‘मॅजेस्टिक’ची केशवराव कोठावळे जन्मशताब्दीनिमित्त कादंबरी स्पर्धा...
पडघम - साहित्यिक
निवेदन
  • केशवराव कोठावळे, मध्यभागी वसंत सरवटे यांनी केशवरावांचं केलेलं रेखाचित्र
  • Sat , 24 September 2022
  • पडघम साहित्यिक केशवराव कोठावळे मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस कादंबरी स्पर्धा

केशवराव कोठावळे जन्मशताब्दीनिमित्त कादंबरी स्पर्धा -

प्रथम पुरस्कार - ₹ ५०,०००

द्वितीय पुरस्कार - ₹ ३०,०००

तृतीय पुरस्कार - ₹ २०,०००

नियम व अटी -

१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाची ‘किमान किंवा कमाल’ अशी कोणतीही मर्यादा नाही.

२) स्पर्धेसाठी पाठवलेली कादंबरी मराठीत किंवा मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेत असावी.

३) कादंबरीच्या आशय/विषयावर कोणतेही बंधन नाही.

४) कादंबरी कोठेही पूर्वप्रकाशित असता कामा नये.

५) कादंबरी पूर्णतः नवी आणि मूळ स्वरूपातील (Original) असावी, ती भाषांतरित किंवा इतर भाषेतील कादंबरीची मराठी आवृत्ती (adaptation) नसावी.

६) कादंबरीची किमान शब्दसंख्या ५०,००० (पन्नास हजार) इतकी असणे बंधनकारक आहे; ती जास्तीत जास्त कितीही शब्दांची असू शकते.

७) परीक्षकांच्या मते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करण्याकरता स्पर्धेतील कोणतीही कादंबरी गुणवत्तेच्या निकषांवर पात्र न ठरल्यास पारितोषिक न देण्याचा अधिकार संयोजकांकडे असेल.

८) स्पर्धेच्या निकालाबाबतचे सर्वाधिकार संयोजकांकडे असतील; त्याबाबतीत कोणताही पत्रव्यवहार किंवा तत्सम स्पष्टीकरण देण्याचे बंधन संयोजकांवर नसेल.

९) पारितोषिक विजेती कादंबरी ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने प्रकाशित होईल.

१०) स्पर्धकांनी आपल्या कादंबरीची छापील प्रत (लिखित किंवा टाईप केलेली हार्ड कॉपी) खालील पत्त्यावर दि. २८ फेब्रुवारी २०२३पर्यंत पाठवावी.

मान्यवर लेखकांनाही या स्पर्धेत भाग घेता येईल.

ई-मेल किंवा इतर कोणत्याही माध्यमात पाठवलेली कादंबरीची सॉफ्ट कॉपी स्पर्धेकरता ग्राह्य धरली जाणार नाही.

पत्ता :

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

३०८ फिनिक्स,

४५७ एस. व्ही. पी. रोड,

गिरगाव,

मुंबई – ४००००४.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......