आपल्यातील बहुतेक जण ‘कामगार’ आहेत. ‘काम’ हे व्यक्तीची ओळख असते व त्यावर तिचे केवळ आर्थिकच नव्हे तर ‘मानसिक आरोग्य’सुद्धा अवलंबून असते!
ग्रंथनामा - झलक
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 30 November 2021
  • ग्रंथनामा झलक कामगारांचे मानसिक आरोग्य Kamgaranche Manasik Arogya वृषाली राऊत Vrushali Raut काम Work कामगार Worker मानसिक आरोग्य Mental health वर्क फ्रॉम होम Work from Home लॉकडाउन Lockdown

औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आणि ‘अक्षरनामा’च्या लेखिका डॉ. वृषाली राऊत यांचे ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ हे कामाशी संबंधित मानसिक आरोग्याच्या समस्यांचा विस्तृत आढावा घेणारे पुस्तक नुकतेच मैत्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला लेखिकेने लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

२००२मध्ये मी कॉलेजमध्ये शिकत असताना मा‍झे वडील रामदास संतोषराव राऊत यांना त्यांच्या विभागाने नोकरीतून अचानकच तडकाफडकी काढून टाकले आणि त्यांना निवृत्ती वेतन, तसेच इतर कुठल्याही पद्धतीचा लाभ मिळाला नाही. या घटनेनंतर माझे व मा‍झ्या आईचे आयुष्य कधीच पूर्ववत झाले नाही. जो मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास मा‍झ्या कुटुंबाला झाला, तो भरून येणे शक्य नाही. माझे वडील अतिशय हुशार होते. या घटनेने त्यांचे जे नुकसान झाले, त्यामुळे त्यांचा शेवटचा काळ दु:खात गेला. मला आयटीमध्ये नोकरी असल्याने शेवटची काही वर्षे त्यांनी आनंदात घालवली, पण त्यांचे दु:ख काही कमी झाले नाही. हुशार माणसाला सन्मान हवा असतो, जो त्यांना त्यांच्या जिवंतपणी मिळाला नाही. त्यांना जो काही मानसिक त्रास झाला, तो भयंकर होता. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असता, पण या घटनेनंतर माझे वडील १८ वर्षे हिमतीने जगले.

२००६मध्ये माझा सख्खा मामा कै. मुकुंद रामराव देशपांडे याचा स्वतःचा व्यवसाय व ऑफिस हे काही कारणाने बंद झाले. त्यानंतर २००७मध्ये केवळ वर्षभरातच त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. कष्टाने उभा केलेला व्यवसाय ४४व्या वर्षी अचानक कुणामुळे तरी बंद करावा लागणे, हा आघात आहे, ज्याचा परिणाम मा‍झ्या मामाच्या मनावर झाला. आधीच हळवा व संवदेनशील असलेल्या मा‍झ्या मामाला हा धक्का सहन झाला नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

माझे वडील व माझे मामा यांच्यामुळे माझे आयुष्य घडले. कामामुळे होणार्‍या मानसिक आरोग्याच्या समस्यांना सहन करताना मी या दोन्ही जवळच्या लोकांना बघितले आहे. असे व याहून भयानक अनुभव कामाच्या माध्यमातून अनेक लोकांना येतात, ज्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर कधीही न पुसले जाणारे परिणाम होतात. काम हे व्यक्तीची ओळख असते व त्यावर तिचे केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आरोग्यसुद्धा अवलंबून असते!

२००६मध्ये मी जेव्हा आयटी उद्योगात काम करायला सुरुवात केली, त्या वेळेस आयटी उद्योग हा भरभराटीच्या शिखरावर होता. एक आयटी रिक्रुटर म्हणून मी कामाला सुरवात केली, त्याच उद्योगासंबंधित विषयावर पीएच.डी. करून पुढे मी त्यावर एक पुस्तक लिहिले, ज्या पुस्तकाचा विचार मी कधी केला नव्हता. काही गोष्टी नशिबात असतात, तशा त्या-त्या वेळी घडत गेल्या. योग्य माणसांची साथ योग्य वेळी मिळत गेली. या वर्षी माझ्या कारकिर्दीला १५ वर्षे पूर्ण झाली. या वाटचालीत पुणे शहराचा पण तेवढाच वाटा आहे. ही वाटचाल अजिबात सोपी नव्हती.

माझ्या कारकिर्दीची सुरुवात झकास झाली असली तरी, कुटुंबातील जिव्हाळ्याची तीन माणसे २००८ ते २०१२ या काळात अचानक सोडून गेल्याने तारुण्याचा बराचसा काळ हा दु:खातून सावरून धडपड करण्यात गेला. त्याचा मा‍झ्या आयुष्यावर न पुसता येणारा परिणाम झाला. २०१०मध्येच या दु:खातून लक्ष वळवण्यासाठी मी पीएच.डी करण्याचे ठरवले. त्या वेळेस ‘औद्योगिक मानसशास्त्र’ या विषयात नागपूर विद्यापीठात गाईड म्हणून मला अनेकांनी नकार दिला, परंतु नशिबाने डॉ. रुबिना अन्सारी यांनी होकार दिल्याने माझे काम सोपे झाले. चांगला गाईड मिळाला म्हणजे अर्धी पीएच.डी. झाल्यासारखेच असते. ती करत असताना मी स्वतः औदासीन्याचा अनुभव घेतला व त्यातून सहीसलामत बाहेर पडले.

पीएच.डी. करताना माझा भरपूर लोकांशी संपर्क आला, लोकांची दुःखे कळली. चमचमणाऱ्या आयटी उद्योगात सगळेच आलबेल व आनंदी नाही, हे लक्षात आले. त्यानंतर लोकांचा भारतीय मानसिक आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे समजले.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

एप्रिल २०१९पर्यंत १३ वर्षे या उद्योगात काम केल्यावर मला स्वतःला ‘बर्न आऊट’ झाल्यासारखे वाटू लागले व मी आयटीमधील जॉब सोडून थोडा ब्रेक घेतला. त्या काळात मी शिक्षणक्षेत्रात ‘visiting faculty’ म्हणून काम केले. त्याचबरोबर लिखाण व ट्रेनिंग या गोष्टी सुरूच होत्या. परंतु मी प्रामुख्याने इंग्रजी भाषेत लिहायचे. मार्च २०२०ला करोनामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर सहज वेळ जावा म्हणून मी ट्विटर वापरायला सुरुवात केली. त्या वेळी सगळेच गडबडलेले होते. एकदा असेच काहीतरी इंग्रजीमध्ये ट्विट केल्यावर मला ट्विटरवर भेटलेल्या एका मैत्रिणीने आणखी लिही, हे सुचवले. इंग्रजीत लिहून पोस्ट केल्यावर मी ते मराठीत भाषांतर केले. एप्रिल २०२१मध्ये माझा ट्रोलिंगवर लिहिलेला पहिला लेख प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानंतर मी सातत्याने मराठीत मानसिक व सामाजिक आरोग्यावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली.

त्यानंतर काही कारणाने मी ट्विटर बंद केले, पण ब्लॉगिंग चालू ठेवले. ऑक्टोबर २०२०ला माझ्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या वेळेस मी नागपुरातून ‘वर्क फ्रॉम होम’ करत होते. त्या वेळेस आरोग्य-व्यवस्थेचे भयानक रूप बघायला मिळाले. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना प्रचंड ताण अनुभवला. या सर्व घटनांतून भारतीय कामाची पद्धती कशी आहे, याचा वारंवार अनुभव येत गेला.

नोव्हेंबर २०२०मध्ये माझा पहिला मराठी लेख हा ‘अक्षरनामा’ या मराठी वेबपोर्टलवर आला. त्यानंतर मी नियमित ‘अक्षरनामा’वर लिहायला सुरुवात केली. गेल्या आठ महिन्यांत माझे वेगवेगळ्या वेब व छापील या माध्यमात २९ लेख छापून आलेत. हे लिखाण चालू असतानाच पुस्तक लिखाणाची सुरुवात मागच्या वर्षी झाली. या लिखाणाला खरा वेग मार्च महिन्यात आला व मी हे पुस्तक मे महिन्यात लिहून पूर्ण केले. हे लिखाण मी अध्यापनाचे काम सांभाळत पूर्ण केले. कामगार व कर्मचारी यांच्या मानसिक आरोग्यावर लिहायचे हे पक्के होते, पण सुरुवातीला चाचपडत असताना मात्र हळूहळू पुस्तकाला आकार येत गेला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

एक औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणून या पुस्तकात मी भारतीय कार्यव्यवस्थेचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अभ्यास केला आहे. एखाद्या व्यक्तीने कोणते काम कुठे, कसे व का करावे, तसेच ते काम करताना त्या व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि ते काम परिणामकारक व्हावे, यासाठी त्या व्यक्तीचे मानसिक व शारीरिक आरोग्य कसे असावे, हेसुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. 

पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात भारत हा शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक निकषांच्या पातळीवर नक्की कुठे उभा आहे, हे डाटाच्या आधारे सांगितले आहे. मी जेव्हा काम करायला सुरुवात केली, त्या वेळेस भारतीय मनुष्यबळाची गुणवत्ता व आता उपलब्ध असलेले मनुष्यबळ यातील फरक प्रामुख्याने आरोग्याच्या व त्या अनुषंगाने बदलणार्‍या भावनिक व बौद्धिक क्षमता यांच्यात दिसतो.

या नंतरच्या प्रकरणात व्यावसायिक मानसशास्त्र व औद्योगिक मानसशास्त्र यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या सोबत भारतातील कामगार कल्याण कायदे व कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याची काय स्थिती आहे, हे लिहिले आहे.

‘जॉब सेफ्टी अनॅलिसिस’ हा अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित असा मानव संसाधन विभागातील प्रकार व त्याचा वापर करून दहा वेगवेगळ्या व्यवसायातील लोकांचे भारतीय कार्यपद्धतीमुळे त्या व्यावसायिकांच्या मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम, हे तिसर्‍या प्रकरणात सविस्तर मांडले आहे.

मानसिक आरोग्य म्हणजे केवळ मानसिकरित्या विकृत किंवा अस्थिर असणे नसून ताण, झोप, भावना, व्यसन व कामाच्या ठिकाणचे Ergonomics यामुळे कर्मचारी व कामगार यांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे विस्तृतपणे चौथ्या प्रकरणात लिहिले आहे.

मानसिक आरोग्य नीट नसल्यास कामाची गुणवत्ता ढासळते, हे पाचव्या प्रकरणात आकडेवारीसह मांडले आहे. ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’च्या भाषेत एक डॉलर मानसिक आरोग्यावर खर्च केल्याने उद्योगांना चार डॉलरचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्यात गुंतवणूक करणे हे उद्योगांना फायदेशीर असते हे सोदाहरण मांडले आहे.

लॉकडाऊनमुळे भारतीय कामगार विश्वावर काय परिणाम झाले, याचा सविस्तर उहापोह ‘लॉकडाउन व भारतीय कामगार विश्व’ या प्रकरणात केला आहे. त्यात सर्वच वर्गातील कामगारांच्या उत्पन्नावर झालेला परिणाम व त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील विविध घटकांवर पडलेला प्रभाव यावर भाष्य आहे. ‘वर्क फ्रॉम होम’चा फायदा हा कुणाला झाला हे सहाव्या प्रकरणात विस्तृतपणे मांडले आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’मुळे काय फायदे व तोटे झाले, हेसुद्धा सांगितले आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

कामाच्या ठिकाणी आरोग्य हे त्या कामामुळे निसर्गाला किती हानी होते, यावर पण अवलंबून आहे. त्यामुळे परदेशात ‘वेल बिंग प्रोग्राम’ हे कामगारांच्या मानसिक आरोग्यासोबतच निसर्गाची जपणूक कसे करतील, या आधारावर तयार केले जातात, ज्याचा थोडक्यात आढावा हा सातव्या प्रकरणात येतो.

भारतीय कार्यव्यवस्था व मानव संसाधन याची कार्यपद्धती ही कामगारांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करते आणि त्यात कोणत्या प्रकारचा सुधार आवश्यक आहे, याचा नवव्या व दहाव्या प्रकरणात आढावा घेण्यात आला आहे.

कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य योग्य राखण्यासाठी चालवण्यात येणारे ‘वेल बिंग प्रोग्राम’ हे भारतीय उद्योगात कशा स्वरूपाचे असतात व त्यात काय सुधारणा आवश्यक आहे, हे शेवटच्या प्रकरणात लिहिले आहे.

हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश हा, एक वेगळा विषय भारतीय लोकांसमोर आणणे आहे. मी स्वत:ला लेखिका मानत नाही. हे पुस्तक सर्वसामान्यांनाही सहज समजावे म्हणून उदाहरणांसाठी आवश्यक महत्त्वाचा डेटा व आकडेवारी वापरली आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आयटी उद्योगात राहिल्याने एका विशिष्ट वर्गाशी संबंध होता व मुख्य प्रवाहापासून मी दूर होते. आयटी उद्योगात बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टी जरा कमीच आहेत, मात्र लिखाणामुळे मी महाराष्ट्रात व मराठी लोकांशी जोडली गेले. अनेक दिग्गज लोकांसोबत व लोकांसमोर विषय मांडण्याची संधी मिळाली, ज्यामुळे हा दुर्लक्षित विषय बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला.

‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ या विषयावरचे हे पहिलेच पुस्तक असून हे या विषयावरचे अंतिम सत्य असे काही मी मानत नाही. हे पुस्तक पहिले पाऊल असून यावर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. कामगार हा विषय एका पक्षाचा व संघटनेचा नसून प्रत्येकाचा आहे. कारण आपल्यातील बहुतेक जण ‘कामगार’ आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने या विषयाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात येईल आणि काही चांगल्या सुधारणा घडून येतील, अशी एक औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणून अपेक्षा व आशा.

‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ – डॉ. वृषाली राऊत

मैत्री पब्लिकेशन, पुणे

पाने – २००, मूल्य – ३०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5382/Kamgaranche-Manasik-Arogya-

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......