‘आमच्या भावना दुखावल्या’ हे प्रकरण तसे चार्वाक काळापासूनचे जुनेच दुखणे आहे!
पडघम - सांस्कृतिक
जगदीश काबरे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 24 December 2021
  • पडघम सांस्कृतिक भावना दुखावल्या संत तुकाराम Sant Tukaram संत नामदेव Sant Namdev राजाराम मोहन रॉय Rajaram Mohan Royगोपाळ गणेश आगरकर Gopal Ganesh Agarkar महात्मा फुले Mahatma Phoole डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar र. धों. कर्वे R. D. Karve वि. दा. सावरकर V. D. Savarkar

हल्ली कुणी धर्म चिकित्सा करायला लागला की, धर्मअंध लोक ‘आमच्या भावना दुखावल्या’, अशी कोल्हेकुई सुरू करतात. पण भावना दुखावणे हे प्रकरण तसे चार्वाक काळापासूनचे जुनेच दुखणे आहे.

- तुकारामांच्या अभंगांनी जेव्हा धर्मातील भोंदूगिरी आणि कर्मकांडावर प्रहार केले, तेव्हा मंबाजी भटासारख्या लोकांच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी तुकारामांचा आयुष्यभर छळ केला आणि शेवटी सदैव वैकुंठाला पाठवले.

नामदेवांनी जेव्हा त्यांच्या अभंगातून कुप्रथा आणि रूढींवर ताशेरे ओढले, तेव्हाही सनातन्यांच्या भावना दुखावल्या. परिणामी सनातन्यांनी केलेल्या छळामुळे त्यांना महाराष्ट्र सोडावा लागला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

राजाराम मोहन रॉय यांनी ब्रिटिशांवर सतीची चाल बंद व्हावी म्हणून कायदा करण्याचा दबाव आणला, तेव्हाही बंगाली ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या. त्यांनी त्यांच्या विरोधात गरळ ओकायला सुरुवात केली.

आगरकरांनी जेव्हा विधवाविवाह, केशवपन, प्रेतसंस्कार यावर, तसेच अनेक रूढींवर सडेतोड टीका केली, तेव्हाही महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या. परिणामी त्यांची जिवंत प्रेतयात्रा काढण्यात आली.

फुले दाम्पत्याने जेव्हा स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हाही सनातन्यांच्या भावना दुखावल्या. आणि त्यांच्यावर शेणगोळे तर घरावर दगड फेकण्यात आले. एवढेच काय पण महात्मा फुले यांच्यावर मारेकरी धाडण्याइतपत काही नराधमांची मजल गेली.

स्त्रियांना समान हक्क देणारे ‘हिंदू कोड बिल’चे समर्थन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सनातन्यांनी भावना दुखावल्यामुळे कडाडून विरोध केला.

र. धों. कर्वे यांनी समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमनाचा प्रसार करत आयुष्य वेचले. त्यांना स्वतःला उच्च सुसंस्कृत म्हणवणाऱ्या ब्राह्मणांनी समाजात अ-नीती पसरवणारा अधम म्हणून शिव्याशाप दिले.

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कुलबर्गी यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना धर्मावर आणि दांभिक धर्ममार्तंडांवर घणाघात केल्याने सनातन्यांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांच्या हत्या केल्या गेल्या.

वरील सर्व उदाहरणांवरून हे लक्षात येईल की, प्रत्येक वेळी समाजसुधारणा करणाऱ्या सुधारकांचा सनातन्यांनी ‘भावना दुखावल्या म्हणून’ या ना त्या प्रकारे नुसता छळच केला नाही, तर प्रसंगी हिंस्त्र श्वापदासारखे वागून निर्ममपणे त्यांच्या हत्याही केल्या.

आणि म्हणे, हिंदुत्व हे सहिष्णू आहे!

सुधारकांचा छळ करणे, प्रसंगी हत्या करणे यालाच ‘सहिष्णुता’ म्हणतात काय?

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

तेव्हा प्रश्न पडतो की, हाच का सनातन्यांचा महान धर्म, जो स्त्रिया आणि बहुजनांना माणूस म्हणूनही किंमत देत नाही! हाच का तो ‘गर्वसे कहो...’वाला धर्म, जो सनातन्यांना आपल्या विरोधी विचाराच्या माणसांना संपवण्यासाठी उद्युक्त करतो!! हाच का तो उच्च, सुसंस्कृत(?) धर्म, जो शेकडो वर्षे बहुजनांना शिक्षण नाकारणारा, जातीयतेच्या नरकात आणि गरिबीत ढकलणारा आहे!!!

तेव्हा ‘भावना दुखावल्या’ असा कंठशोष करणारे सनातनी हे विसरतात की, त्यांनी शेकडो वर्षे स्त्रिया आणि बहुजनांच्या भावना दुखावल्या, तेव्हा मात्र त्यांना तो हक्क वाटत होता. आज तुमच्या त्या नतद्रष्टपणावर होणाऱ्या टीकेमुळे थोडासा त्रास व्हायला लागला, तर कोल्हेकुई केली जातेय की, ‘आमच्या भावना दुखावल्या म्हणून!’ व्वा रे व्वा!!

मग असल्या गळूसारख्या ठसठसणाऱ्या दूषित भावना दुखावल्या म्हणून आम्ही चिंता का करावी? उलट तो समाजविघातक गळू फोडून समाजात प्रबोधन करून समाजस्वास्थ्य निर्माण करणे, हे आमचे कर्तव्य आहे, असे आम्ही समजतो.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

वि. दा. सावरकर ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ या पुस्तकात म्हणतात,

“आपल्या हिंदू समाजातील स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धिबंदी, रोटीबंदीप्रभृति अनेक धार्मिक म्हणून मानल्या गेलेल्या रूढींपायी आज आपल्या राष्ट्राची किती अपरिमित हानि होत आहे, ते दाखवून त्याचे आणि अशाच विविध प्रकारच्या धार्मिक छापाच्या भाबडे रणाचें अच्चाटण करण्यासाठी झटत असता आम्हांस असे आढळून आले, की अनेक सनातनी मंडळींकडून आमच्या सुधारक मंडळींवर जे स्थिरटकीय (स्टीरिओ टाअिण्ड) ठाम आक्षेप घेतले जातात, त्यात ‘लोकांच्या धर्म भावना तुमच्या या प्रचारामुळे दुखतात; म्हणून तुमच्या ह्या सुधारणा गर्हणीय होत!’ हा एक आक्षेप नेहमी येतो. त्या सुधारणा राष्ट्रहितास आवश्यक आहेत की नाहीत, हा प्रश्नच जणू काय विचारात घेण्याचे कारण नाही.

तीच गोष्ट धर्मभावनांची. धर्म असेल तर त्याविषयींच्या सद्भावना दुखवू नयेत हे ठीकच आहे; पण जर एखादा अधर्माला धर्म समजत असेल आणि जर त्या अधर्माविषयीच्या त्याच्या भावना अितक्या धर्मवेड्या असतील, की आमच्या सभ्य नि सदिच्छ अपदेशानेही त्या दुखावतील, तर अशा प्रसंगी त्या अधर्मभावना दुखविणेच खरें धर्मकृत्य ठरतें, अधर्मभावना तशा अर्थी दुखविल्यावाचून गत्यंतरच उरत नाही.

सावाला चोराच्या तडाख्यातून सोडवताना चोराच्या भावना दुखतात; मरू द्या त्या सावाला, असे म्हणावयाचें की काय? आपली आई वाताच्या झटक्यात खिडकीतून खड्डयात उडी मारू लागली तर तशा प्रसंगी तिच्या भावना कितीही दुखावल्या तरी त्या दुखवून तिला तशीं प्राणघातक उडी न मारू देणें हेच खऱ्या मातृभक्तीचे कर्तव्य होय, खरा पुत्र धर्म होय. तीच गोष्ट राष्ट्रभक्तीची आणि स्वधर्मभक्तीची होय. राष्ट्रहितास अत्यंत हानिकारक अशा ज्या ज्या धार्मिक रूढि तुम्हांस वा आम्हांस लोकविकृष्ट वाटतात त्यांचा त्यांचा उच्छेद करण्यासाठी झटणे हेच तुमचें वा आमचें राष्ट्रीय कर्तव्य होय.”

..................................................................................................................................................................

जगदीश काबरे

jetjagdish@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......