तरुणांमधली वाढती व्यसनाधीनता कमी करायची असेल, तर दिशादर्शक विकासात्मक उपक्रम राबवले पाहिजेत...
पडघम - राज्यकारण
अर्पिता मुंबरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 26 February 2022
  • पडघम राज्यकारण दारूबंदी Daru Bandi दारू Alcohol वाईन Wine व्यसनाधिनता Addiction तरुण Youth करोना विषाणू Corona virus करोना-१९ Corona-19

गेल्या काही दिवसांपासून ‘वाईन’ या शब्दाभोवती सारा महाराष्ट्र फिरतो आहे. वाईन ही अस्सल दारू नसली तरी मदिरेच्या वाटेवरचा तो टप्पा आहे. मात्र अशा नशेच्या आहारी जाणाऱ्या, अनेक आयुष्य, संसार उद्ध्वस्त करणाऱ्या, पिढ्यानपिढ्या बरबाद करणाऱ्या आणि नव्या पिढीलाही गिळंकृत करणाऱ्या व्यसनाधीनतेकडे म्हणावे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाहीये, ही खंत आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करत असताना मला हे भीषण चित्र रोज दिसते आहे. आणि याची बाधा फक्त व्यसन करणाऱ्यालाच नाही, तर अप्रत्यक्षपणे त्याच्या कुटुंबाला, मित्र परिवाराला आणि संपूर्ण गावाला होते, हे चिंताजनक आहे. दारूप्रमाणे तंबाखू/गुटख्याचे व्यसनही फार बोकाळले आहे.

जगातील सर्वांत जास्त युवक असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे, कारण १८ ते ३५ या वयोगटातील ५५ टक्के युवक भारतात आहेत. हा युवावर्ग विवेकी, निरोगी, विज्ञाननिष्ठ, व्यसनमुक्त आणि सुदृढ असणे, हीच देशाची खरी ताकद आणि यश असते. परंतु भारतात विचित्र स्थिती पाहावयास मिळते आहे. किशोरवयीनांपासून ते युवकांपर्यंतचे सर्वच गुटखा, मावा, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून रस्त्यावर पचापचा थुंकताना दिसतात. अशी ही युवा पिढी देशाचे भवितव्य कसे ठरू शकेल?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मादक पदार्थांच्या नशेच्या आहारी जाणारी युवापिढी पाहिल्यास भयावह स्थिती समोर येते. कोकणात गिरणी कामगारांच्या संपानंतर या तरुणांच्या वाताहतीला सुरुवात झाली, ती अद्याप सुरूच आहे. बेकारी, हाताला काम नाही, रोजगार नाही म्हणून दारिद्र्य आले. दारिद्र्यातून नैराश्य आणि नैराश्य घालवण्यासाठी तंबाखूजन्य व मादक पदार्थांचे सेवन हे दुष्टचक्र सुरू झाले. त्यात ही तरुणाई अडकली आहे. बाप व्यसनाधीन झाला, पुढे मुलाने व नातवानेही तोच कित्ता गिरवला, अशी शेकडो कुटुंबे मी पाहिली आहेत.

१९९९ साली शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीस लागले. पण याबरोबरच व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढले आहे. पर्यटनाच्या नावाने गाव तेथे दारू दुकाने, बिअर शॉपी सुरू झाले. प्रत्येक गावात पर्यटक येतातच असे नाही. पण गावातील तरुणाई मात्र या मादक पेयाचा आस्वाद घेऊन झोकांड्या खात आहे. पर्यटनस्थळावर भल्या माणसांची जाण्याची सोयच उरली नाही. रिकाम्या दारूच्या बाटल्या, गुटख्याची रिकामी पाकिटे यांच्या कचऱ्याने व्यसनाधीन संस्कृतीचे चित्र पर्यटकांच्या दृष्टीस पडते.

एकूणच दारू, गुटका, तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. एकाने याचा आस्वाद घेतला, त्याला दुसरा येऊन मिळाला, नंतर तिसरा, चौथा, पाचवा... अशी संख्या वाढत जाऊन समूहाने एकत्र येऊन मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या ठिकाणाला गावात ‘पागलनाका’ संबोधले जाते. अशा पागलनाक्यांची ठिकाणे गावोगावी पाहावयास मिळतात.

पर्यटनस्थळ, सागर किनारा आणि सागरी मार्गामुळे जिल्ह्यात अमली पदार्थांचा व्यापार बिनबोभाट सुरू आहे. या अनैतिक धंद्यात आणि मादक पदार्थांच्या विळख्यात सापडणार्‍या तरुणांची संख्याही मोठी आहे. याचा परिणाम जीवनशैली बदलली आणि अनावश्यक गरजा वाढल्या. त्या पूर्ण करण्यासाठी चोरी, दरोडा, खून, मारामाऱ्या व्हायला लागल्या. या सगळ्यामुळे वातावरण गढूळ झाले. त्या पार्श्वभूमीवर भान हरपून नशेच्या धुंदीत जगणारी तरुणाई दृष्टीस पडते, तेव्हा मन खिन्न होतं!

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आज-काल निरनिराळ्या सण-समारंभातून उदरारणार्थ दहीहंडी, नेत्यांचे वाढदिवस, मिरवणुका, ३१ डिसेंबर, लग्न, हळदी समारंभ, वाढदिवस, पुढाऱ्यांच्या मिरवणुका अशा प्रसंगी आयोजित केल्या जाणाऱ्या मद्य पार्ट्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा मिळत आहे.

खोटी आश्वासने देणाऱ्या राजकारण्यांच्या थापांच्या नादी लागून या तरुणांना व्यसनांच्या विळख्यात ढकलण्यासाठी पुढाऱ्यांची चढाओढ लागलेली असते. व्यसनासाठी कोणतेही काम करायला तरुण तयार होतात. व्यसनांना घातक न मानता उलट ती सन्मानाची बाब आहे, असे मानण्याचे मूल्य समाजात रुजले आहे.

अवैध मार्गाने आलेल्या दारू, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ वापरात येत आहेत. त्यांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला फुप्फुसाचे, किडनीचे, आतड्याचे, तसेच लिव्हर निकामी होण्याच्या रोगांनी ग्रासले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार व्यसनांच्या आहारी जाऊन मृत्यू ओढवलेल्यांची संख्या दरवर्षी १५ लाख इतकी आहे. यात १८ ते ३५ या वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. कोकणातही अशा मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. पर्यटन जिल्हा होण्याचे हे एक फलित आहे. पण जिल्ह्यात कोठेही व्यसनमुक्ती केंद्राची सोय नाही. जिल्ह्याबाहेर सातारा किंवा पुणे येथे व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायचे तर पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो. तो परवडणारा नसतो. काही मोजक्या व्यक्तींना त्यांच्या आर्थिक सुबत्तेमुळे तिथे जाता येते. उर्वरित तरुणांना व्यसनांनी ग्रासलेल्या आजारातून मुक्ती मिळते मृत्यूनेच!

शाळेच्या आवारात, परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचा कायदा २००३3 लागू झाला असूनही शाळा कॉलेज परिसरात गुटखा, मावा आणि तंबाखूजन्य पदार्थ सहज मिळतात. याचा परिणाम शालेय मुलांवर होताना दिसतो अनेक शाळांच्या परिसरात गुटख्याच्या पाकिटांचा मोठ्या प्रमाणात कचरा दिसत असतो. याशिवाय बेकायदा दारू आणि गुटखा थांबवण्यास शासनाचे नाकर्तेपण दिसून येते. अवैध दारू विरोधी समित्या तालुकानिहाय स्थापन्याचे परिपत्रक गृहखात्याने २००४मध्ये काढले होते, पण अद्याप कुठेही अशा समित्या स्थापन झालेल्या दिसत नाहीत.

या व्यसनांचा परिणाम स्त्रियांवर होताना दिसतो. पुरुष व्यसन करतात, पण परिणाम बाईला भोगावे लागतात. सुरुवातीला नवरा दारू पिऊन मारतो, नंतर मुलगा व नातूही तेच करतो. घरी बायकोला आणि मुलांनासुद्धा बाप दारू पिऊन मारझोड करतो. नवरा तर मारतो, पण पुढे मुलगाही वडिलांचे अनुकरण करतो. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांचे सातत्य टिकून राहते. बाईने हे असेच सहन करत जगावे, असा पारंपरिक समज आहेच.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

यातून एखाद्या बाईने होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी उलटपक्षी वार केला, तर अख्खा समाज आणि गाव तिच्याविरोधात उभे राहते. नवऱ्यावर हात उगारायचा नसतो, बाईमाणसाने इतके तर सहन केलेच पाहिजे, असा सल्ला दिला जातो.

गावात ज्या काही विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता आहेत. त्याचे कारण व्यसनाधीनता आहे. अशा व्यसनी पुरुषामुळे स्त्रियांचे जगणे नकोसे झाले आहे. व्यसनी नवऱ्याबरोबर संसार करण्यापेक्षा एकटे राहून मुलांचा सांभाळ करणे पसंत करायला लागल्यात महिला! कोणत्याही बाईच्या घरातील पुरुषाला व्यसन लागले की, तो मेल्याशिवाय त्याच्या छळातून तिची सुटका नाही, असेही म्हटले जाते. कित्येक विधवा झालेल्या स्त्रियांना व्यसनामुळे वैधव्य आणि अनाथपण आले आहे. व्यसनाधीन तरुणांना पाहून मनात विचार येतो- ‘हाच का आमच्या तरुणांचा देश! कुठे नेऊन ठेवलाय तरुण?’

तरुणांमधली वाढती व्यसनाधीनता कमी करायची असेल, तर दिशादर्शक विकासात्मक उपक्रम राबवले पाहिजेत. तरुणांची मोठी संख्या असलेल्या देशात या तरुणांसाठी देशाच्या, राज्याच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पात, नियोजनात कोणतीही तरतूद नाही. गावागावातून तरुण मंडळे अस्तित्वात आहेत, पण एखाद्या ग्रामदेवतेचा उत्सव साजरा करणे, सत्यनारायणाच्या पूजेचा उत्सव करणे आणि क्रिकेटच्या मॅच भरवणे, इतक्यापुरतेच या तरुण मंडळांचे अस्तित्व!

स्वातंत्र्य चळवळीनंतर तरुणांसाठी कोणतेही दिशादर्शक उपक्रम झाले नाहीत. पोपटराव पवार, पेरे पाटील यांच्यासारखे नेतृत्व सिद्ध करून विधायक कार्य करणाऱ्या व्यक्ती तयार करावयाच्या असतील तर बाबा आमटेंच्या छावणीसारखे उपक्रम गावागावातून राबवले गेले पाहिजेत. शासनाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी, स्वयंसेवी संस्था-संघटनांनी तरुणांसाठी एककलमी ‘गाव विकासात तरुणांचा सहभाग’ हा कार्यक्रम राबवल्यास तरुणांची ऊर्जा आणि वाढता उत्साह गावाच्या विकासासाठी विधायक कामासाठी वापरता येऊ शकतो.

पण इथे तर देश चालवायला, राज्य चालवायला नशेच्या पदार्थांच्या उत्पन्नाचा आधार घ्यावा लागतो. आज वाईन उपलब्ध करून देतील, उद्या आणखी दुसरे काही! हीच खरी शोकांतिका आहे. एका दारुड्या नवऱ्याची बायको म्हणते- ‘दारू पिऊन महिलांना मारझोड करणाऱ्या समाजाकडून देशाच्या अर्थव्यवस्थेत काय भर पडणार आहे?’

नवऱ्याच्या मारामुळे, छळामुळे आमच्या व आमच्या मुलाबाळांच्या डोळ्यातून निघणाऱ्या आसवांवर देशाची अर्थव्यवस्था उभी करायची असेल, तर अजून किती वर्षे आम्हाला हे सहन करावे लागणार?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

माझ्यासारख्या व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना वकिलांपेक्षाही जास्त युक्तिवाद करावा लागतो, कारण व्यसनाधीन व्यक्ती त्यांच्या वर्तनाचा बचाव सतत करत असतात. मला शासनाचा पुरस्कार मिळाला, तेव्हा ‘हे आम्ही व्यसन करतो म्हणून....’ असे खिजवणारेही भेटले आणि करोना काळात तर दारू दुकाने उघडी ठेवावी की नाही किंवा ती घरपोच देण्याची सुविधा, याबाबतच्या शासनाच्या कोलांटीउड्यांनी तर माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना आत्यंतिक निराश केले. महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी वर्षीदेखील महाराष्ट्राला दारू विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाशिवाय ‘आत्मनिर्भर’ होता येत नसेल, तर आम्ही कार्यकर्त्यांनी कुठपर्यंत लढावे? 

‘महात्मा गांधी व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार’ मिळाल्याचा अभिमान वाटत होता, तो या अशा निर्णयामुळे आपण स्वीकारण्यास पात्र होतो का, अशी शंका येण्यापर्यंत माझा प्रवास झाला आहे...

.................................................................................................................................................................

लेखिका अर्पिता मुंबरकर महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळच्या जिल्हा समन्वयक आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......