संस्कृती ‘जोडणारी’ असली पाहिजे, ‘तोडणारी’ नाही. विशिष्ट संस्कृतीमुळे समाजात गट पडू नयेत, दुफळी माजू नये, यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे
पडघम - सांस्कृतिक
आर्चबिशप फेलिक्स मच्याडो
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 28 December 2021
  • पडघम सांस्कृतिक संस्कृती Culture जीवनशैली Lifestyle धर्म Religion

‘संस्कृती’ (Culture) हा शब्द फ्रेंच शब्दापासून आला आहे. त्याचे मूळ ‘colere’ या लॅटिन भाषेतील शब्दात आहे. ‘Culture’ म्हणजे मशागत करणे. जसे मातीतून उगवलेले रोपटे पृथ्वीच्या दिशेने झुकते आणि वाढते, भाताच्या रोपाची मूठ लागवड (आवणी) केल्यावर आपण त्याची मशागत करतो, त्याप्रमाणे जीवनाच्या मशागतीला ‘संस्कृती’ हा शब्द वापरतात. मग त्याचा व्यापक अर्थ रूढ होऊन माणसाच्या जीवनाला समजून घेण्याचा प्रयत्न होत राहिला.

आपण संस्कृतीसह जन्माला येत नाही. परंतु, एका विशिष्ट संस्कृतीत आपण जन्म घेतो. मग जन्म घेतल्यापासून आपण ‘संस्कृती’ आत्मसात करत असतो. संस्कृती ही एक गोष्ट आहे, जी आपण अखंड व मरेपर्यंत शिकतो. तथापि, हे आपण कधीच विसरता कामा नये की, संस्कृती आपल्याला समजते तेवढीच, दिसते तेवढीच नसून ती अधिक व्यापक आहे. मानवाच्या अंतमनात शिरून सारासार जीवनाचा शोध घेण्यासाठी ‘संस्कृती’ हे प्रवेशद्वार ठरते. संस्कृती ही स्थिर नसून एक गतिशील, क्रियाशील व प्रक्रियात्मक संकल्पना आहे. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत संस्कृती वाढत राहते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

संस्कृतीचे काही पैलू ही आपली ओळख आहे. वांशिकता, वय किंवा पिढी; व्यवसाय आणि सामाजिक - आर्थिक स्थिती, भाषा, अभ्यास, शिक्षण, चिंतन, इ. संस्कृतीचा वापर आपल्या जीवनशैलीचे वर्णन करण्यासाठी आणि आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेली मूल्ये, श्रद्धा, धर्म आणि प्रवृत्ती यांचे वर्णन करण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो. संस्कृतीच्या काही व्याख्या कला, धर्म, खाण्याच्या सवयी, बोली भाषा, पेहराव, अन्न, निवास, वाहतूक, पैसा, हवामान, जीवनशैली, विधी, विनोद, विज्ञान, कायदा, खेळ, समारंभ इत्यादींवर लक्ष केंद्रित करतात.

एका संस्कृतीला दुसर्‍या संस्कृतीपेक्षा उच्च किंवा कमी, दुसर्‍यापेक्षा चांगली किंवा वाईट, दुसर्‍यापेक्षा मोठी किंवा लहान म्हणून प्रक्षेपित करणे चुकीचे आहे. संस्कृती आपणास जोडणारी असली पाहिजे, तोडणारी नाही. संस्कृतीचा गैरवापर एक शस्त्र म्हणूनसुद्धा होऊ शकतो. दुर्दैवाने तसा गैरवापर होतो. विशिष्ट संस्कृतीमुळे समाजात गट पडू नयेत, दुफळी माजू नये, यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. देशात, समाजात, चर्चमध्ये माणसं जोडली गेली पाहिजेत.

संस्कृती संपूर्ण मानवी कुटुंबाला पूरक असली पाहिजे, एक दुसर्‍याच्या विरोधात नाही, स्पर्धेत तर मुळीच नाही. प्रत्येक संस्कृती स्वतःच्या पायावर उभी असते. आणि ती  संस्कृती एक दुसर्‍यापासून सुव्यक्त असली तरी ती अलग नसते. म्हणून संस्कृतींमध्ये परस्परसंबंध, आंतरप्रवेश आणि परस्परसंवाद नाही, असे समजायचे नाही. निरनिराळ्या संस्कृती एकमेकांना आधार देऊ शकतात आणि काही वेळा, परस्पर संबंधाने निरनिराळ्या संस्कृती अधिक सात्त्विक व अजून समृद्ध बनू शकतात. संस्कृती निर्जीव गोष्ट नसून ती जिवीत किंवा सजीव आहे. म्हणून संस्कृती सातत्याने वाढत राहते, काळानुरूप बदलत राहते. जे अयोग्य आहे, त्याला तिलांजली देत संस्कृती चांगल्या गोष्टींचा समावेश करून घेते.

संस्कृतीतील सर्वच गोष्टी (पद्धती) जीवन फुलवणार्‍या, जीवन संवर्धक किंवा जीवनाला अनुकूल असतातच असे नव्हे. जसे भौतिक जीवन एकाच वेळी प्रकाशकिरणांनी आणि अंधारमय छायांनी भरलेले असते, तसे संस्कृतीचे असते. काही संस्कृतीत जशा तारक पद्धती, तशाच मारक पद्धती एकत्र असू शकतात. म्हणून संस्कृतीची फक्त वरवरून समजून वाखाणणी करत बसून संस्कृतीला स्वप्नवत हरभर्‍याच्या झाडावर चढवण्याचे प्रयत्न सतर्कतेने टाळावेत.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आपला भारत देश हा समृद्ध, प्राचीन आणि वैविध्यपूर्ण संस्कृती असलेला देश आहे. भारतातील संस्कृती जगातील इतर ठिकाणी आढळणार्‍या संस्कृतींपेक्षा वेगळ्या आहेत. भारतातील चर्च (CBCI) आणि भारतातील स्थानिक चर्च (आपला वसई धर्मप्रांत) या समृद्ध व प्राचीन भारतीय संस्कृतीला शुभवर्तमानाच्या प्रकाशात अधिक संपन्न व समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. ख्रिस्ती म्हणून कोणत्याही एकाच संस्कृतीच्या काही विशिष्ट मर्यादेत अडकून न पडता सतत शुभवर्तमानाच्या प्रकाशात आपणाला लाभलेल्या संस्कृतीची व्यापकता जाणून घेण्याचा प्रयत्न आपण ख्रिस्ती श्रद्धावंतांनी केला पाहिजे. आपल्या ख्रिस्ती समुदायांची मूळ व खरी ओळख ही आपण भारतीय आहोत व त्याचबरोबर आपली श्रद्धा ख्रिस्ती आहे, यात होते.

धर्माला संस्कृतीपासून वेगळे करता येत नाही. धर्म आणि संस्कृती यांचा घनिष्ट संबंध आहे. पोप संत दुसरे जॉन पॉल म्हणतात, “संस्कृतीचा मार्ग हाच माणसातील माणुसकीपाशी पोचण्याचा मार्ग आहे. याच मार्गावर माणसाची परमेश्वराबरोबर भेट घडते. कारण सर्व चराचर सृष्टीला सामावणारा परमेश्वर सर्व संस्कृतींच्या तारक मूल्यांशी घनिष्ठ संबंधांनी मढलेला असतो.”

संस्कृती केवळ माणसाद्वारे आणि माणसासाठीच अस्तित्वात असते, तरीपण धार्मिक मुळावर उभी असलेली संस्कृती माणसाला भौतिक व लौकिक जीवनाच्या पलीकडे नेण्यास समर्थ ठरते. संपूर्ण मानवी क्रियाकलाप, मानवी बुद्धिमत्ता आणि भावना, अर्थ, मानवी चालीरीती माणसाला नीतीमान बनण्यासाठी साहाय्यकारक ठरतात. संस्कृती ही माणसासाठी इतकी नैसर्गिक आहे की, मानवी स्वभाव संस्कृतीतूनच प्रकट आणि विदित होऊ शकतो.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

आपल्या वसईलासुद्धा एका प्राचीन, समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीची देणगी लाभलेली आहे. वसईमध्ये विविध धर्माचे, परंतु एकाच संस्कृतीच्या धाग्यांनी गुंफलेले लोक प्रेमाने, शांतीने व गुण्यागोविंदाने पिढ्यानपिढ्या समृद्ध जीवन जगत आहेत, यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत. वसई धर्मप्रांत आगर (वाडवळ, कुपारी, पानमाळी, भंडारी, ईस्ट इंडियन, इ. लोक राहत असलेला विभाग), नगर (विशेषत: स्थलांतरित होऊन आलेले लोक - रेल्वे लगत असलेला विभाग), डोंगर (आदिवासी लोक राहत असलेला विभाग), सागर (कोळी लोक राहत असलेला विभाग) अशा प्रकारे फोड करून सांगता येऊ शकतो. प्रत्येक विभागातील संस्कृतीच्या विविध पैलूंचा आपण अनुभव घेऊ शकतो.

ख्रिस्ती श्रद्धेच्या बाबत सांगायचे तर एकच श्रद्धा वसई धर्मप्रांताच्या वेगवेगळ्या संस्कृतींद्वारे कुठल्याही गोंधळाविना सुंदरपणे व्यक्त केली जाते, साजरी केली जाते व जगली जाते. आपल्या वाडवडिलांनी जी संस्कृती, मग ती आपली बोली भाषा असो, पेहराव असो की, सोहळ्यांचे साजरीकरण असो, ती आपल्या पिढीसाठी आपणापर्यंत हस्तांतरित केली आहे; ती सुंदर विविधतेने नटलेली संस्कृती आपण सगळ्यांनी मिळून रोज ख्रिस्ती श्रद्धेच्या प्रकाशात मंगल आणि पवित्र करत राहिले पाहिजे. आणि त्या संस्कृतीला धरून आपण सर्वांनी परमेश्वराची स्तुती – आराधना केली पाहिजे. म्हणून आपल्या संस्कृतीचे जतन, संवर्धन आपण केले पाहिजे व आपल्या पुढच्या पिढीकडे तो वारसा परिणामकारकरित्या सुपूर्द केला पाहिजे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

विविध संस्कृतींच्या आविष्काराद्वारे ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाची घोषणा श्रद्धेचे जिवंत समुदाय तयार करण्यास, आशा आणि प्रेमाचे वाहक बनवण्यास, संपूर्ण जगामध्ये सत्य आणि प्रेमाची सभ्यता आणि सर्वांचे जीवन समृद्ध करण्यास आपणाला उद्युक्त करते व आपणाला देवाचा अस्सल गौरव करण्यास सक्षम करते. अशी जीवनसंवर्धक व जीवन फुलवणारी संस्कृती कृतीत आणण्यास आपण सर्व कटिबद्ध होऊ या.

(‘ख्रिस्तायन’ या ऑनलाईन मासिकाच्या नाताळ विशेषांकातून साभार)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......