हे पुस्तक म्हणजे अपप्रचाराला खोडून काढून वास्तव समोर आणणे, यासाठी एका सामान्य कार्यकर्त्याने केलेला प्रयत्न आहे!
ग्रंथनामा - झलक
विवेक कोरडे
  • ‘भगतसिंग, गांधी आणि सावरकर : अपप्रचारामागचे वास्तव’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 03 May 2022
  • ग्रंथनामा झलक भगतसिंग गांधी आणि सावरकर : अपप्रचारामागचे वास्तव ‌BhagatSingh Gandhi aani Savarkar - Appracharamagche Vastav विवेक कोरडे Vivek Korde

सामाजिक कार्यकर्ते डॉ. विवेक कोरडे यांचे ‘भगतसिंग, गांधी आणि सावरकर : अपप्रचारामागचे वास्तव’ हे पुस्तक नुकतेच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला लेखकाने लिहिलेले हे मनोगत...

..................................................................................................................................................................

अवघ्या काही दशकांपूर्वी साडेतीन टक्क्यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (संघ) पूर्वाश्रमीचा राजकीय अवतार भारतीय जनसंघ आणि त्याचा नवा अवतार भारतीय जनता पक्ष आता ४० टक्क्यांच्या आसपास मते मिळवत असून, गेल्या सात वर्षांपासून केंद्रात पूर्ण बहुमताने सत्तेवर आला आहे. जोपर्यंत भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि त्या आंदोलनातील नेते यांचा प्रभाव जनतेवर होता, तोपर्यंत समाजातील तथाकथित उच्चवर्णीय आणि छोट्या-मोठ्या व्यापारी व उद्योजकांना वगळले तर या पक्षाकडे सर्वसामान्य मतदार ढुंकूनही पाहत नव्हता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या आधीपासूनच तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना बदनाम करण्याची मोहीम चालवली होती. १९२०मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले. गांधीजींनी सर्वसामान्यांच्या उत्थानाचा आशय स्वातंत्र्य आंदोलनाला जोडला. त्यामुळे गांधीजी देशाचे सर्वोच्च नेता झाले. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना (१९२५) केली गेली. अन्य जातीयवादी संघटनांप्रमाणेच संघ स्वातंत्र्य आंदोलनापासून अलिप्त होता. त्यामुळे ही संधी मंडळी काँग्रेस आणि गांधी-नेहरूंचा द्वेष आणि त्यांची बदनामी, याशिवाय काहीच करू शकत नव्हती. गांधी-नेहरू आणि काँग्रेस यांची बदनामी करणे, हिंदू-मुसलमानांतील विद्वेष वाढवून ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला मदत करणे, हे कार्य संघाने सातत्याने केले. आज हीच मंडळी स्वतःला ‘राष्ट्रवादी’ म्हणवतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

महात्मा गांधींच्या विरोधात संघाने निर्माण केलेल्या विषाक्त वातावरणाची परिणती संघ स्वयंसेवक नथुराम गोडसे आणि त्याच्या टोळीने केलेल्या महात्म्याच्या हत्येत झाली. हत्येनंतरही गांधीजींना बदनाम करण्याची मोहीम बंद झालीच नाही. महात्म्याला प्रात:स्मरणीय ठरवल्यानंतरही ती सुरूच राहिली आणि आजही सुरूच आहे.

१९७४मध्ये मी पनवेलच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये अकरावीत शिकत होतो. रानडे नावाचे शिक्षक आम्हाला मराठी शिकवायचे. अवांतरपणे बोलताना सहजपणे विनोद सांगायच्या आविर्भावात त्यांनी एक किस्सा सांगितला होता. एक माणूस पुण्यात शिवाजीनगरला जाणाऱ्या बसमध्ये चढला आणि त्यांनी कंडक्टरकडे गांधीनगरचे तिकीट मागितले. कंडक्टरने बस शिवाजीनगरला जाते, असे सांगितल्यावरही त्या माणसाने ‘ही बस गांधीनगरला जात नाही का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर कंडक्टरने म्हणाला, ‘कुठे शिवाजी आणि कुठे गांधी’ (हे वाक्य कुत्सितपणे). सारा वर्ग हसला. अशा प्रकारे अत्यंत सूक्ष्म पातळीवर आणि जिथे शक्य असेल तिथे उघडपणे गांधीजींना बदनाम करण्याचे कार्य पद्धतशीरपणे होत राहिले. अर्थात त्याचे परिणाम होत होत आमची पिढी वाढली.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

त्यानंतर मी मुंबईच्या पोदार वैद्यकीय महाविद्यालयात शिकण्यासाठी आलो. या काळात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत काही विद्यार्थी वैद्यकीय शिबिरासाठी ठाणे जिल्ह्यातील आस्वली या आदिवासी गावात जात असत. मीही एकदा तेथे शिबिरासाठी गेलो होतो. २६ जानेवारी नुकतीच होऊन गेली असावी. एका वृद्ध आदिवासीशी बोलताना मी त्यांना ‘आपण झेंडावंदन का करतो?’ असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी ‘हा झेंडा आम्हाला गांधीबाबाने दिला आहे,’ असं उत्तर दिलं. आस्वली हे गाव घोलवड रेल्वे स्टेशनपासून आठ किलोमीटर दूर आहे. तेव्हा तेथे जायला रस्ता नव्हता. पायवाटेने चालत जावे लागायचे. अशी त्या वेळची परिस्थिती होती. अशा गावातही गांधीबाबा पोहोचला होता. त्यामुळेच संघाच्या विद्वेषी प्रचाराचा उपयोग होत नसावा.

आता ती पिढी केव्हाच संपली आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्य आंदोलनाबाबत जाणण्याची फारशी उत्सुकता नाही. त्यांचा इतिहासाचा अभ्यास वार्षिक परीक्षेला विषय आहे म्हणून परीक्षेपुरता असतो. अन्यथा सर्वसाधारणपणे या पिढीला इतिहासाशी देणे-घेणे नाही. अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुकसारख्या समाजमाध्यमांच्या साहाय्याने केलेल्या अपप्रचाराने या पिढीची दिशाभूल केली जात आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा, स्वातंत्र्य आंदोलनातून निर्माण झालेली आधुनिक मूल्ये आणि त्या मूल्यांची देशाला असलेली गरज, याचे फारसे भान या पिढीला फारसे नाही. स्वातंत्र्य आंदोलनात अहिंसक आणि क्रांतिकारी असे दोन प्रवाह होते. तिसरा प्रवाह जातीयवादी मंडळींचा होता. या स्वातंत्र्यद्रोही प्रवाहातील मंडळींना आदर्श मानणारे लोक आज गांधी आणि भगतसिंग यांना त्यांचे विचार वगळून सोयीस्करपणे वापरायचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे गांधींना ‘प्रातःस्मरणीय’ म्हणत दुसरीकडे नथुरामचे उदात्तीकरण करत आहेत. अंदमानात शेकडो स्वातंत्र्यवीरांनी हालअपेष्टा सोसल्या, मरण पत्करले, पण ते ब्रिटिशांना शरण गेले नाहीत. असे असताना केवळ सावरकरांचे उदात्तीकरण करण्याचा उद्योग सातत्याने केला जात आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘भगत सिंग, गांधी आणि सावरकर : अपप्रचारामागचे वास्तव’ हे पुस्तक अशा अपप्रचाराला खोडून काढून वास्तव समोर आणणे, यासाठी एका सामान्य कार्यकर्त्याने केलेला प्रयत्न आहे. या पुस्तकातील लेख वेगवेगळ्या वेळी लिहिले असल्याने यात काही ठिकाणी पुनरुक्ती झाली आहे. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी अनेकदा पुनरुक्तीचीही आवश्यकता असते. यासाठी पुनरुक्तीचा दोष मी पत्करतो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......