‘तुम्ही आम्हाला चांगलं म्हणायचं अन आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊन गोजारायचं’ असा सत्ताधाऱ्यांचा शुद्ध ‘राजकीय’ व्यवहार असतो!
संकीर्ण - वाद-संवाद
देवेंद्र शिरुरकर
  • भारताचा तिरंगा ध्वज
  • Thu , 25 November 2021
  • संकीर्ण वाद-संवाद कंगना रनौत Kangana Ranaut स्वातंत्र्य Liberty भीक‌ Bheek

पु.ल. देशपांडे यांचा ‘अंतू बर्वा’ सांगतो, त्याप्रमाणे इंग्रज गेला तो कंटाळून, लुटण्यासारखं इथं शिल्लकच काय राहिलं होतं, धंदा बुडीत खाती जायला लागला, फुकलंनित दिवाळे. कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडे! यातला विनोदाचा भाग सोडा. पण अंतू बर्व्यानं इंग्रजांनी भारत का सोडला असावा, याचं उत्तम विश्लेषण केलेलं आहे.

ब्रिटिश हा देश सोडून गेले अन सत्ता एत्तदेशीयांच्या हाती आली. सत्तेत, सरकारमध्ये आणि जिथं सर्वसामान्य जनतेशी संबंधित निर्णय होतात, अशा प्रत्येक ठिकाणी निर्णय घेणारा गोरासाहेब जाऊन तिथं आपल्यातला म्हणजेच ‘आपला माणूस’ आला. या आपल्या माणसांनी आपलं, इथल्या जनतेचं काय कल्याण केलं, याच्याशी आपण सगळे अवगत आहोत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

कधी कधी सध्या जे सुरू आहे, त्यापेक्षा ब्रिटिशांचा प्रशासकीय कारभार बरा होता, असं आपल्यालाही वाटतंच की! इंग्रज जाताना आपल्या हाती जे देऊन गेले, त्याचा आपण उकिरडा केला का, हा यानिमित्तानं विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

स्वातंत्र्यासाठी त्याग करणाऱ्या लोकांची जशी असंख्य उदाहरणं आहेत, तशीच देशसेवेच्या नावाखाली खऱ्याखोट्या पावत्या फाडणाऱ्या लोकांचीही. खूप त्याग, संघर्ष करून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यासाठी ज्या तत्कालीन पिढीनं मोठा त्याग केला, यात दुमत असण्याची शक्यता नाही आणि त्यांच्या त्यागाबद्दल शंका उपस्थित करण्याची गरज नाही. पण स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा आदर करणं आणि ब्रिटिशांकडून भारतीयांकडे झालेल्या सत्तेच्या हस्तांतरणाकडे भाबडेपणाने पाहणं, याचा सहसंबंध जोडणं चुकीचं आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेकांनी जमेल तसे प्रयत्न केले. कोणी सविनय कायदेभंगाच्या मार्गानं, तर कोणी रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळालं, या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करत संघर्ष केला. या सगळ्या प्रयत्नांना मिळालेला प्रतिसाद म्हणून स्वातंत्र्याकडे पाहिलं जात असलं तरी हा देश सोडताना ब्रिटिशांनी जेवढा म्हणून स्वार्थ, फायदा करून घेता आला, तेवढा घेणं स्वाभाविकच होतं. इंग्रज वाटाघाटासाठी ज्यांच्यावर विश्वास ठेवून होते, त्या तत्कालीन प्रस्थापित नेत्यांचा सशस्त्र उठाव करू पाहणाऱ्या वा क्रांतिकारक मंडळींच्या प्रति असणारा व्यवहार हा एकवेळ वादाचा मुद्दा असू शकतो.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

अजून ५० वर्षांनी या देशातील विद्यार्थिदशेत असलेल्या मुलांचा ब्रिटिशांचा वसाहतवाद, त्यांनी केलेली वसाहतींची लूट, भारतासारख्या वसाहतीवरील त्यांचा अधिकार त्यांनी कसा सोडला? याबाबतचा दृष्टिकोन कसा असेल? फार खोलात न जाता तो अधिक वास्तववादी असेल, असं सांगता येईल. कारण भारतीय सत्तेच्या हस्तांतरणाकडे आपण भावनिकदृष्ट्या वा भाबडेपणानं पाहत आलेलो आहोत.

आता पद्मश्री कंगना रणौत या अभिनेत्रीनं १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य ‘भीक’ होती अन २०१४ साली खरं ‘स्वातंत्र्य’ मिळाल्याचं सांगून हा विषय अनायसे ऐरणीवर आणला आहे. त्यानिमित्त तरी या सत्तांतराकडे तटस्थपणे पाहिलं जाईल, अशी अपेक्षा!

मिळालेलं स्वातंत्र्य भीक नसली तरी हाती आलेलं फार काही गाजावाजा करण्यासारखंही नव्हतं, हे लक्षात घ्यायला हवं. इतिहास हा नेहमी जेत्यांचे गोडवे गाणारा असतो, या तत्त्वानुसार स्वातंत्र्याच्या वाटाघाटी या ब्रिटिशांना हव्या त्या मुद्द्यावर झाल्या अन वाटाघाटी करणाऱ्या काँग्रेसी नेत्यांनी किमान इंग्रज हा देश सोडून जाणार या अपेक्षेनं त्या स्वीकारल्या असणं स्वाभाविक आहे. या सत्तांतराचं चित्रण अतिरंजितपणे करण्यात आलं का?

आता हे विषय का उपस्थित केले जाताहेत? त्याने आजच्या एकूण व्यवस्थेत, आपल्या राजकीय प्रक्रियेत, सर्वसामान्य जनतेच्या जगण्यात काही फरक पडणार आहे का?

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

काहीही झालं तरी सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या मुद्द्यावर चर्चा होऊ द्यायची नाही. सध्या आपल्यासमोरील जे प्रश्न आहेत, ते वेगळेच आहेत, त्यांची चर्चा होता कामा नये, त्याकडे चुकूनही कोणाचं लक्ष जाता कामा नये, याची काळजी सगळेच सत्ताधारी घेतात. मग त्यासाठी नको ते विषय, नको त्या व्यक्तींच्या तोंडून, नको त्या वेळी वदवायचे, सगळा झोत या फुटकळ विषयावर राहील, याची विशेष काळजी घ्यायची, ही रीत असते. त्यावर गहजब माजवायला प्रसारमाध्यमं असतातच.

म्हणूनच कोविडमध्ये लोक (ऑक्सिजन, रेमडीसवीर वा अन्य वैद्यकीय सुविधांअभावी) धडाधड मरत असल्याचं वास्तव दिसत असूनही सरकार ऑक्सिजन नसल्यानं कोणी मेलं नसल्याचं संसदेत सांगू शकलं. वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू असतानाही सरकार त्यांच्यावर ‘दहशतवादी’ असल्याचा ठपका मारून दुर्लक्ष करू शकलं. पशुखाद्यासाठी सोया पेंड आयात करून, खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करून, साठ्यावर मर्यादा घालून भारतीय शेतकऱ्यांच्या माना मुरगाळल्या जातात अन सरकार त्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करू शकलं. अपुरं वेतन, कामाच्या विचित्र वेळापत्रकामुळे त्रस्त एसटी कामगार महामंडळाच्या सरकारीकरणाचा आग्रह धरतात आणि त्याच वेळी सरकार मात्र महामंडळाचं खाजगीकरण करण्याचं स्वप्न पाहत असतं.

सरकार कुठलंही असो, जनतेचं लक्ष मूळ मुद्द्यावरून फालतू मुद्द्यांकडे वळेल, याची काळजी घेण्याची कार्यपद्धती सारखीच. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर प्रश्न विचारून पहा- ‘राममंदिर, हिंदुत्व, राष्ट्रवाद’ अशी उत्तरं दिली जातील. महाराष्ट्रातही असे प्रश्न उपस्थित करून पहा- केंद्र सरकार राज्याच्या अधिकारांवर कसं अतिक्रमण करतंय, याचे दाखले दिले जातील!

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

‘देश की जनता भुखी हैं, ये आझादी झुठी हैं’ या आकर्षक पण कटुसत्याच्या पार्श्वभूमीवर आज एक देश म्हणून आणि समाज म्हणून आपलं जे काही सुरू आहे, ते पाहता आपल्याला मिळालेल्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यात स्वातंत्र्य आहे का? आणि असेलच तर त्याचा आपण कशासाठी व किती सदुपयोग करून घेतलाय? ज्यांनी अर्ध्या जगावर राज्य केलं, ज्यांनी वसाहतीमधून लुटलेल्या संपत्तीवर आपली औद्योगिक प्रगती केली, त्यांनाही या जुन्या इतिहासावर आजचा वर्तमान सुखद करता आलेला नाही. अशा वेळी आपल्यासारख्या देशाला वर्तमानात वाटचाल करताना जसा ‘या देशात सोन्याचा धूर निघत होता’, या आठवणींचा लाभ नाही, तशीच धार्मिक उमाळ्यांचीही गरज नाही.

कंगनाच्या विधानाच्या उत्तरार्धावर फारसं बोलण्यासारखं काही नाही. कारण सगळेच सत्ताधारी आपल्या बाजूनं बोलणाऱ्यांचं कोडकौतुक करत असतात, त्यांना गोंजारून ठेवतात, त्यासाठी त्यांच्यावर पुरस्कारांचीही बरसात करतात. त्यामुळे असे पुरस्कार मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती पात्र आहे का, वगैरे प्रश्न निरर्थक ठरतात. या पुरस्कारांच्या निमित्तानं सत्ताधारी आपल्या अवतीभोवती रेंगाळणारं एक वलयांकित कोंडाळं, आपल्या बऱ्या-वाईटाचा (बहुदा वाईटाचाच) उदो-उदो करणाऱ्या लोकांवर अशी बरसात करत असतात. मग तो काळवीट मारणारा सैफ अली खान असो वा अद्वातद्वा बोलणारी कंगना!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सत्ताधाऱ्यांचा ‘तुम्ही आम्हाला चांगलं म्हणायचं अन आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊन गोजारायचं’ असा शुद्ध ‘राजकीय’ व्यवहार असतो! मोदी सरकारने या वेळी जाहीर केलेल्या पुरस्कारार्थींच्या यादीत बरीचशी वेगळी नावं दिसली, म्हणून या पुरस्कार समारंभाची चर्चा सुरूय. मात्र कंगना रणौतला पुरस्कार देऊन सरकारने सगळेच पुरस्कार योग्य व्यक्तीना दिले, असं होता कामा नये, याचीही काळजी घेतली. आता तिनेही तिची भूमिका प्रामाणिकपणे वठवली… यात तिची काय चूक?

..................................................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......