कॉम्रेड मनोहर टाकसाळ म्हणजे प्रत्येक संघर्षामध्ये पुढाकार असलेला एक ध्येयवेडा नेता
संकीर्ण - श्रद्धांजली
कॉ. भीमराव बनसोड
  • कॉम्रेड मनोहर टाकसाळ
  • Wed , 01 December 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली कॉ. मनोहर टाकसाळ भाकप CPI औरंगाबाद Aurangabad

कॉम्रेड अ‍ॅड. मनोहर टाकसाळ यांचे काल, ३० नोव्हेेंबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता दुःखद निधन झाले. ते १९५३ सालापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित होते. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय समितीचे सदस्य म्हणूनही काळ  काम केले होते. पक्षकार्यासाठी ते राज्यभर फिरस्ती करत, तसेच राष्ट्रीय समितीचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी देशभरही दौरा केला होता.

ते भाकपशी संबंधित असले तरी महाराष्ट्रातील व औरंगाबाद शहरातील विविध डाव्या, पुरोगामी, आंबेडकरवादी पक्ष व संघटनांच्या चळवळीत अग्रेसर असायचे. कामगार-कष्टकरी, दलित, आदिवासी, महिला इत्यादी सर्व प्रकारच्या शोषित-पीडितांच्या चळवळीत त्यांनी अत्यंत पुढाकाराने, मोलाची भागीदारी केली. त्यामुळे उपरोल्लेखित सर्वच पक्ष व संघटनांतील कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

कॉम्रेड टाकसाळ यांनी वकिली केली, तीसुद्धा प्रामुख्याने चळवळीतील कार्यकर्त्यांवर झालेले खटले विनामोबदला चालवण्यासाठीच. हा माझाही व्यक्तिगत अनुभव आहे. पैठण औद्योगिक परिसरातील लाल निशाण पक्षाशी संबंधित असलेल्या साखर कारखाना संपातील खटला असो अगर जैन स्पिनर येथील संघर्ष असो, प्रत्येक संघर्षात त्यांनी कोणताही अभिनिवेश न बाळगता मदत केली होती. कन्नड साखर कारखान्यातील कामगार आंदोलनावर पोलिसांनी अश्रूधूर व लाठीचार्ज केला होता. ते त्या आंदोलनात पुढाकाराने होते. इतकेच केवळ नव्हे तर नंतर झालेल्या खटल्यांमध्येही त्यांनी मदत केली होती.

प्रत्यक्ष रस्त्यावरील संघर्षातसुद्धा त्यांचा पुढाकार असे. उरणचे गोळीबाराचे आंदोलन, खैरलांजी दलित अत्याचार प्रकरणातील मोर्चे, औरंगाबाद शहरात झालेल्या धार्मिक दंगली रोखण्याचा प्रयत्न, भूमिहीन शेतमजुरांच्या जमिनी अतिक्रमणाचा प्रश्न, त्याबद्दलचा सत्याग्रह, अशा अनेक संघर्षांत त्यांचा कायम सहभाग असायचा. पी.ई.एस. सोसायटीच्या न्याय्य मागणीच्या संघर्षातही त्यांचा पुढाकार होता. मराठवाडा नामांतराच्या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही भोगलेला होता. मुंबई उच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर तो या न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर जाळण्यातही त्यांचा पुढाकार होता. त्यासाठीही त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र त्यांनी स्वतः जामीन घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना जास्त दिवस तुरुंगात राहावे लागले. पण त्यांनी त्याची फिकीर केली नाही. खरे तर ते किती वेळा तुरुंगात गेले असतील, याची मोजदाद करणे तसे कठीणच आहे.

कॉम्रेड टाकसाळ म्हणजे प्रत्येक संघर्षामध्ये पुढाकार असलेला एक ध्येयवेडा नेता अशीच बहुतेकांची भावना होती. कारण सर्वच पक्ष व संघटनांच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यापासून पुढाऱ्यापर्यंत सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते केवळ चळवळीपुरतेच नव्हते, ते प्रसंगी कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक अडी-अडचणी सोडवण्यासाठीही मदत करत असत. आजारपणात दवाखान्यात दाखल करण्यापासून त्यांच्या मुलांना विद्यालय अथवा महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यापर्यंत, ते स्वतः लक्ष घालत. प्रसंगी त्यासाठी आपली प्रतिष्ठाही खर्ची घालत… हा माझाही अनुभव आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कॉम्रेड टाकसाळ यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि गोवा मुक्तीसंग्राम दोन्हींतही सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना राज्य सरकार व केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यसैनिक म्हणून काही सवलती मिळाल्या होत्या. परिणामी त्यांना एस.टी.ने व रेल्वेने सर्वत्र फिरता आले. त्याचा फायदा त्यांनी चळवळ वाढवण्यासाठी करून घेतला.

कॉम्रेड टाकसाळ दौऱ्यावरच जास्त असायचे. बीड जिल्ह्यातून आमदार राहिलेले कॉम्रेड काशिनाथ जाधव हे त्यांचे आदर्श होते. त्यांच्या वसतिगृहात राहून त्यांच्या सहकार्याने त्यांनी बीड येथील शिक्षण पूर्ण केले. पुढच्या वकिलीच्या शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले. घरची अत्यंत गरिबी असल्याने सुरुवातीच्या काळात त्यांनी कॉम्रेड एम.डी. भोसले यांच्या शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. ती करत वकिलीची परीक्षा पास केली. आणि नंतरच्या काळात सर्व चळवळींतल्या कार्यकर्त्यांना कोर्टकचेऱ्यांच्या प्रकरणांतून सोडवण्यासाठी आपले कायद्याचे ज्ञान पणाला लावले. त्यामुळे त्यांच्याविषयी वकिलीक्षेत्रात काहीसा आदरयुक्त दबदबा होता. त्यांच्या त्यागपूर्ण, नि:स्वार्थी जीवनाची माननीय न्यायाधीशही नोंद घेत. औरंगाबाद शहरातील ‘लेबर लॉ प्रैक्टिशनर्स असोसिएशन’चे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. नंतर त्यांनी असोसिएशनचे कायमस्वरूपी सल्लागार म्हणून काम केले.

सामाजिकदृष्ट्याही ते अत्यंत प्रगतीशील विचारांचे होते. त्यांनी आंतरजातीय विवाह केला, तसेच इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित केले. अशा जोडप्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठीही ते मदत करत.

कोणत्याही सार्वजनिक कामासाठी निधी गोळा करायचा असल्यास कॉम्रेड टाकसाळ यांची खूपच मदत व्हायची. कोणाची स्मरणिका अथवा स्मृतिग्रंथ काढायचा असो किंवा एखादे अधिवेशन वा परिषद घ्यायची असो, ते ज्यांच्याकडे जात त्यांनी कधी आर्थिक मदत केली नाही, असे सहसा घडत नसे. एखादी मोहीम हातात घेतल्यास त्याचा ते शेवटपर्यंत पिच्छा पुरवत असत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कॉम्रेड टाकसाळ औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या दलित अत्याचार विरोधी संघर्ष समितीचेही अध्यक्ष होते. अ‍ॅड. बी. एच. गायकवाड कायदेशीर सल्लागार, तर बुद्धप्रिय कबीर सरचिटणीस होते. बुद्धप्रिय कबीरचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले. आणि आता कॉम्रेड टाकसाळ यांचे. त्यामुळे ही समिती एक प्रकारे पोरकी झाली आहे. जिथे कुठे दलितांवर अन्याय-अत्याचार होई, तिथे कॉम्रेड टाकसाळ हजर राहत. त्या प्रकरणाबाबत पत्रकार परिषदा आणि विविध प्रकारच्या आंदोलनांच्या माध्यमांतून आवाज उठवत. 

हे सर्व काम ते देशात ‘कामगार-कष्टकऱ्यांचे राज्य’ यावे यासाठी करत. त्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. तेच त्यांचे जीवन ध्येय होते. प्रसंगी त्यांचे घराकडे दुर्लक्ष होते, अशी टीकाही होत असे, पण त्याची त्यांनी कधी फिकीर केली नाही. गंगापूर मतदारसंघातून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांना यश आले नाही. मात्र त्यामुळे ते अजिबात निराश झाले नाहीत. पत्करलेले काम ते पूर्वीच्याच चिकाटीने करत राहिले. त्यांचे राहिलेले काम आता त्यांच्या पुढच्या पिढीतील कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे.

..................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......