कोनाचे ‘अच्छे दिन’ येओ का नाय येओ बावा, पर आपल्या विदर्भवाल्या लोकायचे त पक्के आले दिसते...
दिवाळी २०२२ - लेख
सलील जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 22 October 2022
  • दिवाळी २०२२ लेख विदर्भ Vidarbh अच्छे दिन Achhe Din कोकण Konkan मुंबई Mumbai कॅलिफोर्निया California

माही बायको कालच्यानं मले म्हने का तुमी व्हराडी मदी काहून नाय बोलत? म्या दचकून पाहाले लागतो का बा ताप त नाय आला हिले? माई बायको बंबइची हाय. तिले व्हराडी भासा का राहते ते बी मालूम नसन.

म्या इचारलं, “काहून बा, काहाले बोला लागते व्हराडी मंदी?”

त ते म्हने, “मले आयकुशा लागते म्हनूनशान सांगून ऱ्हाहाली.”

तुमाले सांगतो, माह्या सासरकडच्यान माह लग्न होइतोपावर एक पन व्हराडी मानूस नसन पायला. आता का समजा चंद्रावर आगुदर वस्ती असती, आन का बा तेथं जवा य्येथून मानूस गेला असता, तवा त्यायले कसं वाटलं असन, तस्स मले पाहून माह्या सासरकडच्याले बी वाटलं असन. आगुदर रहानारे चंद्रावरचे लोकं वराडले अस्ते का, “इचिबीन, कोन आला रं बावा? एक उतरून राहाला, उड्डया मारून राहाला, दुसरा बी आला अन झेंडा गाडून राहाला.”

माह बी असच वाटलं असन त्यायले. का मानूस हाय? दिवसाले ४-५ कपं चाहा पेते, चाहा बी एकदम पानीवाला पेते, अद्रक का घालते. ह्याले कांदा खाऊशा लागते, ज्याचा त्याचा मंदी. माया बायकोच्या बुढीले म्हनलं जे तेत वल्ल खोब्र टाकून काहून बनवते वं? दान्याचं भुस्कुट घाल कवा कंवा? त ते माह्याकडं पाहे का बह्याडला त नाय हा. त्यायले माहित नव्हतं का बा आमच्या विदर्भाकडं नारर बी सुक्कं भेट्टे.

तुमाले सांगतो, म्या जवा लहान होतो, तवा व्हराडा बहार राहनाऱ्या लोकायले वाटे बा तेथं जा च असन नं त, बैल-बंडीनं जा लागते. लोकायले वाटे का आकोल्या पावतो आलं, का बंडीनं जा लागते कोठबी. त्यायले वाटे का विदर्भामंदी नुस्ते सापं, इंचू अन वहागं राहते. नागपूरले एकदा का बा बंडीत बसला का पायं वरती घेऊन बसा लागते, नाई त डसते साप नाय त इंचू. त्यायले अंतराचा अंदाजा नसे. त्यायले वाटे का अकोला, अमरावती अन नागपूर जवर-जवर हाये. अकोला हून नागपूरले जाले आठ घंटे लागले, हेस मालूम नसे त्यायले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

लोकायले वाटे तेथं येवढं जंगल हाय का बा दिवसा-ढवऱ्या काइस नाय दिसतं. कोठून बी, कवा बी नक्षली लोकं येते अन घेऊन जातें. लोकायले याचं नसे तिकड, त्यायले वाटे का बा कितीक मागास लोक राहते तेथं. लोकायले सांगा लागे का बा घाबराच काम नाही तुमाले. त्यायले सांगा लागे बावा जाले यष्टी बी भेट्टे अन रेल्वे गी जाते तेथं. 

पयले इंदिरा गांधी येये तवा लोंकायले समजे का बा आनंदवन हाय काय तरी. जे सरकारी लोकायले सिक्षा कराची असंन त त्यायले धमकी देये सायेब लोकं “का बे? गडचिरोलीले करू काय ट्रांसफर तुही?” सरकारी लोकं बी भेऊन राहे का बा कोठं जा लागन का बा. इंग्रजायच्या जमान्यामंदी अंदमानची जशी भीती राहे न, तसी सरकारी काममंदी गडचिरोलीची, चंद्रपूरची राहे.

तावा आमच्या व्हराडी लोकायले बी मुंबै-पुन्याले जा चं त भेव लागे. आमचं एक गेलथं बम्बईले. ते लोकायची गर्दी पाहून बहकून गेलं. जेव्हढे लोकं त्यानं पुऱ्या जिंदगीत नसन पायले, तेव्हढे त्यानं एक्का रेल्वे स्टेशनामंदी पायले. भयताडावानी दुसऱ्या दिवसाले वापस आलं ते.

पन आता सर्व बदललं भौ. आता लोकायले व्हराडामंदी भाय जाऊशा लागते. एक मंजे जेव्हढे फोटो लोकं आपल्या बुड्या-बुडी सोबत नाही काहाडात, तेवडे विदर्भामंदी जाऊन कहांडते. लोकायले वाघं पाहाले जा च राहते तेथं. जेवडे वाघं व्हराडात राहते ना, तेवडे त पुर्ऱ्या देसामधी नसनं राहत. आमच्या ग्रामपंचायतीच्या इलेकशन मंदी, आमचा नऱ्या तायडे उभा ऱ्हायला. त्याले गावची लोकसंख्या कंट्रोल कसी कराची, त्या उपर वाघायची कसी वाढवाची ह्याची चिंता जास्ती ऱ्याये.

आता लोकं आनंदवनात का जाते, ताडोबाले जाते, हेमलकस्याले जाते, पार गडचिरोलीले जाते अन फोटो काहाडते. भाय फोटो काढते. आन फेसबुक वर टाकते. फेसबुक टाकते अन त्या उप्पर आमाले पाठवते. आता मले म्हनुशा लागते का “अबे, कोनाले पाठवून राहाला तू? आमची जिंदगी गेली न लेका तेथं.”

पन मंग वाटतें का बा पाठवून राहिला तं चांगलं हाये बावा. ह्याले आत्ता समजून राहालं ना, तं सांगू दे लोकायले. मले चंद्रावर अगुदर पासून राहानाऱ्या वानी वाट्टे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

आमच्या  लोकायले बी बाहार जा च नाय रहात. ते म्हन्ते “सगरे भेट्टे ना बे, फेसबुकवर. काहले जा लागेत कोठं?” आता त्या दिवसी म्या फेसबुक काहाडल, पायतो त आमचा सुन्या हिवरे जग्वारची एजन्सी घेतो म्हनून रहालता. फोन लावला त्याले, आनं म्हनलं,

“का बे जग्वार एजन्सी घेते का बे?”

“हो भाऊ”

“का बे, रास्ता हाय का बे जग्वार गाडी चालवाले”

“अबे, ते जग्वार नाय बे. ते नरं, टोटी गी राहाते न? ते जग्वार. पानी वालं, बाथरूम मधी लावते ते”

“असं का? पन बाप्पा, पानी नाय लागत का बे त्याले?” म्या म्हनलं.

“अबे, लोकं लय घरं बांधून राहले. त्यायले पानी नसन त चालन, पन नरं-तोट्या भाय चांगल्या पायजेल. पानी का बे, कवा बी येते आता. नागपुरले मेट्रो आली म्हन्ते न बावा.” सुन्या सांगे.

मांगं दत्ता पाटल्या भेटला. म्या विचारलं, “का करून राहला बे पोटापान्याले?”

पाटल्या म्हने “प्लॉटींग करून राहलो न.”

मले वाटलं पॉटिंग करते बा तो. झाडं गी लावते.

पाटल्या म्हने, “अबे नाय ना बे, आमच्या जमिनीचं प्लॉट करून विकून रहालो.”

म्या इचारलं, “कोन घेते बे?”

पाटल्या म्हने, “घेते नाय त का लेका लोकं? नाय कोनी त आमचे रिश्तेदार घेते न. टाइमपास होते ना बे.”

नऱ्या तायडे सांजच्याले हाय वे च्या धाब्यावर ग्रामपंचायतीच्या सभासदायची मीटिंग घेये. हे मीटिंग आली का बा समजाचं का, काई तरी बेक्कार प्राब्लेम आहे, गावाले अनं नऱ्या परेशान हाय. एकदा त्याले कोनतरी सांगे का बा आपला लय अनुशेष बाकी आहे. त्याले येवढं माहित होतं का काई तरी होऊन नाई राहालं आपल्या बरोबर. त्यानं मीटिंग बलावली होती तवा विचाराले का काई करता येते का बा.

आमच्या गावात बातम्या बी थोड्या उशिरानच येते. तसं आमच्या गावात सर्व काही उशिरानं येते. दोन वर्सा पूर्वी ‘शोले’ लागला होता त आमच्या गावच्या टुरिंग टाकीजवाल्यानं नवा पिच्चर लागून राह्यला म्हणून सांगितलं पोट्ट्यायले.

आता बी, नऱ्या न कोठंतरी वाचलं का बा कोकनचा कॅलिफोर्निया बनवून राहाले. त्यानं मीटिंग बलावली. “का हो, हे कोकणचा कॅलिफोर्निया बनवून राहाले म्हन्ते?” त्यानं इचारलं.

“हाऊ भाऊ. पन ते पुरानी न्यूज हाय. आता बम्बई चं शांघाय बनवते म्हन्ते.”

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

त्याच्या एका सभासदानं त्याले म्हायती देल्ली. ह्या सभासदाले पेपरं वाचाचा भाय शौक! नऱ्याले भाय घोर लागून राहे का बा कोकणचा कॅलिफोर्निया बनवते, बम्बईचं शांघाय बनवते त आपलं का बनवते?

“कोठं येते बे कॅलिफोर्निया? कोन हाय का आपलं तेथं?” सभासद सांगे का बा आपला जन्या देशमुख तेथं राहते. जन्या इंजिनीरिंग करून तेथं गेलथा नौकरी कराले.

“पाय ना. व्हाट्स यॅप गी लावता येते का ते?” नऱ्या विचारे. 

सभासदान त्याले फोन लावून देल्ला. त जन्या सांगे का कॅलिफोर्निया मंदी लय गर्मी पडली हाय. तेथं पान्याचे अशे का वांधे झाले आहे का, आता तेथं पानी बी लोक विकत घेते म्हन्ते. लाईट बी जाते म्हंते तेथं. लोडशेडींग करा लागन आता काही वर्सामदी. समद्या कॅलिफोर्नियात आगी लागून जंगलं जरून जात आहे. जंगलातून धूर येऊन समद्यायले का-का बिमारी होऊन राहाली. नऱ्या काहीस नाही बोले. 

जन्या नंतर म्हने, “बरं झालं लेका नऱ्या तू फोन केला. मले म्हाया पोरीसाठी जातीचं सर्टिफिकेट पायजे. ते आता लेका इथं बी कालेजात मांगा लागले. ते आपल्या ग्रामपंचायतीच्या आफीसातून भेटवून दे जो रे भाऊ.”

नऱ्या भाय हासाले लागे. तो मिटिंग मंदी सांगे, “अबे, कोकन चं त माहित नाही, पण कॅलिफोर्नियाचा विदर्भ झाला नं बाप्पा.” नऱ्याची एक कारजी मिटली होती. 

पन नऱ्याले पंदरा-वीस दिवसामधी असे झटके येत राहते. तीन दिवसापूर्वी त्यानं बोलावलं सम्द्यायले पुन्हा हायवे च्या धाब्यावर. नऱ्याचा चेहरा पार उतरला दिसे. 

त्यानं आल्या-आल्या सभासदाले विचारलं, “कितीक वाघं आहे देसात?” सभासद गूगल पाये अन नंबर सांगे त्याले.

“अबे, आपल्या इलाक्यात कितीक हाये ते सांग नं.” 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

नऱ्याले वाघायचे गनीत पक्क मायती राहे. त्याले समजे, का लोकं वाघं पाहाले जाते तवा आपल्या गावावरून जाते. वाघायवर ताडोबाले जर का बा कोनाचं हाटेल चालत असन त आपल्या गावची हायवे वरची चहाची टपरी, टायर पंचरचं दुकान बी चालते. म्हनून थो बारीक लक्ष ठेवे त्याच्यावर. 

“भाऊ, शंभर तरी आहे म्हंते बावा हे. पन काहून विचारून राहिले हो तुम्ही?” सभासद विचारे. 

नऱ्याचा घोर कमी झाल्यावानी वाटे. पन तो म्हणजे “अबे, चित्ते येऊन राहाले असं टीव्ही वर सांगे. आता चित्ते येनार असंन त वाहागं पाहाले कोण येईन बे?” नऱ्या विचार करे का नागपूरले कोनाशी बोलावं का बावा ह्याच्यावर.  

नऱ्याले लय प्रश्न पडे का कोणी म्हन्ते ‘येवा कोकण आपलाच असा’, कोनी म्हन्ते ‘पच्चीम महाराष्ट्रात या तुमाले फॅक्टरी काढाले जागा देतो’, पन कोनी ‘महाराष्ट्रात यावा’ असं नाय म्हणून राह्यलं.

आता अकोल्या पासून नागपुरले जा ले चार तास लागते. नागपूरहून चंद्रपूरले एक घंटा. लोकायले रस्ते चांगले झाले त भाय खुसी होते. लोंकायले वाट्टे का बा आजच्याले सरकार बी आपल्या इलाक्यातून चालून राहालं. पयले लोकायले वाटे का बा दिल्ली आपलं सरकार चालवून राहालं. पन आता त्यायले वाट्ते का बा आपल्यास इलाक्यातून दिल्ली चालून राहाली.

पाटल्या सांगे का “ट्रेन पाहाले भेटे का बे लहान असतानी? थांबे बी नाय आपल्या स्टेशना मंदी. आता पोरीले घेऊन चाल्लो नागपूरले मेट्रो दाखवाले. ते बी माह्या गाडीतून.” 

का दिवस आले बाप्पा? बाप पोरीले कार मदून रेल्वे दाखवाले घेऊन चाल्ला.

काल माही बायको यू-ट्यूब पाहे. म्हनलं, “का पाउन रहाली वं?”

तं  ते सांगे “ह्या तुमचा विष्णू मनोहर चंद्रपुरी वडा भात बनवून ऱ्हायला त? करून नाई पहा लागत का?”

अजून का पाहा लागते? वसकन हिरोती अन लसून-मिरचीचं वाटन टाकल्याबाराबर, माह्या बुडीले भाय खुशी झाली न बावा. मंबईच्या लोकायले काय तरी सिकउन दिल्यावानी वाटलं तिले. 

तुमाले सांगुन राहालो, बाकी कोनाचे अच्छे दिन येओ का नाय येओ बावा, पर आपल्या विदर्भवाल्या लोकायचे त पक्के आले दिसते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.

salilsudhirjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

Post Comment

Amol Agare

Wed , 26 October 2022

कोकनी , पच्चीम महाराष्ट्र मानसाले बी वरहाड़ी समजून राहिले ना बे . अच्छे दिन तर आलेच ना बुवा.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे.......