सरकारने दिल्या शेतकऱ्यांच्या हातावर तुरी...
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण मनोहर तोरडमल
  • नाफेड केंद्रावरील तुरीची आवक
  • Thu , 09 March 2017
  • पडघम कोमविप तूर Tur देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis सदाभाऊ खोत Sadabhau Khot हमीभाव Hamibhav बाजारभाव Bajarbhav

राज्यातील महानगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं असल्यानं ते साजरं करण्यात राज्य सरकार मश्गूल झालं आहे. त्यात मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद शिवसेनेपेक्षा कमी सदस्य संख्या असल्याने अपेक्षेप्रमाणे भाजपला मिळवता आलेलं नाही. त्यामुळे तिथंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गनिमी कावा करत महानगरपालिकेच्या महापौरपदासह इतरही महत्त्वाच्या पदांसाठीच्या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. शेवटी काल शिवसेनेला पाठिंबा देऊन सेनेचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा फडकला. मुंबई सेनेच्या ताब्यात राहिली.

एकीकडे मुंबई ताब्यात घेण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली नाही, पण दुसरीकडे त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या संयमाची कसोटी पाहायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या खरेदीबाबत मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी उलटसुलट विधानं करून आधीच तुरीपायी जेरीस आलेल्या शेतकऱ्यांना आणखीनच अडचणीत टाकलं आहे. मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी म्हणाले की, ‘आम्ही केंद्राकडे तूर खरेदीचा कोटा वाढवून मागू’, तर परवा कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘शेतकऱ्यांकडे तूर असेपर्यंत राज्य सरकार तिची खरेदी चालूच ठेवणार’.

प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे? गेल्या आठ दिवसांपासून तूर खरेदीसाठी बारदाणा शिल्लक नसल्याच्या आणि गोदामामध्ये खरेदी केलेली तूर साठवण्यासाठी जागा नसल्याच्या कारणावरून नाफेडनं खरेदी बंद केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या केंद्रांवर विक्रीसाठी आणलेल्या तुरीची रखवाली करण्यासाठी शेतातील रब्बी हंगामाची कामं सोडून थांबावं लागत आहे. त्यातच तूर खरेदीनंतर मोबदलासुद्धा महिना-महिना मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या तूर खरेदी केंद्रांवर अडकून पडल्यानंतरही आता खरेदी बंद झाल्यानं तुरीचं मोजमाप कधी होणार आणि कधी आम्हा शेतकऱ्यांची सुटका होणार?

२०१४मध्ये मोदी सरकारने ‘पन्नास टक्के नफा देणारे हमीभाव शेतकऱ्यांना देऊ’ असं आश्वासन दिलं होतं. ते तर सरकारनेच पाळलं नाहीच, पण आता तुरीसाठी जो हमीभाव दिला होता, त्यापेक्षा बाजारभाव कमी झाला आहे. या प्रश्नांचं कुठलंही उत्तर न देता, मुख्यमंत्री व कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या हातावर भरदिवसा तुरी देऊ पाहत आहेत.

दुसरं असं की, केंद्रशासनानं आयात शुल्कमुक्त तुरदाळ, हरभरादाळ, सोयाबीन, गहू यांची विदेशातून आयात करून तो माल बाजारात आणल्याने, शिवाय नोटबंदीच्या निर्णयानं देशांतर्गत भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भाजप सरकारनं लोकसभा निवडणुकीत दिलेलं आश्वासनदेखील पाळलेलं नाही. सध्या हमी भावाच्याही २५ ते ४० टक्के कमी दराने तूर व इतर शेतीमाल विकला जात आहे. त्यामुळे शासनाने ज्या शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात मालाची विक्री केली असेल तो भाव व हमीभाव यांतील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून नगदी स्वरूपात विनाअट द्यायला हवी.

एका शेतकऱ्यानं त्याची भावना व्यक्त करताना असं म्हटलं आहे की, ‘असं वाटतं की, कोठून तूर पेरली असं झालंय!’

आधारभूत किमतीनं विकण्यासाठी तूर गेल्या २० दिवसांपासून खरेदी केंद्रांवर नेली आहे. तिथं न्यायला दीडहजार रुपये भाडं आणि प्रत्येक रात्रीची ५०० रुपये खुटी लागत आहे. माझी २५ क्विंटल तूर आहे. आताच भाडं १० हजारांवर पोहचलं आहे. दररोज रात्री एक माणूस मुक्कामी जातो. मोटारसायकलला हजार-दीडहजाराचं पेट्रोल लागतं. कधी मोजमाप होईल सांगता येत नाही. केंद्रावरून तूर परत आणायची म्हटलं आणि व्यापाऱ्याला विकावी म्हटलं तर तोही ३५००-४००० हजार क्विंटलनं मागतो. अशा परिस्थिती शेतकऱ्यानं काय करावं?

कडधान्यावरील साठा मर्यादा पूर्णपणे हटवण्याकडेही प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज आहे. सध्या दोनशे टनांपेक्षा अधिक साठा करण्यावर कायदेशीर बंदी आहे. यामुळे व्यापारी व इतर साठा करण्याच्या ठिकाणी खरेदी रोडावली आहे. ज्या वेळी कडधान्याचा तुटवडा होतो, त्यावेळी साठेबाजी होऊ नये या उद्देशाने साठा मर्यादा लावणं योग्य होतं; मात्र आता कडधान्यांचा विपुल पुरवठा सुरू झाला असताना अशा प्रकारची बंधनं घालणं कितपत योग्य ठरेल?

तुरीसह एकूणच कडधान्यांच्या कोसळत्या बाजाराला आधार द्यायचा असेल, तर तातडीने निर्यात बंदी हटवली पाहिजे. देशात २००६-०७ मधील दुष्काळी स्थितीनंतर कडधान्यांचं उत्पादन १४० टनांपर्यंत घटलं होतं. त्यावेळी देशांतर्गत पुरवठा नियंत्रणाखाली राखण्यासाठी सरकारनं निर्यातीवर बंदी घातली होती. ती आजतागायत कायम असून त्याबाबत फेरविचार करण्याची गरज आहे.

पुढील वर्षी जर शेतकऱ्यांनी कडधान्यांची कमी प्रमाणात लागवड केली, तर त्याचा फटका सरकार, ग्राहकांसह सर्वांनाच बसणार आहे. गेल्या दोन वर्षांत कडधान्यांचे भाव तेजीत होते. त्यामुळे यंदा उत्पादन वाढलं आहे. ही उत्पादन वाढ टिकवून ठेवण्यासाठी किमान आधारभावाच्या वर बाजारभाव टिकणं गरजेचं आहे, ही बाब सरकारच्या गळी उतरवण्यासाठी सर्वच घटकांचं साह्य घेणं आवश्यक आहे. एखाद्या पिकाच्या उत्पादन वाढीचं योग्य नियोजन झालं नाही तर, त्याचे काय परिणाम होतात, हे आपण कांद्याच्या बाबतीत पाहतो आहोत.

 

लेखक कृषी पदवीधर असून पूर्णवेळ शेती करतात.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......