‘आमचा बाप आन् आम्ही’ हे पुस्तक घडत्या वयातील तरुणांनी आवर्जून वाचावे आणि त्यातील यशोगाथा समजून घ्याव्यात…
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
जीवन तळेगावकर
  • ‘आमचा बाप आन् आम्ही’
  • Mon , 01 November 2021
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक आमचा बाप आन् आम्ही Aamcha baap aan aamhi नरेंद्र जाधव Narendra Jadhav

डॉ. नरेंद्र जाधव यांच्याआमचा बाप आन् आम्हीया बहुचर्चित पुस्तकाची नुकतीच २०१वी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या विक्रमी आवृत्तीच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी

..................................................................................................................................................................

माणूस हा पोटार्थी प्राणी. रोजचे रहाटगाडे ओढणे हे त्याचे प्राक्तन. असे असताना गरिबीची झळ सोसून मूल्य सांभाळत राहणं म्हणजे दोरीवरून तोल सावरत चालण्यासारखं. मुला-बाळांचा संसार चालवत, गरिबीने थकून-भागूनही मोडून न पडता कणा ताठ ठेवून मुलांना मूल्य-शिक्षण देणं हे विलक्षण प्रेरणेशिवाय व आंतरिक जिद्दीशिवाय केवळ अशक्य.

ते साध्य करून दाखवणारी राही आई आणि या संघर्षमय यशोगाथेचा नायक, म्हणजे लेखकाचे वडील- ‘बाप’ आणि त्यांना कायम साथ देणारी लेखकाची आई- ‘मातोसरी’… ही विलक्षण माणसं.

सर्व कष्ट सोसत, दारिद्र्य वागवत, रात्र रात्र जागवत अभ्यास करणारी, त्यांची ध्येयवेडी मुलं त्या आईबापांची कूस उजळवून टाकणारी निघाली, हे त्यांच्या अखंड परिश्रमाला आलेलं फळ. ‘आमचा बाप आन् आम्ही’ हे डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र, एक व्यवहाराचा व्याप नसला तर एका बैठकीत संपवावे असे प्रवाही आहे, किंबहुना एकदा हातात घेतले की, शेवटपर्यंत सोडवत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या कुलगुरूपदी राहिलेले, एक हाडाचे शिक्षक असूनही कायम विद्यार्थी राहिलेले. एक जागतिक अर्थतज्ज्ञ असूनही विविध प्रांतात सहजपणे संचार करणारे, अगदी राजकारणातदेखील. मराठी, हिंदी, इंग्रजीच नव्हे तर गुरूदेव टागोरांच्या बांग्ला साहित्यावरही मनापासून प्रेम करणारे... त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची यादी पाहिली की, त्यांनी हाती घेतलेल्या विषयांचा व्याप लक्षात येतो. त्यात अर्थशास्त्र आहे, सी. डी. देशमुखांसारखे अर्थशास्त्री आहेत, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र आणि ज्ञात-अज्ञात विचारशलाकांचा समावेश आहे; ते या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडणारे परखड व्याख्यातेदेखील आहेत. 

या पुस्तकात बोलीभाषेतील संवाद आहेत. ते एकूण प्रसंगांना व संदर्भांना जिवंतपणा देतात. यात आलेली प्रमाण भाषा, लेखक आज कसा आहे, याची प्रतिमा बांधण्यास मदत करते. वडिलांचे आत्मचरित्र किती संवादी स्वरूपात लिहिले आहे, ते मुळातून वाचण्यासारखे आहे. तेही प्रथमपुरुषी एकवचनी भूमिकेतून; जणू त्यांच्या कुडत्यात प्रवेशून, त्यातला कष्टाने कमावलेला घामट रुपया अनुभवून, त्यांच्या चालूनविरून पातळ झालेल्या वाहणांत पाय खुपसून अन् त्यातील जीर्णपणा अनुभवून!

कष्टाला मागेपुढे न पाहणारा एक ‘बाप’ मुलगा पेपर विकून, युरोपीय माणसाच्या घरी पडेल ते काम करून रेल्वेमध्ये नोकरीला लागला. पुढे ‘पोर्ट ट्रस्ट’मध्ये गेला आणि तिथेही आपली कामासंबंधी चिकाटी त्याने सोडली नाही. ‘आपण जे करू ते ‘ए-वन’ असले पाहिजे’, असा जणू त्याचा धोशाच होता. तो शब्दांतून व्यक्तिचित्रणात लेखकाने जिवंत केला आहे.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

संसारास लागेल तो हातभार लावण्यास मागे पुढे न पाहणारी, मुलांच्या प्रगतीबद्धल विशेष जागरूक नसलेली; कारण तो ध्यास वडिलांनी घेतलेला, पण त्यांच्या यशाबद्धल प्रचंड अभिमान बाळगणारी ‘कलेक्टरची आई’- मातोसरी. त्यांचे व्यक्तिचित्र अधूनमधून डोकावत राहते. लेखकाचा मोठा भाऊ ‘कलेक्टर’ आहे, याचा आईला सार्थ अभिमान आहे, तो उपरोक्त संबोधनातून व्यक्त होत राहतो.   

यशस्वी मुलांनी लिहिलेले या पुस्तकात एक-एक प्रकरण आहे. स्वतःच्या जीवनप्रवासाचे त्यांचे संक्षिप्त चरित्र विशेष भावते, ते त्यातील मोकळेपणामुळे. आपण काय काय विशेष संपादन केले, हे सांगताना त्या मुलांची छाती जशी अभिमानाने फुलून येते, तसेच नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात आपल्या हातून काही विशेष, भरीव घडू शकले नाही, याची प्रांजळ कबुलीही येते. मार्गक्रमण करत असताना जसे एखाद्या अनाठायी रूढीबद्दल तीव्र चीड व्यक्त होते, तसेच ज्यांनी मनोमन सहकार्य केले, त्यांच्याविषयी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन व्यक्त होणारी कृतज्ञभावनादेखील ओसंडते.

आजकाल आत्मचरित्र अधिक अभिनिवेशी आणि अतिवास्तववादी (सरीअलिस्टिक) पद्धतीने आकार घेताना दिसतात. या पार्श्वभूमीवर या आत्मचरित्रातील एकूण विवेचनात जाणता कोणाचा तिरस्कार व्यक्त होत नाही, हे विशेष. अनुचित घटितांचा निर्देश करणारे काही संवाद आहेत, नाही असे नाही, पण ते परिस्थितीजन्य आहेत; त्याचा मागोवा ज्यांनी ते सोसले त्यांनीच घ्यावा हे योग्य, आणि तो तसा घेतला आहे, पण असे सहजोद्गार निर्विष आहेत हे महत्त्वाचे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

‘आम्ही सऱ्याजणी’, ‘जनरेशन नेक्स्ट’ ही प्रसंगोपात घातलेली विलक्षण संवादी भर परिवारातील सदस्यांचे परस्परांतील नातेसंबंध दर्शवणारी आहे आणि पुढील पिढीत किती आत्मविश्वास भरून वाहतो आहे, याची निदर्शक आहे. हा अदम्य विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाने प्रज्ञेच्या व समाज क्रांतीच्या बळावर पुरवलेल्या प्रेरणेवर जसा आधारित आहे, तसेच त्यांच्यावर विश्वसून परिवाराचे मानस घडवणाऱ्या ‘बापा’च्या विजिगीषा वृत्तीवरही.

एखाद्या प्रकाशकाला क्वचित लाभणारे यश या पुस्तकाच्या रूपाने ‘ग्रंथाली’ला लाभले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती अगदी प्रकाशनाच्या समारंभातच संपली, तेव्हाही याच्या दोनशेच्यावर आवृत्ती निघतील, याची कल्पना त्यांना आली नसावी कदाचित, एवढे हे पुस्तक वाचकप्रिय ठरले आहे. याशिवाय कित्येक जागतिक भाषांमध्ये याचा अनुवाद झाला आहे. आपले पुस्तक सोल या साऊथ कोरियातील शहरात एका मॉलमध्ये पाहिल्यावर लेखक आत जातो आणि तिथे त्यांना जी आपुलकीने ओतप्रोत वागणूक मिळते, ती समाधानची लकेर देऊन जाते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

डॉ. नरेंद जाधव यांचे आत्मकथन प्रेरणादायी झाले आहे. एकदा वर्तमानपत्रामध्ये त्यांचा ‘यशस्वी व्हा!’ हा लेख वाचण्यात आला, ‘यशाची गुणसूत्रं अशी गोळीबंद कशी सांगता आली?’, याबद्धल मनात उत्सुकता असतानाच हे चरित्र वाचण्यात आले आणि उत्तर मिळाले.

मराठी वाचकांनी विशेषतः घडत्या वयातील तरुणांनी हे स्वतःवरील विश्वास वाढवणारे चरित्र आवर्जून वाचावे आणि त्यातील यशोगाथा समजून घ्याव्यात. त्यामागील अविरत कष्टांचा, यशाच्या ध्यासाचा मंत्र त्यांच्या उडण्याच्या व आकाशाला गवसणी घालण्याच्या प्रेरणेचा अंतःस्रोत बनावा!

‘आमचा बाप आन् आम्ही’ - डॉ. नरेंद्र जाधव 

ग्रंथाली, मुंबई

पाने : २९९, मूल्य – १५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......