मोदी सरकार पुरस्कृत ‘अ-संसदीय’ शब्दांची नवी यादी… ‘अ-संसदीय’ म्हणजे ‘बॅन’ (Ban) नव्हे!
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • पाठीमागे भारतीय संसदेचं छायाचित्र, वरती प्रियांका गांधी यांच्या ट्विटर हँडलवरून घेतलेलं चित्र
  • Thu , 14 July 2022
  • पडघम देशकारण लोकसभा Loksabha राज्यसभा Rajya Sabha संसद Parliament अ-संसदीय शब्द Unparliamentary Words

संसदेचं पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा सचिवालयाने नुकतीच काही नव्या अ-संसदीय शब्दांची यादी जाहीर केली आहे. हे शब्द या अधिवेशनादरम्यान आणि यापुढे लोकसभा व राज्यसभेत जेव्हा वापरले जातील, तेव्हा ते कामकाजातून काढून टाकले जातील.

तर या १५०हून अधिक पानांच्या यादीतील काही शब्द पुढीलप्रमाणे -

इंग्रजी शब्द

anarchist

ashamed

abused

bloodshed

bloody

betrayed

childishness

coward

chelas

Covid spreader

corrupt

cheated

criminal

crocodile tears

drama

dictatorial

disgrace

donkey

eyewash

fudge

foolish

goons

hooliganism

hypocrisy

incompetent

mislead

lie

sexual harassment

Snoopgate

untrue

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हिंदी शब्द

अपमान

असत्य

अहंकार

काला दिन

काला बाजारी

खरीद फरोख्त

खलिस्तानी

खून से खेती

गद्दार

गिरगिट

घडियाली आँसू

चमचा

चमचागिरी

जयचंद

जुमलेजीवी

ढिंडोरा पीटना

तानाशाह

तानाशाही

दोहरा चरित्र

दंगा

दलाल

दादागिरी

निकम्मा

नौटंकी

पिट्टू

बालबुद्धी

बेहरी सरकार

बेचारा

बॉबकट

लॉलीपॉप

विनाश पुरुष

विश्वासघात

शकुनी

संवेदनाहीन

संसदेत अशिष्ट-गैर मानल्या जाणाऱ्या म्हणजे अ-संसदीय शब्दांची यादी करण्याचे काम १९५९पासून सुरू आहे. त्यांचा समावेश असलेले ‘Unparliamentary Expressions’ हे पुस्तक लोकसभा सचिवालयाने १९९९मध्ये पहिल्यांदा प्रकाशित केले होते. त्यात स्वातंत्र्यपूर्व भारतातील केंद्रीय कायदेमंडळे, प्रांतिक कायदेमंडळे, हंगामी संसद, स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या दहा लोकसभा व राज्यसभा व विधिमंडळे, याचबरोबर ब्रिटनच्या संसदेने पारित केलेल्या शब्दांचा समावेश करण्यात आला होता.

अर्थात नंतरच्या तरीही काही शब्द राहून गेले होते आणि काही शब्द नंतरच्या काळात संसदेतील खासदारांकडून वापरले गेल्याने पुढे आले. अशा शब्दांची भर घालून या पुस्तकाची नवी आवृत्ती लोकसभा सचिवालयाने २००४ साली प्रकाशित केली. ही आवृत्ती किती पानांची असावी? तब्बल ९००. अर्थात यात हिंदी-इंग्रजी इतर भारतीय भाषांतील अ-संसदीय शब्दांचा आणि वाक्प्रचारांचाही समावेश आहे. काही शब्द व वाक्प्रचार कुठल्या संदर्भात वापरले तर ते अ-संसदीय ठरतील आणि केव्हा ठरणार नाहीत, याविषयीच्या स्पष्टीकरणांचा व उदाहरणांचाही समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे.

लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेचे अध्यक्ष यांना ‘अ-संसदीय’ शब्दांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असतो.

scumbag, shit, badmashi, bad, bandicoot, bluffing, Bribe, blackmail, bribery, thief, thieves, dacoits, bucket of shit, damn, deceive, degrade, darling (said to a female MP), lazy fools, liars, bloody liar, bloody Chair, bloody fellow, double minded, double standards, doubtful honesty, downtrodden, double talk, lazy, lousy, nuisance, loudmouth, racketeer, radical extremist, rat, dirty little rat, deliberately concealed, concocted, confused mind, confused and unintelligent, andhi-goongi, Ali Baba aur 40 chor, angootha chhaap, ajayabghar, corrupt practice, goonda, 420, prajatantra ka balaatkaar (rape of democracy) असे अनेक शब्द यापूर्वीच अ-संसदीय ठरवण्यात आलेले आहेत.

संसदेने पारित केलेल्या शब्दांवरून राज्यांतल्या विधानसभा आणि विधानपरिषदा त्यांची यादी बनवतात. आणि उलट विधानसभा आणि विधानपरिषदा यांमध्ये वापरल्या गेलेल्या शब्दांचाही समावेश लोकसभा सचिवालय त्यांच्या यादीत करत असते. त्यात वेळोवेळी भरही घालली जाते.

केवळ आपल्याकडेच नाही, तर जगातल्या अनेक लोकशाहीतल्या देशांच्या संसदेच्या आणि विधिमंडळाच्या अशा प्रकारच्या अ-संसदीय शब्दांच्या याद्या पाहायला मिळतात. उदा. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जपान, भारत, आयर्लंड, इटली, न्यूझीलंड, नॉर्वे, ब्रिटन, अमेरिका इत्यादी. लोकप्रतिनिधींनी बोलताना, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना किंवा विरोधकांना प्रत्युत्तर देताना कुठले शब्द वापरू नयेत, कुठल्या संदर्भात व कुणासंदर्भात वापरू नयेत, यासाठीचा हा सामान्य संकेत आहे.

सगळेच सत्ताधारी असे काही हरकतीचे शब्द ठरवतात. बोलण्यातली आणि टीकेतली सभ्यता निदान लोकशाहीच्या मंदिरात तरी पाळली जावी, असा सामान्य संकेत त्यामागे असतो, आहे. नवे शब्द जाहीर होतात, तेव्हा विरोधी पक्ष त्यावर आक्षेप घेतात, हाही तसा, निदान आपल्याकडचा सामान्य संकेत आहे.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट -  ‘अ-संसदीय’ म्हणजे ‘बॅन’ (Ban) नव्हे!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......