विनोद दुआ : टीव्ही पत्रकारितेतलं एक ‘झळाळणारं’ पान गळून पडलं…
पडघम - माध्यमनामा
रवीश कुमार
  • विनोद दुआ (जन्म ११ मार्च १९५४, निधन - ४ डिसेंबर २०२१)
  • Wed , 08 December 2021
  • पडघम माध्यमनामा विनोद दुआ Vinod Dua एनडीटीव्ही NDTV ख़बरदार Khabardar ज़ायका इंडिया Zaika India प्रणय रॉय Pranav Roy

भारतीय टीव्ही पत्रकारितेत प्रश्न विचारण्याची परंपरा विनोद दुआ यांच्यापासून सुरू होते. त्यांची पत्रकारिता प्रश्न विचारण्याशी शेवटपर्यंत जोडलेली राहिली. आज हे सांगताना दु:ख होतंय की, आमच्या टीव्ही पत्रकारितेतली एक शानदार असामी आम्हाला सोडून गेलीय. हे वर्षं त्यांच्यासाठी फार त्रासाचं राहिलं. करोनामुळे त्यांना आपली जीवनसाथीदार पद्मावती चिन्ना दुआ यांना गमवावं लागलं. त्या वेळी विनोद दुआ हॉस्टिपटलमध्ये उपचार घेत होते. त्यानंतरही त्यांच्या तब्येतीला उतार पडला नाही. ४ डिसेंबर २०२१ रोजी दिल्लीत त्यांचं निधन झालं. विनोद दुआ आमची वाहिनी, ‘एनडीटीव्ही’शीही जोडलेले होते. इथं त्यांनी अनेक उत्तम कार्यक्रम केले. ‘ख़बरदार’ आणि ‘ज़ायका इंडिया’ हे काही त्यापैकीच. ‘गुड मॉर्निंग इंडिया’च्या आठवणी आजही आमच्या मनात ताज्या आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्यासारखे ‘एनडीटीव्ही’मधले पत्रकार पत्रकारितेतले अनेक नीतीनियम शिकले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

काय बोलायचं आणि कसं बोलायचं, याविषयी विनोद दुआ यांच्याकडे जो एकाधिकार होता, तिथवर कुणीही पोहचू शकलं नाही. भाषा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं एक सहज वैशिष्ट्य होतं, पण तरीही ते एका-एका शब्दासाठी खूप मेहनत घ्यायचे. आपल्या शब्दांना खूप सन्मान देत आणि त्यांच्या उच्चारणाच्या जागा खास प्रकारे निश्चित करत. त्यांची भाषा विश्लेषणात्मक, संक्षिप्त आणि शालीन होती. त्यात इंग्रजी, पंजाबी, हिंदी आणि उर्दू या भाषांतील शब्दांचा उत्तम प्रकारे समावेश असे.

विनोद दुआ यांचे वडील फाळणीनंतर पाकिस्तानातल्या डेरा इस्माइल खाँ या शहरातून भारतात आले. दुआ जेव्हा पठानी सूट घालायचे, तेव्हा त्यातून आपल्या पूर्वजांच्या शहरातली ‘पंजाबीयत’ आणि त्याची रुबाब झळकायचा. कॅमेऱ्यासमोरची त्यांची सहजता लाबवाब होती.

टीव्ही पत्रकार पत्रकारितेच्या मानदंडाबरोबरच टीव्ही माध्यमाविषयीची त्याची समज आणि त्याचं वर्तन यावरूनही ओळखला जातो. माध्यमाच्या बाबतीत विनोद दुआ नेहमीच श्रेष्ठ सादरकर्ते राहिले. त्यांचं काम समजून घ्यायचं असेल तर कॅमेऱ्यासमोरचे त्यांचे हावभाव पाहायला हवेत. असं वाटायचं की, प्रेक्षक आणि त्यांच्यामध्ये जणू कॅमेरा नाहीच, दोघं समोरासमोर बसले आहेत. एखादी घटना सांगून आणि ती तिथंच सोडून पुढं जाणं त्यांना फार सहजपणे जमत असे. ते जर जेवण करण्यात, बनवण्यात आणि खिलवण्यात माहीर नसते, तर त्यांचा ‘ज़ायका इंडिया’ हा कार्यक्रम यशस्वीच होऊ शकला नसता. या कार्यक्रमातील चालते-फिरते विनोद दुआ पाहताना आपल्याला समजतं की, त्यांनी टीव्ही माध्यमाची किती प्रगल्भ जाण होती. ते अगदी मोजूनमापून आणि योग्य वेळी बोलत. राजकीय पत्रकारितेमध्येही त्यांना उत्तम जाण होती.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

विनोद दुआ मसाले आणि पक्वान्न यावर राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून असं काही बोलायचे की, विश्वासच बसायचा नाही. पत्नीच्या निधनानंतर त्यांनी लिहिलं होतं की, परत येईन, वार्तांकन करेल.

दूरदर्शनवरील त्यांचे ‘जनवाणी’ आणि ‘परख’ हे कार्यक्रम आजही संस्मरणीय मानले जातात. त्या कार्यक्रमांमुळे अनेकांना टीव्ही पत्रकारितेचं प्रशिक्षण मिळालं, जे नंतरच्या काळात या माध्यमाचा चेहरा बनले. मलाही त्यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य मिळालं. टीव्ही माध्यमाविषयी मी त्यांच्याकडून बरंच काही शिकलो. काम करत असताना त्यांचं गुणगुणणं आणि एखादं जुनं गाणं म्हणणं, या गोष्टी सर्वांना सहज करून टाकायच्या. ते वरिष्ठ होते, पण सहयोग देणारे वरिष्ठ होते. आत्ताआत्तापर्यंत ते तलत महमूद, बड़े गुलाम अली खाँ, पंडित जसराज यांच्या गायनाविषयी पोस्ट करत असत.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

प्रणय रॉय आणि त्यांची जोडी निवडणूक निकालाच्या काळात साऱ्या देशाला जागं करायची आणि त्यांचं लक्ष वेधून घ्यायची. दोघांनी बराच काळ एकत्र काम केलं. त्यांनी स्वतंत्रपणेही काम केलं आणि एनडीटीव्हीमध्येही बराच काळ एकत्र काम केलं. टीव्ही पत्रकारितेतलं एक झळाळणारं पान आज गळून पडलंय. ते आता या जगात नाहीत, पण टीव्ही माध्यमात अशा प्रकारे आहेत की, ते नाहीत असं वाटतच नाही. अलीकडच्या काळात हिमाचल प्रदेशमधल्या भाजपच्या नेत्याने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला होता. त्याचा सामनाही त्यांनी तितक्याच निर्भीडपणे केला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याच बाजूनं निर्णय दिला.

विनोद दुआ आहेत आणि ते काही बोलत नाहीत, कठोरपणे बोलत नाहीत, तर ते विनोद दुआ नाहीतच. त्यांच्या चालण्यातही निर्भीडता होती. ते आता नाहीत आणि ती दिल्लीही नाही, जी टीव्हीवर आल्यानंतर सगळ्या देशाची होऊन जायची. पत्रकारिता तर पूर्वीसारखी राहिलेली नाही, पण विनोद दुआ शेवटपर्यंत जसे होते तसेच राहिले. त्यांच्याविषयीचे कितीतरी किस्से आहेत...

अनुवाद - टीम अक्षरनामा

.................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख रवीश कुमार यांनी ‘एनडीटीव्ही’च्या पोर्टलवर ४ डिसेंबर २०२१ रोजी लिहिला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://ndtv.in/blogs/ravish-kumar-tribute-to-vinod-dua-2637213

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......