)ने विल्यम वर्ड्स्वर्थ (७ एप्रिल १७७० - २३ एप्रिल १८५०) या निसर्गकवीवर ही सुंदर कविता १८१५ साली लिहिली. त्यात वर्डस्वर्थ एक रोमँटिक कवी म्हणून संपला आहे, अशी टीका शेलीने केली आहे. त्या काळात घरचे भागेना म्हणून वर्डस्वर्थने ‘स्टॅम्प डिस्ट्रीब्यूटर’चे काम स्वीकारले होते. एवढ्या मोठ्या निसर्गकवीने निसर्गात रमतगमत सुंदर कविता लिहायच्या सोडून नीरस आणि कंटाळवाणे काम काय स्वीकारायचे, निसर्गाची साथ सोडून शहरात काय रमायचे? शेली भयंकर चिडला होता. त्या रागात त्याने ही कविता लिहिली. त्याचे प्रेम होते वर्ड्स्वर्थच्या कवितेवर, तत्त्वज्ञानावर आणि प्रतिभेवरही. आपल्या कवितेत वर्ड्स्वर्थ पूर्वी काय होता, याचे सुंदर वर्णन शेलीने केलेले आहे-

‘Thou wert as a lone star, whose light did shine

On some frail bark in winter’s midnight roar:

Thou hast like to a rock-built refuge stood

Above the blind and battling multitude :’

(तू होतास तारा एकाकी ज्याचा प्रकाश राहत असे तेजाळत,

कुण्या झाडाच्या क्षीण खोडावर एकाकीपणे;

हिवाळी मध्यरात्रीच्या अंधार-गर्जनेच्या कोलाहलात…

तू राहिलास उभा एकाकी, एखाद्या खडकावर बांधलेल्या शांततेच्या घरट्यासारखा;

खालच्या आंधळ्या आणि युद्धखोर गर्दीच्या खूप खूप वर…)

‘टू वर्ड्स्वर्थ’ ही कविता लिहिली, तेव्हा शेली २३ वर्षांचा होता. त्या कोवळ्या वयात स्वच्छंद आयुष्य सोडून वर्ड्स्वर्थने अर्थार्जनासारखी गोष्ट करणे त्याला खटकण्यासारखेच होते. तेव्हा वर्डस्वर्थ ४५ वर्षांचा होता. निदान या वयात तरी त्याला थोडी स्थिरता हवीहवीशी वाटली असावी.

तसं बघायला गेलं तर वर्ड्स्वर्थलाही स्वतःचा राग आला असणार, पण करणार काय?

खरं तर, वर्ड्स्वर्थने वयाच्या २८व्या वर्षी साहित्यातील ‘रोमँटिक चळवळी’चा पाया एक प्रस्तावना लिहून घातला होता. त्याने ‘लिरिकल बॅलडस्’ हा कवितासंग्रह प्रकाशित केला. यात सॅम्युएल टी कोलरिजच्यासुद्धा काही कविता होत्या. या संग्रहातील कविता इंग्लंडमध्ये पूर्वी लिहिल्या जाणाऱ्या कवितांपेक्षा वेगळ्या कशा आहेत, हे सांगण्यासाठी वर्ड्स्वर्थने या काव्यसंग्रहाला एक प्रस्तावना लिहिली. ती ‘रोमँटिक’ चळवळीचा पाया ठरली. या चळवळीला मराठीमध्ये ‘स्वच्छंदतावाद’ किंवा ‘अदभुतरम्यतावाद’ असेही म्हणतात. ही दोन्हीही नावे तितकीशी समर्पक नाहीत.

‘रोमँटिक’ हे नाव या चळवळीला का पडले, हे बघण्यासारखे आहे. मध्ययुगीन युरोपात अभिजनांचे एक साहित्य होते. त्यात शैलीला महत्त्व होते. उच्च श्रेणीतील पात्रे आणि उच्च अभिरूचीचे विषय यात असत. या उलट ‘मध्ययुगीन रोमान्स’ हा प्रकार होता. त्यामध्ये अदभुतरम्य वातावरणात साहसी नायकांच्या प्रणयकथांचे वर्णन असे. वर्ड्स्वर्थ आणि इतर ‘रोमँटिक’ कवी आणि लेखक जे साहित्य लिहू पाहत होते, ते या रोमान्सच्या थोडेसे जवळचे होते. म्हणून या चळवळीला ‘रोमँटिक चळवळ’ हे नाव पडले. असे असले तरी ‘स्वच्छंदता’ आणि ‘अदभुतरम्यता’ या दोन्हीच्या पलीकडची अशी ही चळवळ होती. मध्ययुगीन रोमान्सपेक्षा तत्त्विकदृष्टया अत्यंत गंभीर अशी ही चळवळ होती.

ही चळवळ समजून घ्यायची असेल तर गटे, ब्लेक, वर्ड्स्वर्थ, कोलरिज, शेली, कीट्स, बायरन, जेन ऑस्टिन अशा दिग्गजांचे साहित्य... थॉमस कार्लाइलचे वैचारिक लिखाण वाचावे लागते. सामान्य माणसाच्या जीवनातील अनुभव साध्या भाषेत सांगण्यावर या लोकांचा भर होता. आपल्याकडेही पूर्वी सामान्य माणसाच्या भावभावनांवर कविता लिहिली जात नव्हती. प्राचीन आणि मध्ययुगात तुमच्यावर साहित्य तयार व्हावे, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एक तर देव तरी असणे आवश्यक होते किंवा तुम्ही एखादे ऐतिहासिक पात्र असणे आवश्यक होते. केशवसुतांनी ही परिस्थिती बदलली म्हणून त्यांना ‘नवकवितेचे जनक’ म्हणतात. केशवसुतांनी युरोपातील ‘रोमँटिक’ चळवळीपासूनच प्रेरणा घेतली होती.

अजून एक महत्त्वाची गोष्ट. ‘रोमँटिक’ चळवळीचे म्हणणे होते की, मानवाच्या आयुष्यात भावना सर्वांत महत्त्वाची. त्यांचे म्हणणे होते- ‘तुमचे कोरडे तत्त्वज्ञान आम्हाला सांगू नका. आमचे जे काही तत्त्वज्ञान आहे, ते आमच्या हृदयातून, आमच्या भावनांमधून उमलून येते. हृदयातून उमलून येते ते खरे तत्त्वज्ञान. उत्स्फूर्तता महत्त्वाची’. या विचारातूनच वर्ड्स्वर्थचे प्रसिद्ध वाक्य आले -

“Poetry is the spontaneous overflow of powerful feelings: it takes its origin from emotion recollected in tranquility.”

(काव्य हा अत्यंत प्रभावशाली भावनांचा उत्स्फूर्त आणि अनावर प्रवाह असतो. कवितेचा जन्म त्या भावना उफाळून गेल्यानंतर त्यांच्या स्मरणामधून अत्यंत शांततेत होतो.)

थोडक्यात, वर्ड्स्वर्थचे म्हणणे होते की, भावनांच्या उत्स्फूर्ततेला तत्त्वज्ञानाचा स्पर्श झालेला असला पाहिजे. कवीमध्ये ‘पॅशन’ आणि ‘नॉलेज’ एकत्र आलेले असले पाहिजेत. भावना आणि ज्ञान एकत्र झालेले असले पाहिजे. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता.

भावनांना तत्त्वज्ञानाचा स्पर्श झालेला नसेल तर भावना उन्नत होत नाहीत आणि तत्त्वज्ञान भावनांच्या संगतीत राहिलेले नसेल, तर त्याला कोरडेपणाचा शाप मिळतो. साधेपणामुळेच मानवी आयुष्य सुंदर होते आणि अर्थपूर्ण होते, असे त्याचे आणि इतर ‘रोमँटिक’ कवींचे आणि लेखकांचे म्हणणे होते. वर्ड्स्वर्थला ग्रामीण भागातील लोकांच्या आयुष्याचे आकर्षण वाटत असे. त्याचे म्हणणे होते की, निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे या लोकांवर निसर्गात प्रतीत होणाऱ्या ‘सत्या’चा प्रभाव पडलेला असतो.

थोडक्यात, ‘रोमँटिक’ चळवळीने भावनांमधील सौंदर्य महत्त्वाचे मानले, सामान्य माणसाच्या आयुष्याला साहित्यिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि निसर्गाच्या भव्यतेची आणि ऐश्वर्याची साहित्यात प्रतिष्ठापना केली.

हा सगळा साहित्यविचार वर्ड्स्वर्थच्या कविता वाचताना जास्त चांगल्या प्रकारे समजतो. ‘डेझी’ या फुलावर वर्ड्स्वर्थने चार कविता लिहिल्या. अगदी साध्यासुध्या! डेझी म्हणजे आपल्याकडची सोनकी! सर्वदूर उगवणारी, कृश, साध्यासुध्या शालीनतेने नटलेली. आपली सोनकी पिवळ्या रंगाची असते. इंग्लिश डेझी शुभ्रतेने विनटलेली असते.

वर्ड्स्वर्थच्या कवितेची अजून एक गंमत आहे. त्याची कविता आपल्याला आपली वाटते. कारण आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते.

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते.

To The Daisy 1

With little here to do or see

Of things that in the great world be,

Daisy! again I talk to thee,

For thou art worthy,

Thou unassuming Common-place

Of Nature, with that homely face,

And yet with something of a grace,

Which Love makes for thee!

 

Oft on the dappled turf at ease

I sit, and play with similes,

Loose types of things through all degrees,

Thoughts of thy raising:

And many a fond and idle name

I give to thee, for praise or blame,

As is the humour of the game,

While I am gazing.

 

A nun demure of lowly port;

Or sprightly maiden, of Love's court,

In thy simplicity the sport

Of all temptations;

A queen in crown of rubies drest;

A starveling in a scanty vest;

Are all, as seems to suit thee best,

Thy appellations.

 

A little Cyclops with one eye

Staring to threaten and defy,

That thought comes next — and instantly

The freak is over,

The shape will vanish — and behold

A silver shield with boss of gold,

That spreads itself, some faery bold

In fight to cover!

 

I see thee glittering from afar —

And then thou art a pretty star;

Not quite so fair as many are

In heaven above thee!

Yet like a star, with glittering crest,

Self-poised in air thou seem'st to rest; —

May peace come never to his nest,

Who shall reprove thee!

 

Bright Flower ! for by that name at last,

When all my reveries are past,

I call thee, and to that cleave fast,

Sweet silent creature!

That breath'st with me in sun and air,

Do thou, as thou art wont, repair

My heart with gladness, and a share

Of thy meek nature!

‘टू द डेझी - १’

व्यवहाराच्या या महान जगात

वाटले नाही मला काही करण्या अथवा बघण्यासारखे,

म्हणून हे डेझी फुला बोलतो आहे मी तुझ्याशी,

कारण तू आहेस गप्पागोष्टी करत राहाव्यात असा,

निगर्वी, साधासुधे आणि सामान्य अस्तित्व तुझे निसर्गातले, तुझा घरगुती चेहरा,

आणि तरीही तुझ्या साधेपणातील तुझी विलोभनीयता,

या जगातील प्रेमतत्त्वाने तुझ्यात रचलेली.

 

फुलांच्या ठिपक्यांनी जडवलेल्या हिरवळीवर

बसून निवांत,

मी खेळत राहतो तुला बघून माझ्या मनात उमटणाऱ्या उपमानांशी,

आणि अघळपघळपणे मनात रेंगाळणाऱ्या प्रतिमानांशी;

विचार करत राहतो मी तुझ्या रचनेचे,

तुझ्या उमलून येण्यातील सुंदर सामर्थ्याचे निरखत राहताना तुला;

आणि तुझ्याशी खेळत राहता यावे म्हणून,

तुझ्यासाठी तयार करत राहतो मी सुंदर आणि

अघळपघळ नावे - कौतुकाची आणि चेष्टेमधलीही...

 

आहेस तू एक शांत आणि संयमी जोगीण समाजाच्या सामान्य स्तरामधली…

का, आहेस तू एक सुंदर कुमारिका प्रेमाच्या राज्यातली,

आनंदाने भारलेली आणि जीवनाच्या सर्व सुंदर मोहांच्या खेळात रमलेली,

का आहेस तू एक राज्ञी माणकांच्या परिवेशात नटलेली,

का आहेस तू एक कृश स्त्री तोकड्या कपड्यातली;

सगळ्याच उपमा दिसतात शोभून तुला अत्यंत समर्पकतेने…

 

मी पाहतो तुला चमकताना दूरामधून,

आहेसच तू एक सुंदर तारा

असलास थोडा उणा सौंदर्यामध्ये स्वर्गीच्या प्रकाशमान तारकांच्या मानाने;

तरीही एखाद्या ताऱ्याप्रमाणे लेवून चमकता शिरपेच,

राहतोस तरंगत हवेमध्ये तू अधांतरी आपल्या आतल्या प्रसन्न शांततेमध्ये;

कळणार नाही तुझे सौंदर्य ज्याला,

राहायला येणार नाही शांतता त्याच्या मनाच्या घरट्यात कधीही…

 

तेजाचे फुल!... मनात आलेल्या या प्रतिमेने भंग पावल्या

माझ्या तंद्रीमधील सगळ्या विचारमालिका.

शांतता-भंगाची ती खाई भरून काढण्यासाठी

मी बोलावतो आहे तुला - हे शांत आणि प्रसन्न अस्तित्वा…

तू घेतोस श्वास माझ्याचप्रमाणे याच सूर्यप्रकाशात आणि याच निर्मळ हवेत,

ये आणि भारून टाक माझे हृदय निर्मळ मोदाने आणि तुझ्यातील प्रसन्न सौम्यतेने!

व्यवहाराच्या ‘महान’ जगताने मानवाचे आयुष्य नीरस केलेले असते. निसर्गातली सौम्य प्रसन्नता आणि शांतता वर्ड्स्वर्थला त्या निरागस फुलाकडून हवी आहे. निर्मळ मोद त्याला निसर्गाकडून हवा आहे.

त्या फुलाला बघून अनेक उपमा आणि प्रतिमा वर्ड्स्वर्थच्या मनात अवतीर्ण होत आहेत. निसर्ग त्याची स्फूर्तीदेवता बनली आहे. त्याचे त्या फुलाशी एक निष्पाप आणि प्रेमाचे नाते तयार झाले आहे.

तो म्हणतो आहे की, ज्याला निसर्गातले सौंदर्य कळते त्याच्याच मनात शांतता राहायला येऊ शकते.

To The Daisy 2

Bright Flower! whose home is everywhere,

Bold in maternal Nature's care,

And all the long year through the heir

Of joy or sorrow;

Methinks that there abides in thee

Some concord with humanity,

Given to no other flower I see

The forest thorough!

 

Is it that Man is soon deprest?

A thoughtless Thing! who, once unblest,

Does little on his memory rest,

Or on his reason,

And Thou would'st teach him how to find

A shelter under every wind,

A hope for times that are unkind

And every season?

 

Thou wander'st the wide world about,

Uncheck'd by pride or scrupulous doubt,

With friend to greet thee, or without,

Yet pleased and willing;

Meek, yielding to the occasion's call,

And all things suffering from all,

Thy function apostolical

In peace fulfilling.

‘टू द डेझी - २’

हे तेजस्वी फुला! सारे आसमंत म्हणजे घर तुझे,

धिटपणे वावरतोस आई प्रकृतीच्या प्रेमाच्या छायेत.

झेलत राहतोस सुखदुःखे वर्षभर,

मला वाटत राहाते सतत की, तुझ्यामध्ये असतो प्रतिष्ठित

एक सुंदर मिलाफ तुझ्या आणि मानवाच्या अस्तित्वाचा.

जंगलातील दुसऱ्या कुठल्याही फुलात मला दिसला नाही हा मिलाफ

 

खरंच, माणूस गरजेपेक्षा खूप लवकर ग्रस्त होतो निराशेत?

मानव, एक विचारहीन अस्तित्व!

एकदा शापग्रस्त झाल्यावर

वागत नाही तो आपल्या स्मृतीप्रमाणे

अथवा आपल्या विचारशीलतेचा आधार घेऊन

 

शिकव तूच त्याला कसा शोधावा आसरा

प्रत्येक वादळात आयुष्यातल्या

आणि कशी जपावी आशा

निर्दयी काळात

आणि प्रत्येक निर्दयी ऋतूमध्ये!

 

भटकत राहतोस जगभर तू

थारा न देता गर्वाला वा विचक्षण संशयाला,

आनंदमय होऊन राहतोस तू

असले मित्र आसपास तुझ्या किंवा नसले कोणीही जवळ जरी,

विनम्र शांत सहनशील,

शरणागत होत समोर येईल त्या परिस्थितीला,

आणि झेलत दुःखे सर्वप्रकारची सर्वांकडून,

तू करत राहतोस देवदूतांचे कार्य

शांततेचे पूर्ण रूप होऊन राहण्याचे.

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात. आपल्याकडे सोनकीसुद्धा जवळ जवळ वर्षभर फुललेली असते. अगदी उन्हाळ्याचे तीन महिने सोडले तर बाकी सर्व काळ ती माळरानांवर आणि दऱ्याखोऱ्यात फुललेली दिसते.

दुसऱ्या कडव्यात वर्ड्स्वर्थ लिहितो -

‘एकदा शापग्रस्त झाल्यावर

वागत नाही तो आपल्या स्मृतीप्रमाणे

अथवा आपल्या विचारशीलतेचा आधार घेऊन’

या ओळींचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे ख्रिश्चन धर्मात मानवाला मिळालेला शाप- ज्यामुळे मृत्यू त्याच्या आयुष्यात आला. आणि दुसरा शाप म्हणजे औद्योगिकीकरणाचा आणि शहरीकरणाचा शाप.

कवितेचा आणि रोमँटिसिझमचा संदर्भ बघितला तर मला वाटते की, वर्ड्स्वर्थ औद्योगिकरणाविषयी आणि शहरी करणाविषयी बोलत असण्याची शक्यता जास्त आहे. एकदा शहरीकरणाचा शाप मिळाला की, निसर्गातून प्राप्त होणाऱ्या संवेदना नष्ट होतात आणि त्यामुळे सगळी विचारशीलता नष्ट होते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

To The Daisy 3

IN youth from rock to rock I went,

From hill to hill in discontent

Of pleasure high and turbulent,

Most pleased when most uneasy;

But now my own delights I make,--

My thirst at every rill can slake,

And gladly Nature's love partake,

Of Thee, sweet Daisy!

 

Thee Winter in the garland wears

That thinly decks his few grey hairs;

Spring parts the clouds with softest airs,

That she may sun thee;

Whole Summer-fields are thine by right;

And Autumn, melancholy Wight!

Doth in thy crimson head delight

When rains are on thee.

 

In shoals and bands, a morrice train,

Thou greet'st the traveller in the lane;

Pleased at his greeting thee again;

Yet nothing daunted,

Nor grieved if thou be set at nought:

And oft alone in nooks remote

We meet thee, like a pleasant thought,

When such are wanted.

 

Be violets in their secret mews

The flowers the wanton Zephyrs choose;

Proud be the rose, with rains and dews

Her head impearling,

Thou liv'st with less ambitious aim,

Yet hast not gone without thy fame;

Thou art indeed by many a claim

The Poet's darling.

 

If to a rock from rains he fly,

Or, some bright day of April sky,

Imprisoned by hot sunshine lie

Near the green holly,

And wearily at length should fare;

He needs but look about, and there

Thou art!--a friend at hand, to scare

His melancholy.

 

A hundred times, by rock or bower,

Ere thus I have lain couched an hour,

Have I derived from thy sweet power

Some apprehension;

Some steady love; some brief delight;

Some memory that had taken flight;

Some chime of fancy wrong or right;

Or stray invention.

 

If stately passions in me burn,

And one chance look to Thee should turn,

I drink out of an humbler urn

A lowlier pleasure;

The homely sympathy that heeds

The common life, our nature breeds;

A wisdom fitted to the needs

Of hearts at leisure.

 

Fresh-smitten by the morning ray,

When thou art up, alert and gay,

Then, cheerful Flower! my spirits play

With kindred gladness:

And when, at dusk, by dews opprest

Thou sink'st, the image of thy rest

Hath often eased my pensive breast

Of careful sadness.

 

And all day long I number yet,

All seasons through, another debt,

Which I, wherever thou art met,

To thee am owing;

An instinct call it, a blind sense;

A happy, genial influence,

Coming one knows not how, nor whence,

Nor whither going.

 

Child of the Year! that round dost run

Thy pleasant course,--when day's begun

As ready to salute the sun

As lark or leveret,

Thy long-lost praise thou shalt regain;

Nor be less dear to future men

Than in old time;--thou not in vain

Art Nature's favourite.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘टू द डेझी - ३’

तारुण्यात फिरत असे मी खडकाळ रानावनांतून

आणि दऱ्या खोऱ्यां मधून माझ्यातील सळसळणाऱ्या वादळी असमाधानाच्या तंद्रित,

जेवढी अस्वस्थता मोठी, तेवढा मोठा आनंद अस्तित्वात -  असे वाटत असे मला…

परंतु, आता गोष्ट वेगळी आहे,

आता माझा आनंद तयार करतो माझा मीच,

तहान भागते आता माझी कुठल्याही निर्झरावर,

आणि हे डेझी फुला तुझ्यावरच्या प्रेमात सामावते प्रेम सारे आता माझे संपूर्ण निसर्गावरचे!

 

हिवाळा परिधान करतो विरळ विरळ मालिका तुझ्या,

आपल्या विरळ आणि भुऱ्या केसांमध्ये;

वसंत विलग करतो अभ्रांना आपल्या झुळकांनी हळूवार,

कारण त्याला नाहू घालायचे असते सूर्यप्रकाशाने तुला;

उन्हाळ्यात तर काय, निसर्गाचे आंगण दिले गेलेले असते आंदणच तुला;

आणि शरदाचा खिन्न आत्मा

उजळून जातो आनंदाने, जेव्हा बरसतात तुषार पर्जन्याचे लालसर मस्तकावर तुझ्या.

 

फुलून थव्या थव्यांनी किंवा सर्वदूर पसरलेल्या पट्ट्यांमधून,

किंवा करत नर्तन ताटव्याताटव्यातून,

करतोस स्वागत तू वाटसरूंचे;

आनंदतोस त्यांच्या प्रतिसादाने,

पण होत नाहीस निरुत्साही किंवा दुःखी तू,

केले जरी दुर्लक्ष त्यांनी तुझ्याकडे:

किंवा भेटतोस कित्येकदा दूरच्या कोपऱ्यामध्ये कुठल्या तरी

एखाद्या आनंदी विचारासारखा तू आम्हाला,

असते जेव्हा गरज सुंदर विचारांची आम्हाला.

 

डोलतात व्हायोलेटचे ताटवे हवेच्या मंद झुळुकांवर,

चढतात साज मोत्यांचे गुलाबांवर पावसामुळे किंवा दवबिंदूंमुळे.

जगतोस तू असली कसलीही मोठी महत्त्वाकांक्षा न ठेवता,

आणि तरीही जात राहाते तुझी प्रसिद्धी सर्वदूर;

खूप लोक म्हणतात तुला - तू आहेस प्रेयसी साऱ्या कवींची.

 

पळावे लागले जर पावसापासून कवीला आश्रयाला कातळाच्या,

किंवा एखाद्या उन्हाळी दिवसात पडून राहावे लागले

मोजत कंटाळवाण्या घटिका त्याला एखाद्या हिरव्या लताकुंजाखाली,

नजर जाताच त्याची जरा आजूबाजूला, असतोस तू हजर तिथे - एखाद्या मित्रासारखा -

घालवण्यासाठी निराशा त्याची.

 

कित्येक वेळा एखाद्या कतळाजवळ किंवा वृक्षराजीमध्ये पडून राहिलेलो असतो मी थोडा वेळ,

तेव्हा हसऱ्या सामर्थ्यातून तुझ्या -

मिळवले आहे मी

अविचल प्रेम,

मिळवला आहे मी

क्षणिक आनंद,

मिळवल्या आहेत मी

काही स्मृती - ज्यांना नंतर लाभले कवितेचे पंख,

आणि मिळवले आहेत मी

काही झंकार बऱ्या-वाईट कल्पनांचे

ज्यातून उमलून आली पुढे अनपेक्षित निर्मिती.

 

जळत असतात जेव्हा भव्योदात्त इच्छा हृदयात माझ्या

आणि पडते माझी नजर चुकून तेव्हा तुझ्यावर;

सोडून द्यावे वाटते भव्योदात्त ते सारे,

आणि वाटतो प्यावा आनंद साधासा साध्या आयुष्यातील साध्यासुध्या आनंदकलशांमधून -

साधेसुधे घरगुती प्रेम जन्मते जे आयुष्यामधून साध्यासुध्या आणि निसर्गातूनही;

आणि एक साधेसे शहाणपण, करते जे पूर्ण गरजा सगळ्या मानवी हृदयाच्या, अत्यंत शांतपणे आणि अत्यंत हळूवारपणे.

 

किरणांचा आनंद-दंश झालेला तू, ताजातवाना,

जेव्हा उमलतोस सकाळी, सजग आणि आनंदी असा -

तेव्हा हे आनंदी फुला,

उसळू लागते चैतन्य माझ्यातील आनंदाने

तुझ्यामधल्या; 

आणि संध्याकाळी जेव्हा, दवाच्या पांघरूणात

मिटून जाऊ लागतोस तू …ती विश्रांती बघून तुझी

माझ्याही विचारमग्न हृदयावरील चिंतनाचे दुःख

हलके होत जाते.

 

प्रत्येक ऋतूत भेटतो जेव्हा प्रत्येक वेळी मी तुला

विचार करत राहतो मी तुझ्या ऋणाचा,

तुझ्यामुळे माझ्यात उमलेल्या सुंदर अशा अंतःप्रेरणेचा,

माझ्यात अचानक अवतीर्ण झालेल्या ज्ञानाचा,

माझ्यात राहायला आलेल्या मिलनसार सहानुभूतीचा.

तुझ्यामुळेच येते हे सारे हे खरे आहे;

पण येते हे कुठून, कसे आणि नंतर जाते हे सारे कुठे.

 

लेकरू तू सर्व ऋतूंचे,

राहतोस उमलत वर्षभर तू

तुझ्या जीवनाच्या ओघात,

उगवेल दिवस इथून पुढे जेव्हा जेव्हा,

करशील स्वागत त्याचे तू तेव्हा तेव्हा

करतात जसे स्वागत उगवणाऱ्या दिवसाचे चंडोल पक्षी आणि मनोरम पिले सशाची,

पूर्वी प्रमाणेच पुढेही असेल प्रत्येक दिवस तुझ्या कौतुकाचा,

असशील तू असाच लाडका भविष्यतील मनावजातीचा;

उगीच नाही आहेस लाडका तू निसर्गाचा.

या कवितेच्या चौथ्या कडव्यात साधेपणाची थोरवी सांगितलेली आहे. व्हायोलेट किंवा गुलाबासारखे अति-सौंदर्याने नटलेले डेझी हे फूल नाहिये. साध्या आणि शालीन सौंदर्याने विनटलेले हे फूल आहे. आणि त्यामुळेच ते कवीला प्रिय झालेले आहे.

सहाव्या कडव्यात डेझी फुलाकडून कवीला प्रेम आणि आनंद प्राप्त झालेले आहेत. या फुलाच्या दर्शनाने त्याच्या मनात काही स्मृती जागृत झाल्या आहेत. या स्मृतींना पुढे कवितांचे पंख लाभलेले आहेत. या फुलामुळे कल्पनांचे संगीत कवीच्या मनात उमटलेले आहे. या कल्पनांनी पुढे साहित्यिक निर्मितीचे रूप घेतलेले आहे.

स्मृती चाळवल्या गेल्यावर किंवा कल्पना अवतीर्ण झाल्यावर वर्ड्स्वर्थ लगेच लिहायला बसलेला नाही. या उत्स्फूर्त कल्पना आल्यावर त्याने त्यांना ‘पुढे कधीतरी’ साहित्याचे रूप दिलेले आहे.

इथे वर्डस्वर्थचे वाक्य आठवते - ‘Poetry is the spontaneous overflow of powerful feelings : it takes its origin from emotion recollected in tranquility.’ (काव्य हा अत्यंत प्रभावशाली भावनांचा उत्स्फूर्त आणि अनावर प्रवाह असतो. कवितेचा जन्म त्या भावनांच्या स्मरणामधून अत्यंत शांततेत होतो.)

डेझी फुलाच्या दर्शनाने मनात जे अनावरपणे उमटले, त्यावर तत्त्वज्ञानाचे आणि चिंतनाचे संस्कार झाल्यावर काव्यरूप लाभले.

पुढे नवव्या कडव्यामध्ये अंतःप्रेरणा, ज्ञान आणि सहानुभूती असे सगळे कवीला फुलाकडून प्राप्त झालेले आहे. दहाव्या कडव्यामध्ये निसर्गाची उत्स्फूर्त कौतुक-लीला आहे. सेलिब्रेशन आहे.

फूल, उगवणारा दिवस, त्याचे स्वागत करणारे पक्षी आणि प्राणी आणि या सगळ्यातून आनंद आणि तत्त्वज्ञान प्राप्त करून घेणारा रोमँटिक कवी!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

To The Daisy 4

Sweet Flower! belike one day to have

A place upon thy Poet's grave,

I welcome thee once more:

But He, who was on land, at sea,

My Brother, too, in loving thee,

Although he loved more silently,

Sleeps by his native shore.

 

Ah! hopeful, hopeful was the day

When to that Ship he bent his way,

To govern and to guide:

His wish was gained: a little time

Would bring him back in manhood's prime

And free for life, these hills to climb;

With all his wants supplied.

 

And full of hope day followed day

While that stout Ship at anchor lay

Beside the shores of Wight;

The May had then made all things green;

And, floating there, in pomp serene,

That Ship was goodly to be seen,

His pride and his delight!

 

Yet then, when called ashore, he sought

The tender peace of rural thought:

In more than happy mood

To your abodes, bright daisy Flowers!

He then would steal at leisure hours,

And loved you glittering in your bowers

A starry multitude.

 

But hark the word!--the ship is gone;--

Returns from her long course:--anon

Sets sail:--in season due,

Once more on English earth they stand:

But, when a third time from the land

They parted, sorrow was at hand

For Him and for his crew.

 

Ill-fated Vessel!--ghastly shock!

--At length delivered from the rock,

The deep she hath regained;

And through the stormy night they steer;

Labouring for life, in hope and fear,

To reach a safer shore--how near,

Yet not to be attained!

 

"Silence!" the brave Commander cried:

To that calm word a shriek replied,

It was the last death-shriek.

--A few (my soul oft sees that sight)

Survive upon the tall mast's height;

But one dear remnant of the night--

For Him in vain I seek.

 

Six weeks beneath the moving sea

He lay in slumber quietly;

Unforced by wind or wave

To quit the Ship for which he died,

(All claims of duty satisfied;)

And there they found him at her side;

And bore him to the grave.

 

Vain service! yet not vainly done

For this, if other end were none,

That He, who had been cast

Upon a way of life unmeet

For such a gentle Soul and sweet,

Should find an undisturbed retreat

Near what he loved, at last--

 

That neighbourhood of grove and field

To Him a resting-place should yield,

A meek man and a brave!

The birds shall sing and ocean make

A mournful murmur for 'his' sake;

And Thou, sweet Flower, shalt sleep and wake

Upon his senseless grave.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

ही चौथी कविता वर्ड्स्वर्थच्या भावाच्या, जॉन वर्ड्स्वर्थच्या मृत्यूविषयी आहे. तो  दर्यावर्दी होता. १८०५ साली त्याचे जहाज बुडाले आणि त्याबरोबर तोसुद्धा समुद्राच्या तळाशी गेला. वर्ड्स्वर्थ या कवितेत लिहितो, तो सहा आठवडे पाण्यात त्याच्या जहाजाबरोबर पडून होता. नंतर त्याला बाहेर काढले गेले आणि किनाऱ्यावरील उपवनातील मृत्तिकेच्या हवाली केले गेले. असे अनुभव माणसाला मुळापासून हलवतात. त्याला जीवन अर्थहीन वाटू लागते.

जॉन वर्ड्स्वर्थसुद्धा निसर्गप्रेमी होता. त्याला निसर्गरम्य ठिकाणी शेवटचा आसरा मिळाला, हे एक समाधान वर्ड्स्वर्थच्या मनात राहिले. तो शेवटच्या कडव्यात लिहितो -

‘वृक्षराजीच्या शेजारी मिळाले त्याला त्याचे शेवटचे विश्रांती-स्थान,

होता तो सौम्य आणि धैर्यशील!

गातील पक्षी त्याच्यासाठी आणि समुद्र गाज धरेल दुःखाने त्याच्यासाठी,

आणि तू, हे सुंदर फुला, उमलत आणि मिटत राहशील

त्याच्या त्या अर्थहीन विश्रांती-स्थानावर!’

आपल्या भावाच्या अर्थहीन विश्रांतीस्थलावर उमलणाऱ्या डेझी फुलांमध्ये वर्ड्स्वर्थ मानवी जीवनाचा अर्थ शोधतो आहे. एक संपलेले जीवन दुसऱ्या कुठल्या तरी हसऱ्या रूपात पुन्हा एकदा सुरू होते आहे, यात वर्ड्स्वर्थ सांत्वना शोधतो आहे.

देव आणि जीवनाचा स्रोत दूर कुठे आकाशात वगैरे राहत नाही. तो या विश्वातच सर्वत्र भरून राहिलेला असतो. जीवनाचे निरनिराळे आकार घेऊन जीवन धारण करत असतो, अशी देवाविषयीची कल्पना या रोमँटिक साहित्यात होती. ही काही नवी कल्पना नाही. याला ‘पँथिइझम’ म्हणतात. सृष्टी आणि ईश्वर एकच आहेत, अशी ही कल्पना. ‘पॅन’ आणि ‘थिऑस’ या ग्रीक मूल-रूपांवरून ‘पँथिइझम’ हा शब्द तयार झाला आहे. ‘पॅन’ म्हणजे सगळे आणि ‘थिऑस’ म्हणजे देव. सगळ्यात राहतो तो देव. किंवा, देव सगळ्यात राहतो.

वर्ड्स्वर्थच्या भावाच्या जाण्याने जीवन थांबले नाही. चराचरातील देवाने जीवनाचे दुसरे रूप जन्माला घातले. तत्त्वज्ञान भावनांवर मलमपट्टी करते ते असे. तत्त्वज्ञान, भावना आणि साहित्य एकत्र येते ते असे! पुढे रोमँटिक साहित्य हा फार मोठा प्रवाह झाला. आपल्याकडे केशवसुत, बालकवी असे दिग्गज कवी या वाटेने गेले. मराठीच काय जगभरची बहुतेक कविता याच मार्गाने आजही जात आहे. पुढे नवकविता आली. तिचे वेगवेगळे प्रकार आले, पण रोमँटिक संवेदना घेऊन आलेल्या कवितेची मोहिनी या जगावर अजूनही तशीच आहे. पुढेही ही डेझी फुलाची मोहिनी या जगावर तशीच राहणार आहे. या अर्थाने रोमँटिक चळवळीतील कवी आणि लेखक फार मोठे ठरतात!

वर्ड्स्वर्थची ‘लिरिकल बॅलड’ची प्रस्तावना आणि त्या तत्त्वज्ञानावर आधारित त्याची कविता हा विस्तृत प्रकार आहे. त्याचा पूर्ण आस्वाद या लेखात घेता येणार नाही. तो हळूहळूच घेत राहायला लागणार! परंतु शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता. मंदावलेल्या संवेदनांच्या हिवाळ्यातील तो एकाकी प्रकाश होता. या जगतातील अर्थहीन गलबल्याच्या फार फार वर त्याने आपल्या स्वतःचा असा शांततेचा आशियाना तयार केला होता. त्याच्या चार ‘डेझी पोएम्स’ वाचल्या तर हे सारे आपल्या लक्षात अत्यंत साकल्याने येते. 

टिपा -

) ‘टू द डेझी - १’ या मूळ इंग्रजी कवितेतील चौथे कडवे भाषांतरात गाळलेले आहे. यात ग्रीक दंतकथेमधील सायक्लॉप्स या राक्षसाचा संदर्भ आहे. मराठी वाचकाला सहजासहजी न कळणारा हा संदर्भ असल्याने तो टाळला आहे.

२) या कवितांचे मुक्त अनुवाद आशय उलगडून सांगण्याच्या भूमिकेतून केले आहेत. या कवितांच्या ओळीमधील छुपे अर्थसुद्धा अनुवादात घेतले आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे.......