ज्या देशावर साम्राज्यवाद्यांनी आक्रमण केले, ते देश बेचिराख झालेच, पण ज्यांनी आक्रमण केले, त्यांचाही म्हणावा तसा फायदा झाला नाही... तेही खिळखिळे झाले!
पडघम - विदेशनामा
कॉ. भीमराव बनसोड
  • युक्रेनचा नकाशा, तेथील युद्धाचे एक छायाचित्र आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन
  • Mon , 07 March 2022
  • पडघम माध्यमनामा रशिया Russia सोव्हिएत रशिया Soviet Union युक्रेन Ukraine नाटो NATO अमेरिका America पुतीन Putin

गेल्या दोन महिन्यांपासून होणार होणार म्हणून ज्याचा डंका पिटला जात होता, तो हल्ला अखेर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केला आहे. आजचा दहावा दिवस आहे. बॉम्बहल्ले सुरू आहेत. मिसाईल्स हल्लेही सुरू झाले आहेत. ३ मार्च रोजी रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी किव्हमधील टीव्ही टॉवर उडवून दिले आहेत. युक्रेनमध्ये हाहाकार माजला असून जवळपास आठ लाख नागरिकांनी आतापर्यंत शेजारच्या देशात पलायन केले आहे.

युक्रेनमध्ये शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसह इतर देशांच्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे. विविध देशांनी आपापल्या विद्यार्थ्यी-नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. भारताचेही प्रयत्न फारच तोकड्या प्रमाणात उशिरा चालू झाले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरून बराच गहजब केल्यानंतर आता पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन गंगा’ची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी चार मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. भारताचे जवळपास १८ ते २० हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेले आहेत. भारत सरकारने यापूर्वीच अ‍ॅडव्हायझरी जाहीर करून आपल्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना क्रेनमधून ताबडतोब ‘जसे जमेल तसे’ व ‘जेथे जमेल तेथे’ निघून जाण्यास सांगितले होते. परंतु सर्वच विद्यार्थी तसे करू शकले नाहीत. कारण भारत सरकारने नुकतेच खाजगीकरण केलेल्या ‘एअर इंडिया’ने विमान प्रवासाचे भाडे दुपटीपेक्षा जास्त वाढवले आहे. आता ती खाजगी कंपनी झाली असल्याने ‘आपदा में ही अवसर’ या पंतप्रधान मोदींच्या तत्त्वानुसार त्यांनी या परिस्थितीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी तेथेच अडकून पडले. त्यांच्याकडे पुरेशी रक्कम नाही, बँका बंद पडल्या आहेत आणि एटीएम चालू नाहीत. त्यांनी उणे डिग्री सेल्सिअसमध्ये किव्ह, खारकीव्ह इत्यादी शहरांतून पोलंड, रुमानिया, हंगेरी यांच्या सरहद्दीपर्यंत ६० ते १०० किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करून सरहद्दी गाठल्या आहेत. पण तिथेही त्यांना युक्रेनियन प्रशासनाकडून दुजाभावाची वागणूक मिळत आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाबद्दल भारताने बोटचेपी भूमिका घेतली आहे, त्याचे भोग युक्रेनमध्ये शिकत असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. सुरक्षा परिषदेत व नंतर युनोमध्येसुद्धा रशियाच्या निंदाव्यंजक ठरावाच्या वेळेस भारत त्या ठरावाच्या बाजूने उभा न राहिल्यामुळे, युक्रेनियन नागरिक व तेथील प्रशासनाने चिडून जाऊन आपल्या विद्यार्थ्यांना मारहाण करणे, धक्काबुक्की करणे, रेल्वेमध्ये बसू न देणे, सर्वच बाबतीत त्यांची गैरसोय करणे असे प्रकार चालू आहेत.

या विद्यार्थ्यांचे हाल पाहता करोनाच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी अचानकपणे जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे प्रवासी मजुरांचे जे हाल झाले, त्याची दृश्ये नजरेसमोर उभी राहतात. फरक फक्त एवढाच आहे की, त्या वेळी भारतात कडक उन्हाळा होता, तर आता युक्रेनमध्ये कडक थंडी आहे. प्रवासी मजुरांना शेकडो किलोमीटर आपल्या मुलाबाळांसह पायी चालावे लागले, तसेच युक्रेनमधील विद्यार्थ्यांना चालावे लागत आहे. पण भारतातील लोक प्रवासी मजुरांना रस्त्यात नाश्तापाणी करत होते, तर युक्रेनमधील नागरिक कोणतेच सहकार्य करत नाहीत. या विद्यार्थ्यांकडे खाण्यापिण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे त्यांना केवळ चॉकलेट, बिस्किटे खाऊन प्रवास करावा लागत आहे. भारतात जसे प्रवासी मजुरांसाठी वाहनांची सोय सरकार करू शकले नाही, तशीच परिस्थिती युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची झाली आहे. ते तिकडे त्रस्त आहेत, तर इकडे त्यांचे पालक. त्या वेळी मोदी सरकार पश्चिम बंगालादी निवडणुकांच्या पूर्वतयारीत होते, तर आता उत्तर प्रदेश आदि निवडणुकांमध्ये गुंतलेले आहे.

रशियाने यूक्रेनवर हल्ला करण्याची तयारी दोन महिन्यांपासून केली होती. त्यासाठी त्याने एक लाख तीस हजाराच्या जवळपास आपले सैन्य बेलारूस व युक्रेनच्या सीमेवर युद्धसामग्रीसह जमवणे सुरू केले होते. दरम्यानच्या काळात अमेरिका व नाटोतील फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, कॅनडा इत्यादी सहकाऱ्यांनी युक्रेनला ‘युद्ध झालेच तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत’ अशा अर्थाची विधाने करून, एक प्रकारे चिथावणी दिली होती. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेंस्की त्या भरवशावर राहिले. परंतु प्रत्यक्षात अमेरिका व नाटो देश हातावर हात धरून चूप बसले आहेत. त्यांनी काहीही केलेले नाही. फक्त ‘रशियावर आम्ही अत्यंत कडक आर्थिक प्रतिबंध लादत आहोत. त्यामुळे रशिया मेटाकुटीला येईल’, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिकेसह या नाटो देशांनी आम्हाला धोका दिला आहे, अशी भावना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व तेथील जनता व्यक्त करत आहे.

इंग्लंडच्या पंतप्रधानांसमोर एका युक्रेनियन पत्रकार महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने “रशिया इतका अमानुष हल्ला युक्रेनियन नागरिकावर करत असताना आपण हातावर हात धरून चुपचाप कसे बसून आहात? तेथील महिला, मुले यांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काय करत आहात?” असा प्रश्न पत्रकार परिषदेत रडकुंडीला येऊन विचारला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन त्यावर निरुत्तर झाले. त्यांनी कसेतरी उत्तर दिले असले तरी त्यातून कोणाचेच समाधान झाले नाही.

अमेरिका, इंग्लंड यांनी आम्हाला एकटे पाडून, तोफेच्या तोंडी दिले असले, तरीही आता आम्ही आमच्या अस्तित्वासाठी व स्वाभिमानासाठी एकाकीपणे का होईना, पण लढत राहू, अशी घोषणा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेंस्की यांनी केली आहे. त्याप्रमाणे ते लढतही आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये ‘लोकशाही’ स्थापन करण्यासाठी हाती घेतलेली शस्त्रास्त्रे तेथे टाकून दिल्यानंतर, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमीरुल्लाह सालेह हे दुसऱ्या देशात पळून गेले होते, तसे झेलेंस्की यांनीही पडावे, असा अमेरिकेने दिलेला सल्लाही त्यांनी धुडकावून लावला आहे. इतकेच नव्हे तर स्वतः लष्करी गणवेश घालून ते आपल्या सैन्यदलाचे व जनतेचे नीतीधैर्य वाढवत आहेत. त्यांनी त्यांच्या जनतेत मशीनगन, बंदुकाचे वाटप केले आहे. पेट्रोल बॉम्बच्या साह्याने घराघरांतून संघर्ष करा, असे त्यांनी आपल्या जनतेला आवाहन केले आहे. बलाढ्य रशियन सैन्यापुढे त्यांचा किती टिकाव लागेल, ही बाब वेगळी असली तरी, त्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आपण या युद्धाचा विरोधच केला पाहिजे. युद्धाने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत, सुटलेले नाहीत असाच आतापर्यंतच्या सर्वसाधारण अनुभव आहे. ही खरी बाब असली तरी स्वतःला जगाचा दादा समजणाऱ्या अमेरिकेने आतापर्यंत दुसर्‍या जागतिक युद्धासह अनेक देशांवर युद्धे लादलेली आहेत. अनेक देशांतील सरकारे कटकारस्थाने करून आणि तसे जमले नाही तर लष्करी कारवाई करून पाडलेली आहेत. २०१४मध्ये खुद्द युक्रेनमध्येही नाझीवाद्यांना प्रोत्साहन देऊन, असेच लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार पाडले होते.

अमेरिकेने व नाटोतील इतर साम्राज्यवादी देशांनी इतर कोणत्याही युद्धाला चिथावणीसुद्धा देता कामा नये. परंतु त्यांनी युक्रेनला एक प्रकारे चिथावणी दिली. त्यांचे हे कृत्य रशियाच्या आक्रमणाइतकेच निंदनीय आहे. अमेरिकन साम्राज्यवाद्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली नाटो ही संघटना नेमकी आहे तरी काय? त्याबद्दलचा इतिहास व त्याचा उद्देश अनेक लोकांनी अनेक प्रकारे सांगितला असला तरी एक मात्र निश्चित की, ही लष्करी संघटना असून लष्करी हल्ला करण्यासाठीच तिची निर्मिती झाली आहे.

दुसऱ्या जागतिक युद्धानंतर १९४९ साली सोव्हिएत युनियनच्या माध्यमातून जगभरातील विविध देशांत कम्युनिझमचा प्रसार होऊ नये, यासाठी आजी-माजी साम्राज्यवादी देशांनी सोवियत युनियनच्या (रशियाच्या नव्हे, कारण त्या वेळेस रशिया हा सोवियत युनियनचा केवळ एक भाग होता) आणि कम्युनिस्ट विचार मानणाऱ्या इतर देशांच्या विरोधात ही संघटना उभी केली होती. त्या वेळेस अमेरिकेने जगातील वेगवेगळ्या भागांतील देशांच्या ‘सेंटो’, ‘सियाटो’ अशाही लष्करी संघटनाही उभ्या केल्या होत्या.

सोवियत युनियननेही आपल्या बचावासाठी ‘वॉर्सा संधी’सारख्या संघटना बनवल्या होत्या. परंतु १९९१नंतर सोवियत युनियनचे विघटन झाल्यामुळे, कम्युनिस्ट तत्त्वाप्रमाणे व सोवियत युनियनच्या राज्यघटनेत दिलेल्या प्रत्येक राष्ट्राचा फुटून निघण्याचा स्वायत्ततेचा अधिकार मान्य असल्यामुळे, जवळजवळ लहान-मोठी १२ ते १५ राष्ट्रे फुटून निघाली. युक्रेन त्यापैकीच एक आहे. अशा परिस्थितीत ‘वॉर्सा संधी’ वगैरे संघटना आपोआपच बाद झाल्या. ‘सेंटो’, ‘सीयाटो’ याही लष्करी संघटनाचेही अस्तित्व राहिलेले नाही.

ज्या वेळी नाटो ही लष्करी संघटना स्थापन झाली, त्या वेळी केवळ १२ देश या संघटनेचे सदस्य होते. आता त्यात एकूण ३० देशांचा समावेश आहे. यूक्रेनसारख्या देशांनाही समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यालाच स्वतःच्या सुरक्षेसाठी रशियाचा विरोध आहे. नाटोचा विस्तार करण्याची गरज का आहे? उलट ही लष्करी संघटना बरखास्त करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा युद्धांना वारंवार व पुन्हा पुन्हा चिथावणी दिल्यासारखे होईल, ही बाब आपण ध्यानात घेतली पाहिजे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला पाहिजे, तसेच यूक्रेननेसुद्धा ‘आम्हाला नाटो देशाचे सभासद करून घ्या’ असे पालुपद लावण्याचे कारण नव्हते. निदान ‘आता आम्हाला युरोपियन संघाचे तरी सभासद करून घ्या’ यासाठी यूक्रेनचे प्रयत्न चालू आहेत. नाटोचे सभासदत्व मिळवून युक्रेन काय साध्य करणार आहे? अमेरिका व नाटोतील देशांचा उद्देश खरोखरच प्रामाणिक असता आणि आपल्या सहकाऱ्यांना मदत करावी, अशी त्यांची भावना असती, तर ती त्यांनी आताही केली असती. परंतु मुळात त्यांची तशी भावना नाही.

दुसरी एक बाब ध्यानात घेतली पाहिजे. ती अशी की, आताचा रशिया म्हणजे काही पूर्वीचा सोवियत युनियन नव्हे. १९१७ सालच्या क्रांतीनंतर (युएसएसआर, युनायटेड स्टेट ऑफ सोवियट रशिया) सोवियत युनियनचे जे चित्र होते, ते १९९१ नंतर पूर्णपणे बदललेले आहे. रशिया म्हणजे कम्युनिस्ट राष्ट्र नव्हे. कम्युनिस्ट पक्षाशी, कम्युनिस्ट विचारसरणीशी, मार्क्सवादाशी आणि लेनिनवादाशी आता रशियाचा काडीचाही संबंध राहिलेला नाही. तसा तो संबंध राहू नये, यासाठी अमेरिकेने व नाटो सहकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.

म्हणून अमेरिकेसारखे साम्राज्यवादी देश जसे व्हिएतनाम, सीरिया, लिबिया, इराक, अफगाणिस्तान हे देश उदध्वस्त करून टाकतात, तसाच एक साम्राज्यवादी देश म्हणून रशियाही युक्रेनला उद्ध्वस्त करत आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

युक्रेन कधी काळी आमच्या देशाचा एक भाग होता, म्हणून तो आता आम्ही आमच्यात मिळवू पाहतो, ही पुतीन यांची भूमिका चुकीची आहे. आतापर्यंत असे जॉर्जिया आणि क्रिमियाच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी घडवून आणले आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून हे युक्रेनवरील आक्रमण आहे. आपल्या या आक्रमक कृतीला पाठिंबा मिळावा म्हणून ते रशियन जनतेला आपला महान गौरवशाली इतिहास सांगून ‘मी रशियात पूर्वीची महासत्ता असतानाची परिस्थिती निर्माण करू इच्छितो,’ अशा राष्ट्रवादी भावनांचा आभास निर्माण करत आहेत.

अमेरिका सीरिया, इराक, अफगानिस्तान या देशांवर हल्ला करून अमेरिका स्वतः खिळखिळा झाला आहे. परिणामी रशिया त्याच्या एका मित्र देशावर आक्रमण करत असतानाही, अमेरिका चुपचाप पाहण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. अशीच परिस्थिती पुढे चालून रशियाची व्हावी, असेही त्यांना वाटत असावे. त्यामुळे ते रशिया आणि युक्रेन यांच्या आगीत एक प्रकारे तेल ओतण्याचे काम करत आहेत. प्रत्यक्षात त्यांनी आपले सैन्य या युद्धात उतरवले नसले, तरी त्यांच्याकडे असणारी लढाऊ विमाने, रणगाडे, क्षेपणास्त्रे, इत्यादी शस्त्रास्त्रे युक्रेनला विकत आहेत. नुकतेच युरोपियन युनियनने ४५ कोटी युरोची युद्धसामग्री विकण्याला मंजुरी दिली आहे. थोडक्यात, शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणे, त्याची विक्री करणे, त्याचे सौदे करणे हा या साम्राज्यवादी देशांचा एक मोठा उद्योग झाला आहे. त्यासाठी अशा युद्धांची त्यांना सतत गरज असते, हेही आपण ध्यानात ठेवले पाहिजे.

खरे तर अमेरिकेने दुसर्‍या जागतिक युद्धात आणि त्यानंतरही जगातील अनेक देशांवर युद्धे लादली आहेत. त्यात व्हिएतनामपासून इराकपर्यंत अनेक देशांचा अंतर्भाव आहे. ही युद्धे करत असताना त्यांनी लोकशाही मूल्ये, मानवी अधिकार, मानवी मूल्ये वगैरेंचे फार मोठे अवसान आणले होते. अफगाणिस्तान असो वा सिरीया, कोणत्याही मूल्यासाठी त्यांनी युद्धे केली नाहीत. त्यांच्या देशातील कॉर्पोरेट कंपन्या, कॉर्पोरेट घराणे, मोठे भांडवलदार, शस्त्रास्त्रांचे कारखानदार यांच्या हितासाठी युद्धे केली आहेत.

हीच बाब नाटोतील इतर साम्राज्यवादी देशांनीही केली आहे. त्यांनीही अशा युद्धांना पाठिंबा दिला होता. काहींनी तर सक्रीय सहभागही घेतला होता. आता रशियाने निदान मानवी मूल्ये, लोकशाही अधिकार वगैरेचे सोंग तरी घेतलेले नाही. उलट पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘मला माझ्या देशाच्या सुरक्षिततेसाठी युक्रेनचे निसैनिकीकरण करायचं आहे. त्या देशाला कोणत्याही रीतीने नाटो देशाचा सदस्य होऊ द्यायचा नाही. इतर नाटो देशांपासून माझ्या देशाचे संरक्षण करण्यासाठी युक्रेन हे एक प्रकारे आमचे ‘बफर झोन’ म्हणून मला त्याचा वापर करायचा आहे.’ याचा अर्थ त्यांची कृती योग्य आहे, असा कोणीही घेऊ नये.

सर्वच भांडवली प्रसिद्धीमाध्यमे या युद्धामुळे होत असलेल्या हाल-अपेष्टा, जीवित व मालमत्तेची हानी या गोष्टींना चांगलीच प्रसिद्धी देत आहेत. पण अमेरिकेने व इतर नाटो देशांनी ज्या वेळी अफगाणिस्तान, इराक, सीरिया, इत्यादी देशांत हल्ले केले होते, त्या वेळेस एवढा कळवळा दाखवला नव्हता. येथून पुढे होणाऱ्या सगळ्या युद्धाबद्दल त्यांनी असा कळवळा दाखवावा, अशी त्यांच्याकडून अपेक्षा करता येईल काय? या भांडवली प्रसिद्धीमाध्यमांकडून नि:पक्षपातीपणाची अपेक्षा करता येत नाही. ही माध्यमे दाखवतात तेवढ्यावरच आपण अवलंबून राहता कामा नये, तर आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवणे आवश्यक आहे. अशा युद्धाच्या काळात तर त्याची जास्तच गरज आहे.

इतर तज्ज्ञांच्या मते व नाटो राष्ट्रांच्याही दृष्टीने हे युद्ध लांबणार, असा अंदाज आहे. अशा युद्धातून जर काही शिकायचे असेल तर ते हेच की, ज्या देशावर साम्राज्यवाद्यांनी आक्रमण केले, ते देश बेचिराख तर झालेच, पण ज्यांनी आक्रमण केले, त्यांचाही म्हणावा तसा फायदा झाला नाही. तेही खिळखिळे झाले. युक्रेनवरील हल्ल्याची रशियालाही मोठी किंमत मोजावी लागेल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

.................................................................................................................................................................

नेहमीप्रमाणे याही युद्धाच्या विरोधात जगाच्या विविध देशातील शांतताप्रिय नागरिकांनी मोठमोठी निदर्शने केली आहेत. काही ठिकाणी अजूनही ती चालू आहेत. खुद्द रशियातूनही या युद्धविरोधी भावना व्यक्त होत आहेत. व्हिएतनाम, इराक इत्यादी युद्धाच्या वेळेसही जगातील शांतताप्रिय नागरिकांनी अशी निदर्शने केली होती. पण साम्राज्यवादी देश आपल्या साम्राज्यवादी मनसुब्यासाठी अशा निदर्शनांची फारशी कदर करत नाहीत, असाच आतापर्यंतचा अनुभव आहे.

इराकवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याविरोधात यापेक्षाही कितीतरी मोठी निदर्शने जगभरातून झाली होती. पण तेव्हाही युद्ध टळू शकले नाही. केवळ ‘युद्ध नको बुद्ध हवा’ असे म्हटल्याने काम भागत नाही. कॉम्रेड लेनिन यांनी ‘साम्राज्यवाद, भांडवलशाहीची सर्वोच्च अवस्था’ या ग्रंथात मांडलेल्या सिद्धांतानुसार, “युद्धाची शक्यता खरोखरच नष्ट करायची असेल, तर त्यासाठी साम्राज्यवाद नष्ट करणे गरजेचे आहे. जोपर्यंत साम्राज्यवाद अस्तित्वात आहे, तोपर्यंत युद्धाची शक्यता नष्ट करता येत नाही.”

म्हणून प्रत्येक शांतताप्रिय युद्धविरोधी नागरिकांनी प्रथम आपापल्या देशातील भांडवलशाही व्यवस्था नष्ट करून, तिचीच पुढची अवस्था असलेल्या साम्राज्यवादाचाही बिमोड केल्याशिवाय असे युद्ध थांबणार नाही.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा

युक्रेनने २०१४ साली मोदींच्या हत्येचा प्रयत्न केला होता, ही तद्दन ‘फेक न्यूज’ आहे!

‘महाभारता’तल्या कर्णाचे कवच कुंडले गमावल्याने जे झाले, तशी अवस्था आज युक्रेनच्या वाट्याला आली आहे!

व्लादिमीर पुतिन युक्रेनसोबतचे युद्ध आधीच हरले आहेत...

असं वाटतं की, व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर बायडेन व पुतिनला टॅग करता येतं का, ते बघावं! म्हणजे उद्यापर्यंत तेच जाहीर करतील- ‘युद्ध थांबवतो, पण फॉरवर्ड मेसेजेस नको!!...’

ही लढाई डेव्हिड आणि गोलियथची आहे. रशिया नावाच्या महाकाय गोलियथपुढे युक्रेन नावाचा डेव्हिड हार मानायला तयार नाही!

आज युक्रेनची गत ‘रामायणा’तल्या विभीषणासारखी झालीय. रशिया आणि नाटो देश त्याला ‘बिभीषण’सारखा घरभेदी मानायला लागले आहेत

रशिया-युक्रेन संघर्ष : अमेरिका, युरोपियन राष्ट्र, नाटो, चीन आणि भारत

.................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......