ज्येष्ठ कथा-कादंबरीकार राजन खान यांचं हे मुक्तचिंतन...भारतीय लोकशाही, समाज, पक्ष, निवडणुका, माध्यमं, राजकारण, सहिष्णुता-असहिष्णुता यांच्याविषयीचं. मराठी लेखक अशा गंभीर विषयांवर बोलण्याचं टाळतात किंवा बोलतात तेव्हा अतिशय भाबडं किंवा दयनीय वाटावं असं बोलतात. त्या पार्श्वभूमीवर राजन खान यांचं हे मुक्तचिंतन रोखठोक, थेट, नि:पक्ष, निर्भिड आणि समाजहिताचं आहे... म्हणून त्यांनी गेल्या दोन महिन्यात लिहिलेल्या फेसबुक पोस्टचं इथं संकलन केलं आहे...
.............................................................................................................................................
आज विश्वंभर चौधरींनी ट्रोलवाल्यांसाठी झ्याक व्याख्या केली- ‘हे लोक बौद्धिक नसबंदी झालेले आहेत’. (दोन्ही बाजूंनी ही व्याख्या समसमान घ्यावी.)
.............................................................................................................................................
झोप झोप, न्हाई तर बागुलबुवा ईल... तसं काय तरी वाटाय लागलंय राव ह्या ट्रोल लोकांबद्दल. कोन भारी असतंय, बागुलबुवा का ट्रोल?
.............................................................................................................................................
गेल्या तीन वर्षांत फेसबुकला लढाईच्या मैदानाचं स्वरूप आलं आहे आणि तिसरं महायुद्ध सध्या फेसबुकवर लढलं जात आहे.
.............................................................................................................................................
वडिलधाऱ्यांची झापडगिरी :
बेडकाचा कधी बैल होत नाही आणि गांडुळाचा कधी साप होत नाही.
फुकटचा अहंकार मत दिखाव, कर्तबगारी दिखाव. अहंकार बाळगायला फार अक्कल लागत नाही. मूर्खसुद्धा मूर्ख असल्याचा अहंकार बाळगतातच आणि जगात त्यांचीच संख्या जास्त असते. त्यांच्यात रमून आपले वाटोळे करून घेऊ नका.
खरा ज्ञानी कधी अहंकारी नसतो. अहंकार दिसला की मूर्ख ओळखावा.
आणि कर्तबगारी म्हणजे स्वत:चा जीव पोसणे नाही आणि चारदोन खाऊखदाड्या टोळभैरवांनी तुमच्या पांचट कृत्यांना वाहवा म्हणणे नाही.
समाजाच्या भल्यासाठी निरलसपणे राबणे आणि मौतीनंतरही लोकांनी चांगल्यासाठी नाव काढणे म्हणजे कर्तबगारी. स्वत:पुरते तर काय, किडेसुद्धा जगतात, नै का?
त्यामुळे कणभर केले तर मणभरचा भाव खाऊ नका. जाव.
(जुनी पोस्ट)
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

जातीचा अभिमान आहेच आम्हाला, दुसऱ्या जातींचा द्वेषही आम्ही मोठ्या तोऱ्यात करतो, पण आम्हाला दुसऱ्या जातींच्या तत्त्वांचे पक्ष जर उमेदवारी देणार असतील तर आम्ही निर्लज्ज लोचटपणे बेदिक्कत उमेदवारी स्वीकारतो. शेवटी राजकारण आमचा धर्म म्हणजेच धंदा आहे आणि जात आमचं भांडवल.
.............................................................................................................................................
आधुनिक धंदेवाईक पत्रकारितेला रविशभौ तुमी तर कलंक हौ.
.............................................................................................................................................
आमच्या भागात दोन विरोधी पक्ष एकच घोषणा देतायत. वाटीत चिवडा, पंज्याला निवडा आणि वाटीत चिवडा, कमळाला निवडा.
विरोध कितीही असो, ही वाटीत्मता आणि चिवडात्मता थोर आहे!
.............................................................................................................................................
एक ठरवलंय : शहराच्या रोजच्या गदारोळात दाराशी येऊन बकाल भोंगे आणि चोरलेल्या चालींची भंकस गाणी वाजवून प्रचाराच्या नावाखाली प्रदूषित पैशाच्या जिवावर ध्वनिप्रदूषण वाढवणाऱ्या एकाही उमेदवाराला मतदान करणार नाही. बिनआवाजाचा एखादा उमेदवार शोधून त्याला मतदान करीन, भले मग तो पडला तरी चालेल.
(कायद्यानं अशा कर्कश्श प्रचाराला बंदी नाही का घालता येणार मायबाप हो?)
.............................................................................................................................................
लोकांच्या दुःखाच्या पायावर स्वतःच्या सुखाचा इमला उभारतो तो राजकारणी.
(निवडणुका लढतो आणि राजकीय पक्षात असतो तोच केवळ राजकारणी नसतो.)
.............................................................................................................................................
मी माझी जात पाळतो. मला माझ्या जातीचा अभिमान आहे. मी माझ्या जातीसाठी संघर्ष करतो. माझ्या जातीचंच भलं व्हावं असं मला वाटतं. संधी मिळाली तर मी दुसऱ्या जातींचा द्वेष करतो.
या पार्श्वभूमीवर मी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभा राहिलो तर सगळ्या समाजाचा प्रतिनिधी होणं मला शक्य तरी आहे का? नाही. त्यामुळं आपणा सगळ्यांना विनंती की, निवडणुकीत इतर जातीच्या कुणीही मला मतदान करू नये. मला फक्त माझ्याच जातीच्या मतदारांनी मतदान करावं.
.............................................................................................................................................
ज्या समाजात गुन्हेगार लोकप्रिय होतात, त्या समाजातली कायदा आणि सुव्यवस्था विश्वासार्ह नाही असं निश्चित समजावं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

कोणत्याही देशातली रस्त्यांवरची माणसं आणि वाहनं यांची वाहतूक कशी चालते यावर तिथल्या लोकांचं राष्ट्रप्रेम काय लायकीचं आहे हे ठरतं.
.............................................................................................................................................
राजकारण्यांनी सगळी वाट लावली असं आपण सतत म्हणत राहतो. हे कळण्याइतपत आपण स्वतःला बुद्धिमान समजतो. पण ते वाट लावत असताना आपली बुद्धी कुठं शेण खायला गेली होती, याचा मात्र उलगडा करत नाही.
(राजकारण्यांनी वाट लावली हे लोकशाहीतलं सगळ्यात भंपक, आत्मघातकी आणि मूर्ख विधान आहे.)
.............................................................................................................................................
पैसे वाटून मतदान घेणार, पैसे घेऊन मतदान करणार... सीमेवरच्या सैनिकांच्या आणि पाकिस्तानच्या नावानं गळे काढून राष्ट्रप्रेमी म्हणून मिरवणार. आपण सोडून सतत इतरांना राष्ट्रद्रोही ठरवणार.
जय हो. मेरा भारत महान. सत्यमेव जयते.
हाहाहाहाहाहा... ऑsssक थू.
.............................................................................................................................................
आमच्याकडं एक हजार रुपये भाव फुटलाय. (नोटाबंदी असूनही बल्ले बल्ले.)
.............................................................................................................................................
भाजपचे पुढचे पंप्र देवेन्द्र असणार हे लिहून ठेवा. वन मॅन आर्मीतला पुढचा खंदा शिलेदार.
.............................................................................................................................................
मा. पब्लिक,
तुम्ही जोवर जातिधर्मात विभागलेले आहात आणि एकमेकांचा द्वेष करत आहात तोवर देशाचा भौतिक विकास पूर्णत्वाला अजिबात जात नाही बघा.
.............................................................................................................................................
रोजच्या जवळिकीत शिरलेला द्वेष वाढू देण्यापेक्षा आणि नंतर त्याचा मोठ्ठा स्फोट होण्यापेक्षा कधी कधी आधीचं नातं तोडून टाकणं हेसुद्धा प्रेमच असतं.
.............................................................................................................................................
कुठल्याही बाजूनं जा, महाराष्ट्राच्या आजच्या आणि पुढच्या महिन्याभराच्या राजकारणाचे किल्ली-माणूस (की-पर्सन) पुन्हा एकदा शरद पवारच ठरणार. राज्यात विधानसभा निवडणूक व्हावी की, नाही हे तेच ठरवतील.
.............................................................................................................................................
आपला आवडता माणूस किंवा पक्ष निवडणुकीत पडला की 'मला राजकारणाची किळस वाटते किंवा मला राजकारणात रस नाही' असं म्हणतो तो हमखास बुद्धिजिवी.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आहे त्या परिस्थितीतून होणाऱ्या प्रगतीला परिवर्तन म्हणतात, तसंच अधोगतीलाही परिवर्तनच म्हणतात.
.............................................................................................................................................
स्वतः मूर्ख मारामारीत उतरण्यापेक्षा कडेला राहून मारामारी पाहण्याचा आनंद घेणारांसाठी फेसबुक हे अत्यंत बेशुद्ध रमणीय ठिकाण आहे.
.............................................................................................................................................
दुसऱ्याला मलीन म्हणत राहिल्यानं आपली घाण प्रतिमा धुतल्यासारखी दिसते अशा भ्रामक विकृत काळात जगतो आहोत आपण.
.............................................................................................................................................
मतदारांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे जगू नये. मालकाला वाईट दिवस आले तर मग या कुत्र्यांचे हाल कुत्रासुद्धा खात नाही. मुळात कुठल्याच एका पक्षाचं कायमचं बांधील होऊ नये. सोपं म्हणजे, मेंदू शाबूत आणि तटस्थ असलेला मतदार व्हावं, मग सगळ्याच राजकीय पक्षांवर प्रामाणिक राज्य करता येतं.
.............................................................................................................................................
'तुम्ही मतदान करत नसाल तर सरकारला प्रश्न विचारण्याचा किंवा दोष देण्याचा तुम्हाला अधिकार नाही.' असले खाजगी आणि व्यक्तिगत विनोद न्यायालयाच्या सार्वजनिक खुर्चीत बसून करण्याचा अधिकार न्यायाधीशांना राज्यघटनेनं दिलेला आहे का?
.............................................................................................................................................
तत्त्वनिष्ठा :
पक्ष कोंचाही असो, उमेदवार आपल्या जातीचा असला की बास.
.............................................................................................................................................
गरिबी या भांडवलावर पोसलेलं श्रीमंत भारतीय राजकारण... किती वर्षं अजून गंडवणार रे राजकारण्यांनो? आणि किती वर्षं गंडवून घेणार रे मतदारांनो? सत्तर वर्षं एवढ्या दीर्घ काळात अक्कल न येण्याचा हा विश्वविक्रम बास की रे आता.
.............................................................................................................................................
दुसऱ्यांनी काय केलं पाहिजे हे सांगणाऱ्या कर्तृत्वशून्य लोकांची गर्दी अफाट वाढलीय. सध्याच्या काळाची खरी पीडा हेच लोक आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आम्ही बोलतो ते करतो. आम्ही स्थापनेपासून बोलतोय, मुंबईतून मराठी टक्का कमी होऊ देणार नाही.
(५० वर्षांपूर्वी मुंबईत ७८ टक्के मराठी माणूस होता, आता तो २० टक्के आहे.)
.............................................................................................................................................
इतिहासात जेव्हा मूल्यमापन होईल, तेव्हा पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या आधीचा भारत आणि त्यांच्या नंतरचा भारत असंच होईल.
.............................................................................................................................................
माझा मित्र शेण खातो, असं माझं (फक्त) मत आहे. शेण खाणं वाईट असतं असं माझं (फक्त) मत आहे. शेण खाण्यात पारदर्शकता असावी असंही माझं (फक्त) मत आहे. आणि तरीही त्याच्याशी युती करावी की नाही असा मी (फक्त) घोळ घालत बस्लोय.
.............................................................................................................................................
कुठल्या तरी राजकीय पक्षाला किंवा नेत्याला आपलं अनधिकृत बाप म्हणून मानायचं आणि त्यांची अनधिकृत पिलावळी फौज म्हणून जगायचं, यापेक्षा स्वतंत्र मेंदूचं तटस्थ नागरिक म्हणून जगलं तर, मतदारांचा मुक्त समाज तयार होईल आणि त्यातून देशाचा अस्सल विकास वेगानं होईल. नागरिक बनो, पाळीव कुत्ते नहीं.
.............................................................................................................................................
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गंगा स्वच्छ करण्याच्या नावाखाली किती पैसा पाण्यात गेला आणि गंगा अजून स्वच्छ का होत नाही, याचा हिशोब एकदा मांडला गेला पाहिजे.
- तुम्हाला राजकारणावर बोलण्याचा काय अधिकार?
- मी दर निवडणुकीला मतदान करतो, मतदान करताना उमेदवाराची जात, धर्म, गुंडगिरी, पक्ष यांना महत्व देत नाही. मी कुणा उमेदवाराचे पैसे, दारू, कोंबड्या खात नाही. मी उमेदवाराची लायकी पाहून मतदान करतो. एवढी समज दाखवल्यावरही मला राजकारणावर बोलण्याचा अधिकार नाही?
.............................................................................................................................................
विचारानं महान पण आचारानं लहान अशा दुहेरी वर्तणुकीचा समाज कायम विकृत आणि खुजा राहतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
महापुरुष पोटासाठी वापरण्यापेक्षा मेंदूसाठी वापरा लेको.
.............................................................................................................................................
भांडण करायचं असेल आणि त्याचा निकाल आपल्या बाजूनं व्हावा असं वाटत असेल, तर अजिबात उत्तेजित, उद्दिपित न होता, अगदी शांत आणि स्थिर राहून भांडता आलं पाहिजे. जित हमखास आपली होते.
.............................................................................................................................................
जगातल्या कोणत्याही धर्माला आणि जातीला स्वतःचा वाढदिवस नाही.
.............................................................................................................................................
जातीची न् धर्माची झापडं लावून इतिहास लिहिणाराला इतिहास संशोधक म्हणायचं म्हणजे काळोखाचा अंधाराशी लपंडाव.
.............................................................................................................................................
सगळ्या साडेसातशे कोटी लोकसंख्येला मान्य असलेला महात्मा किंवा महापुरुष जगात एकही नाही.
.............................................................................................................................................
महाराष्ट्र सरकारची जाहिरात म्हणते, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दोन वर्षांपूर्वी घडायच्या, आता त्या घडत नाहीत, भारताचं गृह मंत्रालय म्हणतं, महाराष्ट्रात मागच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या चव्वेचाळीस टक्के वाढल्यात, २०१४-१५ पासून ४२२९ आत्महत्या झाल्यात.
कोण खरं?
.............................................................................................................................................
एकमेकांशी मन आणि मेंदूनं पूर्ण पारदर्शी असलेली नातीच फक्त खऱ्या सुखानं जगू शकतात, बाकी सगळा दुःखाचा अखंड राजकीय बाजार.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment