‘जय भीम’चा घोष न करताही ‘जय भीम’ म्हणता येतं, जो सिनेमाचा नायक सूर्यानं सगळ्या व्यवस्थेला केला आहे
कला-संस्कृती - चलत्-चित्र
मिलिंद कांबळे
  • ‘जय भीम’ या सिनेमाची एक पोस्टर्स
  • Mon , 08 November 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र जय भीम Jai Bhim टी. जे. ज्ञानवेल T. J. Gnanavel सूर्या Suriya प्रकाश राज Prakash Raj

काल बहुचर्चित आणि भारतभर गाजत असलेला ‘जय भीम’ हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहून कोणत्याही माणसाच्या - मग तो कोणत्याही विचारधारेचा असू द्या किंवा सिनेमात दाखवलेला अन्याय करणारा असू द्या - डोळ्यात पाणी येते आणि संगिनीला न्याय मिळावा असं वाटतं.  जवळ जवळ पावणे  तीन तास खिळवून ठेवणारा हा सिनेमा आहे. 

पा रणजितने ‘अत्तकाठी’पासून तामिळ सिनेमात ‘आंबेडकरवाद’ आणला. तेव्हापासून एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये छायाचित्रात दिसणारे आंबेडकर आणि त्यांची विचारधारा यावर एक से बढकर एक सिनेमे यायला सुरुवात झाली. त्याच परंपरेतला हा एक महत्त्वाचा सिनेमा.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

याचं नाव ‘जय भीम’ असल्यामुळे आधीपासून उत्सुकता होती की, सिनेमात कुठे बाबासाहेबांचं नाव येतंय, नायक बाबासाहेबांना मानणारा आहे का, ‘जय भीम’चा घोष किती वेळा आहे. या प्रश्नांची उत्तरं सिनेमा पाहताना मिळतात आणि शेवटी ‘जय भीम’चा खरा अर्थ समजतो.

हा चित्रपट खऱ्या घटनेवर आधारित आहे. तामिळनाडूमध्ये जयललिता सत्तेत आल्या की, राज्यात दलित अत्याचार वाढायचे. त्यांच्याच काळात ९३ साली घडलेल्या एका घटनेवर आधारित या सिनेमाची कथा आहे. ती अगदी साधी आहे. एका गावात चोरी होते. त्याच्या आरोपाखाली स्थानिक पोलीस आदिवासी जमातीमधल्या तिघांना अटक करतात आणि त्यांनी गुन्हा कबुल करावा म्हणून अमानुष मारहाण करतात. आणि अचानक ते फरार झाले असं सांगितलं जातं, पण पोलिसांनी केलेली अमानुष मारहाण बघून ते फरार होतील, यावर संगिनीचा विश्वास बसत नाही. ते नक्की फरार झाले किंवा त्यांचं नक्की काय झालं, याचा शोध घेण्यासाठी ती चेन्नईस्थित मानवाधिकार खटले लढणाऱ्या चंद्रू या वकिलामार्फत  न्यायालयात याचिका दाखल करते, आणि मग सुरू होतो खरा खेळ!

पोलीस विरुद्ध चंद्रू अशी लढाई सुरू होते, न्यायालयात आणि न्यायालयाबाहेरसुद्धा. चंद्रू जबरदस्त प्रयत्न करत एक एक बिंदू जोडत आदिवासींना चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी केलेली अटक कशी चुकीची आणि फसवी आहे, हे सिद्ध करतो आणि न्यायालयाला त्या तिघांचं नक्की काय झालं, ते कुठे आहेत, यासाठी डीजीपी रँकच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करायची विनंती करतो. ती मान्य झाल्यावर त्या अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण खटल्याचा शोध घेत पोलिसांनी आपली दमनशक्ती वापरून कसा त्या तीन आदिवासींवर अन्याय केला, त्यातल्या एकाचा खून करून कसा नामानिराळं राहण्याचा प्रयत्न केला, हे सगळं न्यायालयासमोर उघड करतो, आणि संगिनीला न्याय मिळवून देतो. 

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

‘सिंघम’ म्हणून तामिळनाडूमध्ये लोकप्रिय असणारा सूर्या या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत आहे. चंद्रूची भूमिका करताना त्याने न्यायालयात कसे वागतात, न्यायालयाची कार्यपद्धती कशी असते, याचा पुरेपूर अभ्यास केल्याचा प्रत्यय येतो. संगिनीच्या भूमिकेत लिजमोल जोसने ‘चार चाँद’ लावले आहेत. (भारतात सिनेमात काळी माणसं दाखवण्यासाठी गोरी माणसंच का निवडली जातात, सरळ काळ्या रंगाचे लोक का घेतले जात नाहीत?)

प्रकाश राज यांनी छोटीशीच पण लक्षात राहील अशी भूमिका केली आहे. त्याचबरोबर लक्षात राहतात ते पोलीस. गरिबांना मारत असताना त्यांच्या चेहऱ्यावरची क्रूरता आणि न्यायालयात गरीब शेळीगत वर्तन. आदिवासींना केलेली अमानुष मारहाण डोळ्यात पाणी आणते, इतका जिवंत अभिनय केला आहे आदिवासी आणि पोलिसांनी. राज्याचे अधिवक्ता पोलिसांना प्रकरण मिटवून टाकण्याची सूचना करतात, तेव्हा पोलीस संगिनीला जबरदस्तीनं पोलीस स्टेशनला आणून खटला मागे घेण्याची विनवणी आणि मारहाण करत असतात. त्या वेळी वरून फोन येतो की, संगिनीला सहीसलामत घरी सोडून या. त्या वेळी आत्मविश्वासानं चालणारी संगिनी आणि लाचार झालेले पोलीस, हा प्रसंग अतिशय मस्त झाला आहे. खूप आनंद होतो तो पाहताना.

आता संगीताबद्दल. ते अत्यंत समर्पक, उचित आहे. या सिनेमात एकूण सहा गाणी आहेत. मराठी प्रेक्षकांना तामिळ संगीत कदाचित आवडणार नाही, पण त्याचे शब्द जर समजून घेतले तर हे संगीत चांगलं वाटू लागेल. ‘कास्टलेस कलेक्टिव्ह’मधून पुढे आलेल्या अविरुने ‘पॉवर’ हे जबरदस्त गाणं शब्दबद्ध केलंय आणि गायलंही.

सिनेमाच्या दिग्दर्शनात काही त्रुटी जाणवत राहतात, पण एस. कथिरच्या सुंदर अशा सिनेमॅटोग्राफीमुळे त्याचा काही मोठा प्रभाव सिनेमावर राहत नाही. एस. कथिरचा कॅमेरा आपल्याला सिनेमाभर गरीब लोक, त्यांची घरं, चंद्रूचं घर, त्यात असणारे मार्क्स, पेरियार, आंबेडकर दाखवत राहतो. त्याच्या घरातील बुद्ध पुस्तकं दाखवत राहतो. न्यायालयात काय बोललं जातं, न्यायालयाची काम करण्याची पद्धत कोणती, हे सगळं उत्तम प्रकारे दाखवलं आहे त्याच्या कॅमेऱ्यानं. सिनेमॅटोग्राफी हे या सिनेमाचं एक शक्तिस्थळ आहे.

सिनेमाच्या शेवटी संगिनीला न्याय मिळाल्यावर लक्षात येतं की, ‘जय भीम’चा घोष न करताही ‘जय भीम’ म्हणता येतं, जो सिनेमाचा नायक सूर्यानं सगळ्या व्यवस्थेला केला आहे.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा : या सिनेमाचं ‘जय भीम’ हे शीर्षक अनेक क्रांतिकारक विचारांचं सिन्थेसिस म्हणून वापरलं आहे!

..................................................................................................................................................................

आता थोडंसं बाहेरचं. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून काही लोक म्हणत आहेत की, यात कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रचार आहे आंबेडकरवादाच्या नावाखाली. तर त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, हा सिनेमा १९९३ सालात घडतो. त्या वेळी तामीळनाडूत डावे पक्ष होते, चंद्रू स्वतः त्या पक्षात होते. त्यामुळे तेच दिसणार. आताच्या काळातल्या सिनेमात आंबेडकर दिसतात (उदा. ‘पेरियेरुम पेरुमल’, ‘काला’).

दुसरा एक आक्षेप घेतला जातोय की, सिनेमात ‘जयभीम’ची घोषणा नाहीये. या सिनेमात एका गरीब आदिवासीच्या न्यायासाठी कुणी तरी व्यवस्थेशी लढत आहे, तेच तर ‘जय भीम’ आहे, दुसरं काय आहे ‘जय भीम’? 

या सिनेमाद्वारे ‘आंबेडकरवाद’ जागतिक सिनेमात पोचावा...

..................................................................................................................................................................

लेखक मिलिंद कांबळे अर्बन डेव्हलपमेंट या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करतात.

milindkamble.rd@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख