ममता बॅनर्जींची ‘मुंगेरीलालगिरी’!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • शरद पवार आणि ममता बॅनर्जी
  • Sat , 04 December 2021
  • पडघम देशकारण शरद पवार ममता बॅनर्जी युपीए एनडीए राष्ट्रवादी काँग्रेस तृणमूल काँग्रेस भाजप सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेस

‘अमुक-तमुक पक्षाचा विजय म्हणजे तमुक पक्षाला निवडणूक जिंकण्यात आलेलं अपयश आहे’, अशी भोंगळ विधानं करण्यात आपल्याकडचे बहुसंख्य राजकीय विश्लेषक तरबेज आहेत. तसंच काहीसं बहुसंख्य राजकीय नेत्यांचही झालेलं आहे. वस्तुस्थिती काय आहे, याची कोणतीही तमा न बाळगता देशाचं राजकारण कवेत घेण्याचा प्रयत्न हे नेते करत असतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन (महा)राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत भाजपला पर्याय उभा करण्याची केलेली भाषा, या भोंगळपणाचं उत्तम उदाहरण आहे. जे काँग्रेसमधून वेगळे झाले तरी ज्यांचा राजकीय संसार काँग्रेसला वगळून उभाच राहू शकलेला नाही, त्यांना हे समजतच नाहीये की, आपल्या देशात भाजपला पर्याय काँग्रेसला वगळून उभाच राहू शकत नाही. तरीही ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी केलेली भाषा म्हणा की, त्या दिशेने सुरू केलेले प्रयत्न म्हणजे मतांची विभागणी दोनपेक्षा जास्त विरोधकांत होऊन त्याचा लाभ शेवटी भाजपलाच व्हावा, अशी तर खेळी नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

राजकीय परिस्थिती लक्षात न घेण्याचा भोंगळपणा स्वाभाविकच वस्तुस्थितीला धरून कसा नसतो, याची अनेक उदाहरणं सांगता येतील. इथे हा मुद्दा ममता बॅनर्जी यांच्या निमित्तानं निर्माण झालेला असल्यानं नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचंच उदाहरण घेऊ. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या सत्तेत येण्याचं भाजपचं स्वप्न ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तणृमूल काँग्रेसनं उधळून लावलं हे खरं आहे. तृणमूल काँग्रेसच्या जागांतही गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा चारने वाढ झाली हेही खरंच आहे, पण याचा अर्थ पश्चिम बंगालमध्ये खरंच भाजपचं पानिपत झालं आहे का? या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ हेच वस्तुस्थितीला धरून आहे, याचा विसर आपल्या देशातले (पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणारे सर्व नेते आणि त्यांचे) राजकीय पक्ष, तसंच बहुसंख्य राजकीय विश्लेषकांना पडलेलं आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालेला नाही, हेच निकालाची आकडेवारी सांगते. गेल्या निवडणुकीत भाजपचे केवळ तीन सदस्य पश्चिम बंगालच्या विधानसभेत होते. या निवडणुकीत तो आकडा तब्बल ७७वर पोहोचलेला आहे. म्हणजे भाजपचं संख्याबळ ७४नं वाढलं आहे आणि ही वाढ मुळीच दुर्लक्षणीय नाही. शिवाय डावे आणि काँग्रेसला नेस्तनाबूत करत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान प्राप्त केलं आहे, मात्र नेमकं याच वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणं, हे मान्य करण्याचं धाडस राजकीय पक्ष आणि विश्लेषकांतसुद्धा नाहीये किंवा त्यांच्या आकलनात भोंगळपणा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही आकडेवाडी लक्षात घेतली आणि त्या आधारे मांडणी सुरू केली की, या देशात काँग्रेस आणि भाजप हेच दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत; अन्य राजकीय पक्षांचं अस्तित्व प्रादेशिक आहे, हे मान्य करावं लागतं!

मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी ज्या काही गाठीभेटी घेतल्या, त्या अपेक्षितच होत्या आणि त्यापैकी शरद पवार वगळता एकही मान्यवर ‘मास बेस्ड’ नेता नाही. ममता आणि त्यांनी गाठीभेटी घेतलेल्या सर्वांना  भाजपच्या विरोधात बळकट पर्याय उभा करायचा आहे आणि ते योग्यच आहे. कोणत्याही लोकशाहीत  देशात सत्ताधारी आणि/किंवा  प्रबळ पक्ष विरुद्ध एखादा पर्याय उभा करण्यात काहीही गैर नाही. उलट ती एक राजकीय गरजच असते. पूर्वी आपल्या देशातल्या राजकीय पक्षांना काँग्रेस विरुद्ध पर्याय उभा करावा असं वाटायचं, आता भाजपच्या विरोधात या हालचाली सुरू आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

एकूणच खूपशी एककल्ली आणि अरेरावीकडे झुकणारी राजवट बघता भाजप विरुद्ध उभं राहणाऱ्या पर्यायाचं स्वागतच करायला हवं, मात्र असा पर्याय उभा करताना वस्तुस्थितीचं भान बाळगायलाच हवं. काँग्रेसला वगळून असा पर्याय उभा करण्यात येत असेल, तर त्यासाठी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ याशिवाय दुसरी कोणतीही प्रतिक्रियाच नाही, हे ममता बॅनर्जी आणि हा पर्याय उभारणाऱ्या सर्वांनी लक्षात घायलाच हवं.

काँग्रेस सध्या मुळीच एकसंध नाही. जनमनावर असलेली काँग्रेसची पकड ढिली झालेली आहे, सलगच्या पराभवामुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांत आणि नेत्यातही नैराश्य आलेलं आहे आणि हा पक्ष ‘निर्नायकी’ अवस्थेतही आहे. हे सर्व खरं असलं तरी काँग्रेस हाच एकमेव पक्ष देशव्यापी आहे आणि तोच पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेऊ शकतो, हे वास्तव नाकारताच येणार नाही. अनेकांना कितीही कटू वाटलं तरी, सोनिया आणि राहुल गांधी यांच्यातच देशव्यापी नेतृत्वाची क्षमता; कोणत्याही नेत्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि हेच निखळ सत्य आहे. श्रीमती सोनिया गांधी आता थकल्या आहेत. त्यामुळे नेतृत्वाचा हा क्रूस आता राहुल गांधी यांनाच वाहून न्यावा लागणार आहे.

भाजपच्या विरुद्ध तयार होणाऱ्या संभाव्य आघाडीत एकही नेता देशव्यापी नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या राज्यातील विजय म्हणजे देशव्यापी नेतृत्वाची मान्यता देणारा वज्रलेख मिळाला, हा भ्रम आणि अहंकारही आहे. हे म्हणजे काठीचे वार करून पाणी कायमचं दुभंग करण्याचं स्वप्न पाहण्यासारखं आहे.

शिवाय काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडे देशभरात किमान २० ते २२ टक्के मतांचा आधार नाही. भाजपच्या विरुद्ध एकत्र येण्याची भाषा करणारे सर्वच पक्ष प्रादेशिक आहेत. ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, मायावती यांच्यासारखे मोजके अपवाद वगळता अन्य कोणात्याही पक्षात स्वबळावर राज्यात सत्ता निर्माण करण्याची क्षमताही नाही आणि तरीही शरद पवार, चंद्राबाबू नायडू यांच्यासह हे सर्व नेते पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत. म्हणजे केंद्रात सत्ता येण्याआधीच पदासाठी साठमारी आहे!

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

अन्य राज्यांत हे नेते आणि त्यांच्या पक्षांनी जे काही प्रयत्न केले, त्यातून थोडाफार मायावती वगळता अन्य कुणाच्या हाती फारसं काही लागलेलं नाही. मायावतींना मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा अशा काही राज्यांत विधानसभा निवडणुकीत कधी तरी का असेना पाच-दहा जागा नक्कीच मिळालेल्या आहेत. बाकीच्या नेत्यांना तसं अपवादात्मक यशही कोणत्याच निवडणुकीत मिळालेलं नाही. २०१४च्या दिल्ली विधानसभा निवडणुका लढवण्याचा फुगा ममता बॅनर्जी म्हणजे तृणमूल काँग्रेसनं माध्यमात चांगल्यापैकी फुगवला होता, पण अण्णा हजारे यांनी तो फुगा कसा टचकन फोडून टाकला, हे अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. (महा)राष्ट्रवादीचे समर्थक गोवा आणि गुजरातमधल्या एकेका जागेचे दाखले देण्याचा प्रयत्न करतील, पण त्या  यशाचं श्रेय पक्षाचं नव्हे तर त्या उमेदवारांचं होतं हे विसरता येणार नाही.

हे सर्व लक्षात घेता काँग्रेसला बाजूला ठेवून ममता बॅनर्जी आणि (त्यांच्या काँग्रेसबद्दलच्या विधानापासून नेहेमीप्रमाणे सावध लांब उभं राहण्याची भूमिका घेणारे आणि १९७८पासून महाराष्ट्रावरची काँग्रेसची पकड सैल करण्यास सुरुवात करणारे) शरद पवार नेमकं काय साध्य करू इच्छितात, याबद्दल शंका निर्माण होते.

युपीए कुठे आहे, असा प्रश्न विचारणाऱ्या ममता बनर्जी हे विसरतात की, याच युपीएच्या केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांच्या पक्षाचे त्यांच्यासकट सहा मंत्री होते आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतही अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळात आपण मंत्री होतो. त्याचाही विसर त्यांनी पडू देऊ नये. दोन्ही डगरीवर हात ठेवण्याची राजकीय कसरत करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधात लढताना काँग्रेसशिवाय पर्याय उभा करण्याची केलेली भाषा, हे त्यांच्या अहंकारी चंचलपणाला शोभणारी  आहे; ते मुंगेरीलालचं  स्वप्नरंजनच म्हणायला हवं.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आपल्या अस्तित्व आणि (मर्यादित का असे ना उरलेल्या) शक्तीबद्दल अशी शंका का उपस्थित झाली, याचा विचार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी करायला हवा. गेली दोन वर्षं या पक्षाला कायमस्वरूपी नेतृत्व नाही, जे काही कथित नेतृत्व आहे, ते सक्रिय नाही आणि सोनिया व राहुल गांधी वगळता कुणीही देशव्यापी नेता या पक्षाकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे.

काँग्रेसच्या झालेल्या या स्थितीला हेच नेते जबाबदार आहेत, पण ती जबाबदारी उचलून अचेतन होत चाललेल्या काँग्रेसमध्ये जीव फुंकावा असे यापैकी कुणालाही वाटत नाही, ही खरी शोकांतिका आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाला पर्याय नाही, ही वस्तुस्थिती मान्य करून या नेत्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करावं, हाच देशाच्या राजकारणातून काँग्रेसला ‘एलिमिनेट’ करू पाहणाऱ्या, या सर्व मुंगेरीलालच्या स्वप्नरंजनांवर पर्याय आहे; तो पर्याय स्वीकारण्याची सुबुद्धी काँग्रेस नेत्यांना सुचो!

शेवटी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी शिष्टाचार म्हणूनही ममता बॅनर्जी रुग्णालयात गेल्या नाहीत; घरी जाऊन केवळ शरद पवार यांनाच भेटल्या, संकेत समजून घेण्यासारखा आहेच!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......