म्हणून अनंतराव भालेराव यांचं स्मरण गरजेचं आहे...
पडघम - माध्यमनामा
प्रवीण बर्दापूरकर  
  • अनंतराव भालेराव यांचे पोर्ट्रेट - सरदार जाधव. ‘कैवल्यज्ञानी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 20 November 2021
  • पडघम माध्यमनामा कैवल्यज्ञानी Kaivalyadnyani अनंतराव भालेराव Anantrao Bhalerao दै. मराठवाडा Marathwada

‘कैवल्यज्ञानी’च्या प्रकाशन समारंभात करावयाच्या मनोगताचा हा मसुदा आहे. अत्यंत निकटच्या आप्ताचे आकस्मिक निधन झाल्यानं या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं नाही. म्हणून ते मनोगत इथे देत आहे.

..................................................................................................................................................................

‘कैवल्यज्ञानी’ हा पत्रमहर्षि अनंतराव भालेराव यांच्या बहुपेडी स्मरणांचा ग्रंथ वाचकांच्या हाती सोपवताना एक विलक्षण समाधान आहे. स्वतंत्र लेखन आणि संपादन असं मिळून, हे माझं पंधरावं पुस्तक. स्वतंत्र लेखनाला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानापेक्षाही संपादनातून मिळणारा आनंद जास्त आहे, हे प्रांजळपणे मी कबूल करतो. याचं कारण कदाचित, गोतावळ्यात रमणं मला आवडतं हे असावं. ‘आई’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘माध्यमातील ‘ती’ आणि आता ‘कैवल्यज्ञानी’ या चार पुस्तकांच्या संपादनाच्या निमित्तानं अभिजनांच्या मांदियाळीत वावरता येण्याचा अनुभव काही औरच होता. गिरीश कर्नाड, महेश एलकुंचवार, आशा बगे, ग्रेस, यशवंत मनोहर, सुरेश द्वादशीवार, ह. मो. मराठे, या सभागृहात उपस्थित असलेले डॉ. सुधीर रसाळ, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपाख्य नानासाहेब चपळगावकर, निशिकांत भालेराव, राधाकृष्ण मुळी, डॉ. सविता पानट अशा असंख्यांच्या  या मांदियाळीत समावेश आहे. कुठलंच पुस्तक कधीच एकट्या लेखकाची निर्मिती नसते. ‘कैवल्यज्ञानी’ही त्याला अपवाद नाही. सर्व सहभागी मान्यवर लेखक, अनेक पत्रकार, ‘अभंग प्रकाशन’चे सर्व सहकारी, मुद्रितशोधनाची महत्त्वाची कामगिरी बजावणारे डॉ. सुरेश सावंत, अंतर्गत मांडणी करणारे अतुल बर्रेवार, संपादनाच्या कामात महत्त्वाची भूमिका निभावणारे संजीव कुळकर्णी, मुखपृष्ठकार सरदार जाधव अशा अनेकांचा सहभाग हा तीनशे पानी ग्रंथ सिद्ध करण्यात लाभलेला आहे. या सर्वाविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अनंतराव भालेराव हे काही पत्रकारितेतील स्कूल किंवा विद्यापीठ नाही, तर  हा मराठवाड्याच्या सलग चार पिढ्यांच्या पत्रकारितेवर, समाजमनावर झालेला मूल्य आणि निष्ठा यांचा तो अमीट संस्कार आहे. निशिकांत भालेराव हा अनंतराव भालेरावांचा पुत्र आणि पत्रकारितेतील माझा दोस्त. अनंतरावांना तो ‘अण्णा’ म्हणत असे.  म्हणून त्यांना मीही ‘अण्णा’चं म्हणत असे. माझ्या वडिलांनाही मी ‘अण्णा’ म्हणत असे, म्हणजे एका अर्थानं ते माझे पितृतुल्यही.

अनंतराव भालेराव यांना जाऊन आता ३० वर्षे झाली आणि त्यांचा ‘मराठवाडा’ बंद होऊनही सुमारे अडीच दशके उलटली, तरी मराठी पत्रकारितेत अनंतराव आणि दैनिक ‘मराठवाडा’ हा संदर्भ आणि महत्त्व अजूनही कालबाह्य झालेला नाही. अनेकांना आवडणार नसलं तरी, स्पष्ट सांगायचं  झालं तर, अनंतराव भालेराव यांच्यानंतर मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जगताचा दुसरा प्रवक्ताच अजूनही निर्माण होऊ शकला नाही, इतकं अण्णाचं एक संपादक म्हणून असलेलं स्थान अनन्यसाधारण आहे.

या पुस्तकाचं नाव ‘कैवल्यज्ञानी’ ठेवण्यामागे एक निश्चित भूमिका आहे. कैवल्य ज्ञान म्हणजे ‘शुद्धज्ञान’. अनंतराव भालेराव यांची पत्रकारिता शुद्ध होती, पत्रकारितेच्या पवित्रतेवर त्यांची अव्यभिचारी निष्ठा होती. त्यांच्या पत्रकारितेचा तो संस्कार आमच्या पिढीवर आहे, म्हणूनच या पुस्तकाचे नाव ‘कैवल्यज्ञानी’ आहे. हा गौरवग्रंथ नाही तर मराठी पत्रकारितेतील चार पिढ्यांवर पत्रकारितेचा शुद्ध संस्कार करणाऱ्या एका वारकऱ्याचे अनेकांकडून हे करण्यात आलेले नम्र स्मरण आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

केवळ अनंतराव भालेरावच नाहीतर त्यांचे समकालीन असणारे रंगा उपाख्य अण्णा वैद्य, दादासाहेब पोतनीस, भाई मदाने, निशिकांत उपाख्य नानासाहेब जोशी, ब्रिजलाल बियाणी, कांतीलाल गुजराथी, सुधाकर डोईफोडे, अनंत गोपाळ शेवडे, ‘सत्यवादी’कार पाटील... अशी महाराष्ट्राच्या विविध भागातील संपादक मंडळी; पत्रकारिता म्हणजे सामाजिक बांधिलकी, जनतेचे प्रश्न मांडणं, अबोलांचा आवाज होणं, सत्य सांगणं, यावर प्रखर निष्ठा ठेवलेले संपादक होते आणि हे स्पष्टपणे सांगण्यासाठी प्रसंगी कारागृहात जाण्याची किंमतही त्यांनी मोजली. तेव्हाची वृत्तपत्रे आजच्यासारखी मालकांच्या नावानं नव्हे तर या संपादकांच्या नावानं ओळखली जात असत, इतका त्यांच्या नावाचा प्रभाव वाचकांच्या मनावर होता.

दोन घटना सांगतो.

एक– एका माध्यम समूहाच्या वार्षिक बैठकीत एका ज्येष्ठ पत्रकाराला त्याच्या वर्षभराच्या उपलब्धीच्या संदर्भात (Key Result Area) विचारण्यात आलं. तेव्हा त्यानं कुठल्याशा सामाजिक विषयावर त्याच्या बातम्या कशा गाजल्या. विधिमंडळात त्या बातम्यांवर घनघोर चर्चा कशी झाली आणि त्या विषयाची उकल होण्यास मदत कशी झाली हे सांगितलं. त्यावर व्यवस्थापनाचा म्हणजे (मालकाचाच!) प्रश्न होता की, ते सगळं ठीक आहे, पण त्याचा आपल्या ब्रॅण्डला त्याचा काय आर्थिक फायदा झाला? याचा अर्थ पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीपेक्षा आर्थिक फायदा व्यवस्थापनाला जास्त महत्त्वाचा वाटतो.

दोन- ‘कैवल्यज्ञानी’ या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या बातम्या बहुतेक सर्व माध्यमात प्रकाशित झाल्या. मात्र ज्या माध्यमात एक वार्ताहर ते एका आवृत्तीचं संपादक असा विविध पदांवर माझा प्रवास झाला आणि ज्या माध्यमात मी दिल्लीचा राजकीय संपादक म्हणून काम केलं, त्यात प्रकाशित झालेल्या बातम्यांत  ‘कैवल्यज्ञानी’च्या संपादकाच्या (म्हणजे माझ्या!) नावाचा उल्लेख नव्हता! ठेंगण्या मनाची किरट्या विचाराची माणसं बहुसंख्येनं जिथं असतात, तिथं यापेक्षा वेगळं काही घडूच शकत नाही (असं काहीसं मूळ प्रतिपादन फ्रेंच विचारवंत व्हॉलटेअर याचंही आहे.) त्यामुळे मला ना त्याचं आश्चर्य वाटलं ना वैषम्यही.  कारण इथं मुद्दा सर्व प्रकारच्या माध्यमातील पत्रकारिता कशी खुजी होत आहे, पत्रकारितेचं कसं सुमारीकरण होतंय हा आहे. एखाद्या माध्यमानं नाव प्रकाशित केल्यानं मी आणखी काही मोठा होणार नाही किंवा न केल्यानं लहानही होणार नाही तर आहे तिथंच राहणार आहे, यांची मला जाणीव आहे मात्र असा खुजा आणि किरटा संस्कार आमच्यावर अनंतरावांकडून झालेला नव्हता, हे इथे आवर्जून सांगायलाच हवं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अनंतराव भालेराव आणि वर उल्लेख केलेल्या सर्व संपादकांनी त्यांच्या सहकाऱ्यांवर केलेला पत्रकारितेवर केलेल्या पत्रकारितेच्या संस्कारांना प्रखर मूल्य आणि निष्ठांची जोड होती. हे आजच्या पिढीतील पत्रकारांना समजावं हे ‘कैवल्यज्ञानी’च्या निर्मितीमागचं एक प्रमुख कारण आहे. अण्णांची पत्रकारिता कशी होती, हे जर समजलंच नाही तर अण्णांसारखे निष्ठावान आणि मूल्यनिष्ठ संपादक ही आजच्या आणि पुढच्या पिढीतील पत्रकारांना एक दंतकथाच वाटू शकेल!

कुठल्याही व्यवसायाच्या यशा-अपयशाचा मुख्य निकष वित्तीय असतो. वार्षिक उलाढालीनंतर किती नफा किंवा तोटा झाला त्यावर त्या उद्योग व्यवसायाचं यशापयश आकडेवारीचा आधार घेऊन मोजलं जातं. लोकशाहीत लोककल्याण आणि सेवाव्रत म्हणून केलेल्या पत्रकारितेतही सामाजिक बांधीलकी महत्त्वाची असते. एखाद्या वृत्तपत्रानं/माध्यमानं जनतेची किती प्रश्न मांडली? किती समस्यांना वाचा फोडली? आणि त्या संदर्भात असंवेदनशील असणाऱ्या सरकारला कसा जाब विचारला हे निकष पाळले जातात. ‘शहाणे करून सोडावे सकल जन‘ आणि सरकार आणि प्रशासनातील सत्ताधाऱ्यांना खडसावणं, त्यांना प्रश्न विचारणं, सांस्कृतिक क्षेत्राला दिशादिग्दर्शन करणं, अशी बहुपेडी कामगिरी पत्रकारिता / माध्यमांना बजावावी लागते.

म्हणूनच एस. टी. महामंडळ नफ्यात आहे की, तोट्यात हा विचार न करता ‘गाव तिथे एस. टी.’ पोहचून जनतेचा प्रवास सुसह्य झाला हे महत्त्वाचं असतं आणि हेच सूत्र सेवा किंवा व्रत म्हणून पत्रकारिता करणाऱ्या संस्थांना लागू होतं. अनंतराव भालेराव यांच्या पिढीनं ते समर्थपणे निभावलं. आजच्या पत्रकारितेत तसं घडत नाहीये. पत्रकाराला राजकीय भूमिका असावी, पण तो कोणत्याही राजकीय विचारांचा प्रवक्ता होऊ नये, हा निकष आता बाद झालाय आणि त्याने अन्य काही स्वीकारलेल्या बंधनांमुळे पत्रकारितेच्या  निर्भीडता आणि विश्वासाहार्यतेवर प्रश्नचिन्ह लागलं आहे. त्यामुळे पत्रकारितेचा तोल  ढळला आहे म्हणूनच अनंतराव भालेराव यांचं स्मरण गरजेचं आहे...

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

स्वातंत्र्यानंतर भारतीय पत्रकारितेचा प्रवास ‘मिशन टू प्रोफेशन टू बिझनेस’ असा झाला. कोणतेही बदल जसे अपरिहार्य असतात, तसेच ते काही बरे आणि काही वाईटही असतात. अध:पतन ही एक मूलभूत प्रक्रिया असते आणि ती अशा बदलातून जन्माला येते. पत्रकारितेच्या बाबतीत निष्ठा आणि मूल्य या दोन्ही निकषावर सर्वच माध्यमातील  विद्यमान पत्रकारितेचं झालेलं संपादकाचं व्यवस्थापनाच्या अधीन होणं त्यामुळे संपादकपद निष्प्रभ होणं (पूर्वी संपादक ही व्यक्ती नव्हे तर संस्था मानली जात असे), बाजारपेठेचा माध्यमांवर वाढलेला दबाव आणि त्यातून पत्रकारितेच्या मूल्य आणि निष्ठांचा उठलेला बाजार अशी अनेक कारणं या अध:पतनासाठी आहेत.

आपल्या देशात जागतिकीकरण आणि खुल्या व्यवस्थापनानंतर हे जास्त वेगानं घडलं. अध:पतनाचं आणखी एक कारण म्हणजे, व्यवस्थापनातली तरुण पिढी व्यवसायात उतरली आणि या पिढीनं निष्ठा व मूल्यापेक्षा पेड न्यूजला विविध माध्यमातून  उदार आश्रय दिला, तेव्हा आवाज न उठवता बहुसंख्य संपादकांनी शेपट्या कापलेल्या उंदराप्रमाणे माना तुकवल्या आणि सर्वच माध्यमांतील पत्रकारितेची विश्वसनीयता  धोक्यात आली .

हा विषय एवढ्या प्रतिपादनात संपणारा नाही, पण सांगायचं इतकंच आहे  की, अनंतराव भालेराव यांना अपेक्षित असलेली आजची पत्रकारिता नाही. ज्येष्ठ मित्र आणि कवीश्रेष्ठ  ग्रेस यांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘केवळ पत्रकारिताच नाही तर, समाजाच्या सर्वच क्षेत्रात बहुसंख्येनं छिनाल जमलेले आहेत!’ म्हणून अनंतराव भालेराव यांचं स्मरण विद्यमान परिस्थितीत पुन्हा एकदा करणं आणि तशी न घाबरता सत्य सांगणारी, सरकारला जाब  विचारणारी निर्भीड पत्रकारिता पुन्हा प्रस्थापित होणं गरजेचं आहे, याचं स्मरण करून देणं,  हेच या ग्रंथाच्या निर्मितीमागचं प्रयोजन आहे.

जो काही  वेळ संयोजकांनी दिला त्यात एवढंच सांगता येणं शक्य आहे, म्हणून या मोठ्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं प्रतिपादन इथेच थांबवतो.

‘कैवल्यज्ञानी’ : पत्रमहर्षि अनंत भालेराव स्मरणग्रंथ - संपा. प्रवीण बर्दापूरकर

अभंग पुस्तकालय, नांदेड

पाने – ३०८,  मूल्य - ३७५ रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......