‘ऑन द फिल्ड’ - साध्या माणसांची आणि त्यांच्या माणूसपणाची वीण उलगडून दाखवणारं पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
मुक्ता सरदेशमुख
  • ‘ऑन द फिल्ड’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Mon , 15 November 2021
  • ग्रंथनामा शिफारस ऑन द फिल्ड ON the Field प्रगती बाणखेले Pragati Bankhele पाकिस्तान Pakistan मच्छीमार Fisherman भगतसिंग BhagatSingh श्रीलंका Sri Lanka यादवी युद्ध Civil War हरयाणा Haryana तृतीयपंथीय बालविवाह ऊसतोड कामगार भटके महिला गावकारभारणी

दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पत्रकार प्रगती बाणखेले यांचे ‘ऑन द फिल्ड’ हे रिपोर्ताज प्रकारात मोडणारं पुस्तक. त्यांच्या राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय भेटींमधल्या वास्तवाचा, बातमीच्या पलीकडच्या जगण्याचा आणि तिथल्या अनुभवांचा परिपाक आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानवी समस्यांचा हा परीघ. आशयघन विषयांची सोपी आणि गोष्टीवेल्हाळ मांडणी हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य.

हे पुस्तक मुख्यत: सहा विषयांवर भाष्य करते. भारत-पाकिस्तानातील मच्छीमारांचे प्रश्न, तृतीयपंथीयांचं जग, ऊसतोड कामगारांची ससेहोलपट, बालवधू-बालविवाह, ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शिक्षण आणि महिला आरक्षण.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..............................................................................................................................................................

या सगळ्या गोष्टींमध्ये, समस्यांमध्ये एक समान धागा आहे माणुसकीचा. या घटनांमधली माणसं ही माणूसपण जपणारी आहेत. ती नाती जपतात, मदत करतात, देश कोणताही असो माणसं इथूनतिथून सारखीच असतात. प्रत्येकाचा प्रवास मात्र वेगळा असतो, हे या पुस्तकातले रिपोर्तज वाचले की, समजतं. भारत-पाकिस्तान हे एकाच भूमीचे दोन वेगळे भाग. पण सामान्य माणसाच्या मनात भूतकाळातल्या वेदनांचा झिरपत आलला विद्वेष आजही दिसतो तो गल्ल्यांमध्ये आणि क्रिकेटच्या सामन्यांमध्ये. आजही ‘भारत का दुश्मन कौन है?’ असं विचारल्यावर झटकन उत्तर येतं- ‘पाकिस्तान’. इतका द्वेष भरलेला असतानाही हे दोन्ही देश माणुसकीच्या समान धाग्यांत बांधले जातात आणि त्यामुळेच या दोन्ही देशांमधला एकजिनसीपणा, साधर्म्य, फरक आणि समस्यांकडे पाहण्याची व्यापकता आणि लेखिकेचा दृष्टीकोन कोणत्याही सजग वाचकाला विचार करण्यास भाग पाडेल.

‘आँखो को विसा नहीं लगता... सपनों की सरहद नहीं होती’

भारत-पाकिस्तान सीमा आणि सातत्यानं बिघडत जाणारे संबंध, यांमुळे या दोन्ही देशांतील वातावरण कायमच तणावग्रस्त राहत आलं आहे. मुंबईचा हमीद अन्सारी हा उच्चशिक्षित मुस्लीम तरुण प्रेमासाठी अवैधरित्या पाकिस्तानात जातो आणि हेरगिरीच्या आरोपात पकडला जातो. आणि उलगडत जातो एक प्रवास, हमीदला भारतात आणण्याचा. डोळ्यात कमालीची अस्वस्थता आणि कारुण्य. आलेले संकट परतवण्याचे सगळे रस्ते बंद. त्यामुळे  पर्यायानं आलेली हतबलता. सीमा भागात राहणाऱ्यांच्या नशिबी हतबलतेची वारंवारिता अधिक. मूल एका परक्या प्रांतात बेकायदेशीर पकडलं जाणं, ही घटनाच केवढी धक्कादायक! त्याला तिथून आपल्या देशात, आपल्या जवळ आणण्यासाठी कसोशीनं धडपडत होती, त्याची आई, फौजिया. त्याच्या सुटकेसाठी दोन्ही देशांची सरकारंच नव्हे, तर यूएनपर्यंत लढणाऱ्या त्याच्या आईची, फौजियाची ‘आँखो को विसा नहीं लगता... सपनों की सरहद नहीं होती’ ही गोष्ट वाचनीय आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

‘निळा दर्या लाल रेघ’

पाकिस्तानातील सिंध आणि गुजरात या दोन प्रांतांना जोडणारा अरबी समुद्र. भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या तीन युद्धांनंतर बंद झालेला सागरी मार्ग. दोन्ही देशातील मासेमार चांगल्या मासळीसाठी समुद्रात दूर जातात. मासळी मिळाली तर चांगला भाव मिळेल या इर्ष्येपोटी खोल समुद्रात उतरतात आणि एकमेकांच्या सागरी हद्दीत तटरक्षक दलांकडून पकडले जातात. असे कितीतरी मासेमार एकमेकांच्या तुरुंगात आपल्या सुटकेच्या प्रतीक्षेत खंगतात. परक्या प्रांतात अडकलेले कैदी खचतात, तर कधी कोणत्या तरी आजारानं ग्रासतात. गजाआड मृत झालेल्या कैद्यांच्या मृतदेहाचे धिंडवडे होतात. मेलेली व्यक्ती भारतीयच होती, हे सिद्ध करणारे पुरावे पुन्हा पुन्हा सादर करावे लागतात. प्रचंड तणाव. केविलवाण्या नजरेनं आपल्या माणसाच्या मृतदेहाची प्रतीक्षा. मृत व्यक्तीचं नागरिकत्व सिद्ध करण्याची कागदोपत्री धडपड. मृतदेहावर अंत्यसंस्कार व्हावे एवढीच इच्छा असणारे नातेवाईक घरातला माणूस गेल्याच्या बातमीनं सैरभैर झालेले असतात. शेवटी विछिन्न अवस्थेत मृतदेह त्यांच्याकडे सुपूर्द केला जातो. हे भयाण वास्तव ‘निळा दर्या लाल रेघ’ या लेखात वाचायला मिळतं.

‘बालाघाटातल्या बालवधू’

‘इपरीत झालं तर गरिबाच्या अब्रूचं खोबरं व्हतंय, पोरीच्या जातीचा जिवाला लई घोर’ हे वाक्य बालघाटातल्या बालवधूंचं सार आहे. दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकांचा हा प्रदेश दुष्काळग्रस्त. दिवाळीपर्यंत शेतात येतील ती पिकं घ्यायची आणि नंतर साखर कारखान्यांच्या पट्ट्यात ऊसतोडणीला चार-सहा महिन्यांसाठी बाहेर पडणं हा शिरस्ता. मुलींना घरी ठेवून जाणं हे तसं जोखमीचं काम. त्यामुळे मुलीचं लग्न करून जबाबदारीतून मुक्त होणं हेच परवडणारं. कुपोषण, अ‍ॅनिमिया, यांमुळे एकीकडे आलेला अशक्तपणा, तर दुसरीकडे काम जमलं नाही, तर सासरी मारहाण ठरलेली. भकास चेहऱ्यांनी जगणाऱ्या या मुलींचं आयुष्य नवऱ्याच्या अकाली मृत्यूनं अजूनच केविलवाणं होतं. ‘बालघाटातील बालवधू’ या प्रकरणातून हे वास्तव समोर येतं.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

या विषयांना लेखिकेनं भावनेच्या कोशात लपेटल्यानं वरकरणी या सगळ्या समस्यांना भावनेचा रंग आहे. या समस्या बहुआयामी आहेत. या समस्यांना आंतरराष्ट्रीय, राजकीय, आर्थिक बाबी कारणीभूत आहेत. मात्र यातील तथ्ये, आकडेवारी, राजकारण, या बाबींची दखल खूप त्रोटक आहे.

उदाहरणार्थ भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये इतकी तेढ असताना झालेल्या लष्करी कारवाया, पाकिस्तानमधला दहशदवाद, त्याभोवती फिरणारं राजकारण, आंतरराष्ट्रीय पडसाद, हिंदू-मुस्लीम संबंध आणि सामान्य माणसाची झालेली होरपळ इतका मोठा आवाका असणारा हा विषय. परंतु या कथा फक्त माणसांभोवती फिरत असल्यानं विषयाच्या सगळ्या बाजू पुस्तकात येण्यास मर्यादा आहेत. 

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा -

‘रिपोर्ताज’मुळे बातमीमागची बातमी शोधता येते, समस्येच्या मुळाशी जाता येतं आणि प्रश्नाचं खरं स्वरूप सविस्तरपणे समोर आणता येतं - प्रगती बाणखेले

.................................................................................................................................................................

‘आँखो को व्हिसा नही लगता… सपनों की सरहद नहीं होती…’ हे वाक्य या पुस्तकाला तंतोतंत लागू पडतं. माणसं डोळ्यात स्वप्न साठवून आयुष्य काढतात. ही माणसं सामान्य असतात. त्यांचे राग-लोभ असतात; पण ठासून भरलेला विद्वेष राजकारणातून येतो. अनेकदा तो वैयक्तिक अनुभवातून वाढत जातो. भारत-पाकिस्तान संबंधात तो कमालीचा राजकीय बनला असला तरी माणसं तशीच साधी असतात. माणूसपण जपत राहतात. ते वाढवत राहतात. त्यालाही कधी तडे जातात हे खरं, पण एकदा का ‘ऑन द फिल्ड’ उतरलं की, अशी साधी माणसंच असतात अवतीभोवती.

हे पुस्तक अशाच माणसांची आणि त्यांच्या माणूसपणाची वीण चांगल्या प्रकारे उलगडून दाखवतं. वैश्विक वेदनांचं हे सारं चित्रण आहे. या समस्यांना सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आणि आर्थिक किनार आहे. वेगवगळ्या जाणीवांचा हा प्रवास आणि त्याभोवती फिरणारं हे पुस्तक आहे. लेखिका फक्त समस्यांची आणि प्रश्नांची सरबत्ती न करता त्यात घडलेल्या चांगल्या, सकारात्मक कामांची दखलही घेते. प्रत्यक्ष अनुभवातून हे चित्र उलगडत जातं.

थोडक्यात, या पुस्तकातील हकीकती, घटना, संघर्ष आणि भावनांचं भान वाचकाला हेलावून टाकणारं आहे.

‘ऑन द फिल्ड’ – प्रगती बाणखेले

प्राजक्त प्रकाशन, पुणे

पाने – १८४, मूल्य – २४० रुपये.   

.................................................................................................................................................................

लेखिका मुक्ता सरदेशमुख पत्रकारितेच्या विद्यार्थिनी आहेत.                                                           

sardeshmukhmukta@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......