अजूनकाही
१. कुस्तीपटू योगेश्वर दत्तने अभाविपच्या गुंडगिरीचा निषेध करणाऱ्या गुरमेहर कौर या मुलीविरुद्ध केलेल्या ट्विटचा समाचार घेताना गीतकार आणि राज्यसभेतील खासदार जावेद अख्तर यांनी ‘अशिक्षित कुस्तीपटूने कारगिल युद्धातील शहीदाच्या मुलीची खिल्ली उडवणे मी समजू शकतो. पण उच्चशिक्षितांनीही तिची खिल्ली उडवणे दुर्दैवी आहे’ असं ट्वीट करून नवा वाद निर्माण केला आहे. ‘तुम्ही कविता लिहिल्या आहेत, पण आम्हीदेखील आमच्या छोट्या कारनाम्यांमधून देशासाठी इतिहास रचला आहे,’ असे प्रत्युत्तर योगेश्वरने दिले आहे.
शिक्षणाचा आणि संवेदनशीलतेचा संबंध जोडून जावेद अख्तर यांनी असंवदेनशीलतेचाच प्रत्यय दिला आहे आणि आपलंच प्रतिपादन खोटं ठरवलं आहे. आपण इतरांच्या ज्या प्रवृत्तींवर टीका करतो, त्या आपल्यात निर्माण होऊ नयेत, यासाठी खास दक्ष राहावं लागतं. बाकी योगेश्वरलाही कुस्तीतल्या पराक्रमांपुढे कविता-कथा-पटकथा यांची काही मातब्बरी वाटू नये, हीसुद्धा त्याच नाण्याची दुसरी बाजू आहे.
……………………….……………………….……………………….
२. देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आलेला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील स्टुडंट्स युनियनचा नेता कन्हैया कुमार याला मोठा दिलासा मिळाला आहे. कन्हैयावरील देशद्रोहाचा आरोप सिद्ध करण्यास दिल्ली पोलिसांना अपयश आलं आहे. कन्हैयानं देशविरोधी घोषणा दिल्याचे पुरावेच पोलिसांना सापडले नसल्याचं पुढं आलं आहे.
काहीतरीच काय? दरवेळी निवडणुकांच्या आधी नतद्रष्ट डावे आणि फुरोगामी मिळून कसा स्वघोषित राष्ट्रवादी सरकारला अडचणीत आणण्यासाठी कसा कट रचतात, हे विविध 'तथ्यां'च्या साह्याने अगदी बिनचूक समजावून देणाऱ्या पोस्टींचा सोशल मीडियावर महापूर आलेला असताना आणि स्वघोषित देशभक्तांनी त्या फॉरवर्ड करण्याचा धडाका लावलेला असताना ही बातमी यावी. आता गुरमेहर कौर प्रकरण हे कन्हय्या कुमार पार्ट टू आहे, हे भक्तजनांचं म्हणणं उलट्या अर्थाने खरं ठरणार की काय?
……………………….……………………….……………………….
३. भारतात कोट्यवधी रुपयांची बँक कर्जे बुडवणाऱ्यांना आपल्या देशात मुक्काम करू देईल, एवढी इंग्लडमधील लोकशाही उदार आहे, अशा शब्दांत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विजय मल्ल्या यांचे नाव घेता आपली नाराजी व्यक्त केली.
जेटलीसाहेब, पण याबाबतीत सर्वात श्रेष्ठ लोकशाहीत तर आपण राहतो ना? इथे सर्वसामान्य माणसाचा काही हजारांचा हप्ता थकला की घरी गुंड पाठवणाऱ्या बँका हजारो कोटींची कर्जं थकवणाऱ्यांना आणखी हजारो कोटींची कर्जं देतात, राजकारणी पुढारी या गणंगांच्या मांडीला मांडी लावून बसतात, त्यांच्या खासगी सेवासुविधा-सोयींचा मन:पूत लाभ घेतात, लोकशाहीच्या पवित्र मंदिरात त्यांना संगनमताने प्रवेश देतात आणि आता हा बाब्या काही परत येणार नाही, हे २०० टक्के स्पष्ट असताना त्याला सुखाने देश सोडू देतात. इंग्लंड लोकशाहीची जननी असेल, पण भारताची बरोबरी नाही करू शकणार!
……………………….……………………….……………………….
४. पुरातत्त्व विभागाच्या कचाट्यात अडकलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातील अडथळा दूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांची भेट घेत गडकिल्ल्यांविषयी चर्चा केली. या भेटीत रायगडच्या विकासकामांमधील सर्वाधिकार राज्य सरकारला मिळाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. या निर्णयामुळे रायगडप्रमाणेच अन्य किल्ल्यांसाठीही अशी सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अरे बापरे, आता राज्य सरकार आणि त्यांची मावळे कंपनी पुरातत्त्वीय महत्त्व वगैरेंचा कडेलोट करून आपल्या इयत्ता चौथी 'क'मधील कल्पनांप्रमाणे गडकिल्ल्यांचा 'विकास' करणार तर… कुमार केतकरांचा लोकसत्तेतला शिवस्मारकाविषयीचा अग्रलेख आठवला आणि पाठोपाठ केतकरांचं मतपरिवर्तन घडवून आणायला गेलेले प्रेमळ शिवप्रेमीही आठवले. अरे बापरे!
……………………….……………………….……………………….
५. अमेरिकेत श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणाची हत्या झाल्यानंतर आता भारतीय तरुणांना सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तेलंगणा अमेरिकन तेलगू असोसिएशनने (टाटा) अमेरिकेतील तेलगू भाषिक तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी तेलगू भाषेत संवाद साधणे टाळावे, याऐवजी इंग्रजी भाषेत संवाद साधावा, असे निर्देश जारी केले आहेत. कोणासोबत वाद झाल्यास काही न बोलता तातडीने तिथून निघून जावे असे संघटनेच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे. निर्जनस्थळी हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे तसेच एकट्याने फिरणेही टाळावे असे आवाहन संघटनेने केले आहे.
कमाल झाली या तेलंगणा अमेरिकन तेलगू असोसिएशनची. त्यांनी चक्क भारतीय सोशल मीडियावरच्या अघोषित निर्देशांची कॉपी केलीये हो. इथेही सोशल मीडियात स्वस्त जनमतविरोधी भूमिका घेणाऱ्यांनी नेमकी हीच पथ्यं पाळायची असतात. काही काही भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वास्तवातही अशाच प्रकारचे राष्ट्रवादी हल्ले सुरू झालेले असल्याने लवकरच सोशल मीडियाबाहेरच्या जगातही याच सूचना देण्याची वेळ येऊ शकते.
……………………….……………………….……………………….
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Wed , 01 March 2017
all these largely media run campaigns of outrage have had a clear pattern since 2014. 1) An event is carefully picked and/or staged either just before or during a major election. 2) Someone, preferably a woman, plays an agent provocateur first, and then plays the victim claiming 'death threats and rape threats', but no one goes to the cops to register a complaint. 3) 'Friendly' journalists from the left-liberal ecosystem step in, propping up the claims of the 'victim'. The victim is transferred from TV studio to studio, and encouraged to give a carefully curated version of his/her story, with liberal prompts by the 'journalists' interviewing them. 4) Once enough 'hawa' is created, political parties opposed to the BJP take up the cause, almost always, AAP is the first one, followed by the Congress. 5) Any voices politely questioning the narrative, no matter how credible or accomplished they are, are immediately termed 'abusive, hateful, intolerant' and massively trolled. 6) In an amazing coincidence, the carefully orchestrated campaign reaches its crescendo around the last phase of the election campaign. 7) Once the polling is over, the campaign is quietly withdrawn, sleeper cells are told to sleep again, till it is time to activate them during the next round of elections! - Shefali Vaidya