अजूनकाही
गांधी आणि इंग्रजी सिनेमा
रिचर्ड अॅटनबरो यांनी १९८२ साली गांधींच्या जीवनावर सिनेमा काढला. त्याला एकूण आठ ऑस्कर मिळाले. हा सिनेमा जगभर गाजला. हॉलिवुड आणि परकीय भाषेत पुढे गांधींचा विचार सतत दिसला. २००७ साली ‘द ग्रेट डिबेटर्स’ हा डेंझिल वॉशिंग्टन यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आला. त्याचा काळ १९३५चा आहे. याची कथा सत्यघटनेवर आधारलेली आहे. अमेरिकेतील टेक्ससमध्ये वायली या नावाचे निग्रो मुलांचे एक छोटे महाविद्यालय असते. तिथं एक नवीन शिक्षक येतात आणि विद्यार्थ्यांची ‘डिबेट टीम’ तयार करतात. ही टीम स्पर्धेत उतरते, एकेक टप्पा पार करत अंतिम सामन्यात पोचते. अमेरिकेत निग्रो विद्यार्थ्यांची पहिलीच टीम अंतिम सामन्यात पोचते. तिथे सामना होतो हार्वर्ड विद्यापीठाच्या (गोऱ्या) विद्यार्थ्यांसोबत. अंतिम डिबेट सुरू होते. ही डिबेट ‘हिंसा विरुद्ध अहिंसा, सहिष्णुता विरुद्ध असहिष्णुता, कायदा विरुद्ध सविनय कायदेभंग’ अशी बनते. निग्रो विद्यार्थी अहिंसा, असहकार, सहिष्णुतेच्या बाजूने असतात; तर गोरे विद्यार्थी कायदा, सुव्यवस्था आणि कायद्याचा अंमल राखण्यासाठी हिंसा गरजेची असते, म्हणजेच अनागोंदी होऊ नये, सुव्यवस्था टिकून रहावी म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर हिंसा करणे गरजेचे असते, अशा आशयाचे मत मांडतात. अहिंसेची, असहकाराची बाजू मांडत असताना निग्रो विद्यार्थी गांधीजींचे असहकार आंदोलन आणि सविनय कायदेभंगाचे दाखले देतात. या संपूर्ण सिनेमावर महात्मा गांधींचा प्रभाव आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
याच वर्षी नेटफलिक्सवर आलेल्या ‘मनी हेस्ट’ या स्पॅनिश मालिकेतही गांधींचा उल्लेख येतो. थोडक्यात गांधींचा प्रभाव जगातील केवळ राजकीय, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रांवर नसून जागतिक सिनेमामध्येही आहे, हे लक्षात आल्यावाचून राहत नाही.
गांधी आणि हिंदी सिनेमा
१९९६मध्ये श्याम बेनेगल यांनी ‘द मेकिंग ऑफ महात्मा’ बनवला. २००० नंतर भारतीय सिनेमांमध्ये गांधी जास्त प्रमाणात दिसायला सुरू झाले. ‘मैंने गांधी को नहीं मारा’ (२००५), ‘गांधी माय फादर’ (२००७)… दरम्यान २००६ साली ‘लगे रहो मुन्ना भाई’ हा सिनेमा राजकुमार हिराणी यांनी प्रदर्शित केला. तो जोरदार हिट झाला. गांधींच्या विचारांची ती नवी मांडणी लोकांना खूप भावून गेली. अॅटनबरोंच्या किंवा इतर गांधींवरील सिनेमात त्यांना संतरूपात जास्त दाखवतात, पण ‘लगे रहो…’मध्ये ‘गांधीगिरी’ समोर आली आणि तिने प्रेक्षकांना चकित करून टाकले. गांधी सामान्य लोकांना कळेल इतक्या साध्या सरळ पद्धतीने मांडण्यात आले. पुढे शशी थरूर यांनी युनायटेड नेशन्स, न्यूयॉर्कमध्ये ‘लगे रहो मुन्नाभाई’चे स्क्रिनिंग घडवून आणले. यूएनमध्ये दाखवला गेलेला तो पहिला भारतीय सिनेमा ठरला.
सिनेमा आणि प्रोपगंडा
२०१४च्या सत्तांतरानंतर मात्र चित्रपटसृष्टीमध्ये मोठे बदल झाले. गोडसेवादी पूर्ण ताकदीने पुढे येऊ लागले. ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, ‘इंदू सरकार’, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ असे काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांची कुचेष्टा करणारे सिनेमे येऊ लागले. सिनेमांची जागा प्रोपगंडाने घेतली. गांधीविरोधी, बहुजनविरोधी आणि अभिजनवादी वृत्ती पुढे आली. सिनेमा बाजूला सारून अभिजनवादी प्रोपगंडा चालवण्याची ही मूळची मराठी सिनेसृष्टीच्या वृत्तीची लागण हिंदी सिनेसृष्टीलादेखील झाली. मराठी सिनेसृष्टीने आपली पूर्ण हयात ग्रामीण भागाची कुचेष्टा, गावंढळ भाषेचे हसू, गावचा प्रमुख कसा क्रूर, बहुजन समाजातील लोक कसे भ्रष्ट आणि उपद्रवी दाखवण्यात घालवली.
याचे एक उदाहरण सांगायचे झाले तर मोहन जोशी, शरद पोंक्षे आणि सीमा तळवलकर यांचा ‘छडी लागे छम छम’ हा सिनेमा. तो २००५ साली आला. हा सिनेमा माध्यमिक शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांवर आहे. यात नेहमी गुटखा खाऊन, उपद्रव करणारे शिक्षक असतात ‘कांबळे मास्तर’, मास्तरांच्या चहाड्या करणारा शिपाई असतो ‘संभाजी’ आणि विद्यार्थ्यांत शिस्त निर्माण व्हावी, यासाठी मनाने झटणारे शिक्षक असतात ‘देव’ सर अर्थात शरद पोंक्षे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
एकीकडे हे घडत असताना दुसऱ्या बाजूला तमिळ- तेलुगू- मल्ल्याळम सिनेमे पाठीमागून येऊन हिंदीच्याही पुढे चालले आहेत. अशा काळात मराठी सिनेमा स्पर्धेतही नाही. हे घडण्यापाठीमागील कारण म्हणजे दाक्षिणात्य सिनेमे मराठीसारखे कुचकामी उद्योग करत बसले नाहीत. आज दाक्षिणात्य सिनेसृष्टी गांधी-आंबेडकर मांडते. आणि मराठी? ज्या पद्धतीने मराठीमध्ये सिनेमा प्रोपगंडा निर्माण करण्यासाठी वापरला गेला आहे, त्याची फळे आजची मराठी सिनेसृष्टी भोगत आहे, यात काही शंका नाही.
मराठी सिनेमांचे छद्मी उद्योग आजही सुरूच आहेत आणि ते सिनेक्षेत्राची हानी करत आहेत. पण काहीही झाले तरी चालेल, मात्र आपले सांस्कृतिक अंजेंडे कुठे मागे पडता काम नयेत, एवढाच मराठी सिनेसृष्टील्या अनेकांचा उद्देश दिसतो.
म्हणूनच २ ऑक्टोबरचे औचित्य साधून महेश मांजरेकर ‘गोडसे’ या नव्या सिनेमाची घोषणा करतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
एरवीही महाराष्ट्रात नथुराम गोडसे कसा श्रेष्ठ आणि योग्य याची ‘नाटके’ केली जातात. हे निंदनीय असले तरी आपण अभिव्यक्तीच्या नावाखाली स्वीकारले आहे. स्वीकारलेच पाहिजे. त्यांची भूमिका मांडणे त्यांचे स्वातंत्र्य आहे, हे आपण जाणले आहे. पण अशा सांस्कृतिक उद्योगांमुळे मराठी सिनेमा आणि नाटक यांची अपरिमित हानी झाली आहे. पण हेही तितकेच खरे की, सिनेमा व नाटक यांच्या माध्यमांमधून स्वातंत्र्याच्या नावाखाली कितीही प्रोपगंडे चालवले तरी त्याने सत्य बदलणार नाही, बदलत नाही. अशा कारस्थानांमुळे आजवर मराठी सिनेमांची आणि नाटकांची झालेली दुर्दशा भरून निघणार नाही.
त्यामुळे मांजरेकरांनी ‘गोडसे’वर चित्रपट नक्की बनवावा. एका माथेफिरूचा गौरव करावा. गांधींना हवे तसे चित्रित करावे. एका नंग्या फकिराला अजून कोण किती नंगे करणार! जगात गांधींना, त्यांच्या विचाराला जो काही मानसन्मान आहे, तो असा कारस्थानांनी कमी होणार नाही. उलट ‘गोडसेवादी’ सिनेसृष्टी जगासमोर उघडी पडणार आणि एखाद्या डबक्याएवढी सीमित राहणार, यात शंका नाही. जेव्हा मराठी सिनेसृष्टी आपला अभिजनवादी दृष्टिकोन सोडून गांधींच्या विचारांना घेऊन पुढे येईल, तेव्हाच तिचे पुनरुत्थान होईल. त्यामुळे येत्या काळात गांधी हाताळण्याइतपत मराठी सिनेसृष्टी सक्षम होईल, हीच यानिमित्तानं सदिच्छा.
..................................................................................................................................................................
लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.
advbaabar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment