‘महाभारता’तल्या कर्णाचे कवच कुंडले गमावल्याने जे झाले, तशी अवस्था आज युक्रेनच्या वाट्याला आली आहे!
पडघम - विदेशनामा
आर. एस. खनके
  • युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे शनिवारचे एक ट्विट आणि युक्रेनचा नकाशा
  • Mon , 07 March 2022
  • पडघम विदेशनामा रशिया Russia सोव्हिएत रशिया Soviet Union युक्रेन Ukraine नाटो NATO अमेरिका America संयुक्त राष्ट्रसंघ United Nation

स्वत:च्या क्षमतेबाबत शहाणपण सांगणाऱ्या आणि भान देणाऱ्या काही पारंपरिक उक्ती आपल्याकडे सांगितल्या जातात. त्यातीलच पहिली म्हणजे ‘आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्यात आपलेच विचार असावेत’. दुसरी ‘अंथरून पाहून पाय पसरावेत’, तर तिसरी शहाणपण म्हणजे ‘आपल्या स्व सामर्थ्याचा विचार करूनच कुस्तीच्या आखाड्यात शड्डू ठोकावा.’ 

हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे आज ज्या वळणावर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की आलेत ती स्थिती. ज्या नाटो देशांच्या भरवशावर युक्रेनने आपला प्रवास सुरू केला, त्यावर संताप व्यक्त करण्याची वेळ आज झेलेंस्की यांच्यावर आली. ५ मार्चचे त्यांचे शब्द वाचल्यावर नाटो देशांनी त्यांची जी काही अवस्था केलीय, त्याची आणि त्यांच्या मनोदशेची अवस्था स्पष्ट होते.

‘एनबीसी न्यूज’ने दिलेल्या बातमीनुसार युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाटो देशांच्या भूमिकेबद्दल संतप्त आणि उद्विग्न उद्गार काढले की, ‘All the people who die from this day forward will also die because of you, because of your weakness’. (“आज रोजीपासून यापुढे जितकेही लोक मृत्यूमुखी पडतील ते फक्त तुमच्यामुळे आणि फक्त तुमच्या कमजोरीमुळेच मरतील.”) कारण नाटो देशांकडून युक्रेनला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. युक्रेनचा एअर स्पेस ‘नो फ्लाय झोन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी झेलेन्स्की यांनी नाटो देशांना केली होती. पण त्यांनी तसे करण्यास नकार दिल्याने झेलेंस्की यांचा अनावर संताप वरील वाक्यातून व्यक्त झाला. ‘नो फ्लाय झोन’ घोषित केल्यानंतर रशियाला हवाई आक्रमण करण्यात पायबंद झाला असता, असा आशावाद झेलेंस्की यांना असल्याने त्यांनी ही मागणी केली होती. तर ‘नो फ्लाय झोन’ घोषित केल्यास रशिया आण्विक युद्ध (न्युक्लिअर वॉर) पुकारेल, अशी भीती नाटो देशांना आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

इथं युक्रेनची गोची तर झालीच, पण ९०च्या दशकारंभी युक्रेन जेव्हा रशियातून फुटून बाहेर पडला, त्या वेळी नाटो देशांच्या, विशेषत: अमेरिकेच्या बतावणीच्या आहारी जात त्याने स्वत्व आणि स्व ओळख गमावली. त्यासाठी पहिले पाऊल म्हणजे ९०च्या दशकातच युक्रेनने अण्वस्त्र सज्जता त्यागली. याच दशकात सर्वंकष अण्वस्त्र बंदी करार (Comprehensive Test Ban Treaty-CTBT) जगभर गाजत होता, त्यावर युक्रेनने स्वाक्षरी केली आणि आपली अण्वस्त्रसिद्ध क्षमता गमावली.

भारताने मात्र त्या काळी (इंदिरा गांधीच्या काळात) अमेरिकी दबावाला बळी न पडता आण्विक चाचणी घेतली आणि आपण सार्वभौम देश आहोत, याची जगाला ओळ्ख करून दिली. त्यासाठी अमेरिकी प्रतिबंधांचा सामनाही केला. जगाला आण्विक युद्ध परवडणारे नसले तरी आज रशियाने आण्विक युद्ध छेडले तर युक्रेनजवळ त्याला विरोध करण्यासाठी आण्विक पर्याय नाही. म्हणजे महाभारतातल्या कर्णाने कवच कुंडले गमावल्याने त्याचे जे झाले, तशी अवस्था आज युक्रेनच्या वाट्याला आली आहे.

द्रोणाचार्याने गुरूदक्षिणेच्या नावाखाली एकलव्याचा अंगठा कापून घ्यावा, तसा अण्वस्त्र प्रसारबंदी आणि जागतिक शांततेच्या गोंडस नावाखाली युक्रेनची अवस्था केली गेली. एकलव्याला द्रोणाचार्य नडला, तर युक्रेनला आज नाटोचा म्होरक्या अमेरिका नडला.

युद्ध प्रचाराबाबत तर बोलक्या आणि प्रचारकी पक्षाचा प्रचार मोठा असतो, हे सांगायला नकोच. आज युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत येतात, त्या पश्चिमी चष्म्यातून. रशियाची बाजू आणि भूमिका स्पष्टपणे आपल्यापर्यंत येत नाही. आपल्यासाठी या युद्धवार्ता एकांगी आहेत, हेच त्यातील काय ते तथ्य. या युद्धाचे भारतातल्या कुठल्याही वाहिनीवर युद्धभूमीवरून थेट वार्तांकन होत असल्याचे दिसत नाही. भारतीय दर्शकांच्या माथी मारला जातोय, तो निव्वळ युद्धज्वर.

युद्धवार्ता कशी असावी आणि पिडिताकडे जगाने, विशेषत: भारतासारख्या युद्धगटाबाहेरील देशाने आपल्या भारतीय दर्शकाला काय दाखवू नये, याचा नमुना म्हणजे आपल्या वाहिन्यांचे युक्रेन युद्धदर्शन. जी शालीनता आणि मानवी संवेदना कतारची ‘अलजझिरा’ ही वृत्तवाहिनी दाखवतेय, ते पाहिल्यावर युद्ध वार्तांकन कसे असावे, याचा वस्तुपाठ मिळतो. त्यांच्या ‘live streaming’वर जाऊन कुणीही याबाबत पदताळणी करू शकतो. त्याचबरोबर फ्रान्सची AFP आणि असोसिएटेड प्रेस यांसारख्या अनेक नामांकित वृत्तसंस्थाही चांगले, संयमित वार्तांकन करताना दिसत आहेत. त्या इंग्रजी असल्याने सामान्य भारतीय माणसाच्या निदर्शनास मात्र येत नाहीत. त्यामुळे भारतीय वाहिन्या स्व-तर्काच्या युद्धकथा रंगताहेत.

आंतरराष्ट्रीय माध्यमात ‘आँखो देखी’ वार्तांकन होतेय. युक्रेनच्या अधिकृत प्रेस रिलिजनुसार शनिवारी युक्रेनची स्थिती विदारक होत चालली असल्याचे दिसले. रशियाने युक्रेनवरील हल्ले चढवत, सर्व बाजूंनी घेरा बंदी करत युक्रेनची राजधानी कीव शहराकडे आपली वाटचाल सुरू ठेवलेली असताना युक्रेनच्या दक्षिण पूर्वेला युद्धनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे शहर मरियोपोल आणि पूर्वेला असलेले वोलनोवाखा ही शहरे आणि तेथील महापौर यांनाही ताब्यात घेतले आहे.

उत्तरेकडून शेजारील देश बेलारूस युक्रेनवर हल्ले चढवत आहे. युक्रेनमधून आजअखेर १२ लाखांपेक्षा अधिक लोकांनी आपला देश सोडून शेजारील देशांत आश्रय घेतला आहे. या शहरातील लोकांना पश्चिमीदेशांकडे जावे म्हणून Humanitarian corridor निर्माण करण्यात आलाय.

रशियाने शनिवारी सकाळी पूर्वेकडील या दोन शहरांत तात्पुरती युद्धबंदी जाहीर केली, ती  दोन्ही शहरांतील लाखो लोकांना आपली राहती घरे सोडता यावीत म्हणून. मात्र युद्धबंदीतही रशियन हल्ले सुरूच असल्याने लोक बाहेर पडू शकत नाहीत, असे वृत्त दुपारनंतर ‘गार्डीयन’ने दिले. रशियाने युक्रेनचा आण्विक प्रकल्प ताब्यात घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने बैठक बोलावली. आमचे अनेक प्रांत रशियाने घेरले असल्याचे युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाने जाहीर केलेय. तर ‘सेल’ नावाच्या युरोपच्या ऑइल कंपनीने कधी नव्हे इतक्या सवलतीत रशियन तेल खरेदी केलेय.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आपल्याकडच्या तिसऱ्या प्रहरी ‘फॉक्स न्यूज एजन्सी’ने दिलेली बातमी अमेरिकी भूमिका सांगणारीच आहे. ती अशी की, अमेरिकी उपराष्ट्र्पती कमला हॅरिस ९ ते ११ मार्चच्या दरम्यान पूर्व युरोपच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यात पोलंड आणि रोमानिया देशाला त्या भेट देणार असून निर्वासितांच्या प्रश्नावर चर्चा करणार आहेत. मानवी मदत करत युक्रेनच्या सोबत आहोत, असे सांगणारे वृत्त व्हाईट हाउसच्या हवाल्याने ‘फॉक्स न्यूज एजन्सी’ने दिले आहे. यातलं आपल्या कानावर काय आलं आणि टीव्हीच्या पडद्यावर काय दिसलं, हे तुलना करून पाहता येईल.

याचा अर्थ रशियाच्या आर्थिक नाड्या कसण्याबाबत युरोप, म्हणजे नाटो देशांची भूमिका अद्यापही नाही, हे स्पष्ट होतेय. रशिया आणि युरोपच्या मध्यावर असलेले सर्व देश नाटो देशांना स्वत:च्या सुरक्षेसाठी ‘बफर झोन’ म्हणून आवश्यक आहेत. त्याचे प्रत्यंतर युक्रेनच्या निमित्ताने येताना दिसत आहे.

यात अमेरिका अशा स्थितीत आहे की, हे युद्ध इतर युरोपियन अथवा ‘बफर झोन’मधील राष्ट्रांसोबत झाले तरी भौगोलिकदृष्ट्या अमेरिका सुरक्षित अंतरावर आहे. युक्रेनला अमेरिकेच्या सैन्य मदतीची गरज आहे की, कमला हॅरिसच्या दौऱ्याची?

या सगळ्या प्रकाराकडे पाहिल्यावर सुरुवातीला दिलेली भारतीय पारंपरिक उक्ती किती सार्थ आहेत याचे आणि आपल्या भारतीय युद्ध वार्तांकनाचे खरे प्रत्यंतर येते. त्याचबरोबर आपली माध्यमं आपल्याला युद्धभूमीवरचे नेमकं कोणतं सत्य सांगताहेत, याचाही अंदाज येतो.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा

व्लादिमीर पुतिन युक्रेनसोबतचे युद्ध आधीच हरले आहेत...

असं वाटतं की, व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर बायडेन व पुतिनला टॅग करता येतं का, ते बघावं! म्हणजे उद्यापर्यंत तेच जाहीर करतील- ‘युद्ध थांबवतो, पण फॉरवर्ड मेसेजेस नको!!...’

ही लढाई डेव्हिड आणि गोलियथची आहे. रशिया नावाच्या महाकाय गोलियथपुढे युक्रेन नावाचा डेव्हिड हार मानायला तयार नाही!

आज युक्रेनची गत ‘रामायणा’तल्या विभीषणासारखी झालीय. रशिया आणि नाटो देश त्याला ‘बिभीषण’सारखा घरभेदी मानायला लागले आहेत

रशिया-युक्रेन संघर्ष : अमेरिका, युरोपियन राष्ट्र, नाटो, चीन आणि भारत

..................................................................................................................................................................

आर. एस. खनके

sangmadhyam@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......