अमीश त्रिपाठी : ‘भारताचा टॉल्किन’, ‘भारतातला पहिला साहित्यिक पॉपस्टार’, ‘पौराणिक कथाकार’ वगैरे…  
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
जीवन तळेगावकर
  • अमीश त्रिपाठी आणि त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ
  • Fri , 12 November 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो अमीश त्रिपाठी Amish Tripathi द इमॉर्टल्स ऑफ मेलूहा The Immortals Of Meluha द सिक्रेट ऑफ द नागाज The Secret of the Nagas द ओथ ऑफ द वायुपुत्राज The Oath of the Vayuputras राम : सायन ऑफ इक्ष्वाकू Ram - Scion of Ikshvaku सीता : वॉरिअर ऑफ मिथिला Sita - Warrior of Mithila रावण : एनेमी ऑफ आर्यावर्त Ravan - Enemy of Aryavarta

ललितेतर वाचणाऱ्या वाचकालादेखील ललित-वाङ्मयाची गोडी लावणारा लेखक म्हणजे अमीश त्रिपाठी. आजपर्यंत त्यांनी दोन ‘ट्रिलॉजी’ लिहिल्या आहेत. भारतीय मानसाला भूरळ घालणाऱ्या ‘शिव’ आणि ‘राम’ या दैवी पुरुषांविषयी. त्यांच्या मानवी भूमिकेत शिरून, क्वचित अद्भुताच्या (रोमँटिसिझम) आधाराने. अमीशने भारतीय खंडकाव्य वा पौराणिक वाङ्मय इंग्रजीतून तरुणांसाठी वाचनीय बनवलं आहे, त्याचं श्रेय त्यांना द्यायलाच पाहिजे.      

शिवासंबंधी त्यांची तीन गाजलेली पुस्तकं अनुक्रमे ‘द इमॉर्टल्स ऑफ मेलूहा’, ‘द सिक्रेट ऑफ द नागाज’ आणि ‘द ओथ ऑफ द वायुपुत्राज’ या नावानं आली. रामासंबंधीची तीन पुस्तकं ‘राम : सायन ऑफ इक्ष्वाकू’, ‘सीता : वॉरिअर ऑफ मिथिला’, आणि ‘रावण : एनेमी ऑफ आर्यावर्त’ या नावानं आली.

त्यांच्या पहिल्याच पुस्तकानं वाचकांना अक्षरशः वेड लावलं, विशेषतः तरुणांना आणि दुसऱ्या ‘सिक्वल’बद्दल त्यांची उत्कंठा जागृत ठेवली. लोक एकमेकांना ऑफिसात विचारायला लागले, ‘मेलूहा वाचलंस का?’ ती जणू नवी ‘स्टाईल स्टेटमेंट’च झाली होती. पुस्तक प्रकाशित झाल्यावर काही महिन्यांनी मलादेखील एकदा एअरपोर्टवर माझ्या मित्राने ‘ए एच व्हीलर’ बुक स्टॉलवर ते पुस्तक दाखवून विचारलं, ‘हे वाचलंस का?’ मी निर्विकारपणे ते चाळून त्याला सांगितलं, ‘मला इंग्रजी फिक्शन वाचवत नाही.’ तसा तो उसळलाच. म्हणाला, ‘हा काय माज आहे? तो उतरवण्यासाठी तरी हे फिक्शन तू वाचलंच पाहिजे.’

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

निव्वळ त्यानं भरीस पाडलं म्हणून मी ते घेतलं. घेतल्यावर न वाचणं हा अपराध वाटून घरी आल्यावर रात्री झोपायच्या आधी ते वाचायला घेतलं, तर एका पाठोपाठ एक पानं सरकवत मी कधी त्या कथेचा भाग झालो ते कळलंच नाही. सतीच्या नेत्रपल्लवांत आणि तिबेटन ट्रायबल लीडर शिवाच्या लयदार नृत्यात व युद्ध कौशलात मी गुरफटत गेलो. माझ्या नकळत मॅरिहुआना घेणारा रांगडा शिव माझा हिरो झाला. लागोपाठ वेळ मिळेल तेव्हा साधारणतः एक आठवडाभरात ते मी भारावल्यासारखं वाचून काढलं.

मला शिवाची ही मानुष रूपातील गोष्ट मनापासून आवडली. त्याचं घायाळ होणं, मग जखमेवर उपचार करणं, समोरच्या गोड बोलणाऱ्या शत्रू-सैनिकांवर लगेच विश्वास टाकणं, सतीच्या रूपावर भाळणं, एखाद्या दिव्यासाठी आत्मविश्वासाच्या बळावर तयार होणं, अगदी सहज वाटलं. एरवी इंग्रजी फिक्शनची दहा पानं न उलटू शकणारा मी या कथेच्या पुढच्या भागाची उत्सुकतेनं वाट पाहू लागलो. तसेच दोन्ही ‘ट्रिलॉजीच्या प्रत्येक भागाबद्दल झालं.

अंतर्गत बंडाळीने ग्रासलेल्या कैलाश पर्वतामधून शिव आपल्या लढवैय्या साथीदारांसमवेत मेलूहा नावाच्या विकसित प्रातांत येतो, तिथं त्याच्या लोकांवर उपचार करताना तो नीलकंठ आहे, असे राजवैद्य आयुर्वतीला उमगतं. ती त्याच्यापुढे नतमस्तक होते. तो पुढे तेथील राजा दक्षाला भेटतो, त्याची मुलगी सती पुढे शिवाची पत्नी होते. मेलूहातील लोक आपल्या दीर्घायुष्यासाठी अमृत प्राशन करत असतात, हे त्याला कळतं. पुढे मंदार पर्वतावर मेलूहाच्या मुख्य वैज्ञानिकाची, बृहस्पतीची आणि शिवाची मैत्री होते. या अमृताचा (सोमरसाचा) साठा रोडावत चालला आहे, ही काळजी स्थानिकांना ग्रासून टाकत असते, त्यासाठी तो शिवाची मदत मागतो.

पूर्वेकडील स्वद्वीपावरील चांद्रवंशी आणि मेलूहातील सूर्यवंशी असा संघर्ष नंतर पेटतो, तो अमृतासाठीच असतो. दरम्यान एक शूर नागवंशीय सतीच्या मागावर असतो, तो मेलूहातील सोमरसाचं उंचावरचं केंद्रच जाळून टाकतो.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

त्यातून पुढच्या भागातील कथानक आकार घेतं. दक्षिणेत दंडकारण्यातील नागवंशी म्हणजे सूर्यवंशीयांचं त्याज्यपुत्र (बॉर्न विथ डिफॉर्मिटीज) असतात असं दाखवलं आहे. ते रूपानं चांगले नसले तरी स्वभावानं अधिक चांगले असतात, असं शिवाला नंतर जाणवतं. त्यांचा मार्गदर्शक बृहस्पतीच असतो, असं या भागाच्या शेवटी कळतं. दरम्यान शिवाचा अमृताचा शोध त्याला काशीला घेऊन जातो. तिथं त्याला एक वायुपुत्र वासुदेव नागवंशीयानं दिलेलं औषध देतो. तिथं शिव आणि सतीचा पुत्र कार्तिकेयाचा जन्म होतो. शिवाची परशुरामाशी भेट होते, तो त्याला ‘नागवंशीय चांगले लोक आहेत’, असं सांगतो. दरम्यान सतीला काशीजवळ जंगलात वाघापासून तिची बहीण आणि आधीचा मुलगा गणेश वाचवतात, तिला त्याची काहीच कल्पना नसते. ‘पुत्र मृत जन्माला होता’, असं तिला सांगितलेलं असतं. ते दोघं नागवंशीय असतात म्हणून त्यांचा मेलूहानं त्याग केलेला असतो. सतीची बहीण काली नागांची राणी असते, ती आणि गणेश शिवाला भेटतात, तेव्हा कार्तिकेयाला वाघांपासून गणेशानं वाचवलं म्हणून शिव त्याला जवळ करतो; अन्यथा गणेशानं मेरूमंदाराच्या आगीत बृहस्पतीला अमृतासाठी मारलं आहे, असा शिवाचा समज झालेला असतो. पुढे ते दंडकारण्यात पंचवटीला नागवंशीयांसोबत जातात. तिथं शिवाला बृहस्पती जिवंत आहे, हे कळतं आणि तिसरा भाग आकार घेऊ लागतो.

बृहस्पती शिवाला सांगतो की, सोमरस (अमृत) बनवण्यासाठी सरस्वती नदीचंच पाणी लागतं. त्यामुळे ती रोडावत चालली आहे आणि या प्राशनाचे काही दुष्परिणाम आहेत. त्यामुळे मेलूहांच्या पोटी नागवंशीयांचा जन्म होतो आणि या प्रक्रियेतील उर्वरकांमुळे बह्मपुत्रा दूषित होते आणि काशीसारख्या भागात प्लेग जोर धरतो. केवळ काही लोकांनी दीर्घायुषी व्हावं म्हणून इतरांनी दुष्परिणाम भोगणं अन्यायकारक आहे, हे शिवाला उमगतं. शिव पुन्हा महादेवाचे अंश असलेल्या वासुदेवांना भेटण्यासाठी परिहा भागात उज्जैनला जातो. तिथं त्याला तोच दुसरा महादेव असल्याचं कळतं आणि तो मेलूहांविरुद्ध युद्ध पुकारतो. कार्तिक आणि गणेश अयोध्येवर आक्रमण करून महर्षी भृगु यांना मेलूहाला मदत करण्यापासून थांबवतात. शिवाची एक हार झाल्यावर वायुपुत्र शिवाला पाशुपतास्त्र देतात.   

दक्ष दरम्यान तहाची बोलणी सुरू करतो, पण शिवाकडून बोलणीसाठी गेलेल्या सतीचा त्या वेळी दक्षाने शिवाचे प्राण घेण्यासाठी आणलेल्या ईजिप्शियन हत्याऱ्याकडून अंत होतो. न राहवून शिव दक्षाचं राज्य मिटवून टाकतो. शिव सतीच्या अवशेषांपासून बावन्न शक्तिपीठांची निर्मिती करतो आणि आपल्या स्वस्थानी कैलासावर जाण्यासाठी परत फिरतो.   

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

वाचकाला कथावस्तूच्या जिवंत चत्रणात गुंफून ठेवणं हे या लेखकाचं शक्तिस्थान. त्याची इंग्रजी भाषा तरल आणि संवादी आहे. तो शब्दांतून चलतचित्रागत प्रसंग अगदी डोळ्यासमोर साकारतो आणि आपण जणू कुठेतरी त्या वेळी झाडामागे दडून तो चलचित्रपट पाहात असतो. काही काळासाठी भान हरपून त्या कथेशी एकरूप होतो.

तसेच, कुबेराचं लंकेतील राज्य रावणानं आपल्या व्यापार कौशल्याच्या बळावर मिळवलं. रावण हा एक मोठा ‘सेल्फ मेड’ साहसी दर्यावर्दी होता. त्याने सप्तसिंधू प्रदेश जिंकला आणि आपल्या नीतीप्रमाणे त्यांच्यावर राज्य न करता विशिष्ट कर आकारला. त्यातून त्यानं जिंकलेली राज्यं अधिकाधिक गरीब होत गेली, अशी संहिता लेखकानं ‘राम’ ट्रायोलॉजी संदर्भात मांडली आहे आणि त्यातून रामकथा फुलवली आहे.

सीतेला तर लेखकानं मिथिलेची ‘वॉरिअर प्रिन्सेस’ म्हणून दाखवलं आहे. मिथिला या नगरीचं केलेलं वर्णन अफलातून आहे. ते वाचताना जनकाच्या मिथिलेत, तेथील घरांच्या अरुंद बोळांतून सीता-स्वयंवराच्या वेळी झालेली रावणाची फजिती पाहत आपण वावरत आहोत, असं वाटतं.    

शिवाय, भाषेच्या आणि अर्थाच्या बाबतीत आक्षेप घेता येईल असं न लिहिणं, हा नियम अमीशने या धार्मिकदृष्ट्या संवेदनशील विषयांच्या बाबतीत अगदी काटेकोरपणे पाळला आहे. या नियमाला थोडी मुरड ‘रावण’ या शेवटच्या भागात घातली आहे. विशेषतः कुंभकर्ण व समीची संबंधी काही प्रसंगांत; कदाचित आसुरी वृत्ती दृगोचर करण्यासाठी तसं केलं असावं. पण तरलपणे लिहिणाऱ्या या लेखकानं आतापर्यंत एवढं सुरेख लिहिलं आहे की, त्या काही शब्दांशिवाय त्याला प्रत्ययकारी प्रसंग रंगवता आले नसते, यावर विश्वास ठेवता येत नाही. ते संवाद अपवादात्मक मानावयास हवेत.

या शिव व राम चरित्रात स्थानमहात्म्याला जागा आहे आणि त्यासंदर्भात लेखकाने अगदी नकाशांसकट स्थानाचा महिमा वर्णिला आहे. त्यामुळे सरितेसारख्या प्रवाही कथेला इतिहासाचे कल्पित बंध असले तरी भूगोलाचे भक्कम बांध आहेत. लेखकाच्या या संशोधनात्मक भूमिकेमुळे या कथेला निव्वळ अद्भुतरम्य ठरवणं अन्यायाचं होईल. ऐतिहासिक पात्रांच्या बाबतीत फार काही वैकल्पिक भूमिका लेखकाने घेतलेली नाही, उलट त्या पात्रांचा आपापसातील बनाव वा बेबनाव अधिक माहितीपूर्ण चित्रणातून जिवंत केला आहे. उदा. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यावर साकारलेले प्रसंग. विकल्प फक्त काही रोमँटिक प्रसंगांच्या बाबतीत घेतले आहेत. त्याला ऐतिहासिक आधार असण्याची शक्यता नसल्यामुळे ते लेखकाचे स्वातंत्र्य समजायला प्रत्यवाय नसावा.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

जरी या पुस्तकांचे अनुवाद मराठीत उपलब्ध असले तरी अमीशच्या भाषेच्या श्रीमंतीचा अनुभव घेण्यासाठी ही पुस्तकं मूळ इंग्रजीतच वाचणं अधिक समृद्ध करणारं ठरतं. ‘बिझनेस टाइम्स’ने अमीशला भारताचा ‘टॉल्किन’ (‘द लॉर्ड ऑफ रिंग्स’सारख्या विख्यात फँटसीचा लेखक) म्हणून गौरवलं, तर शेखर कपूरने त्याला ‘भारतातला पहिला साहित्यिक पॉपस्टार’ म्हटलं आहे. ‘हेराल्ड’ने ‘पौराणिक (मायथॉलॉजिकल) कथाकार’ म्हटलं.  

ज्या अ-भारतीयांना भारतीय खंडकाव्यं जाणून घ्यायची ओढ असते, त्यांच्या हाती एकदम मूळ संहिता किंवा त्याचा अकॅडेमिक इंग्रजी अनुवाद दिला की, ते त्यापासून अधिक दूर जातात. त्यापेक्षा त्यांना अमीशने लिहिलेली ‘रामायण’ या आर्ष काव्याची अद्भुतरम्य ओळख अधिक वाचनीय वाटण्याचा संभव आहे. त्यातून त्या वाचकाला मूळ ग्रंथ वाचण्याची प्रेरणा मिळेल आणि मग ते अधिक माहितीपूर्ण ग्रंथांकडे वळू लागतील. हाच नियम अगदी माहितीपूर्ण वा विदग्ध न वाचणाऱ्या भारतीय तरुणांनादेखील लागू पडतो.

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......