गांधीजींबाबत ज्या दंतकथा ऐकायला येत होत्या, त्यांची भारतीय जनतेला प्रचीती आली. भारताच्या प्रजेला हे लक्षात आले की, हा ‘दमदार’ माणूस आमच्या कामाचा आहे!
पडघम - देशकारण
रमेश ओझा
  • म. गांधी
  • Fri , 08 October 2021
  • पडघम देशकारण महात्मा गांधी Mahatma Gandhi नेहरू Nehru सरदार पटेल Sardar Patel विनोबा Vinodba अ‍ॅनी बेझंट Annie Besant

६ फेब्रुवारी १९१६ रोजी गांधीजींनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी प्रथमच राजकीय भाषण केले. ते केवळ जाहीर निवेदन नव्हते, तर ‘दमदार’ माणसातील दमदारता आणि सोबत ‘आपल्या कामाचा नाही’ याचे जाहीर प्रकटन होते. समारंभात जल्लोषाला पारावार नव्हता. उद्घाटनाकरता आलेल्या गव्हर्नरांच्या सुरक्षेसाठी सर्व बंदोबस्त करण्यात आला होता. शहरात चारीकडे पोलीस तैनात होते. भाषणांचा मोठा भपका होता आणि सर्व वक्ते इंग्रजीत बोलत होते. किमती आभूषण ल्यालेले राजे महाराजे उपस्थित होते. गांधीजी मात्र त्या सर्व वातावरणात बेचैन होते.

जेव्हा गांधीजींची बोलायची पाळी आली, तेव्हा ते म्हणाले, ‘‘भारताला जर स्वराज्य मिळवायचे असेल तर येथील जनता ज्या भाषेत बोलते, समजते व विचार करते त्या भाषेत बोलायला हवे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावर एकवाक्यता होणार नाही.’’ यानंतर गव्हर्नरांच्या सुरक्षेचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, ‘भीतीने जगणं हे जीवन नाही. जर त्यांना भय वाटत असेल तर त्यांनी मायदेशी परतलेले बरे.’ श्रोत्यांच्या माध्यमातून जनतेला उद्देशून गांधीजी म्हणाले, ‘‘जर गव्हर्नर आमच्यामुळे भयभीत असतील तर ती शरमेची बाब आहे. आपल्याला गव्हर्नरांशी डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासाने आपले म्हणणे संगितले पाहिजे. भिण्याची गरज नाही, भिववण्याचीही नाही.” राजा महाराजांच्या आभूषणांचा उल्लेख करत गांधीजी म्हणाले की, ‘हे तुम्ही मिळवलेल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन नसून, तुम्ही जे जनतेचे शोषण केलंय त्याचं प्रदर्शन आहे.’

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

गांधीजींनी सर्वांसमोर हे स्पष्ट शब्दांत सांगितले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी दरभंगा, बिहारचे महाराज होते. इतरही अनेक राजे मंचावर वा पहिल्या रांगेत बसले होते! गांधीजींना असे बोलताना पाहून मंचावरील डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी त्यांना आवरते घेण्याची सूचना केली. श्रोते मात्र गांधीजींनी भाषण पूर्ण करावे याचा आग्रह करत होते. जेव्हा दुसऱ्यांदा अ‍ॅनी बेझंट यांनी गांधीजींना बसायला सांगितले, तेव्हा ते म्हणाले, ‘अध्यक्ष जर मला भाषण आटोपते घ्यायला सांगतील तर मी बसायला तयार आहे.’ समोर लोकांचा हर्षनाद इतका होता की, गांधीजींना ‘बसा’ म्हणायची अध्यक्षांची हिंमत होत नव्हती. काही वेळाने अॅनी बेझंट विरोध दाखवण्यासाठी म्हणून खाली उतरल्या, पाठोपाठ काही राजे लोकही व्यासपीठ सोडून चालते झाले.

गांधीजींबाबत ज्या दंतकथा ऐकायला येत होत्या, त्यांची भारतीय जनतेला प्रचीती आली. हा माणूस जनतेशी एकात्म होऊ शकतो. ही व्यक्ती सामान्य माणसाच्या भाषेत, सामान्य जनाच्या हिताचे बोलते. हे काही वेगळे रसायन आहे; जे विचार करतो ते बोलतो व तेच करतोही. तरीही हा अभिमानी नाही, ना तुसडा.

हा माणूस लहान समूह किंवा विशिष्ट वर्ग वा समाजाविषयी बोलत नाही, तर सर्वांचा विचार करणारा आहे. भारताच्या प्रजेला हे लक्षात आले की, हा ‘दमदार’ माणूस आमच्या कामाचा आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर दमदार असूनही जो प्रस्थापित नेत्यांना ‘आपल्या कामाचा नाही’ असे वाटत होते, तो सामान्य जनतेच्या दृष्टीने कामाचा वाटत होता. या घटनेनंतर गांधीजी भारतीय प्रजेचे एकमेव नेता या स्वरूपात पुढे येत होते किंवा असे म्हणू शकतो की, तेव्हापासूनच गांधीजींना त्रास द्यायला सुरुवात झाली होती.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

गांधीजींच्या भाषणाचे पडसाद देशभर उमटले होते. खरी शक्ती आत्म्यात आहे; संख्या व गर्दीत नाही, हे त्यांनी सिद्ध केले होते. गांधीजींच्या त्या भाषणाच्या पुढील महिन्यातच विनोबा भावे शास्त्रांचे अध्ययन करण्यासाठी काशीला आले होते. सर्वत्र गांधीजींच्या भाषणाच्या चर्चा चालत होत्या. त्या वेळी विनोबा दुविधेत होते. देश मुक्त करण्यासाठी क्रांतीचा मार्ग धरावा की, जीवन-संसार बंधनातून मुक्त करण्याकरता संन्यास घ्यावा. जेव्हा विनोबांनी गांधीजींचे पूर्ण भाषण वाचले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या माणसात दोन्हीही आहेत- क्रांतीही आणि शांतीही. सर्वार्थाने मुक्त व्यक्तीच सर्वांसमोर असे जाहीर बोलू शकते. हा माणूस माझ्या देशालाही मुक्त करेल व माझ्या जीवनालाही मुक्त करून सार्थक बनवील. क्रांती आणि शांतीचा समन्वय याच्या ठायी दिसतो. बिनोबा भावे यांनी गांधीजींना पत्र लिहून भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि जून १९१६मध्ये नेहमीकरता गांधीजींजवळ येऊन राहिले. या घटनेनंतर गांधीजींनी बिनोबांना आपले आध्यात्मिक उत्तराधिकारी घोषित केले.

बॅरिस्टर वल्लभभाई पटेल गुजरात क्लबमध्ये नेहमी गांधीजींची टर उडवत. एकदा क्लबमध्ये गांधीजींचे भाषण होते. वल्लभभाई व त्यांचे मित्र गणेश वासुदेव मावळंकर हे दोघे क्लबमध्ये पत्ते खेळत होते. गांधीजी आल्यावर मावळंकरांनी वल्लभभाईंना म्हटले की, ‘गांधी आलेत; चला, मध्ये जाऊया. त्यांचे भाषण ऐकायचे नाही?’ वल्लभभाई आपल्या विशिष्ट शैलीत म्हणाले, ‘तुम्ही निघा, मला यायचे नाही. ते काय बोलतील हे तुम्हाला आत्ताच सांगू शकतो. गव्हातून खडे कसे बाजूला करावेत म्हणजे स्वराज्य मिळेल.’ असे म्हणून ते जोरात हसले. तेच वल्लभभाई गांधीजींचे बनारसचे भाषण ऐकून म्हणाले, ‘मावळंकर, हा माणूस स्वराज मिळवूनच देईल.’

घनश्यामदास बिर्ला कलकत्याचे उदयोन्मुख उद्योगपती होते. आदल्या वर्षी १९१५ला गांधीजी कलकत्यास गेले होते. तेव्हा मारवाडी युवक संघाच्या तरुणांनी घोडे काढून स्वतः गांधीजींची घोडागाडी ओढली होती. त्या युवकांमध्ये घनशामदास बिर्लाही होते. त्यांनीही गांधीजींचे बनारसमधील भाषण ऐकल्यावर तरुणांना म्हटले- ‘तयारीला लागा; आता स्वातंत्र्य मिळेलच.’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पण प्रस्थापित नेत्यांना तर हा माणूस अजूनही ‘आपल्या कामाचा’ वाटत नव्हता. गुंता असा होता की, माणूस ‘दमदार’ तर होता आणि आता तर तो जनतेलाही आपल्या कामाचा वाटायला लागला होता. लक्षात घ्या; बिनोबा भावे, घनशामदास बिर्ला, वल्लभभाई पटेल हे जेव्हा असे म्हणाले, त्या वेळेस तेही अगदी सामान्यातीलच होते, नेते झालेले नव्हते. जवळपास असेच मत बऱ्याच लोकांचे होते, जे पुढे जाऊन राजकीय नेता किंवा गांधीजींचे सहकारी वा प्रतिष्ठित महानुभाव झाले. प्रस्थापित नेत्यांसमोर प्रश्न हा होता की, या माणसाचे करायचे काय? हा आमची भाषा बोलत नाही आणि ज्या प्रकारचे राजकारण आम्ही करतो त्यास हा नाकारतोय. आपण या व्यक्तीला नाकारूही शकत नाही, जनता तर याच्यासोबत आहे.

१९१९-१९२०मध्ये भारतातील सर्व नेत्यांना, पुन्हा सांगतो की, अपवाद वगळता सर्वांना, या गांधी नामक गोंधळात टाकणाऱ्या वास्तविकतेचे काय करावे याचा निर्णय घेणे भाग पडले.

(‘साम्ययोग साधना’च्या १६ सप्टेंबर २०२१च्या अंकातून साभार)

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Umeshrao K

Fri , 08 October 2021

१९४७ च्या आसपास ईस्त्राएल आणी चिन स्वतंत्र झाले आज त्यांचा विकास आणी भारताचा विकास मध्ये जो फरक आणी अंतर राहिले त्याला सर्वस्वी जबाबदार हा प्रणयी गांधी आणी प्रणयी नेहरु आहेत.


Umeshrao K

Fri , 08 October 2021

गांधीजींबाबत ज्या प्रणयकथा ऐकायला येत होत्या, त्यांची भारतीय जनतेला प्रचीती आली. हा माणूस फक्त स्त्री शरीरात एकात्म होऊ शकतो.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......