अजूनकाही
महाराष्ट्रात ‘मोबाईल टॉवर ग्रीव्हन्स फोरम’ची स्थापना करणारे आणि ‘मोबाइल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय’ या पुस्तकाचे सहलेखक मिलिंद बेंबळकर यांचं ‘5G वायरलेस तंत्रज्ञान - दुष्परिणाम आणि उपाय’ हे नवं पुस्तक लवकरच ई-बुक स्वरूपात प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाला लेखकाने लिहिलेले हे मनोगत...
..................................................................................................................................................................
वायरलाईन सेवा - लॅंडलाईन टेलिफोन आणि फायबर ऑप्टिक केबलचे महत्त्व नागरिक आणि धोरणकर्ते यांच्यासमोर मांडणे आणि भारतातील पायाभूत सुविधांमध्ये वायरलाईन सेवांचे महत्त्व विशद करणे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे.
वायरलाईन सेवा (लॅंडलाईन टेलिफोन आणि फायबर ऑप्टिक केबल) आणि वायरलेस सेवा (3G, 4G, 5G सेवा) यांमधील फरक, सुस्पष्ट धोरणे आणि त्याच्या अंमलबजावणीअभावी खाजगी कंपन्यांनी ग्राहक आणि बाजारपेठेवर मिळवलेला कब्जा, याविषयीची चर्चा या पुस्तकात करण्यात आलेली आहे.
डेटाची गोपनीयता, सुरक्षितता, नेट न्युट्रॅलिटी, डिजिटल प्रणालीचा वापर करण्याचा समानाधिकार, खाजगी कंपन्यांपासून सर्व सामान्य जनतेच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सरकारला आलेले अपयश, खाजगी कंपन्यांची एकाधिकारशाही, वायरलेस सेवांसाठीचा वीजेचा प्रचंड वापर, वायरलेस सेवांमुळे होणार्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, याचा परामर्ष या पुस्तकात घेण्यात आलेला आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
वायरलेस सेवांपेक्षा कित्येक पटीने वेगवान सेवा देणार्या फायबर ऑप्टिक केबलचे, कॉपर केबलचे, इथरनेट जोडणीचे समर्थन या पुस्तकात केलेले आहे. ज्याप्रमाणे पाणी, रस्ते, पूल, रेल्वे सेवा या पायाभूत सुविधांवर जनतेचा अधिकार आणि नियंत्रण असते (शासनयंत्रणेमार्फत), त्याचप्रमाणे ब्रॉडबॅंडमार्फत अतिवेगवान इंटरनेट सेवा देणार्या फायबर ऑप्टिक केबलवर जनतेचा अधिकार आणि नियंत्रण असले पाहिजे, खाजगी कंपन्यांचे नियंत्रण असू नये. फायबर ऑप्टिक केबलचे जाळे देशभर अंथरणे आणि त्याचे नियंत्रण आणि देखभाल स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत झाले पाहिजे. कारण ही सेवा अतिशय सुरक्षित, विश्वसनीय, टिकाऊ, सर्वांना परवडणारी आहे.
मागील दोन दशकांमध्ये वायरलेस सेवा (2G, 3G, 4G इ.), सेल्युलर फोन (मोबाइल फोन), इत्यादीस प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सेवा देणार्या कंपन्यांची वाढ आणि त्यांची आर्थिक प्रगती अतिशय वेगाने झाली. वायरलाईन सेवा - लॅंडलाईन टेलिफोन सेवा कालबाह्य झालेल्या आहेत, असा समज सगळीकडे झाला. इंटरनेट आधारित वायरलेस सेवांनाच (2G, 3G, 4G इ.) फक्त उज्ज्वल भवितव्य आहे, असे वातावरण निर्माण केले गेले. परंतु राजकारण्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असणार्या खाजगी कंपन्यांच्या दबावगटाने हे लक्षात घेणे गरजेचे आहे, वायरलेस सेवांच्या कल्पनातीत प्रगतीस आक्रमक व्यापारी नीती, नियामक संस्थांचे आणि शासनाचे पक्षपाती धोरण कारणीभूत आहे. त्यामध्ये कोणतेही जनहित नाही.
वायरलेस उद्योगाची व्यावसायिक नीती, त्यांचा दृष्टीकोन, त्यांच्या बाजारपेठेविषयीच्या अवास्तव कल्पना आणि गैरसमज, त्यांची आक्रमक प्रचार यंत्रणा, कायदेमंडळांचे अपयश, नियामक संस्थांचे पक्षपाती धोरण, राजकारण्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असणारी खाजगी उद्योगांना अनुकुल धोरणे, यामुळे नागरिकांच्या वायरलेस सेवांविषयी अतिअपेक्षा निर्माण झालेल्या आहेत आणि पर्यायाने वायरलाईन सेवांकडे (लॅंडलाईन टेलिफोन आणि फायबर ऑप्टिक केबल) अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यासंबंधीचा ऊहापोह या पुस्तकात केलेला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
उत्तम दर्जाची प्रशासकीय यंत्रणा राबवण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारला आपल्या विविध सेवा आणि योजना उदा. ई-ग्रामपंचायत, ई-प्रशासन, ई-शिक्षण, ई-आरोग्य, ई-औषधे, ई-तक्रार निवारण, ई-शेती, ई-नागारिक सुविधा कमीत कमी वेळात थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या महत्त्वाच्या सरकारी योजना यशस्वी करण्यासाठी फायबर ऑप्टिक केबलद्वारे इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही इंटरनेट सेवा वेगवान, सहजपणे परवडणारी, तटस्थ, टिकाऊ, शाश्वत, सुरक्षित, योग्य दर्जाची असावी. हे साध्य करण्यासाठी सर्व प्रशासकीय पातळ्यांवर प्रयत्न झाले पाहिजेत, परंतु त्याचे नियमन आणि अंमलबजावणी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत स्थानिक पातळीवरच झाली पाहिजे.
आपण अशा एका वळणावर उभे आहोत, जेथे आपली संस्कृती, परंपरा, आचार-विचार स्वातंत्र्य, यावरच बंधने घालण्याचा काही मूठभर लोकांचा इंटरनेटमार्फत प्रयत्न चालू आहे. त्यास आव्हान देण्याची गरज आहे. म्हणूनच फायबर केबलमार्फत देण्यात येणार्या इंटरनेट सेवेवर नियंत्रण समाजाचेच असले पाहिजे, हे प्रतिपादन करण्यासाठी हा पुस्तकप्रपंच.
.................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा
.................................................................................................................................................................
लेखक मिलिंद बेंबळकर यांनी महाराष्ट्रात ‘मोबाईल टॉवर ग्रीव्हन्स फोरम’ची स्थापना केली आहे. तसेच ते ‘मोबाइल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय’ या पुस्तकाचे सहलेखकही आहेत.
milind.bembalkar@gmail.com
...............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment