रवीश कुमार यांची नवी कोरी कथा – ‘सावधान : अँकर दारू प्यायलेला होता…’
पडघम - माध्यमनामा
रवीश कुमार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 14 December 2021
  • पडघम माध्यमनामा टीव्ही पत्रकारिता TV Journalism पत्रकारिता Journalism अँकर Anchor दारू Alcohol

रोज रोज खोटं आणि द्वेष यांना सत्य म्हणून सादर करून करून अँकरचा घसा कोरडा पडत होता. दुपारपासूनच संध्याकाळच्या स्वप्नात बुडून जाण्याची सवय लागली होती. पिऊन आणि न पिऊनसुद्धा सारखा बडबडत असे. जेव्हा प्रदीप शेतकऱ्यांना ‘आतंकवादी’ म्हणे, तेव्हा ऑफिसातल्या सहकाऱ्यांना समजायचं की, यानं आज दारू प्यायलेली आहे. जेव्हा ‘खलिस्तानी’ म्हणायचा, तेव्हा समजायचं की, काल रात्रीची नशा अजून उतरलेली नाही. अशा प्रकारे प्रदीपचे किस्से ऑफिसात प्रचलित झालेले होते. त्यांच्यावर सरकारी फाइलींसारखा अति संवेदनशील आणि गुप्त असा शिक्का मारला जात असे.

दिल्लीच्या गाजीपूर सीमेवर जमलेल्या शेतकऱ्यांना पाहून प्रदीप बडबडायला लागला. रौशनीला कळून चुकलं की, काल रात्रीची अजून उतरलेली नाही. खूप पिणाऱ्यांच्या घशात थोडीशी दारू नेहमीच शिल्लक राहते. प्रदीप मीरतला पोहचण्याआधी सरकारमान्य दुकानातून एक बाटली घेऊ इच्छित होता. रौशनी म्हणाली, ‘‘आधीची एक बाटली शिल्लक आहे.’’

‘‘हो, पण रस्त्यात बाटली संपली तर? रौशनी, तुझ्यासारखीच दारूही सतत सोबत असणं गरजेचं आहे. दोघांचा रोमान्सच तसा आहे.’’

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अँकरिंग करणाऱ्या या जोडीनं फेकन्यूज आणि प्रोपगंडा इतका रचला आहे की, अनेक वेळा शहरात दंगल होता होता राहिली. रात्रीच्या झोपेपासून पळण्यासाठी प्रदीपला दारूची सवय लागली. रौशनी प्रदीपची दोन थेंबांची साथीदार होती. मीरतच्या प्रवासात मॅनहॅटनच्या गप्पा होऊ लागल्या. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी परराष्ट्र मंत्रालयानं दिलेली दारू होती. रौशनीने आठवण करून दिली, ‘‘सरकारमान्य दुकानावर थांबू नकोस, लोक तुला ओळखतील.’’

नोएडा आणि गाझियाबादमध्ये पसरलेल्या रहिवाशी इमारतींपासून पुढे जायला लागलं की, महानगरामध्ये सामावत होत चाललेल्या शेतांमध्ये मोठे मोठे बोर्ड दिसायला लागतात. एका जाहिरातीत पँट-शर्टमध्ये असलेल्या एका तरुणीच्या हातात एक हिंदी वर्तमानपत्र होतं. आयेशा जुल्काची प्रतिमा त्या वर्तमानपत्राला नव्या जमानाचं बनवत होती. त्या वर्तमानपत्राचं नाव प्रदीपसोबतच मीरतच्या दंगलीत आलं होतं. नव्या जमान्याच्या अशा अनेक बोर्डांच्या मध्ये असलेल्या एका पिवळ्या रंगाचा बोर्ड पाहून रौशनीने गाडीचा वेग कमी केला. कुणा चित्रकारानं खूप कौशल्यानं रेखाचित्र साकार केलं होतं. त्यावर लिहिलं होतं, ‘‘आता अपघातांच्या बातम्या संपल्या आहेत. दारू पिऊन अँकरिंग करणाऱ्या दुर्घटनांमुळे लोकांना जाग येते – सावधान : अँकर दारू प्यायलेला होता…’’

ते पाहून रौशनी म्हणाली, ‘‘तू आताही दारू प्यायचाच विचार करतो आहेस? दिल्लीला परत गेलावर पी.’’ इतरांचे संघर्ष चॉकलेटच्या आवरणात लपेटून विकणारी रौशनी बोलायचं म्हणून बोलली. कठोर होणं तिच्या स्वभावात नाही. प्रदीपने बोर्डवरून नजर वळवली आणि समोर पाहू लागला. ‘बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ’ या नाऱ्यांनी भरलेले ट्रक भारताची प्रगती दाखवत होते. सरकारने संसदेत सांगितलंय की, या योजनेसाठीचा सगळा निधी जाहिरातींवरच खर्च करण्यात आलाय. मुली योजनेमुळे वाचत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठीची आर्थिक तरतूद या योजनेची जाहिरात करण्यातच खर्च करण्यात आलीय.

प्रदीप संध्याकाळच्या स्वप्नात बुडायला लागला. दुपारच्या कडक उन्हापासून आणि रात्रीच्या फेकन्यूजपासून वाचण्यासाठी त्याला संध्याकाळची वाट पाहण्याची सवय लागली होती. दारू पिणारे कुठल्याही वेळेला संध्याकाळ बनवू शकतात. त्यांना दारूचं नाही, संख्याकाळचं निमित्त हवं असतं. संध्याकाळी दारू हवीच. ‘8PM’ हा ब्रँड पाहून तो आपल्या आठ वाजताच्या लाइव्ह शोच्या संध्याकाळमध्ये हरवून गेला. लवकर परतण्याची घाई करू लागला. प्रदीप वाहिनीचा चेहरा आहे, त्यामुळे पत्रकारितेचाही चेहरा आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

मीसुद्धा प्रदीप आणि रौशनी यांचाच विचार करत होतो. लोकांनी त्यांचा व्हिडिओ टॅग करून ट्टिटरवर बरंच काय काय लिहिलं होतं. ‘प्रेस क्लब’मधून मनोहर लालचा फोन येऊ लागला. ‘अल्ट न्यूज’च्या जुबेरने मॅसेज करून विचारलं, ‘‘अँकरच्या दारू पिण्यावर तुमचं काय म्हणणं आहे?’’

‘‘मला काही म्हणायचं नाही, मी भाजी खरेदी करतोय. घरून यादी बनवून आणलीय.”

‘‘बिग बास्केटमधून का नाही मागवत?’’

पत्रकारितेत अयशस्वी होण्याच्या अनेक कारणांपैकी हेही एक कारण आहे की, प्रत्येक मोठ्या घटनेच्या वेळी मी भाजीमंडईत तरी असतो किंवा सुट्टीवर तरी.

दोन विक्रेत जवळून जाताना बोलत होते – ‘‘बघ, हा अँकर आहे. स्वत:च भाजी विकत घेतोय. हा तो दारू पिणारा तर नाही?’’ एक ड्रायव्हर दारू पितो, याचा अर्थ असा तर नसतो की, सगळेच ड्रायव्हर दारू पितात. दारू पिणं हा काही नैतिकतेचा प्रश्न नाही, अर्थव्यवस्थेचा आहे. मी माझा प्रतिवाद तयार करायला सुरुवात केली, नेमक्या त्याच वेळी टॉमेटोचा भाव सांगून भाजीवाल्यानं चर्चेला वेगळं वळण दिलं. अँकरच्या दारू पिण्याची बातमी शहरभर पसरलीय आणि मी बाजारात अडकून पडलोय. कारण नसताना व्हायरल होऊ लागलो.

मी प्रतिवाद करायला लागलो – ‘‘त्याचं दारू पिणं चुकीचं तर नाही.’’ टीव्हीवरील डिबेट शोप्रमाणे हिंसक होण्याच्या भीतीनं मी टोमॅटो सोडून बटाटे उचलले. बटाटे शस्त्रासारखे कामी येऊ शकतात. टॉमटो चिकटू शकतात, बटाटे मात्र घरंगळून पडतात. नेम चुकला तरी कुणाला ना कुणाला लागूच शकतात. बातमी तर होईल, पण ती वेळ आली नाही. कोथिंबिरीची जुडी उचलताना विचार करू लागलो, ‘‘दारू प्यायल्यानंतर प्रदीप काय म्हणाला? इतका हंगामा का केला जातोय? वृत्तवाहिन्यांच्या नियामक संस्थेचा तो अध्यक्ष आहे, त्याचं कोन काय वाकडं करणार? जर पत्रकारितेच्या सगळ्या नैतिकतेचा ऱ्हास वैध आहे, तर मग दारू पिणं अवैध कसं? दारू पिऊन त्यानं चागलंच केलं. खरं तर त्याने ड्रग्जचाही व्यवसाय करायला हवा. ईडीचे अधिकार तसेही माझ्याच घरी येतील, प्रदीपच्या घरी तर कधीच जाणार नाहीत. त्याचा फायदा प्रदीपने घ्यायला हवा. प्यायला हवं, पाजायला हवं.’’

लोकांना माझं म्हणणं पटलं. त्यांना कळून चुकलं की, मी फ्रस्ट्रेट झालेलो आहे, आल्टो कारमधून फिरतो.

प्रदीपने बाटली उघडली. रौशनीने दोन थेंबाच्या आशेनं वेग वाढवला. प्रदीप आदल्या रात्रीचा सगळा किस्सा बयजवार सांगू लागला. दारू प्यायल्यानंतरचं त्याला सगळं आठवतं. त्यामुळे त्याला हे सिद्ध करता येतं की, त्याने दारू प्यायलेली नव्हती. दारुडे विसरून जातात. प्रदीप सगळं आठवणीत ठेवतो.

“रौशनी, तुला तर माहीतच आहे, दारू प्यायलानंतरही मला स्वत:ला सावरता येतं. मला दारूच्या प्रेमाची नशा आहे.” प्रदीप पोएटिक होऊ लागला, तेवढ्यात शेजारून भारतीय अर्थव्यवस्था लादलेला अशोक ले लँडचा ७२ चाकांचा ट्रक गेला. दिल्लीहून लखनौला चालला होता. देशाची प्रगती कुणाला आवडत नाही? प्रदीपचा आत्मविश्वास वाढला. एव्हाना अर्धी बाटली संपली.

‘‘बातमी ही एक नशाच आहे, जानेमन…’’

 रौशनीला जानेमन म्हटलेलं आवडत नाही. आधी आवडायचं. पण प्रदीपचा व्हॉटसअ‍ॅप मॅसेज व्हायरल झाल्यापासून रौशनीला या शब्दाविषयी तिरस्कार वाटायला लागलाय. त्या मॅसेजमध्ये त्याने अनेक नव्या तरुण महिला अँकर्सना ‘जानेमन’ म्हटलं होतं. ती चिडली- ‘‘अर्धी बाटली संपली की, तू जानेमनवर आलास.”

“सॉरी, बातमी ही एक नशा आहे, नशेमन. आता ठीक?”

“तुला हवं ते म्हण.”

‘‘मला मीरतहून दिल्लीला परतायचंय. धर्माचा झेंडा लावलेल्या ट्विटर अकाउंटवरून विश्वगौरवावर ट्विट करायचंय. मी तर माझी वाक्यंही तयार करून ठेवलीत- ‘दिल्लीहून लखनौला जाणारा हा ट्रक, भारताची स्वप्नं पूर्वांचलमध्ये पोहचवेल. मुलींना वाचवेल. या ट्रकमुळे जळणारे अँकरच्या दारू पिण्यावर हाहाकार माजवताहेत. जणू काही या देशात पाण्याऐवजी दारूची कमतरता आहे!’ पहा माझ्या या ट्विटरवर हायकमांडचाही लाईक पडेल. कुणी सांगावं या वेळी पाठपुरावाही होईल.”

“माझीही वाक्यं ऐक.”

“सांग. तशीही बाटली संपायलाच आलीय…” प्रदीप खिडकीवर लवंडला. बडबडायला लागला. नकळत फेसबुक लाइव्हचं बटन दाबलं जाऊन ते सुरू झालं…

“प्रश्न हा नाहीये की, मी दारू प्यायलेली होती. प्रश्न हा आहे की, दारू प्यायल्यानंतर मी खोटं बोलत होतो का? जर नव्हतो, तर मग लोकांना नेमका प्रॉब्लेम का आहे? तुम्हाला वाटत नाही का, मी सत्य बोलावं? सत्य पत्रकारिता करावी? एक दिवस दारू पिऊन अँकरिंग केली तर काय बिघडलं? मी तर दारूची इज्जत राखलीय. प्यायल्यानंतर खोटं बोललो नाही. दारू हे माझ्या आयुष्यातलं एक सत्य आहे. दारू न पिताही मी अडखळतो, पण दारू प्यायल्यावर गडबडलो म्हणून काय हंगामा माजवला जातोय? मला कुणाच्या निधनावर दारू प्यायला नको होती, पण मी माझ्या आत्म्याच्या मृत्युवर दारू प्यायलो होतो, पत्रकारितेच्या मृत्युवर प्यायलो होतो. जेव्हा जेव्हा पत्रकारिता मरते, तेव्हा तेव्हा मी दारू पितो. जेव्हा आत्मा मरतो, तेव्हा मी दारू पितो. मृत्युचं दु:ख हलकं करण्यासाठी दारू प्यायलो नव्हतो. गेल्या अनेक वर्षांत मी रोज रात्री आठ वाजता पत्रकारितेचा खून करतो, मी तिला संपवून टाकलंय. त्यात मी यशस्वी झालोय. माझं पिणं त्या यशाचं सेलिब्रेशन होतं. कुणाला काय प्रॉब्लेम आहे? हिक् हिक् हिक्…”

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

फेसबुक लाइव्ह पाहणाऱ्यांची संख्या दहा लाख झाली. रौशनीला फोन येऊ लागले की, लोकांना सगळं ऐकायला येतंय, दिसतंय, प्रदीप काय बडबडतोय ते…

प्रदीप म्हणाला, “ऐकू दे. मी दुहेरी जीवन जगत नाही. फेसबुक बंद कर आणि दिल्लीला चल. आजचा लाइव्ह शो लवकर करू.”

रौशनीने या वेळी हायकमांडचा लाईक पडला हे त्याला सांगितलं नाही. त्याचं ट्विटचं असं होतं की, हायकमांडचा लाईक पडणारच होता. मनातल्या मनात ती म्हणाली- ‘आज अजून एक फेकन्यूज सत्य झाली. भारताच्या अर्थव्यवस्थेची झळाळी दिल्लीपासून गावांपर्यंत पसरू लागलीय.’

प्रदीपला समजून चुकलं होतं की, दोघांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आयटी सेलच्या सहकार्यामुळेच येतेय. ट्विटरवरील प्रतिसादाचा विषय काढत त्याने बाटलीतली उरलेली दारू ग्लासात टाकली. कारमध्ये बाटली ठेवण्याच्या सुविधेमुळे पिणं सोपं झालं होतं. पित पितच तो स्टुडिओत आला.

थेट प्रसारण चालू झालं. प्रदीपला चालता येत नव्हतं. सहकाऱ्यांनी पाठ थोपटत हिंमत वाढवली की, “हे ‘अँकरिंगचं नाही, बारचं टेबल आहे. याला बार टेबल समजून बोला. तुम्ही लोकप्रिय अँकर आहात. सरकारच्या बाजूनं आहात. तुम्ही नसाल तर या सरकारची शोभा वाढत नाही. पंतप्रधानांना ‘सबका साथ सबका विकास’ मिळत नाही. जेवढं प्यायलात तेवढं पुरेसं आहे आजच्या लाइव्ह प्रसारणासाठी.”

माईक सुरू झाल्यानंतर प्रदीपने पहिल्यांदा जी गोष्ट सांगितली, ती शभंर टक्के सत्य होती. त्याची प्रत्येक गोष्ट मी टिपून ठेवली होती. यू-ट्युबचं काही सांगता येत नाही, कधीही डिलिट केलं जाऊ शकतं. त्यामुळे मी जे टिपून ठेवलं होतं, तेच तुमच्यासमार मांडतो आहे. कॅमेरा स्थिर होता, प्रदीप झुलत होता.

“उचकी तहान नाही, दारू असते. ती गळ्यात कुठेतरी अडकून बसलेली असते. ती गळ्यातून खाली उतरण्याच्या आधी पुढच्या पेगची वाट पाहत असते. जेव्हा पुढचा पेग येत नाही, तेव्हा उचकी लागते. उचकी वाट पाहते की, पुढचा पेग कधी येणार. उचकी हिशोब मागते. जी प्यायलेली असते आणि प्यायची बाकी असते, त्या व्हिस्कीची यातना असते उचकी. दारूचं संगीत आहे उचकी… हिक् हिक् हिक्…”

दर्शकांची छाती फुलायला लागली. त्यांना वाटायला लागलं की, अँकर दारूचे औषधीय गुणच सांगतोय. सगळे पटापट उतरवून घ्यायला लागले. व्हॉटसअ‍ॅपवर फॉरवर्ड करू लागले. प्रदीपला फीडबॅक मिळायला लागला. फेसबुकवर दर्शकांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली. शो हिट झाला. प्रदीप झुलायला लागला. त्याच्या कानात एक गाणं वाजू लागलं. त्याने गाणं बंद करण्यासाठी दोन्ही हातांनी आपलं डोकं दाबलं, पण ते झालं नाही. तो गायला लागला- ‘झूमती चली हवा… याद आ गया कोई…’ शुद्धीत येताच प्रदीनं विचारलं, ‘‘मी बोलत नाहीये का?’’ कॅमेरामनच्या गप्प राहण्यानं तो नाराज झाला. “मी बोलत नव्हतो, तर कोण बोलत होतं? मी कुणाशी बोलत होतो? ते कुणाशी बोलत आहेत?”

“कोण सर?” कॅमेरमनची जीभ घसरली, “सर, तुम्ही गात आहात.”

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

भाजीमंडईतून परतल्यावर मी चखना खात खात अपूर्ण निबंध पूर्ण करायला लागलो. हा लेख ‘साहित्य अकादमी’च्या पुरस्काराच्या पात्रतेचा तर नाही, पण ‘कमला पसंत पुरस्कारा’ची नक्कीच आशा आहे. जाहिराती बंद झाल्यामुळे चरितार्थ चालवण्यासाठी इथंतिथं लेखन करतो आहे. कथेच्या या भागात त्या चौकीदाराचा उल्लेख आहे, जो रात्री प्यायला येणाऱ्यांना आत सोडून चकना मिळण्याची वाट पाहत राहतो. लिंबू पिळलेल्या ओल्या चन्यांच्या वासानं त्याचं डोकं भनभनलेलं असतं. तो प्लेटमधल्या कबाबांवरचं पसरलेलं तेल चाटू लागतो.

चौकीदाराकडे चकन्याचे एक से बढकर एक किस्से होते. चकना पाहूनच तो पिणाऱ्याची दर्जा आणि त्याचा प्रतिष्ठा सांगू शकत असे. पिताना मीठ-मिरची टाकून तळलेली डाळ खाणारे त्याला अजिबात आवडत नाहीत. त्याच्यापर्यंत प्रदीपच्या पिऊन अँकरिंग करण्याचा किस्सा पोहचला होता. त्या किश्श्याच्या नशेत तोही गेस्ट हाऊसच्या बाहेर उभा राहून चकना-ग्रंथ वाचू लागला. इथं मी जाणीवपूर्वक पुराण लिहिलेलं नाही. संस्कृतीच्या मर्यादेशी छेडछाड करण्याची कुणालाच परवानगी नाही.

“चांगला चकना असेल तर लोक जास्त पितात. लोक जास्त पित असतील तर, सरकारला जास्त पैसा मिळतो. सरकार जास्त पैसा कमावते, तेव्हा जास्त विकते. अँकर दारू विकत नाही. पारो म्हणते, ‘अँकरने दारू सोडायला हवी.’ पारोला सांगा, ‘तू हा देश सोड’. अँकर सरकार सोडू शकत नाही, त्यामुळे दारूही सोडू शकत नाही.”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

चौकीदाराच्या ‘अँकर सरकार सोडू शकत नाही, त्यामुळे दारूही सोडू शकत नाही’, या वाक्याचा लोक हॅशटॅग बनवतील, या आशेनं ते मी या कथेत तसंच राहू दिलंय. प्रदीपच्या बाजूनं देशातील जनता उभी राहिली. दारूला भारतीय संस्कृतीशी जोडण्यात आलं. दारू प्यायल्यानंतरच्या हल्ल्याला भारतीय संस्कृतीवर हल्ला, असं जाहीर करण्यात आलं. प्रदीपच्या दारू पिण्यावर टीका करणाऱ्यांवर त्रिपुरामध्ये राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. माझ्याकडे मॅसेज येताहेत की, मी हा मुद्दा माझ्या कार्यक्रमात घ्यावा आणि जनतेला जागरूक करावं. मी दुर्लक्ष केलं. चौकीदाराचा किस्साच पुढे चालवला. माझ्या कथेत तो सांगतोय की, “दारूचा संबंध संस्कृतीशी आहे. संस्कृतीचा संबंध सरकारशी आणि जनतेचा संबंध जमावाशी. जमावाचा संबंध असत्याशी आणि असत्याचा संबंध दारूशी आहे. अँकरच्या दारू पिण्यावर प्रश्न उपस्थित करू नका. प्रश्न विचारणारे तुरुंगात डाळ-पाणी पित आहेत. अँकर अजूनही दारूच पितोय.”

निष्कर्ष

शिक्षकानं ही ‘कमला पसंत पुरस्कार’ प्राप्त कथा ऐकवल्यानंतर गर्वानं आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांकडे पाहिलं. थोडंसं स्मितहास्य केलं आणि सगळ्या वर्गावर नजर टाकत विचारलं, ‘‘कथेचं शीर्षक कुणाकुणाला समजलं नाही, त्यांनी हात वर करा.’’

आवाज आला, ‘‘समजलं सर, ‘सावधान : अँकर दारू प्यायलेला होता.’ ”

अनुवाद - टीम अक्षरनामा

.................................................................................................................................................................

ही मूळ हिंदी कथा पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या फेसबुक पेजवर १० डिसेंबर २०२१ रोजी लिहिली आहे. मूळ कथेसाठी पहा -

 

पेश है रवीश कुमार की नई कहानी, लेखक ने बिना पिए ही लिख डाली। कल पोस्ट करने के बाद हटा ली थी, कहानी में सुधार किया गया है...

Posted by Ravish Kumar on Friday, December 10, 2021

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......