मंटो आणि अब्बास सामान्य माणसाच्या जगण्याचा संघर्ष, त्याची गरिबी, दारिद्र्य, असाहय्यता तटस्थपणे मांडतात...
पडघम - साहित्यिक
कलीम अजीम
  • ख्जाजा अहमद अब्बास आणि सआदत हसन मंटो. मध्यभागी नवव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह
  • Mon , 20 December 2021
  • पडघम साहित्यिक अंबाजोगाई साहित्य संमेलन Ambejogai Sahitya Sammelan ख्जाजा अहमद अब्बास Khwaja Ahmad Abbas सआदत हसन मंटो Saadat Hasan Manto

४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी अंबाजोगाईत ‘बहुभाषिक साहित्य संमेलन’ झाले. त्यात एका परिसंवादात पत्रकार कलीम अजीम यांनी ‘वृद्ध आणि उर्दू साहित्य’ या विषयावर केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

१.

उर्दू आणि मराठी या दोन्ही भाषेत मला अनेक समान गुण आढळतात. या दोन्ही भाषेत प्रचंड समृद्धता व शब्दश्रीमंती आहे. उर्दूबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या निर्मितीवर प्रचंड कष्ट घेण्यात आलेले आहेत. जावेद अख्तर यांच्या मते उर्दूच्या व्याकरणावरच नव्हे, तर उच्चारावरदेखील प्रचंड कष्ट घेण्यात आले, संशोधन व अभ्यास करण्यात आलेला आहे. उर्दूत कठीण उच्चार व शालिनतेत बसत नसलेला शब्दच नाही, तर त्याला जोडून आलेला विचारही बाद केल्याचं आपल्याला दिसतं.

कधी काळी अरबी व फारसी भाषेला भारतीय मुस्लिमांनी आपली ‘धर्मभाषा’ म्हणून स्वीकारलं, त्याच वेळी उर्दूला हीन म्हणून नाकारण्यातही आलेलं होतं. नंतर प्रादेशिकता, संस्कृती व लोकव्यवहाराला कवेत घेऊन उर्दूनं जी प्रगती साधली, ती अविश्वसनीय व अचंबित करणारी आहे. त्यामुळेच भारतात इतर लोकभाषेच्या तुलनेत उर्दू सामाजिक व वैचारिक जनभाषेचं स्थान घेऊ शकली. कालांतरानं या भाषेतील अदीब, मुसन्नीफ, शायर, तारीख़दा, लोकविचारवंत, साहित्यिक, कवी, अभ्यासक व जाणकारांना उर्दूला ‘ज्ञानभाषा’ म्हणून विकसित केलं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अठराव्या-एकोणिसाव्या शतकात उर्दू ही फक्त लोकभाषाच नव्हती, तर ती एक ज्ञानभाषा म्हणून जगभर प्रसिद्ध पावली. जगभरातील ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व तत्त्वज्ञान या भाषेत आणलं गेलं. या प्रवासात अनेक विद्वानांची साथसंगत लाभली. म्हणजे सर सय्यद, अलताफ हुसैन हाली, शिबली नोमानी इत्यादींनी धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, राजकारणशास्त्र, नीतीशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी ज्ञानसाधना उर्दूत निर्मिली. पुढे मौलाना आज़ाद यांनी अरबीच्या कचाट्यातून सोडवून धर्मतत्त्वज्ञानाची जी मांडणी उर्दूत केली, ती अदभुत व क्रांतिकारी होती.

ब्रिटिशकालीन भारतात उर्दू ‘राजभाषा’, ‘ज्ञानभाषा’ होती. शिवाय लोक आणि व्यवहारभाषाही होती. त्यामुळे ती रोजगार भाषाही सहज होऊ शकली. स्वातंत्र्यानंतर हळूहळू उर्दू आकुंचन पावली व ती शेरो-शायरी व साहित्यापर्यंत मर्यादित झाली. अलीकडे ही लोकभाषा फक्त शेरो-शायरीपुरती बंदिस्त झालेली आहे. आज जगभरात उर्दू आवडणारे असंख्य आहेत, पण उर्दूला शिक्षण व ज्ञानभाषा करण्याच्या बाबतीत औदासीन्यता दिसून येते. (त्याच्या रंगीय राजकारणावर तर न बोललेलं बरं!) अगदी आजच्या ‘उगाच बोलू कौतुके मराठीची’ सारखीच तिची अवस्था झालेली दिसून येते.

‘उर्दू अदब’ जसे जीवनसंघर्षाशी दोन हात करणारे, नागरी व सामाजिक प्रश्न, समस्या मांडणारे, तसेच सांस्कृतिक संघर्ष घडवणारे एक विद्रोही साहित्य राहिलेलं आहे. इतकंच नाही तर अस्मितावादी शिवाय गुढकथांनी (तिलिस्म) भारावलेलं, प्रेमप्रणय, रंजनवादी, अभिजनवादी साहित्यिकही ‘उर्दू अदब’मध्ये चिक्कार आहेत. ‘जीवनासाठी साहित्य की, साहित्यासाठी जीवन’ हा संघर्षही उर्दू साहित्यविश्वात मोठा राहिला आहे. त्यामुळे गेल्या तीस-एक वर्षांत मराठी साहित्याबद्दल जी समीक्षा, चर्चा, चिकित्सा, टीका व हेटाळणी होते, ती उर्दूत सुमारे शंभर-दीडशे वर्षांपूर्वी होऊन गेलेली आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

उर्दूचा इतका प्रचंड मोठा विस्तार पाहता कथा या साहित्य प्रकारावर बोलणं म्हणजे उर्दूवर अन्याय करण्यासारखं आहे. पण विषयाची गरज म्हणून प्रसिद्ध उर्दू अफसानानिगारांच्या एक-एक कथांवर मंथन करणार आहे. बोलणार काय तर त्याचं व त्यांच्या रचनांचा परिचय करून देणार आहे. त्यांच्या या रचनांमध्ये वृद्धांचं चित्रण व त्यावर भाष्य करणार आहे.

प्रथम, ‘सआदत हसन मंटो’ यांची अभिजात कथा ‘खोल दो’ घेऊ.

या प्रसिद्ध लेखकाला आपण ‘मंटो’ नावानं ओळखतो. त्यांचा जन्म लुधियानाजवळ असलेल्या ‘समायरा’ गावात ११ मे १९१९ रोजी झाला. कमी वयापासून ते लेखनाकडे खेचले गेले. उच्च शिक्षणानंतर त्यांनी अनेक लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या. पण शेवटी ते लिखाण क्षेत्रात पूर्णवेळ स्थिरावले. त्यांची पहिली कथा ही ‘तमाशा’ नावानं होती. त्याला ‘जालियावाला बाग’ हत्याकांडाची पार्श्वभूमी होती. पहिल्याच कथेनं ते साहित्यविश्वात एक उत्तम कथाकार म्हणून नावारूपास आले.

४३ वर्षांच्या अल्प कालावधीत मंटो भरभरून जगले. आयुष्याची तब्बल २०-२२ वर्षं त्यांनी लिहिण्यात व्यतीत केली. लिखाण त्यांचे पॅशन आणि जगण्याचा आधार होता. ‘खोल दो’ ही त्यांची कथा भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेदना, स्थलांतर, स्वकीयांची ताटातूट, होलपट, दु:ख इत्यादींवर भाष्य करते.

कथा सुरू होते, सीमावर्ती भागातील स्थलांतरितांच्या निर्वासित कॅम्प येथून- “अमृतसर से स्पेशल ट्रेन दोपहर दो बजे चली और आठ घंटों के बाद मुगलपुरा पहुंची। रास्ते में कई आदमी मारे गए। बहोत से जख्मी हुए और कुछ इधर-उधर भटक गए।

सुबह दस बजे कैम्प के ठंडी जमीन पर जब सिराजुद्दीन ने आंखें खोलीं और अपने चारों तरफ मर्दों, औरतों और बच्चों का एक उमड़ता समंदर देखा तो उसकी सोचने-समझने की कुव्वते और भी बूढ़ी हो गईं।

वह देर तक धुंदले आसमान को टकटकी बांधे देखता रहा। यूँ तो कैम्प में शोर मचा हुआ था, लेकिन बूढे सिराजुद्दीन के कान जैसे बंद थे। उसे कुछ सुनाई नहीं देता था। कोई उसे देखता तो यह सोचता की वह गहरी निंद में डुबा हैं। मगर ऐसा नहीं था, उसके होश ओ हवास गायब थे। उसका सारा वजूद सिफर (शून्य) में लटका हुआ था।

धुंदले आसमान की तरफ बगैर किसी इरादे के देखते-देखते सिराजुद्दीन की निगाहें सूरज से टकराईं। तेज रोशनी उसके वजूद की रग-रग में उतर गई और वह जाग उठा। ऊपर-तले उसके दिमाग में कई तस्वीरें दौड़ गईं - लूट, आग, भागम-भाग, स्टेशन, गोलियां, रात और.. और सकीना... सिराजुद्दीन एकदम उठ खड़ा हुआ और पागलों की तरह उसने चारों तरफ फैले हुए इनसानों के समंदर को खंगालना शुरु कर दिया।”

देशाची फाळणी झाल्याने सिराजुद्दीन अमृतसरहून आपल्या कुटुंबासह मायभूमी सोडून डोक्यावर छप्पर शोधत नव्या देशाकडे निघालाय. वाटेत त्याची व त्याच्या कुटुंबीयांची ताटातूट झालीय. त्याचे एकुलतं एक मूल, त्याची तरुण मुलगी ‘सकीना’ स्थलांतराच्या प्रवासात - तिची ताटातूट झालीय, बापापासून ती दूर कुठेतरी हरवली आहे.

असंख्य वेदना, दु:ख, अंगावर झालेल्या भीषण जखमा विसरून सिराजुद्दीन सकीनाचा शोध घेतोय. प्रत्येक, निर्वासित कॅम्प, पोलीस ठाणे, चौक्या, चेकनाके, सगळीकडे शोधून झालंय. सकीना कुठेच आढळली नाहीये. तीन तास शोध घेऊन आता तो थकलाय.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

मंटो लिहितात, “सिराजुद्दीन थक-हारकर एक तरफ बैठ गया और दिमाग पर जोर देकर सोचने लगा कि सकीना उससे कब और कहां अलग हुई, लेकिन सोचते-सोचते उसका दिमाग सकीना की मां की लाश पर ठहर जाता, जिसकी सारी अंतड़ियां बाहर निकली हुईं थीं। उससे आगे वह और कुछ न सोच सका।”

सकीनाची आई दंगलीत मरून पडली होती. तिने सिराजुद्दीनच्या डोळ्यांसमोर जीव सोडला. पण सकीना कुठे दिसत नव्हती, सकीनाच्या चिंतेत मरता-मरता तिने आपल्या नवऱ्याला - सिराजुद्दीनला सांगून ठेवलं होतं, “मुझे छोड़ दो और सकीना को लेकर जल्दी से यहां से भाग जाओ।”

“सकीना उसके साथ ही थी। दोनों नंगे पांव भाग रहे थे। सकीना का दुप्पटा गिर पड़ा था। उसे उठाने के लिए उसने रुकना चाहा था। सकीना ने चिल्लाकर कहा था, “अब्बाजी छोड़िए!” लेकिन उसने दुप्पटा उठा लिया था। ....यह सोचते-सोचते उसने अपने कोट की उभरी हुई जेब का तरफ देखा और उसमें हाथ डालकर एक कपड़ा निकाला, सकीना का वही दुप्पटा था, लेकिन सकीना कहां थी?”

सिराजुद्दीन थकलेल्या मेंदूवर ताण देत आठवत राहिला की, सकीनाची आणि त्याची ताटतूट नेमकी कुठं व कशी झाली? तो विचार करू लागला की, त्याने सकीनाला आपल्यासोबत स्टेशनपर्यंत आणलं होतं? ती त्याच्यासोबत गाडीत बसली होती? वाटेत ट्रेन थांबवली गेली आणि दंगलखोर आत घुसले. त्यांनी सकीनाला उचलून नेलं, त्याच वेळी तो बेशुद्ध झाला होता....

सिराजुद्दीनच्या डोक्यात अनेक प्रश्न घोंगावू लागले, पण उत्तर कुठेच नव्हते. त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक मानवी तांड्याचे दु:ख सारखंच होतं. सिराजुद्दीनचे दु:ख शब्दांच्या पलीकडचं होतं. “सिराजुद्दीन ने रोना चाहा, मगर आंखों ने उसकी मदद न की। आंसू न जाने कहां गायब हो गए थे।”

सहा दिवसानंतर सिराजुद्दीन काहीसा भानावर व शुद्धीवर आला, तो अशा लोकांना भेटला जे त्याची मदत करायला तयार होते. “आठ नौजवान थे, जिनके पास लाठियां थीं, बंदूकें थीं। सिराजुद्दीन ने उनको लाख-लाख दुआऐं दीं और सकीना का हुलिया बताया, गोरा रंग है और बहुत खूबसूरत भी है... मुझ पर नहीं अपनी मां पर थी... उम्र यहीं सत्रह साल के करीब है। ...आंखें बड़ी-बड़ी ...बाल स्याह, दाहिने गाल पर मोटा सा तिल... मेरी इकलौती लड़की है। ढूंढ लाओ, खुदा तुम्हारा भला करेगा।”

त्या तरुणांनी सकीनाला शोधून काढण्याची हमी दिली. हे तरुण जीव मुठीत घेऊन अमृतरसला गेले. अनेकांना संकटातून बाहेर काढून मदत पुरवली, त्यांना सुरक्षित स्थानी पोहोचवले. दहा दिवस लोटले पण त्यांना सकीना कुठेच आढळली नाही.

एका दिवशी सेवाकार्यासाठी ते ट्रकमधून अमृतसरला जात होते. रस्त्याच्या एका चौकावर त्यांना एक मुलगी दिसली. ट्रकचा आवाज ऐकून ती अजून भयग्रस्त होऊन बेफाम पळू लागली. तिला पळताना बघताच सर्व जण लक्ष्याला टिपण्यासाठी तिच्यामागे पळू लागले. अखेर त्यांनी तिला धरलं. “एक लड़के ने उससे कहा, घबराओ नहीं-क्या तुम्हारा नाम सकीना है? लड़की का रंग और भी जर्द हो गया। उसने कोई जवाब नहीं दिया, लेकिन जब तमाम लड़कों ने उसे दम-दिलासा दिया तो उसकी दहशत दूर हुई। उसने मान लिया की, वह सिराजुद्दीन की बेटी सकीना हैं।”

इकडे सिराजुद्दीन हॉस्पिटल, मुर्दाघर, कॅम्प, ऑफिसेस, नदी, नाले, गटारीत आपल्या लेकीचा शोध घेतच होता. अनेक दिवस लोटले, पण सकीनाचा पत्ता काही सिराजुद्दीनला लागत नव्हता. एके दिवशी सिराजुद्दीनला ते आठ तरुण दिसले. ट्रक सुरू करून ते निघण्याच्या तयारीतच होते. सिराजुद्दीनने पळत-पळत जाऊन त्यांना आर्जव करत म्हणाला, “सकीनाचा काही पत्ता लागला का?” सर्वांनी एकसुरात म्हटले, “लागेल... लागेल…” आणि त्यांनी ट्रक चालू केला व निघून गेले. सिराजुद्दीनने त्या तरुणांना यश मिळण्याची भरभरून दुआ केली.

त्यानंतर बरेच दिवस लोटले, सिराजुद्दीन सकीनाचा शोध घेतच राहिला. एका संध्याकाळी रेल्वे ट्रॅकवर काहीतरी गडबड जाणवली, चार माणसं काहीतरी उचलून आणत होते. मुलगी तिथं बेशुद्ध पडल्याचं त्याने ऐकलं. सिराजुद्दीन त्यांच्या मागोमाग चालू लागला. ते मुलीला हॉस्पिटलवाल्यांच्या सुपुर्द करून निघून गेले.

“सिराजुद्दीन कुछ देर वह ऐसे ही अस्पताल के बाहर गड़े हुए लकड़ी के खंबे के साथ लगकर खड़ा रहा। फिर आहिस्ता-आहिस्ता अंदर चला गया। कमरे में कोई नहीं था। एक स्ट्रेचर था, जिस पर एक लाश पड़ी थी। सिराजुद्दीन छोटे-छोटे कदम उठाता उसकी तरफ बढ़ा। कमरे में अचानक रोशनी हुई। सिराजुद्दीन ने लाश के जर्द चेहरे पर चमकता हुआ तिल देखा और चिल्लाया - सकीना....!

डॉक्टर, जिसने कमरे में रोशनी की थी, उसने सिराजुद्दीन से पूछा, क्या है?

सिराजुद्दीन के हलक से सिर्फ इस कदर निकल सका, जी मैं... जी मैं... इसका बाप हूं।

डॉक्टरने स्ट्रेचर पर पड़ी हुई लाश की, नब्ज टटोली और सिराजुद्दीन से कहा, खिड़की.. खोल दो।

सकीना के मुर्दा जिस्म में जुंबिश (हालचाल) हुई। बेजान हाथों से उसने नाड़ा खोला और सलवार नीचे सरका दी।

बूढ़ा सिराजुद्दीन खुशी से चिल्लाया, “जिंदा है - मेरी बेटी जिंदा है? या खुदा, मेरी बेटी जिंदा हैं।”

डॉक्टर सर से पैर तक ठंडे पसीने में भीग गया।”

कथा इथं संपते. कथेचा शेवट फारच धक्कादायक आहे. कथाकार म्हणून मंटो एका व्यक्तीला, गटाला, परिस्थितीला किंवा राजकीय व्यवस्थेला; कोणालाच जबाबदार ठरवत नाहीत. सकीनाचे अपहरण करून तिच्यावर रोजच सामूहिक अत्याचार होतोय, अत्याचार करणारे, घडवून आणणारे कोण आहेत, त्यांनी असं का केलं? बिचारा सिराजुद्दीन, घर, गाव, सकीना, सकीनाची आई, पळापळ, हिंसा, भीषण दंगल, सर्व काही मंटो तटस्थपणे मांडत, निवेदन करत जातात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

चारएक पानांची ही कथा, उर्दू साहित्यात एक मैलाचा दगड म्हणून गणली गेली. मंटोसह अनेक दिग्गज लेखकांनी, ज्यात राजेंद्रसिंह बेदी, कृश्न चंदर, ख्वाजा अहमद अब्बास, कुर्रतूल ऐन हैदर, इस्मत चुगताई, राही मासूम रज़ा, कमलेश्वर, अनिसा किडवई इत्यादी अदीबांनी म्हणजे साहित्यिकांनी फाळणीच्या वेदना शब्दबद्ध केल्या आहेत. या दिग्गजांच्या कथा वाचून आपणास उत्तरेकडची फाळणी किती विदारक होती, त्याचा मानवी समूहावर काय परिणाम झाला; हत्या, लूटालूट, बलात्कार, विनाश, नासधूस, स्थलांतर इत्यादींबद्दल एक संपूर्ण पट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. याउलट परिस्थिती १९४८च्या ‘हैदराबाद मुक्ती संग्रामा’वेळी होती.

राजसत्तेचं होत असलेलं हस्तांतरण इथल्या सामान्य, कष्टकरी समुदायांचे हत्याकांड घडवून गेला. राजसत्ता (निजाम) समर्थक म्हणून अनेक जण केंद्रीय सैन्याच्या बंदुकीचे बळी ठरले, तर उर्वरित रज़ाकार समर्थक म्हणून स्थानिकाकडून मारले गेले. प्रसिद्ध गांधीवादी पंडित सुंदरलाल यांनी केलेल्या सर्वेक्षण अहवालातून पुढे येते की, त्या काळी झालेल्या दंगलीत व ‘पोलीस अॅक्शन’च्या संघर्षात तब्बल दोन लाख जीव गेले, तर लाखो निर्वासित म्हणून पाकिस्तान व भारताच्या इतर प्रदेशात पळून गेले. त्यांच्या वेदना, दुख:, वेदना व होरपळ, कष्टांना कुठल्याही साहित्यात जागा मिळू शकली नाही. त्यांच्या रक्तपाताबद्दल एक साधी ओळही साहित्याच्या अभिरुचीत येऊ शकली नाही. त्यामुळेच कदाचित अलीकडच्या काळातील मोठ-मोठी इतिहासाची प्राध्यापक, भाष्यकार मंडळी दावे करतात की, त्या काळी मराठवाड्यात किंवा हैदराबादला असं काही घडलंच नाही... असे करताना ते डोळे उघडे ठेवून पांघरून घेतात, दुसरं काही नाही. आता झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करणं किती मुश्कील आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. असो.

सआदत हसन मंटो यांनी फाळणीवर अनेक कथा रचल्या आहेत, विशेष म्हणजे बहुतेक पात्रांचे चरित्रनायक ‘पालक’ म्हणजे ‘वृद्ध’ आहेत. त्यांच्या अनेक कथा स्त्रीप्रधान आहेत. स्त्रियांच्या व्यथा, समस्या, भावविश्व, शोषण, पुरुषार्थ गाजवणारी पात्रं त्यांच्या कथांमधून येतात. तर दुसरीकडे दुखियारी, अबला, शोषित, पीडित, निराश्रित स्त्री त्यांच्या कथेत दांभिक समाजाविरोधात विद्रोह करून पुढे येते.

ज्या वाचकांना उर्दू भाषा येत नाही, त्यांच्यासाठी मंटो समग्र देवनागरीत उपलब्ध आहे. शिवाय त्यांच्या अनेक कथांचं मराठीकरण झालं आहे. यातले बहुतांश भाषांतरं निरस असली तरी त्यातून कथासूत्र समोर येतं. त्यांच्या अनेक कथा ऑडियो-व्हिज्युअल फॉरमॅटमध्ये आलेल्या आहेत. त्यांच्या बऱ्याच कथांवर सिनेमे, मालिका तयार झाल्या आहेत. भारतात आर. जे. सायमा या विदूषीने मंटोंच्या अनेक कथांवर ‘एक पुरानी कहानी’ नभोनाट्य मालिका म्हणजे रेडिओ रुपांतरण केलेलं आहे. त्यातून मंटोंनी रेखाटलेल्या कथा नेमक्या प्रसंगांसह आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात.

मंटो दीर्घकाळ मुंबईत वास्तव्याला होते. काही मराठी लेखक, साहित्यिक असे मानतात की, साहित्यात मंटोनी रेखाटलेली ‘घाटन लडकी’ म्हणजे ‘मराठी स्त्री’ अद्याप कोणीही रेखाटली नाही. मुंबई मंटोंच्या आत्म्यात निवास करत होती. चुकीचा निर्णय मंटोला मुंबई सोडून लाहोरला घेऊन गेला. त्याबद्दल ते अखेरपर्यंत स्वत:ला दोष देत राहिले.

२.

ख्वाजा अहमद अब्बास हे मुंबईत राहणारे आणखी एक उर्दूचे श्रेष्ठ कथाकार. देशाला त्यांचा परिचय वास्तववादी (रियलिस्टिक) सिनेमा निर्मिती करणारे दिग्दर्शक, निर्माता व पटकथाकार असा आहे. पण अब्बास मुळात एक उत्तम लेखक, कथाकार होते. त्यांनी उर्दू आणि इंग्रजी भाषेत विपुल लिखाण केलं आहे. तब्बल ५२ वर्षे त्यांनी रुसी करंजिया या प्रसिद्ध संपादकाचं बहुचर्चित टॅब्लॉइट ‘ब्लिट्झ’मध्ये ‘दि लॉस्ट पेज’ नावाचं सदर आपल्या निधनापर्यंत चालवलं.

माझ्या माहितीत सर्वाधिक काळ चाललेलं हे एकमेव वृत्तपत्रीय सदर असावं. हे सदर एकाच वेळी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजीत येई. उर्दू आवृत्तीत ‘आज़ाद कलम’, तर हिंदीत ‘आखरी पन्ने’ या नावानं प्रकाशित होई.

अब्बास यांचा जन्म ७ जून १९१४ रोजी हरयाणाच्या पानिपतमध्ये झाला. त्यांचे पंजोबा अलताफ हुसैन ‘हाली’ महात्मा फुलेंचे समकालीन होते. सर सय्यद यांनी सुरू केलेल्या सामाजिक सुधारणा चळवळीचे ते एक प्रमुख संघटक होते. त्यांची ओळख तत्त्वज्ञानी, विद्वान, चरित्रकार, शायर आणि समाजसुधारक अशी होती. अब्बास यांचे वडीलही स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते.  

स्वातंत्र्य सेनानींचा वारसा लाभलेले अब्बास देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी बाळगून विद्यार्थिदशेतच सक्रिय राजकारणात उतरले. अल्पावधीतच ते साम्यवादी चळवळीकडे खेचले गेले व नेहरूंच्या ‘समाजवादी भारत’ साकारण्याच्या दूरदृष्टीसाठी कार्यमग्न झाले.

अलीगड विद्यापीठात शिकत असताना ते ‘बॉम्बे क्रॉनिकल’ नावाच्या प्रतिष्ठित वृत्तपत्राशी जोडले गेले. या वर्तमानपत्रात बातमीदार व चित्रपट समीक्षक म्हणून त्यांनी १९४७पर्यंत काम केलं. बॉलिवुडमध्ये ‘पब्लिसिस्ट’ म्हणून त्यांचं मुंबईत पदार्पण झालं. एकाच वेळी ते पत्रकारिता, कथालेखन, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संस्कृतीकर्मी, साहित्यकार, संघटक इत्यादी अशा हरफनमौला भूमिका बजावत होते.

हयातीत तब्बल ७५ पुस्तकांची रचना करणाऱ्या अब्बास यांनी अनेक ‘कालजयी’ म्हणजे ‘अभिजात’ कथांची रचना केली आहे. आज आपण त्यांच्या ‘अबाबील’ या अभिजात कथेचा परिचय करून घेणार आहोत.

‘अबाबील’ तसा मूळ शब्द अरबीतून आलेला आहे. छोट्या आकाराच्या पक्ष्याला उद्देशून तो वापरला जातो. हे पक्षी कथेचे चरित्र नायक आहेत. त्यांचं घरटं व त्याची पिल्लं आणि ‘रहीम खान’ या वृद्ध शेतकऱ्याचं घरटं आणि त्याची पिल्लं असा या कथेचा पट आहे.

रहीम खान हेकट, तिरसट आणि रागीट व्यक्ती म्हणून गावात प्रसिद्ध आहे. अब्बास यांच्या मते, राग आणि कठोरता हा त्याच्या स्वभावातला अवगुण आहे. कथा सुरू होते अशी- “उसका नाम तो रहीम ख़ान था, मगर उस जैसा ज़ालिम भी शायद ही कोई हो। गाँव भर उसके नाम से कांपता था। न आदमी पर तरस खाए न जानवर पर। एक दिन रामू लुहार के बच्चे ने उसके बैल की दुम में कांटे बांध दिए थे, तो मारते-मारते उसको अध मुआ कर दिया।

अगले दिन ज़मींदार की घोड़ी उसके खेत में घुस आई, तो लाठी लेकर इतना मारा कि लहूलुहान कर दिया। लोग कहते थे कि कमबख़्त को ख़ुदा का ख़ौफ़ भी तो नहीं है। मासूम बच्चों और बेज़बान जानवरों तक को माफ़ नहीं करता। ये ज़रूर जहन्नम में जलेगा। मगर ये सब उसकी पीठ के पीछे कहा जाता था। सामने किसी की हिम्मत ज़बान हिलाने की न होती थी।”

त्याच्या निर्दयी स्वभावामुळेच त्याचा मुलगा नूरू घर सोडून काकाकडे निघून गेलाय. “बीवी ने एक दिन डरते-डरते कहा, ‘बिलासपुर की तरफ़ जाओ ज़रा, नूरू को लेते आना।’ बस फिर क्या था आग बगूला हो गया। ‘मैं उस बदमाश को लेने जाऊं। अब वो ख़ुद भी आया तो टांगें चीर कर फेंक दूँगा।”

रहीम ख़ान तिरसट असल्याने गावातील प्रत्येकांनी त्याच्याशी बोलणं टाकलंय. “मगर उस पर कोई असर न हुआ। सुबह-सवेरे वो हल कांधे पर धरे अपने खेत की तरफ़ जाता दिखाई देता था। रास्ते में किसी से न बोलता। खेत में जा कर बैलों से आदमियों की तरह बातें करता। उसने दोनों के नाम रखे हुए थे। एक को कहता था नत्थू, दूसरे को छिद्दू। हल चलाते हुए बोलता जाता, “क्यूँ-बे नत्थू तू सीधा नहीं चलता। ये खेत आज तेरा बाप पूरे करेगा। और अबे छिद्दू तेरी भी शामत आई है क्या?” और फिर उन ग़रीबों की शामत आ ही जाती। सूत की रस्सी की मार। दोनों बैलों की कमर पर ज़ख़्म पड़ गए थे।”

दोन वर्षांनंतर त्याचा लहान मुलगा बिंदूदेखील बापाच्या क्रौर्याला कंटाळून निघून गेला. रहीम ख़ानच्या रौद्र रूपाचे संकट आता पत्नीवर ओढावले. एके दिवशी त्याने बेगमला इतके मारले की, तीदेखील आपल्या भावाला बोलावून त्याच्यासोबत निघून गेली.

आता रहीम खान खूपच एकटा पडलाय. कथा पुढे सरकते अशी, “अगले दिन रहीम ख़ान जब सो कर उठा तो दिन चढ़ चुका था। लेकिन आज उसे खेत पर जाने की जल्दी न थी। बकरियों का दूध दूह कर पिया और हुक़्क़ा भर कर पलंग पर बैठ गया।

अब झोंपड़े में धूप भर आई थी। एक कोने में देखा तो जाले लगे हुए थे। सोचा कि लाओ सफ़ाई ही कर डालूं। एक बाँस में कपड़ा बांध कर जाले उतार रहा था कि खपरैल में अबाबीलों का एक घोंसला नज़र आया।

दो अबाबीलें कभी अंदर जाती थीं, कभी बाहर आती थीं। पहले उसने इरादा किया कि बाँस से घोंसला तोड़ डाले। फिर मालूम नहीं क्या सोचा। एक घड़ौंची ला कर उस पर चढ़ा और घोंसले में झांक कर देखा। अंदर दो लाल बूटी से बच्चे पड़े चूं चूं कर रहे थे। और उनके माँ-बाप अपनी औलाद की हिफ़ाज़त के लिए उसके सर पर मंडला रहे थे। घोंसले की तरफ़ उसने हाथ बढ़ाया ही था कि मादा अबाबील अपनी चोंच से उस पर हमलावर हुई।”

“अरी, आँख फोड़ेगी?” उसने अपना ख़ौफ़नाक क़हक़हा मार कर कहा। और घड़ौंची पर से उतर आया। अबाबीलों का घोंसला सलामत रहा।”

रहीम खान आपल्या नित्य दिनक्रमात व्यस्त झाला. गावातील लोकांनी बोलणं टाकलं, मुले-पत्नी घर सोडून निघून गेली, याचा त्याच्या आयुष्यावर फारसा फरक पडला दिसत नाही. तो दररोज शेतावरून आल्यावर अंगणात खाट टाकून हुक्का धरतो आणि अबाबीलच्या घरट्याकडे टकटक पाहत राहतो.

“अब दोनों बच्चे भी उड़ने के क़ाबिल हो गए थे। उसने उन दोनों के नाम अपने बच्चों के नाम पर नूरू और बिंदू रख दिए थे। अब दुनिया में उसके दोस्त ये चार अबाबील ही रह गए थे। लेकिन उनको ये हैरत ज़रूर थी कि मुद्दत से किसी ने उसको अपने बैलों को मारते न देखा था। नत्थू और छिद्दू ख़ुश थे। उनकी कमर से ज़ख़्मों के निशान भी तक़रीबन ग़ायब हो गए थे।”

एकेदिवशी तो शेतावरून घरी येत होता. रस्त्यात काही मुले खेळत होती. लांबूनच रहीम ख़ानला येताना पाहून ती आपली बूट सोडून पळून गेली. तो जोरजोरात ओरडून सांगत राहिला, “अरे, मी आता, मारतोय थोडाच! या की!”

त्या दिवशी आभाळ भरून आलं होतं. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्यासोबत जोरदार पाऊसही.. धावत धावत तो घरात आला व दरवाजा बंद करून घेतला. नेहमीसारखे अबाबीलच्या घरट्याजवळ जाऊन भाकरीचे शिळे तुकडे त्यांच्यासमोर टाकले. “अरे, ओ... बिंदू आणि नुरू..” त्याने आवाज दिला पण पिलं काही बाहेर आले नाहीत.

“घोंसले में जो झाँका तो चारों अपने परों में सर दिये सहमे बैठे थे। ऐन जिस जगह छत में घोंसला था वहां एक सुराख़ था और बारिश का पानी टपक रहा था। अगर कुछ देर ये पानी इस तरह ही आता रहा तो घोंसला तबाह हो जाएगा और अबाबीलें बे-चारी बे-घर हो जाएँगी। ये सोच कर उसने किवाड़ खोले और मूसलाधार बारिश में सीढ़ी लगा कर छत पर चढ़ गया। जब तक मिट्टी डाल कर सुराख़ को बंद कर के वो उतरा तो शराबोर था। पलंग पर जा कर बैठा तो कई छींकें आईं। मगर उसने परवाह न की और गीले कपड़ों को निचोड़ चादर ओढ़ कर सो गया।

अगले दिन सुबह को उठा तो तमाम बदन में दर्द और सख़्त बुख़ार था। कौन हाल पूछता और कौन दवा लाता। दो दिन उसी हालत में पड़ा रहा।”

इकडे गावकरी दोन दिवस रहीम शेताकडे का गेला नाही म्हणून चिंतेत होते. कालू ज़मीनदार आणि काही शेतकरी संध्याकाळी त्याच्या झोंपड़ीत पाहायला गेले. पाहिलं तर हा पलंगावर पडून स्वत:शीच बडबड करतोय. “अरे बिंदू, अरे नूरू। कहाँ मर गए। आज तुम्हें कौन खाना देगा?” काही अबाबील खोलीत फडफड करत होती.

“बेचारा पागल हो गया है।” कालू ज़मींदार ने सर हिला कर कहा। सुबह को शिफा-ख़ाना वालों को पता देंगे कि पागलख़ाना भिजवा दें।”

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे शेजारी डॉक्टरांना घेऊन आले. त्यांनी त्याच्या झोपडीचा दरवाजा उघडला, तेव्हा पाहिलं की, रहीम खान कधीचाच मरून पडलाय. चारही अबाबील मान खाली घालून त्याच्या पायाशी गप्प बसली होती.

३.

कठोर स्वभावाचा रहीम खान पावसाच्या पाण्यापासून पक्ष्यांचे रक्षण करतो. त्यांच्यासाठी तो भर पावसात गच्चीवर जाऊन छिद्र बुजवतो. पावसात भिजल्याने त्याला सर्दी व पुढे न्यूमोनिया होतो आणि वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा जीव जातो.

अब्बास यांनी रेखाटलेला नायक रहीम खान हा सामाजिक अर्थाने कठोर, क्रूर व रागीट असला तरी तो प्रचंड हळवा, संवेदनशील आहे. रहीम खान गावकऱ्यांसाठी रागीट असला तरी तो पक्ष्यांसाठी देवदूत ठरला आहे. त्याच्या मृत्युनंतर पक्षी त्याच्या पायाशी शोकमग्न बसले आहेत.

ख्वाजा अहमद अब्बास एक उत्तम लघुकथाकार होते. मानवी संवेदना, भाव व त्यात समाजमन टिपणारे ते हळवे लेखक होते. त्यांनी रेखाटलेल्या अनेक कथा अशाच संवेदनशील आहेत. राज कपूर यांनी अब्बास यांच्या अनेक कथांवर सिनेमे तयार केले आहेत. त्यामुळेच राज कपूरचे सिनेमे आपल्याला अधिक भावतात.

‘अबाबील’ कथेत कुटुंब सोडून गेल्यावर रहीम खान असाहाय होतो. पण आपल्या वेदना तो व्यक्त करू शकत नाही, त्यामुळेच तो दोन्ही पिल्लाना आपल्या मुलांच्या नावाने हाका मारतो. जणू ती त्याचीच पिल्लं आहेत, असं मानून त्यांचं संरक्षण करतो. मृत्युशय्येवरदेखील त्याला त्या पक्ष्यांच्या पिल्लांची काळजी वाटते.

अब्बास यांनी रेखाटलेला रहीम खान मानवी प्रवृत्तीचे दोन कोन आहेत. अबाबीलशी मैत्री झाल्यावर त्याच्या रागीट स्वभावात ९० अंशी बदल होतो. तो पहिल्यासारखा बैलांना मारत नाही, शिवाय गावकऱ्यांवरदेखील अकारण खेकसत नाही. त्याचे अवगुण संपुष्टात येतात. बोलू न शकणाऱ्या पक्ष्यांच्या पिलाकडे पाहून त्याला जगणे सुंदर वाटू लागतं.

मानवी प्रवृत्तीची दोन टोकं व त्यात झालेला लक्षणीय बदल अब्बास यांनी उत्तम रेखाटला आहे. त्यामुळेच ‘अबाबील’ अभिजात कथेत मोडते. अब्बास जेवढ्या अस्खलित उर्दूत लिहीत, तेवढंच ओघवत्या इंग्रजीतही. दोन्ही भाषेवर त्यांनी मजबूत पकड होती. उर्दू न जाणणाऱ्या वाचकांसाठी अब्बास यांचं बरंचंस लेखन देवनागरीत आलेलं आहे. शिवाय त्यांनी लिहिलेल्या अनेक सिनेमांमधून त्यांची सामाजिक मांडणी येत राहते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

नेहमीच त्यांच्या कथेत सामान्य माणूस हा मुख्य नायक व पात्र असतो. गरीब, निराश्रित, शोषित घटकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी कथा रचल्या आहेत. त्यांच्या सर्वच कथा सामाजिक प्रथा-परंपरा, रूढी, विषमता, जाति-व्यवस्था, सावकारी पाश, शेतकरी, भूमीहिन मजूर, कामगार, राजकीय दुर्भिक्ष्य इत्यादींवर प्रहार करतात.

मंटो आणि अब्बास हे दोन्ही कथाकार सामाजिक प्रवृत्ती टिपण्यात पटाईत होते. त्यांचा साम्यवादी दृष्टीकोन मानवी हित व कल्याण पाहतो. सामान्य माणसांच्या जगण्याचा संघर्ष, त्याची गरिबी, दारिद्र्य, असाहय्यता हे लेखक तटस्थपणे मांडत जातात. त्या पात्राच्या सामाजिक संघर्षाचे चित्रण करताना ते कोणालाही दोष देत नाहीत, हे दोन्ही कथाकारांचे एक वैशिष्ट्य म्हणूया...

.................................................................................................................................................................

लेखक कलीम अजीम ‘डेक्कन क्वेस्ट’ या द्विभाषिक वेबपोर्टलचे संपादक आहेत.

kalimazim2@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......