अजूनकाही
मराठीतील ज्येष्ठ विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचं नुकतंच पुण्यात निधन झालं. त्यांना ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक विनय हर्डीकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून वाहिलेली श्रद्धांजली...
..................................................................................................................................................................
फडके-खांडेकरांची साचेबद्ध कथा, ज्यांच्या नावावर नवकथा जमा आहे ते गंगाधर गाडगीळ-अरविंद गोखले-व्यंकटेश माडगूळकर-पु. भा. भावे हेही लिहीत होते. सदानंद रेगेंसारखे लोक लिहीत होते, जयवंत दळवींसारखे नवीन आलेले लोक लिहीत होते. या सगळ्या गर्दीमध्ये कथालेखनामध्ये आपलं एक स्वतंत्र स्थान द. मा. मिरासदारांनी कसं निर्माण केलं, हा दीर्घ मांडणीचा विषय आहे. परंतु ते त्यांनी निर्माण केलेलं होतं, हे मात्र नक्की.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
कथेमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण करणं हे जसं अवघड होतं, तसं कथाकथनामध्येसुद्धा स्वतंत्र स्थान निर्माण करणं अवघडच होतं. एका बाजूला व्यंकटेश माडगूळकर, दुसऱ्या बाजूला शंकर पाटील, तिसऱ्या बाजूला व. पु. काळे आणि अधूनमधून कथाकथन करणारे ग. दि. माडगूळकर, नंतर आलेल्या ज्योत्स्ना देवधर वगैरे स्त्रीलेखिकाही कथाकथनामध्ये पुढे यायल्या लागल्या होत्या. या सगळ्यामध्ये मिरासदारांनी कथा सांगण्याचं एक स्वतंत्र तंत्र निर्माण केलं.
मिरासदार या गर्दीमध्ये वेगळे दिसतात ते कशामुळे? उत्तम लेखकाच्या अंगी असणारे सूक्ष्म निरीक्षण, कथनशैली वगैरे गुण त्यांच्याकडे होते. पण मला असं वाटतं की, मिरासदारांच्या जडणघडणीमध्ये पंढरपूर या गावाचाही फार मोठा वाटा आहे....
..................................................................................................................................................................
लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत.
त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.
vinay.freedom@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment