‘श्रीकृष्णलीलामृतसिंधू’ : निखळ महानुभावीय परंपरेतलं २०० वर्षांपूर्वीचं भागवत
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
इंद्रजित भालेराव
  • ‘श्रीकृष्णलीलामृतसिंधू’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 19 March 2022
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो श्रीकृष्णलीलामृतसिंधू Shreekrushnaleelamrutsindhu दामोदर धाराशिवकर Damoddar Dharashivkar महानुभवा Mahanubhav

परवा बा.भो. शास्त्री घरी आले होते, तेव्हा त्यांनी ‘श्रीकृष्णलीलामृतसिंधू’ ही अनमोल ग्रंथभेट माझ्या हातावर ठेवली. दामोदर धाराशिवकर या महानुभाव कवीने लिहिलेला हा महानुभावीय भागवताचा ओवीबद्ध ग्रंथ आहे. तो ७६ अध्यायाचा असून त्याची ओवी संख्या २०,३५५ आहे.

गेली अनेक वर्ष बा.भो. शास्त्री यांनी या ग्रंथाच्या प्रकाशनाचा ध्यास घेतला होता. एवढा मोठा ग्रंथ संपादित कोण करणार? प्रकाशित कोण करणार? हे प्रश्न होतेच. पण बा.भो. शास्त्री अत्यंत चिकाटीचे  आहेत. त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली आणि हा ग्रंथराज आता उपलब्ध करून दिला आहे.

बा.भो. शास्त्री दरवर्षी चिंतनीचं अधिवेशन घेतात. त्याला आता २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं या वर्षी हे अधिवेशन पांचाळेश्वरला रौप्यमहोत्सवी म्हणून होणार होतं. सगळा खर्च अहमदनगरच्या नागेबाबा सोसायटीचे कडुभाऊ काळे उचलणार होते. पण करोनामुळे ते अधिवेशन रद्द करावं लागलं. बा.भो. शास्त्री यांनी त्यांच्या दातृत्वाचा ओघ ग्रंथप्रकाशनाकडे वळवला आणि हा प्रश्न सोडवला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

काळे यांनी रॉयल डेमी आकारातला, शुभ्र मॅपलिथो कागदावरचा ८०० पानांचा, पुठ्ठा बांधणीचा हा ग्रंथ केवळ ३०० रुपयांत उपलब्ध करून दिलेला आहे. बाजार भावाने या ग्रंथाचं मूल्य कमीत कमी २००० असायला हवं. महानुभाव पंथ आणि मराठी वाङ्मयविश्व कडूभाऊंचं कायम ऋणी राहील.

या ग्रंथाचे कर्ते महाकवी दामोदर धाराशिवकर हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पारद या गावचे. त्यांचा जन्म १७६४ साली एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना वयाच्या नवव्या वर्षी महानुभाव साधू ओंकार मुनी यांना अर्पण करण्यात आलं. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. आणि ‘श्रीकृष्णलीलामृतसिंधू’ हा ग्रंथ वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी लिहून पूर्ण केला.

त्यांचे गुरू ओंकार मुनी हेदेखील कवी होते आणि त्यांनी ‘लिलानिधी’ नावाचा १०० अध्यायांचा ग्रंथ लिहिलेला होता. तो अजून अप्रकाशित आहे. दामोदर धाराशिवकर यांनी आपल्या गुरूकडूनच काव्याची प्रेरणा घेतलेली असावी. त्यांनी पुसद तालुक्यातल्या शिरपूर या गावी हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे १८१४ साली, बुधवारी, श्रावण वद्य अष्टमीला, तिसऱ्या प्रहरी लिहून पूर्ण केला.

या ग्रंथाला आता २०८ वर्षं झाली. तेव्हा देशावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झालेली नव्हती. आणि आपल्याकडं तर निजामाचं राज्य होतं. या काळातला असा हा महाग्रंथ सध्यातरी मराठीत एकमेव असावा. कारण हा प्रामुख्यानं शाहिरी वाङ्मयाचा कालखंड होता. अशा काळात निजाम राजवटीतल्या एका महानुभाव साधूने या महाकाव्याची निर्मिती करावी, ही गोष्ट विशेष आहे. त्यामुळे या ग्रंथाचा अनेक अंगांनी अभ्यास व्हायला हवा.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................ 

तो काळ बोरू आणि शाई हाताने करावी लागायची असा होता. कागदही दुर्मीळच असायचा. शिवाय या ग्रंथाचे कवी दामोदर धाराशिवकर दीक्षित महानुभाव असल्याने सतत फिरतीवर राहून भिक्षेवर जगणारे. त्या काळात ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत, भिक्षा मागत, रानावनात झाडाखाली बसून लिहिलेला हा ग्रंथ. ती भाग्यवंत झाडंदेखील आता कदाचित नसतील आणि असली तरी कुणाला माहीत नसतील!

मुरलीधर शास्त्री आराध्य यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीला ‘श्रीमद्‍भागवताचे पंथीय महत्त्व’ नावाचे एक अभ्यासपूर्ण टिपण लिहिले आहे. त्यात संपूर्ण इतिहासाचा धांडोळा घेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्यापासून पुढे पाच शतकं कुणीकुणी भागवत आधारित काव्याच्या रचना केल्या आहे, ते साधार सांगितलं आहे. आणि निष्कर्ष काढला आहे की, महानुभावांच्या साहित्यनिर्मितीमध्ये श्रीमद्भागवत पुराणांतर्गत दशम स्कंध आणि एकादश स्कंध यांचा सिंहाचा वाटा आहे.

या ग्रंथाचे प्रास्ताविक दि.कों. माळवे यांनी लिहिले आहे. माळवे हे महानुभाव साहित्याचे संशोधक आणि हस्तलिखितांचे संकलक आहेत. प्रस्तुत भागवत हे त्यांच्याच संकलित संग्रहालयातून मिळालेले आहे. त्यांना ते हस्तलिखित खानदेशातील शिरपूर तालुक्यातील जतोडे या गावचे श्री.रामचंद्र लोंढाजी ब्राह्मण पाटील यांच्याकडून मिळालेले होते. श्री.माळवे यांनी ते बा.भो. शास्त्री यांना दाखवले. शास्त्रींनी ते प्रकाशित करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि संपादकीय संस्कारासाठी अहमदनगरचे प्राचार्य श्री खासेराव शितोळे यांच्याकडे दिले.

खासेराव शितोळे यांनी अखंड आणि अथक मेहनत घेऊन त्याची मुद्रण प्रत तयार केली. एक सविस्तर प्रस्तावना लिहून कविचा परिचय आणि या काव्याचे वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखवले. खासेराव शितोळे यांचे हे पंथावर आणि मराठी वाङ्मयविश्वावर हे मोठेच उपकार आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

महानुभाव लोक श्रीकृष्णाचे भक्त. परंतु महानुभाव कवींनी लिहिलेले श्रीकृष्णाचे चरित्रग्रंथ इतके दिवस उपलब्ध नव्हते. त्यामुळे श्रीधर कवीचे ‘हरिविजय’ आणि ‘पांडवप्रताप’ हेच ग्रंथ महानुभाव मठातून श्रावण महिन्यात वाचले जात असत. पण अलीकडच्या काळात महानुभावीयांनीही भागवत लावायला सुरुवात केली.

आता या ग्रंथाच्या रूपाने त्यांना महानुभावीय भागवत उपलब्ध झालेलं आहे. कारण चक्रधर निरुपित श्रीकृष्णचरित्राचा आधार हाच या ग्रंथाचा मूळ पाया आहे. त्यामुळे निखळ महानुभावीय परंपरेतलं भागवत ज्याला म्हणता येईल, असा हा ग्रंथ आता महानुभावीयांना खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि इतरांना २०० वर्षांपूर्वीच्या भाषेचा नमुना म्हणून अभ्यासता येणार आहे.

.................................................................................................................................................................

लेखक इंद्रजित भालेराव प्रसिद्ध कवी आहेत.

ibhalerao@yahoo.com
.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......