अजूनकाही
एका क्रुझवर अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) सेवन करताना म्हणा की, ते बाळगताना म्हणा, हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित काही जणांना अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) झालेली अटक सध्या गाजते आहे. थयथयाट, तळतळाट, बदला घेण्याची भाषा ऐकू येते आहे. त्यात महाराष्ट्राच्या ‘हर्बल वनस्पती’फेम एका मंत्र्यानेही पुढे येऊन त्याच्या जावयाला अशाच प्रकरणात झालेली अटक, कशी बेकायदेशीर आणि आकसपूर्ण होती, असा सूर आळवला आहे.
या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत सर्व भान विसरून बरीच राळ उडवली गेली असून प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण जिवंत ठेवण्याचे प्रयत्न नेहमीप्रमाणे कसोशीने चालवलेले आहेत. नेमकं कोण खरं आणि कोण खोटं, याबाबत संभ्रम निर्माण व्हावा, असे दावे आणि प्रतिदावे दररोज समोर येत आहेत. कथित संशयित आरोपींसोबतच एनसीबीच्या मुख्य तपास अधिकाऱ्यालासुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आरोपीशी संबंधित असणाऱ्यांना यश आलेलं आहे. हे असंच सुरू राहिलं, तर ड्रग्ज आणि काळ्या पैशाने हिंदी चित्रपटसृष्टीला विळखा घातल्याचा आणि त्यातील तथ्य, हा मुख्य मुद्दा कधीच तडीला लागणार नाही. तरी या धुरळ्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, अशी जी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे, ती कितपत गंभीरपणे घ्यावयाची, असा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
हिंदी चित्रपटसृष्टीचं मुख्यालय मुंबई आहे. मुख्यमंत्रीही मुंबईत जन्माला आलेल्या आणि नंतर महाराष्ट्रात पसरलेल्या शिवसेनेचे आधी प्रमुख आहेत. नंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीशी शिवसेना व व्यक्तिश: ठाकरे कुटुंबियांचा अतिशय निकटचा संबंध आहे. हिंदी (आणि मराठीही) चित्रपटसृष्टीचा ‘कारभार’ कसा चालतो, याचं अतिशय सूक्ष्म ज्ञान ठाकरे कुटुंबियांना आहे. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, फायनान्सर ठाकरे कुटुंबियांचे आश्रित असल्याचा अनुभव यापूर्वी महाराष्ट्राने अनेकदा घेतला आहे.
पत्रकारिता करताना संजय राऊत यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या अनेक बातम्या दिल्या आहेत. अंडरवर्ल्डचे अनेक ‘डार्क’ पैलू ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकातील त्यांच्या स्तंभातून वाचकांसमोर मांडले गेले होते. एक्सप्रेस वृत्तपत्र समूहातील एकेकाळी आमचे सहकारी असलेले संजय राऊत यांनी मुंबई पोलीस दलाबद्दलही बरंच लेखन केलं आहे. त्यामुळे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत कुणाचा किती वैध-अवैध पैसा गुंतलेला आहे आणि अंमली पदार्थांचा मुंबईच्या चित्रपटसृष्टीला कसा विळखा पडलेला आहे, हे ठाकरे-राऊत आणि शिवसेनेच्या मुंबईतील लहान-मोठ्या नेत्यांना चांगलं ठाऊक नाही, असं जर कुणी म्हटलं तर त्यावर कुणाचा विश्वास बसणारच नाही.
त्यामुळे तर कुणाला तरी शाब्दिक का असेना दिलासा देण्यासाठी तर महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचं मत व्यक्त करून या प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकातील कुणाला तरी उद्धव ठाकरे लक्ष्य तर करत नाहीयेत ना? अशी शंका घ्यायला जागा आहे. ड्रग्जच्या आहारी गेलेली, गांजेडी आणि अंडरवर्ल्डचं धन वापरून फोफावलेल्या चित्रपटसृष्टीशी संबंधित कुणाची चौकशी होणं, हा महाराष्ट्राच्या बदनामीचा कट असेल, तर या आधी यापेक्षाही घडलेल्या गंभीर घटना महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या होत्या का, याचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी द्यायला हवं.
..................................................................................................................................................................
एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.
ई-मेल - SAF.CPM@outlook.com
पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw
आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.
..................................................................................................................................................................
ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री फरार आहेत, पोलिसांकडून शंभर कोटींची खंडणी मागितल्याचा याच गृहमंत्र्यावर आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तही गायब आहेत. त्यांना फरारी (Fugitive) म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया न्यायालयाने सुरू केली आहे, अशा बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. माजी गृहमंत्री आणि मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांवर अशी वेळ येणं, हा मुख्यमंत्री म्हणून ठाकरे महाराष्ट्राचा गौरव जर समजत असतील तर महाविकास आघाडीच्या सरकारनं बदनामी, अवमान, गौरव, अभिनंदन, सन्मान, उज्ज्वल परंपरा, अशा अनेक मराठी शब्दचे अर्थच बदलून टाकायला हवेत.
अलीकडच्या काही दशकात अशा अनेक घटना घडल्या की, ज्यामुळे राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची केवळ बदनामीच नाही तर छी-थू झाली, पण त्या घटना घडल्याबद्दल महाराष्ट्राची मान खाली गेली, अशी काही प्रतिक्रिया या आणि या आधीच्या सरकारांनी व्यक्त केलेली नाही, म्हणून त्या घटनांचं गांभीर्य कमी झालं. त्यात बळी गेलेल्या जिवांचा मोल माती ठरलं आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन-चार ड्रग्सवाले पकडले तर महाराष्ट्राची बदनामी झाली, महाराष्ट्रावर प्रचंड आघात झाला, असं जर ठाकरे-राऊत सुचवत असतील तर मग एकूणच कठीण आहे.
या गंजिड्या, गर्दूल्या, ड्रगिस्ट लोकांसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिण्याऐवजी अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या आणि ज्यांच्या डोळ्यातले अश्रूही सुकून गेलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना जास्त मदत मिळावी म्हणून केंद्राला साकडं घालतो, असं जर मुख्यमंत्री म्हणून ठाकरे म्हणाले असते, तर जनतेला त्यांच्याप्रती जास्त प्रेम वाटलं असतं!
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
अलीकडच्या चार दशकांत ११४ निष्पाप गोवारी किड्या-मुंग्यासारखे चिरडले गेले, कुपोषणामुळे हजारो बालमृत्यू होतात, हे जेव्हा उघडकीला आलं, तेव्हा महाराष्ट्राच्या सरकार आणि प्रशासनाला शरम वाटली नाही. इथपासून या अशा अनेक महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणाऱ्या घटनांची सुरुवात होते. खैरलांजी आणि कोपर्डीचे मानवतेला काळिमा फासणारे बलात्कार काय महाराष्ट्राची शान उंचावणारे होते का? हे अजूनही थांबलेलं नाही. गेल्या आठवड्यात औरंगाबाद आणि नाशिकला आशा नृशंस घटनांची पुनरावृत्ती झाली आहे. कर्जामुळे भिकेला लागलेल्या हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, नापिकीमुळे अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजाने प्राणत्याग केला, मावळच्या पोलीस गोळीबारात शेतकरी नाहक ठार झाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेल्या गोळीबारात आजवर २७ शेतकरी ठार झाले, करोनाच्या काळात ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण तडफडून मेले, भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत कोवळे जीव भाजून मेले...
अशा किती घटना सांगाव्यात की, ज्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाला असंख्य वेळा लाज वाटायला हवी होती. पण वर उल्लेख केलेल्या एकाही घटनेत नेमका गुन्हेगार असलेल्या एकालाही शिक्षा झाली नाही. हा काय महाराष्ट्राचा गौरव समजायचा का? भंडारा जिल्हा रुग्णालय दुर्घटनेत तर चौकशी अहवालात वीज पुरवठा यंत्रणेतील दोषामुळे आग लागल्याचं म्हटलं आहे, पण प्रशासनानं परिचारिकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असं झालं तरीही साकार आणि प्रशासन निगरगट्ट आहे. या सर्व घटना गांजेड्या आणि नशिल्या चित्रपटसृष्टीतील आरोपींना झालेल्या त्रासापुढे यत्किंचित आहेत, असाच मुख्यमंत्र्यांचा म्हणण्याचा अर्थ झाला.
गेल्या सरकारमध्ये सहभागी असताना आणि त्याआधी विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे म्हणून उद्धव ठाकरे ओळखले जात होते. ते सुसंस्कृत आहेत असाही समज प्रस्तुत पत्रकारासकट अनेकांचा होता. मात्र अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या बचावार्थ पुढे येऊन या प्रतिमेला ठाकरे यांनी तडा दिला आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘हीरक महोत्सव–अमृत महोत्सव’ अशी गल्लत ठाकरे यांच्याकडून झाली आणि त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपमानास्पद शब्द वापरले म्हणून महाआघाडीचे सरकार चवताळून उठले. राणेंना अटक करण्यात महाविकास आघाडीच्या सरकारने पुरुषार्थ मानला. मात्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळातील एक मंत्री तपास यंत्रणेतील एका अधिकाऱ्याच्या जाती-धर्माचा उल्लेख करून त्याला अटक करण्याची भाषा करतो, त्याच्या घरातील स्त्रियांचे अनुचित उल्लेख करतो, हे सुसंस्कृतपणाचं लक्षण समजावं का? हा मंत्री गांजाला ‘हर्बल वनस्पती’ म्हणतो, त्याची कोणतीही शहानिशा करण्याचं औदार्य मुख्यमंत्री दाखवत नाहीत, यातून त्या मंत्र्याला मिळणारं संरक्षणच स्पष्ट दिसतं.
‘कर नसते त्याला डर नसते’ आणि तो कोणत्याही चौकशीला घाबरत नसतो, हे साफ विसरून काय खरं काय खोटं ते सिद्ध व्हायच्या आतच महाराष्ट्राची बदनामी झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री व्यक्त करतात. याचा अर्थ बदनामी, अवमान, गौरव, अभिनंदन, सन्मान अशा अनेक शब्दांचे अर्थ बदलण्याची वेळ आता महाविकास आघाडीच्या सरकारने आणलेली आहे, असं समजायला हरकत नाही. त्यासाठी मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी त्यांच्या मर्जीतील तज्ज्ञांची समिती स्थापन करून पुढाकार घ्यावा. आणि हो, ‘हर्बल गर्द’, ‘हर्बल ड्रग्ज’, ‘हर्बल मद्या’ची निर्मिती करण्यासाठी उत्तेजन द्यावं, तेवढंच आता शिल्लक उरलं आहे!
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment