सुमारे १० वर्षांपूर्वीची गोष्ट. पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेली एक मुलगी तिच्या एका उदगाराने खूपच लोकप्रिय झाली. ती कोण, कशी, कुठली आहे, याचा पत्ता कोणाला नव्हता. परंतु ती बोलता बोलता केव्हाही ‘फक्’ म्हणते, असा तिच्याबद्दलचा बोलबाला सुरू झाला. बारावी करून आलेली ती तरुणी उघड आहे, इंग्रजी माध्यमातून शिकून आलेली होती. विद्यापीठातले अजून टिकून राहिलेले ग्रामीण, गरीब, गंभीर वातावरण तिच्या या उच्चाराने गरम झाल्याचे काही वरिष्ठ विद्यार्थी सांगत होते.
तिच्यासाठी अगदी सहज अन निरागस असलेला हा उदगार विद्यापीठातल्या थोर, थोराड, थुलथुलीत, थातुरमातूर अशा साऱ्यांना फारच धाडसी वाटला. हळूहळू ती अन तिचा उदगार चांगलेच रुळले. एकदा माझ्या पुढ्यात बोलताना तिच्या तोंडून तो उदगारा बाहेर पडला आणि ती चक्क शरमली. ‘सॉरी’ म्हणू लागली. मी काही प्रतिक्रिया दिली नाही. विद्यापीठात कपडे, भाषा, रिकामा वेळ, मैत्री आदी विषयांवर काही टीकाटिपणी करायची नसते. एक तर सारे विद्यार्थी मोठे झालेले असतात आणि ज्ञानग्रहणाच्या आड अशा फालतू गोष्टी आल्या नाही पाहिजेत, या मताचा मी. वयाचा भाग असतो, तसा सवयीचाही. शिक्षकांनी अशा बाबींत लक्ष घालायचे नसते.
इंग्रजी चित्रपट, साहित्य, माध्यमे यांच्याशी जोडल्या गेलेल्यांना या शब्दाचा परिचय इतरांच्या मानाने खूप आधी होतो. आता तो निरुपद्रवी अन नैसर्गिक सहजोदगार वाटावा एवढा त्याचा वापर समोर येतोय. हिंदी, इंग्रजी, मल्याळी, कोरियन, इंडोनेशिया, जपानी, फ्रेंच अशा कितीतरी चित्रपटांत अन मालिकांत तो ओटीटी मंचावर निर्धास्त असतो!
मुद्दा सेन्सॉरचा अथवा संस्कृतीचा नाही. एखादा देश किंवा त्याचा इतिहास यांचाही नाही. नटनट्यांच्या सोवळेपणाचा नाही की, कोणाला काय वाटेल याचा! जगभरच्या भाषांत तो घट्ट जुळून गेल्यासारखा झालाय. गंमत म्हणजे अनेक चित्रपट अन वेबमालिका इंग्रजीत एखाद्या पात्राच्या तोंडी उदगारलेला हा शब्द सबटायटल्समध्ये मात्र ‘शिट’, ‘नटस’, ‘डॅम्न’, ‘कस’ असा काहीही देऊन मोकळे होतात. काहीदा पहिला ‘एफ’ व शेवटचा ‘के’ यांमध्ये फुल्या फुल्या अशा फुल्या समोर येतात. पण ‘बिप’ केले काय, फुल्या टाकल्या काय, तो शब्द कोणताय, याचा उलगडा अगदी सहज होतो. त्याने ना अंग शहारते, ना कान तापतात, ना डोक्यात तिडिक जाते, ना ओठांवर शिवी येते. तो आता जगातल्या अनेक संस्कृतीत सहजगत्या सामील झालेलाय.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
ती विद्यार्थिनी ज्या शालेय संस्कृतीमधून आलेली होती, तिथे बंडखोरी, विद्रोह अथवा बिनधास्तपणा यांचा ‘श्राव्य’ उदगार म्हणजे हा शब्द. अन्य कुठल्या शिव्या कदाचित अवघडलेपण आणि अडसर उत्पन्न करत असतील. त्या अगदीच उद्धार करणाऱ्या असतील किंवा फारच टोकदार वाटत असतील. पण हा उदगार खरोखरच शिवासारखा वापरात असतो का?
मोबाईलमधल्या ‘डिक्शनरी डॉट कॉम’ या अॅपला या शब्दाचा अर्थ विचारला तर आधी ‘युसेज अॅलर्ट अबाउट फक’ अशी ओळ येते व आपल्याला पुढल्या गोष्टी कळतात : अनेकांसाठी हा शब्द अत्यंत ओंगळ, गलिच्छ, अयोग्य आणि सर्व प्रकारे मना असणारा आहे. तरीही या शब्दाची विविध रूपे असून प्रामुख्याने ती शब्दश: नसणारी आणि स्लँग स्वरूपाची आहेत. तरीही त्यांची सहज वापरात वाढ होताना आढळते.
आपसूकपणे तोंडात आलेला असा उदगार जो धक्का, भय वा चीड यांबाबत असतो. तसेच शाब्दिक चाळा आणि प्रभावोत्पादक वापरही त्याचा होतो. कधी वैताग, कधी अस्वस्थता, तर कधी आश्चर्य यासाठीही तो वापरतात. ‘व्हेअर आर माय फकिंग कीज?’, ‘व्हॉट द फक इज टेकिंग सो लाँग?’, ‘धिस इज फकिंग ऑसम…’ इत्यादी. तरीदेखील सभ्य लोकांसमक्ष या शब्दाचा उच्चार करणे टाळले जाते. प्रसारमाध्यमांनी या शब्दाची अडवणूक काही ध्वनींनी करावी वा पूर्णपणे वगळावी, असा सक्त नियम करण्यात आलेला असून तो तोडणाऱ्यास शिक्षा होते.
काही वेळा एखादे व्यंजन अदृश्य करून तो शब्द प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या जातात. बोलताना त्या शब्दाचा अतिशय कल्पक वापर नव्या पिढीकडून होत असतो. आता तर या शब्दाचा संदर्भ द्यायचा असल्यास ‘एफ’ची विविध रूपे पुढे येतात. प्रत्यक्ष अर्थावाचून त्याची चर्चा करण्यासाठी तो उभा असतो.
अर्थ : १) फक् : क्रियापद : स्लँग : अश्लील : संभोग करणे; २) एखाद्याला कठोरपणे वा अन्यायाने वागवणे; ३) लुडबूड करणे; ४) संताप वा शिसारी वा अव्हेर इत्यादी प्रसंगीचा उदगार.
वर सांगितलेले प्रसंग आणि या शब्दाचा स्त्री व पुरुष पात्रांनी केलेला उच्चार बरोबर जुळतात. वयात आलेली १३-१४ वर्षांची मुलंमुली असोत की, जख्खड म्हातारे, ‘फक्’ म्हणणारे सारेच आढळतील.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
हताशा, आनंद, दु:ख, विजय याही भावनांनी ‘फक्’ला पत्करलेले दिसले. इंग्रजीत ‘फ’ या अक्षराचा उच्चार तोंडातून हवा काढून केला जातो. मराठीत हवा जोरात येत नाही, पण दोन्ही ओठ दुमडून आत घ्यावे लागतात. ‘फजिती’ या शब्दाचा उच्चार करतेवळी तोंडासमोर समजा पेटती मेणबत्ती ठेवलेली असेल, तर ती थोडीशी थरथरलेल, एवढीच हवा तोंडावाटे फुंकरीप्रमाणे बाहेर पडते. त्यामुळे ‘फक्’चा उच्चार करतेवेळी चित्रपट-मालिका यांमधली बव्हंश पात्रे घसा, ओठ, मोठे तोंड या सर्वांचा ठाम वापर करतात. आपली भावना आणखी प्रभावी करण्यासाठी सर्व मौखिक हत्यारे ती या शब्दासाठी पाजळतात. चेष्टामस्करी, चिडवाचिडवी, टिंगल, वेडावणे यांसाठीही त्याचा वापर केला जातो. पण त्या वेळी डोळे, भिवया, तोंड, नाक यांचाही आधार घेतला जातो.
याचा अर्थ संभोग असा आहे. मात्र हा शब्द त्या शारीरिक क्रियेमधला संथपणा व उत्कटता व्यक्त करतो, तसा तो ‘फक्’ला अभिप्रेत नाही. संभोगाला मराठीतच ‘झवणे’ असा प्रतिशब्द आहे. पण तो आक्रमक, उग्र, पुरुषप्रधान आणि एकतर्फी आहे. लोकोक्तीत तोच शब्द ठोकणे, चढणे, मारणे अशा एकतर्फी शक्तीवाचक अर्थाने प्रकटतो. उघड आहे, तो ‘मर्दानी’ आहे. म्हणून ‘फक्’च्या वापराला तीच अर्थरचना अपेक्षित आहे. बलात्कार हाही त्यात दडलेला आहे, हे विशेष. कोणी तरी नकळत आपण बेसावध असताना टप्पू मारून जावे, ती क्रिया या उदगाराला स्वबाबतीत सांगायची आहे. सेक्स, इंटरकोर्स, मेक लव्ह, कॉप्युलेशन या इंग्रजी शब्दांहून ‘फक्’ची अर्थव्यवस्था भिन्न आहे. अपमान आणि क्रोध यांचा तो एकत्र आविष्कार आहे.
फुल्याफुल्यांच्या कुळातला हा अग्रमानाचा शब्द. अमेरिकन टीव्ही, चित्रपट, नाटके व अन्य लेखन यांत जरी तो फुल्याबद्ध असला तरी कित्येकदा त्या फुल्या उधळून लावल्या गेल्या. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने सेन्सॉरशिप ओलांडून घराघरांत जसा प्रवेश केला, तसतसा तो मूळरूपात प्रसंगीनुरूप ऐकू येऊ लागला. आज त्याचा वावर वाढला, वापर यथेच्छ होऊ लागला, त्याचे ते कारण होय. काही मालिकांत अन चित्रपटांत त्याची उपस्थिती इतकी वाढते की, त्याचाही उबग येऊ लागतो. सर्वच भावनांचा उच्चार या एकाच शब्दाने व्यक्त केला जाणे म्हणजे काहीतरीच, नाही का?
‘डर्टी वर्डस’च्या यादीत शिरलेल्या शब्दांनी हळूहळू आपली सुटका करवून घेतली, ती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने. इंटरनेटने या शब्दाला अन त्या शारिरीक क्रियेला स्वातंत्र्य दिले. जग आता पुष्कळच मोकळे वाटते. स्वातंत्र्यासह सहिष्णुताही येते. त्यामुळे तो शब्द कानांवर आदळतो अजूनही, मात्र त्याने गडबडायला होत नाही. ‘द एफ वर्ड’ अशी एक संज्ञाच तयार झाली होती. त्यावर भाषाशास्त्रज्ञ, समाजशास्त्री अशा अनेकांनी भरपूर लिहिलेसुद्धा. आज तो म्हणजे ‘फक्’ही सरावला असून आपणही वातावरणाला जुळून गेलो आहोत. गेल्या सात वर्षांच्या सांस्कृतिक राष्ट्रवाद्यांच्या सत्तेत त्यांची नजर चुकवून म्हणजे ‘ओव्हर द टॉप’ (शेंडापार) अर्थात ओटीटी मंचावरचे मनोरंजन फुल्याफुल्यांतून पळून आले आहे.
‘स्लॅम डंक्स अँड नो-ब्रेनर्स’ या शीर्षकाचे भाषेवरचे एक पुस्तक लेस्ली साव्हान यांनी लिहिले आहे. त्यात त्या असा दाखला देतात की, फक् हा शब्द दुसऱ्या महायुद्धाच्या काळी कमालीचा लोकप्रिय ठरल. ‘स्नाफू’ हा प्रयोग ‘सिच्युएशन नॉर्मल ऑल फक्ड अप’ या वाक्याचे लघुरूप होते. फब व फबर यामध्येही ‘फक्ड अप’ लपवलेले होते. २००५ साली FCUK हे नाव टी-शर्टवर झळकू लागले आणि त्याचा अर्थ ‘फ्रेंच कनेक्शन युके’ असा होता. ‘फक् हर’ आणि ‘फक् हिम’ अशा नावाचे सुंगधही ‘FCUK’ या नियतकालिकाने बाजारात आणले होते. पुढे या कंपनीला कायदेशीर त्रास सोसावा लागला.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ या चित्रपटात ‘फक्’ व ‘शिट’ या शब्दांचा नुसता भडिमार आहे. पण ते तसेच न कापता ठेवले गेले. तेव्हापासून पुराणमतवादी आग्रह बंधने आणू लागले. FCUK हा ब्रँड आता ओसरला असला तरी PHUK अर्थात प्लेनेट हॉलिवुड युनायटेड किंगडम या कंपनीचे स्नेट शर्टस लोकप्रिय होत आहेत. ‘फक्’ जसजसा कायद्याच्या जंजाळात अडकत चालला, तशी त्याची जागा ‘सक्’ या दुसऱ्या इंग्रजी शब्दाने घेतली. त्यावर अर्धमनाई असे. त्यालाही लैंगिक संदर्भ आहे. मात्र तो आता तक्रारवजा, गाऱ्हाणेसम रूप धारण करतो आहे. असंतुष्ट ग्राहक एखाद्या सेवेविषयी ‘इट सक्स’ अशा शब्दांत कुरकुरतात.
‘फक्’ या इंग्रजी शब्दाचे मराठीतले प्रतिरूप झवणे मात्र सर्रास भांडणे, मारामाऱ्या, वाद, शिवीगाळ या वेळी ऐकू येते. वा. गो. आपटे यांच्या ‘शब्दरत्नाकर’मध्ये झवणेचा अर्थ संभोगणे असा दिला आहे. नंतरचा शब्द झवतरोड म्हणजे रोडका, दुर्बळ असा असून त्यापुढे येणाऱ्या झवाडणे या शब्दाचा अर्थ शिव्या देणे, खरडपट्टी काढणे असा दिलेला आहे. अश्लील वा असभ्य अशी श्रेणी मात्र या शब्दांना आपट्यांनी बहाल केलेली नाही हे खासच!
‘फक्’ला पर्याय म्हणून सध्याची मुलेमुली मराठीतला झवणे हा शब्द वापरू लागली तर? एकतर ‘फक्’सारखे वैविध्य या शब्दाला नाही. म्हणजे अपमान, फजिती, लुबाडणूक, निंदा, चेष्टा, पराभव, हताशा, आनंद, आश्चर्य अन दु:ख अगर वेदना यांचा सरसकट संबंध झवणे, या क्रियापदाशी जोडता येणार नाही. नशिबाने ठासली, मित्राने मारली, मास्तर चढला, भीतीने फाटली, असे प्रयोग संभोगाच्या अनुषंगानेच येतात, मात्र त्यात फक् वा झवणे याप्रमाणे थेटपणा नाही. मैथुनच ते, पण झवणे ही क्रिया आपट्यांनी संभोगणे या रूपाने सादर केली. याचा अर्थ त्यांना जबरी, बलप्रयोग, सक्ती, उपभोग, अनिच्छा अशा काही छटा दिसतात. हाही शब्द पुरुषी, एकतर्फी, शक्तीसूचक आणि आनंदहिन आहे. एका क्रियेचे वर्णय निंदनीय वाटावे आणि ओंगळ वाटावे, असे हा शब्द करतो. मात्र तो निखळ मराठी व ग्रामसंस्कृतीमधून उगवलेला आहे.
अ.द. मराठे यांनी ‘मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार’ (ग्रंथाली, २०११) नावाच्या अभ्यासपूर्ण पुस्तकात झवणे या क्रियापदाशी संबंधित म्हणी, वाक्प्रचार जमवले आहेत. ते तशा प्रकारातले सर्वांत जास्त आहेत संख्येने. झवणी, झवणं, झवतं, झवाड, बाझवणे अशी रूपेही त्यांनी दिली आहेत. परंतु ‘फक्’ची जागा घेईल असे एकही रूप मराठीत नाही. दोन्ही भाषांतले हे शब्द स्फोटक आहेत. त्यातून वारा बाहेर पडतो. त्वेष आणि तिरस्कार दोन्ही भावना हे शब्द व्यक्त करतात. एक शब्द रुळला, दुसरा नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
मराठीत वा हिंदीत समजा ‘फक्’चा वापर त्या भाषांतले प्रतिशब्द वापरून करायचे ठरल्यास तो एकटा येऊनच शकणार नाही, अशी अडचण आहे. मादरचोद, भेंचोद, यांतून आई व बहीण पुढे येतात. ‘फक्’ला नाती अमान्य दिसतात. झवणेला नाते आवश्यक वाटते. बऱ्याच जणांच्या तोंडी आई झवली वा माय झवली हे प्रयोग उदगारवाचक म्हणून येत राहतात. पण ते खरोखरच ओंगळवाणे व निंदास्पद वाटतात. प्रत्यक्ष त्या क्रियेऐवजी गांडू (नशीब), बोचा (मारला), लवडा (घुसडला), चूत (मारीच्या), झाट (उपट) वगैरे शब्द वापरून आपल्या भावना व्यक्त केल्या जातात.
आजकाल हिंदीत ‘जो उखाडना हैं उखाडले’ असा संवाद वारंवार येतो व तो केसांच्या अनुषंगाने येतो, हे समजते. स्त्रियाही हा संवाद म्हणताना दाखवतात. पुल्लिंगाला उद्देशून वापरात असलेला शब्द ‘घंटा’ म्हणण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. कित्येक मुली शिवी किंवा नकार, निषेध म्हणून ‘घंटा’ म्हणतात. पण त्यांना ती मोठी पितळी घंटा आणि त्यामधला पुरुषाच्या लिंगासारखा लोंबता लंबक डोळ्यापुढे येत नसावा, काय माहीत!
हा एवढा ‘घंटा’ शब्दच मराठी चित्रपट, मालिका यांत धीटपणे वापरतो. बाकी फक आहेच. थेरगावच्या दोन तरुणी काही दिवसांपूर्वी अश्लील शिवीगाळ करतात म्हणून पकडल्या गेल्या. त्या काही फक् म्हणताना दिसल्या नाहीत. म्हणजे फक् फारच सोवळाय….?
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ganesh Kulkarni
Tue , 08 March 2022
लेख उत्तम आणि माहितीपूर्ण आहे. खूप पूर्वी लग्नाच्या बेडीत राजा गोसावी काम करत असताना एका प्रयोगात समोर लेखक आचार्य अत्रे स्वतः आलेले असताना घंटा या शब्दावर अँडिशन घेण्याअगोदर गोसावींनी लेखकाची परवानगी घेतली होती आणि .. तो काय घंटा ऐकणार.. हा डायलॉग मारल्यावर अख्खे प्रेक्षागृह लोटपोट होऊन गेले होते. धन्यवाद. मझा आला असा थोर लेख वाचायला मिळाला.