अजूनकाही
‘मासिक पाळी’ हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. तुमची पाळी येत असेल तरी, आणि नसेल तरी... शेवटी आपल्या सगळ्यांचा उगम ‘पाळी’मधूनच तर होतो! तरीदेखील पाळीबद्दल बोलायचं झालं की, आपण हा ‘बायकांचा विषय’ म्हणून बाजूला सारतो. त्यामुळे पाळी, लैंगिकता आणि त्यासंबंधित अनेक विषय सगळ्यांपर्यंत पोचत नाहीत. आणि मराठीत या विषयांवर बोलणं अजूनही अनैसर्गिकच मानलं जातं.
पण या विषयांवर रोजच्या जीवनात मोकळेपणाने बोलता यावं, असं आम्हाला वाटतं. त्याचबरोबर पाळी व त्यासंबंधीची माहिती सर्वांसाठी उपलब्ध असावी असं वाटतं. त्यामुळे ‘अमारा प्रकल्प’ व ‘अक्षरनामा’ सादर करत आहे, न बोलल्या जाणाऱ्या विषयावरचं हे नवं सदर- ‘आता तुझी ‘पाळी’!’... दर पंधरवड्यानं.
या पहिल्या भागात सायुरी आणि सुरभी ‘अमारा प्रकल्पा’ची, त्यांच्या कामाची व स्वतःची ओळख करून दिली आहे. ऐका तर, त्यांना ‘पाळी’बद्दल कसं कळलं, पहिल्यांदा पाळी केव्हा आली याविषयी आणि शाळा, स्त्रीच्या प्रजनन-संस्थेची ओळख आणि मोकळेपणानं संवाद साधण्याची गरज यावरील चर्चा व गप्पा!
आमच्या या प्रयत्नात तुम्हीही सामील व्हा, तुमच्या प्रक्रिया कळवा,
आमच हा उपक्रम इतरांशी शेअर करा.
कारण... आता तुमची ‘पाळी’ आहे!
.................................................................................................................................................................
वरील ऑडिओमध्ये उल्लेख असलेलं चित्र -
.................................................................................................................................................................
काल ‘अक्षरनामा’च्या फेसबुक-ट्विटर पेजवर, टेलिग्राम चॅनेलवर आणि व्हॉटसअॅप ब्रॉडकास्टवर शेअर केल्या गेलेल्या प्रोमो व्हिडिओचा श्रेयनिर्देश :
Shot & Edited by Maithili Ajay Phatak
Voiceover by Surabhee Arjunwadkar
Cover Design by Indawee Pandit
.................................................................................................................................................................
सुरभी अर्जुनवाडकर
surabheearjun@bennington.edu
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment