१८ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील मतदानाची तिसरी फेरी समाप्त झाली. मोदी-योगींचे समर्थक आणि विरोधक या दोघांमध्येही आनंदाची लहर उठली...
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • उत्तर प्रदेशचा नकाशा, मायावती, प्रियांका गांधी, अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ
  • Tue , 22 February 2022
  • संकीर्ण व्यंगनामा मायावती प्रियांका गांधी अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ

२०२२च्या फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशातील निवडणुकांसाठी मतदान सुरू झाले. तसं बघायला गेलं तर, उत्तर प्रदेशाच्या बरोबरच अजून चार राज्यांतही निवडणुका होत्या. पण त्यांच्याकडे कुणाचं फारसं लक्ष नव्हतं. पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर अशी ही राज्यं होती. गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड ही छोटी राज्यं होती. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात टक्कर होती. केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपचा पंजाबमध्ये काही ‘स्टेक’ नव्हता. अकाली दलाबरोबर पूर्वी त्यांची आघाडी होती. या आघाडीतील अकाली दल मुख्य पक्ष होता, भाजप ज्युनियर पार्टनर. पण २०-२१ सालामधील शेतकरी आंदोलनाने या आघाडीची पार दैना उडवली. भाजपच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांनी घराबाहेर पडणेही अवघड केले. इथे आपली डाळ शिजणार नाही, हे ओळखून भाजपने पंजाबचा नाद अलगदपणे सोडून दिला.

पण, उत्तर प्रदेशची गोष्टच काही और होती. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ४०३ जागा होत्या. बाकी चार राज्यांमध्ये मिळून २८७ होत्या. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक फार प्रतिष्ठेची होती.

अजून एक फार महत्त्वाची गोष्ट होती. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मूळ गुजरातचे असले तरी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून निवडून आले होते. हिंदुत्वाची पताका घेतलेल्या पंतप्रधानांनी काशीमधून निवडून येण्यामागे मोठी प्रतीकात्मकता लपली होती. नरेंद्र मोदी यांनी इथून उभं राहताना - ‘गंगा माँ ने मुझे बुलाया हैं’ - असा दावा केला होता. लोकांनीही मोठ्या प्रेमाने त्यांना निवडून दिले होते.

आता या निवडणुकीत जर भाजप हरला, तर गंगा माँ ने आपला आशीर्वाद मागे घेतला आहे, असे विरोधक म्हणू शकणार होते.

(एकविसाव्या शतकातील राजकारणी लोक आजच्या बाविसाव्या शतकातील राजकारण्यांएवढेच लबाड होते, हे बघून आजच्या २१२२मधील वाचकांची मोठी करमणूक होईल. सगळ्या काळातले राजकारणी सारखेच!)

खुद्द पंतप्रधानांचे इतके मोठे ‘स्टेक’ असल्याने त्यांचे साहाय्यक श्रीमान अमितजी शहा यांनी सुरुवातीलाच या निवडणुकीतील ‘स्टेक’ वाढवले. त्यांनी लोकांना आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगून टाकले होते - ‘येत्या २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे असेल तर ‘बीजेपी को उत्तर प्रदेश विधानसभा में जिताना होगा.’

पण, गंमत अशी झाली की, आपण हे वाक्य कुठून बोलून बसलो असे अमितजी शहा यांना झाले. जनमताचा कौल बदलला आहे काय, अशी शंका लवकरच सगळ्यांनाच आली. मोठी धांदल उडाली.

२०१४पासून एक गोष्ट सगळ्यांनी बघून ठेवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांतील खऱ्या-खोट्या शब्दांच्या अमोघ प्रवाहात कुठलाही प्रश्न लुप्त होऊन जात होता. मग तो फेल गेलेल्या नोटबंदीचा प्रश्न असो, वा अजून कुठला. आता बदललेल्या वातावरणात असे होईल की नाही, अशी शंका सगळ्यांनाच येऊ लागली होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

शेतकरी आंदोलनापुढे नरेंद्र मोदी यांना झुकावे लागले होते आणि सगळी मजाच निघून गेली होती. त्यात महागाई, बेरोजगारी, मोकाट पशूंची समस्या, शेतमालाला मिळणाऱ्या भावाची समस्या, अशा अनेक समस्या समोर येऊन उभ्या राहिल्या होत्या. त्या सोडवायच्या असतात. खरे-खोटे बोलत राहून समस्या थोड्याच टाळता येतात? शब्दांच्या प्रवाहाच्या ओघामुळे इतके दिवस लपून राहिलेले समस्यांचे खडक आता त्या प्रवाहाच्या वर डोके काढू लागले होते. मोदीजींच्या शब्दांतील व्यर्थता सामान्य लोकांच्याही लक्षात येऊ लागली आहे काय, असे अनेक चाणाक्ष राजकारणी लोकांना वाटू लागले. मोदी यांचे सगळे समर्थक आणि विरोधक सजग झाले होते. मोदीजी आणि भाजप समस्यांच्या खिंडीत सापडणार की काय, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात पिंगा घालू लागला होता.

त्यामुळे पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी उत्तर प्रदेशात येऊन भाजपचे मुख्य विरोधक, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांना पाठिंबा देऊ लागल्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव नरेंद्र मोदी यांची खोटी म्हणता येतील, अशी वक्तव्ये पत्रकार परिषद घेऊन उघडी पाडू लागले. महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे कोपरखळ्या मारू लागले. महाराष्ट्रातील ‘खरेखुरे चाणक्य’ शरद पवार बिहारमधील नीतीश कुमार यांच्याशी संधान बांधू लागले. ‘बीजेपी उत्तर प्रदेश में हारेगी’ असे भाजपचेच मोठे नेते म्हणत असल्याचे व्हिडिओ लीक होऊ लागले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ‘अनवधानाने’ केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ असाच ‘लीक’ झाला. श्रीमान मोदीजी यांनी २०१४ साली जसे काँग्रेसला घेरले होते, त्याच धर्तीवर मोदीजींना घेरण्याची तयारी झाली.

मोदी आणि शहा या दोघांना हे सारे कळत होते, पण करणार काय? त्यात अजून एक चिंतेची गोष्ट घडली. मोदीजी, अमितजी शहा आणि योगी आदित्यनाथ अशा कोणाच्याच सभांना उत्तर प्रदेशात गर्दी होणे मुश्किल झाले. त्यातच ‘जले पर नमक’ या न्यायाने अखिलेश यादव, प्रियांका गांधी आणि मायावती या विरोधकांच्या सभांना प्रचंड गर्दी होऊ लागली.

ही परिस्थिती झाकून ठेवणे आवश्यक झाले. अजूनही काही भक्तांची भक्ती शाबुत होती. अजूनही ‘फ्लोटिंग व्होटर’ भाजपला मत देऊ शकत होते. विरोधकांच्यातील दुफळीमुळे भाजप अजूनही कट्टाकट्टी का होईना विजय प्राप्त करू शकत होता. येथे ‘जी हुजुरी’ करणारा मेनस्ट्रीम मीडिया कामाला येणार होता. भाजपच्या बाजूने लाट कशी आहे, भाजपच कसा निवडून येणार आहे, विरोधक देशद्रोही कसे आहेत, असा सर्व प्रचार या मीडियामध्ये सुरू झाला. मेनस्ट्रीम मीडियाचेच एक अंग बनून गेलेले ‘मेनस्ट्रीम ओपिनियन पोल्स’ भाजपच कसा निवडून येणार, हे सांगू लागले. पश्चिम बंगालच्या आधीच्या वर्षीच्या निवडणुकीत हेच झाले होते. बंगाल भाजपचा झाला आहे, अशी आवई उठवण्यात आली होती. आणि शेवटी झाले काय? ममता बनर्जी यांचा ‘तृणमूल काँग्रेस’ हा पक्ष भाजपला हरवून निवडून आला. तोही २९४ पैकी २१५ जागा जिंकून! मेनस्ट्रीम मीडिया आणि त्यांचे ओपिनियन पोल्स तोंडावर आपटले.

हे सारे विसरून परत हाच खेळ उत्तर प्रदेशात सुरू झाला. पण आता हा खेळ निर्वेधपणे खेळता येणे अशक्य झाले. मधल्या काळात यू-ट्यूबवर अनेक चॅनेल्स निघाले होते. ‘नॅशनल दस्तक’, ‘4 P M’, ‘सत्य हिंदी’, ‘ऑन लाईन न्यूज इंडिया’, ‘नॅशनल पिलर’ अशा नावांचे हे चॅनेल्स होते. या सगळ्या चॅनेलनी त्यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘ज़मीनी हक़ीक़त’ सांगायला सुरुवात केली. विकल्या गेलेल्या मेनस्ट्रीम मीडियावर वैतागलेल्या प्रेक्षकांनी ‘दुसऱ्या बाजूचा’ अंदाज घेण्यासाठी यू-ट्यूबवरचे हे चॅनेल्स बघायला सुरुवात केली. या दोन मीडियांमध्ये एक प्रचंड युद्ध सुरू झाले.

आज बाविसाव्या शतकात कुठलीही बातमी अजिबात दाबता येत नाही. इतके चॅनेल्स निघालेले आहेत. नॉर्वेमध्ये बसून लोक भारतीय राजकारणावर चॅनेल्स चालवत आहेत. त्यांची मुस्कटदाबी सरकारला कशी करता येणार? मीडिया सरकारच्या हाताबाहेर जाण्याच्या प्रक्रियेची सुरुवात याच काळात झाली.

शिरोजी हा सगळा रोमांचक खेळ बघत होता. त्याचे हात अर्थातच शिवशिवू लागले असणार. त्याने हा सगळा वृत्तांत आपल्या बखरीच्या या नवव्या प्रकरणात लिहिला आहे. आम्ही तो वाचकांच्या समोर अत्यंत नम्रतापूर्वक ठेवत आहोत. एक सांगावेसे वाटते - शिरोजी हा सध्याच्या काळातला अतिशय लोकप्रिय इतिहासकार झाला आहे. त्याच्यासारख्या इतिहासकाराला आज शंभर वर्षांनंतर का होईना न्याय मिळू लागला आहे, याचा अत्यंत मोठा आनंद आम्हाला आज होत आहे.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

..................................................................................................................................................................

शिरोजीची बखर : प्रकरण नऊ

१८ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील मतदानाची तिसरी फेरी समाप्त झाली. मोदी-योगींचे समर्थक आणि विरोधक या दोघांमध्येही आनंदाची लहर उठली. मोदी समर्थकांचे म्हणणे असे की, मोदी विरोधी मतदारांमध्ये फूट पडली. ऊस पिकवणारे जाट शेतकरी मोदी विरोधात होते, ते विरोधातच राहिले, पण आग्रा-मथुरा आणि इतर भागातले ‘बटाटा उत्पादक’ शेतकरी भाजपला मत देऊन गेले. शिवाय मायावती यांची बहुजन समाज पार्टी विरोधकांची मते खाऊन गेली.

मोदी विरोधकांचे म्हणणे असे की, सगळे जाट किसान आणि मुसलमान मोदी विरोधात एकत्र आले. शिवाय भाजपच्या समर्थक असलेल्या सैनी, गुज्जर अशा जातीतील अनेक लोकांनीसुद्धा मोदी विरोधात मते दिली. शिवाय बसपाने भाजपची मते खाल्ली. मतामतांचा धुरळा उडाला.

नाना, अविनाश, अच्युत गाडीने आणि भास्कर व समर स्कूटरवरून अतिशय आनंदात भजी खायला पांडेजींच्या ठेल्यावर आले. भास्कर आणि समर आले म्हटल्यावर अविनाशला राहवले नाही. 

अविनाश - लोळवलं की नाही, मोदीजींनी तुम्हाला पुन्हा एकदा? त्यावर भास्करने शांतपणी भजी सांगितली...

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

भास्कर - शेतकरी आंदोलनात ७०० शेतकरी गेले, हे विसरून सगळ्या शेतकऱ्यांनी मोदीजींना मतं दिली का?

अविनाश - जे गेले ते शेतकरी नव्हतेच. तसा मेसेज व्हायरल झाला आहे उत्तर प्रदेशमध्ये कालपासून. त्यामुळे आग्रा-मथुरा भागातल्या ‘बटाटा उत्पादक’ शेतकऱ्यांनी भाजपला मतं दिली. शिवाय काही राष्ट्रवादी मुसलमानांनीही.

नाना - मोदीजींच्या मुत्सद्दीपणाला हरवणं अवघड आहे. या शेतकरी आंदोलनामुळे सगळं संपलं असं वाटत होतं, पण मोदीजींनी मतदानाच्या आदल्या रात्री पारडं फिरवलं. एक मेसेज व्हायरल केला आणि विरोधकांचं सगळं अवसान संपलं.

अच्युत - पांडेजींना बोलवा ना. त्यांना विचारू नक्की काय झालं आहे ते.

पांडेजींना बोलवले गेले. तेसुद्धा हौसेने आले. 

पांडेजी - ऐसी बहुतसी थियोरी निकलेगी अब काउंटिंग होने तक. उनका कोई मायना नहीं होता.

नाना - लेकिन बटाटा-किसान लोगोंने अपने सारे मत बीजेपी को दे दिए. वैसा मेसेज आ के पड़ गया हैं मेरे फोन में.

(१९७३ साली नाना एका शिबिरासाठी लखनऊला महिनाभर राहून आले होते. त्यामुळे त्यांचे हिंदी अत्यंत उत्कृष्ट झाले आहे, असा समज सगळ्या पुण्यात झाला होता. तो समज अजूनही तसाच आहे. आज पुण्यात तुम्ही कुणालाही नानांचे हिंदी कसे आहे, हे विचारले की, पुणेकर वाहव्वा करतात. असो!)

पांडेजी - मैं सेंट्रल यूपी का हूं. पश्चिम के आलू किसानों के वोट कहां पड़े ये नहीं बता पाएंगे हम.

नाना - लेकिन कुछ तो कान के ऊपर पड़ा होगा ना आपके?

पांडेजी - क्या पड़ा हैं कानोंपर मेरे?

भास्कर - आपके कानों के उप्पर कुछ नहीं पड़ा हैं. आपके कानों मे क्या पड़ा हैं, ऐसे पूछ रहें हैं हमारे नानाजी.

हे ऐकल्यावर घाबरलेले पांडेजी शांत झाले. कानांवर धरलेले आपले हात खाली घेत म्हणाले -

पांडेजी - मैं सुनता रहता हूँ यू-ट्यूब के चैनेल आजकल. वहाँ तो बता रहें हैं की, बीजेपी के लिए दिक्कत ही दिक्कत ही हैं.

भास्कर - कौन से चॅनेल देखते हैं आप?

पांडेजी - बहुत हैं. ‘नॅशनल दस्तक’, ‘4 P M’, ‘सत्य हिंदी’, ‘ऑन लाईन न्यूज इंडिया’, ‘नॅशनल पिलर’... और भी बहुत सारे हैं.

अविनाश - हे सगळे देशद्रोही चॅनेल आहेत.

पांडेजी - ऐसा क्यों कह रहे हों? ‘नॅशनल दस्तक’ दलितों का चैनल हैं. ‘4 P M ब्राह्मणों’ का हैं. ‘सत्य हिंदी’ पर बड़े बड़े पत्रकार आते हैं. तमाम पत्रकार! हमारे अंबरीश मिश्र आते हैं, सिद्धार्थ कलहंस आते हैं, फिर श्रवण गर्ग, राजेंद्र तिवारी, आलोक जोशी, शरद प्रधान, विनोद अग्निहोत्री, अजय शुक्ल कितने बताऊँ! मजा आता हैं सुनने में.

अविनाश - खरं तर अर्णब गोस्वामी हा एकच पत्रकार ठेवा भारतात. बाकी कशाला पाहिजेत?

समर - तो तरी कशाला पाहिजे? मोदीजी ‘मन की बात’ करतात, तेच ठेवा.

नाना - उसका ऐसा हैं पांडेजी, अगर ‘हिंदू राष्ट्र’ करना हैं, तो उस में पत्रकारों का कोई स्थान नहीं रहता. ‘हिंदू राष्ट्र’ में पत्रकार की कोई जरूरत ही नहीं रहेगी. जो कुछ बातमी हैं वो सरकारही देगी.

पांडेजी - सरकार क्या देगी?

नाना - बातमी, बातमी!

भास्कर - बातमी म्हणजे खबर!

पांडेजी - वो सब ‘हिंदू राष्ट्र’ जब आयेगा तब जरूर करिए. लेकिन आज का हाल देखा जाए, तो आज भारत में सत्ता हैं संविधान की. आज की तारीख में किसी को पत्रकारिता करने से रोक नहीं सकते आप.

भास्कर - या यू-ट्यूब चॅनेलवाल्यांनी नाकात दम आणला आहे भाजपच्या. 

अविनाश - यांना अटक केली पाहिजे. राष्ट्रद्रोही कुठले!

पांडेजी - देखिए आपके पास सरकार का गुणगान करने वाले इतने चैनेल हैं. ‘रिपब्लिक’, ‘झी न्यूज’, ‘इंडिया टीव्ही’, ‘आज तक’... आपको प्रश्न पूछने वाला भी कोई चाहिए ना?

अविनाश - कशाला विचारायचे प्रश्न? कशाला पाहिजेत यू-ट्यूबवरच्या चॅनेलवरच्या चर्चा?

पांडेजी - जब तक संविधान का राज हैं, यहां प्रश्न तो पूछेही जाएंगे. लोकतंत्र हैं ये.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अविनाश - योगीजी म्हणतात ते बरोबर आहे. एक हाथ में विकास की छड़ी और दूसरे हाथ में बुलडोजर का स्टिअरिंग, असंच पाहिजे.

नाना - आता असल्या चॅनेलवाल्यांच्या घरावरून बुलडोझर चालवायला लागणार योगीजींना.

पांडेजी - योगीजी की ऐसी भाषा की वजह से ही बीजेपी दिक्कत में आयी हैं यूपी में.

नाना - बिल्कुल नहीं. लोगों को बहुत अच्छी लगती हैं, योगीजी की ‘दबंग’ स्टाईल.

अविनाश - या देशाला असंच पाहिजे.

पांडेजी - आपको एक चीज समझनी चाहिए, भारत से लोकतंत्र हटा नहीं सकते आप लोग.

भास्कर - लोकशाही खूप रुजली आहे भारतात. तसं नसतं तर आज ही वेळ आली नसती भाजपवर उत्तर प्रदेशमध्ये.

अविनाश - काही वेळ वगैरे आलेली नाहिये.

समर - तुमच्या सभांना गर्दी होत नाहिये. खुद्द मोदीजींना आपल्या सभा रद्द कराव्या लागल्या. बिजनौरमधली सभा रद्द झाली. लखीमपूर खीरीमधली सभा रद्द झाली. पंजाबमधली सभा रद्द करावी लागली.

अच्युत - मोदीजी मला प्राणापेक्षा प्रिय आहेत, पण मलाही संशय यायला लागला आहे आजकाल. भाजपची बोंब झाली असणार उत्तर प्रदेशमध्ये. 

नाना - (गालातल्या गालात हसत) कळेगा मोजणी के दिवस पर.

पांडेजी - ये क्या कह गए नानाजी मराठी में?

भास्कर - (हसत) वो कह रहे हैं की, १० मार्च को जब काऊंटिंग होगी, हम लोगो की समझ में सब आ जाएगा.

पांडेजी - (हात जोडत) आप बुजुर्ग हो. आपका तजुर्बा बहुत बड़ा हैं. बीजेपी जीत भी सकती हैं. लेकिन हमारा आकलन ये हैं की, बीजेपी एक ऐतिहासिक हार की तरफ बढ़ रही हैं.

अविनाश - क्या पैज मरोगे आप.

पांडेजी - (काही न कळून भास्करकडे बघत)  किसको मारना हैं?

भास्कर - (हसत) पैज को मारना हैं!

पांडेजी - ये पैज क्या होती हैं?

भास्कर - पैज का मतलब होता हैं शर्त.

पांडेजी - अरे बापरे! शर्त वगैरा नहीं लगाते हैं हम. हम बहुत छोटे आदमी हैं.

अविनाश - बीजेपी को कम से कम २५० जागा मिलेंगी.

पांडेजी - यू-ट्यूबवाले सर्वे बोल रहें हैं की, बीजेपी १३० के अंदर सिमट जाएगी.

अविनाश - (चिडून) झूठ ठरेंगे वो.

पांडेजी - क्या करेंगे वो?

भास्कर - झूठ साबित हो जाएंगे वो.

पांडेजी - आपको एक समझना होगा - बीजेपी का कुनबा बिखर गया हैं.

नाना - कुनबा का मतलब शेतकरी ना? किसान?

पांडेजी - कुनबा याने की परिवार. पिछले इलेक्सन में बीजेपी के साथ सब जाती एकसाथ खड़ी हुई थी. कुशवाहा, सैनी, शाक्य, नोनी, दलितों का बड़ा हिस्साभी था. अब की बार, ये सब वोट बिखर गए हैं.

भास्कर - ओबीसी तुम्हाला सोडून चालले आहेत.

समर - दलित तर तुमचे कधी नव्हतेच.

पांडेजी - अमित शाहजी ने बहुत कष्ट किए थे कुनबा सम्हालने के लिए. योगीजी की ठाकूरवाद ने पूरा कुनबा बिखर दिया. मोदी-शहा की सारी मेहनत पे योगीने पानी फेर लिया. सारी वोट बँक तोड़ दी.

भास्कर - मोदीजी आणि चाणक्यजी यांनी जी मोट बांधली होती, ती योगीजींनी तहसनहस करून टाकली.

नाना - बीजेपी जातीपाती की मोट नहीं बांधती हैं. हिंदुत्व की मोट बांधती हैं. बिखरेगी नहीं ये मोट. ये ८० टक्के लोगों की मोट हैं.

पांडेजी - ठीक हैं. आप कह रहें हो तो नहीं बिखरेगा कुनबा. लेकिन यू-ट्यूबपर लोग बोल रहें हैं की, योगीजी का फैलाया हुआ रायता समेटे नहीं समेट पा नहीं रही हैं आपकी पार्टी.

समर - (हसत) कळलं का अविनाश? रायता फैल गया हैं! सगळा रायता सांडून टाकला आहे योगीजींनी चौफेर. विचका झाला आहे सगळा, विचका!

अच्युत - पहिला विचका मोदीजींनी केला. माफी मागितली शेतकऱ्यांची!

अविनाश - तू गप रे. सारखं माफी माफी करू नकोस.

अच्युत - मोदीजींनी माफी मागितली आणि सगळ्या लोकांना दोन गोष्टी कळून चुकल्या. एक म्हणजे यांना सत्ता आवडते आणि दुसरी म्हणजे यांची छाती छप्पन इंचांची नाही.

अविनाश - तू गप्प बस प्लीज! तू स्वतःच एक सांडलेला रायता आहेस.

अच्युत - शेतकरी आंदोलनामुळे झालं हे सगळं. त्याच्या आधी चांगलं चाललं होतं सगळं.

अच्युत - अगदी बरोबर. मोदीजींना माफी मागायचीच होती, तर ७०० शेतकरी मरण्याची वाट पाहून का मागितली? आधीच मागायची! ७०० शेतकरी मेल्यावर तुम्ही माफी मागता? कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर?

अविनाश - तू गप्प बस.

पांडेजी - सही फर्मा रहें हैं अच्युतजी. पहले आपने किसानों को न जाने क्या क्या गाली दे दी हैं. ये फर्जी किसान हैं, खालिस्तानी हैं, पाकिस्तानी हैं! न जाने और क्या क्या!

अच्युत - करेक्ट! आणि आता तुम्ही त्याच लोकांकडं मतं मागायला जाता आहात.

पांडेजी - अब लोग आपसे पूछ रहे हैं की, हम खालिस्तानी हैं, तो आप हमसे वोट क्यो मांग रहे हो?

समर - (नाटकी दुःखाने) बहोत बुरे हाल हुए हैं बीजेपी के!

अविनाश - (चिडत) चुप बस!

भास्कर - अरे, आम्ही बसू गप्प! पण मतदार त्यांना पाहिजे त्यांनाच मतं देणार.

पांडेजी - देखीये ऐसा हैं, यूपी के लोगों को आपने बताया था की, अब डबल इंजन की सरकार होगी, केंद्र और राज्य दोनों जगह एक पार्टी की सरकार होगी, तो ‘अच्छे दिन’ आ जाएंगे.

अविनाश - आये हैं यूपी में ‘अच्छे दिन’.

पांडेजी - आए होंगे तो १० मार्च को पता चलेगा. लेकिन हमें लगता हैं की, आज की तारीख में यूपी के लोग मोदीजी आणि योगीजी इन दोनों से खफा हैं. डबल इंजन तेजी से ढलान से फिसला जा रहा हैं.

अविनाश - ऐसा हो ही नहीं सकता. भाजपला २५० जागा मिळणार!

भास्कर - अखिलेश यादव म्हणत आहेत की, मतदानाची पाचवी आणि सहावी राऊंड येईपर्यंत भाजपच्या बूथसवर ‘भूत नाचेंगे’. सगळ्यांना कळून चुकले आहे की, भाजप हरते आहे म्हणून.

अविनाश - सगळे मोठे ‘ओपिनियन पोल्स’ म्हणत आहेत, भाजप जिंकणार, त्याला काहीच अर्थ नाही का?

पांडेजी - यू-ट्यूबपर बड़े बड़े पत्रकार बोल रहे हैं की, सब बड़े पोल्स बिक चुके हैं आठ-आठ, दस-दस करोड़ में.

अविनाश - सब विचारवंत बिक गए हैं एक दारू की क्वार्टर में.

भास्कर - हा मुद्दा लिहून ठेवू. १० मार्चला कळेल आपल्याला की, कोण विकलं गेलं होतं ते.

पांडेजी - यू-ट्यूबपर ये भी चर्चा हैं की, सांप्रदायिक गर्मी बिल्कुल कम हो गई हैं यूपी में.

नाना - सांप्रदायिक गर्मी का क्या मतलब हैं?

भास्कर - धर्माच्या राजकारणाची गरम हवा.

पांडेजी - यू-ट्यूबपर चर्चा हैं की, पश्चिम यूपी में मुसलमान और जाट एकसाथ वोट कर रहे हैं अखिलेश भय्या को.

अविनाश - साला हे यू-ट्यूब चॅनेल बंद पाडले पाहिजेत! नाही त्या बातम्या पसरवतायत! देशद्रोही!

पांडेजी - परसो ‘4 P M’ चैनेल बंद हो गया अचानक. बीजेपीवालोंने बहुत शिकायतें की, उसकी यू-ट्यूब के पास. यू-ट्यूबने एक झटके में बंद कर दिया ये चैनल.

अविनाश - असंच पाहिजे.

पांडेजी - ‘4 P M’ के संजय शर्माजीने दूसरे दिन नया चैनेल शुरू किया- ‘4 P M UP’.

अविनाश - असं कसं?

पांडेजी - लागत ही कुछ नहीं हैं. मोबाईल सामने रख कर व्हिडिओ बनाओ और चढ़ा दो यू-ट्यूबपर. आप हमारा आज एक चैनेल बंद करो, कल हम दूसरा चैनेल शुरू करते हैं.

अविनाश - पण त्याचे आधीचे सगळे सबस्क्राइबर गेले असणार.

पांडेजी - तीन लाख सत्तर हजार थे. तीन वर्षों में जमा हुए थे.

अविनाश - घालवले ना सगळे आम्ही. बस बोंबलत म्हणावं आता.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पांडेजी - नया चैनेल आने के दूसरे दिन ३५ हजार लोगो ने सबस्क्राइब कर दिया चैनेल को फिर एक बार!

अविनाश - असं व्हायला लागलं तर कसं होणार?

पांडेजी - वो आप जानो और आपकी पार्टी जाने!

नाना - काही तरी गंभीर विचार व्हायला पाहिजे या प्रश्नावर.

पांडेजी - जरूर करिए! लोग बाहर के देशों में बस जाएंगे और ऐसे चैनेल चलाएंगे. क्या करोगे आप?

भास्कर - लोक यू-ट्यूब चॅनेल चालवतील, व्हॉटसअॅप चॅनेल चालवतील, टेलिग्राम चॅनेल चालवतील...

पांडेजी - मैं एक चीज बताऊँ नानाजी आपको? लोकतंत्र का गला दबोचना बहुत मुश्किल हो गया हैं, आजकी तारीख में.

नाना - ठीक आहे. आपण पैज लावू. उत्तर प्रदेशमध्ये भाजप जिंकला तर तुम्ही एक प्लेट भजी द्यायची आम्हाला. आणि हरला तर आम्ही अर्ध्या भजी प्लेटचे पैसे देणार तुम्हाला.

समर - अर्ध्या प्लेटचे का?

नाना - भज्यांची प्लेट अर्ध्याच किमतीला पडते ना पांडेजींना! ५० टक्के फायदा असतो, त्यात त्यांचा. तो आम्ही का द्यावा?

पांडेजी - (हसतात) ऐसा करतें हैं बीजेपी बुरी तरह पीटनेवाली हैं ये हम जानते हैं. अगर बीजेपी पीट जाती हैं, तो हम आपको एक प्लेट भजी देंगे. और बीजेपी जीत गई तो आपको जो खुशी होगी, उस खुशी के सम्मान में हम आपको दो प्लेट भजी खिलाएंगे.

समर - व्वा पांडेजी, तुम्हाला खऱ्या अर्थाने लोकशाही कळली आहे. भज्याच्या प्लेटचे अर्धे पैसे देणाऱ्या लोकांना कशी समजावी लोकशाही?

..................................................................................................................................................................

दुर्गाप्रसाद पांडे हे एक अप्रतिम पात्र शिरोजीने तयार केले आहे. अत्यंत व्यवहारचतुर, प्रेमळ, कॉमनसेन्स असलेले आणि म्हणूनच लोकशाहीची खरी किंमत माहीत असलेले! दुसऱ्यांची मते आपल्याला अजिबात पटत नसतानाही त्या मतांविषयी आदर असलेले! कुठल्या ना कुठल्या फोल आदर्शांच्या मागे भुतासारखं भटकणाऱ्या अतृप्त लोकांना लोकशाहीची किंमत कशी कळणार?

असो. शेवटच्या भज्यांच्या किश्श्यामधून शिरोजीने पांडेजींची लोकशाही वृत्ती किती छान पद्धतीने व्यक्त केली आहे! हीच ती प्रसन्न लोकशाही वृत्ती! पांडेजींसारखे लोक भारतात होते म्हणून आज बाविसाव्या शतकात आपण एक ‘व्हायब्रंट लोकशाही’ समाज बनलेलो आहोत!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......