‘उचल्यानंतर...’ हे एक धीट, रोखठोक, सत्यकथन करणारं आत्मकथन आहे. ते वाचताना वाचक अस्वस्थ नक्कीच होईल
ग्रंथनामा - झलक
लक्ष्मीकांत देशमुख
  • ‘उचल्यानंतर...’ आणि ‘उचल्या’ या पुस्तकांची मुखपृष्ठे. मध्यभागी लक्ष्मण गायकवाड
  • Tue , 05 October 2021
  • ग्रंथनामा झलक उचल्या Uchalya लक्ष्मण गायकवाड Laxman Gaikwad उचल्यानंतर Uchalyanantar भटके-विमुक्त

प्रसिद्ध लेखक लक्ष्मण गायकवाड यांचे ‘उचल्या’ हे आत्मकथन १९८७ साली प्रकाशित झाले आणि त्याने मराठी साहित्यात खळबळ माजवली. पुढच्याच वर्षी त्याला साहित्य अकादमी मिळाले. इतर अनेक पुरस्कार मिळाले. इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. या पुस्तकाने गायकवाडांना खूप प्रसिद्धी झाली, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ज्या भटक्या-विमुक्तांच्या हक्कासाठी, न्यायासाठी ते संघर्ष करत होते, त्याला बळ मिळाले. नुकताच गायकवाडांनी ‘उचल्यानंतर’ हा आपल्या आत्मकथनाचा उत्तरार्ध लिहिला आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यक आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रस्तावना लिहिली आहे… ती ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी….

..................................................................................................................................................................

‘उचल्यानंतर...’ हे लक्ष्मण गायकवाडचे आत्मकथन त्यांच्या १९८८च्या साहित्य अकादमी पारितोषिक प्राप्त ‘उचल्या’ या आत्मचरित्राचा एक प्रकारे तेवढाच रोखठोक व स्फोटक उत्तरार्ध आहे. तो लिहिणे हे अधिक धाडसाचे होते. कारण ‘उचल्या’ लिहिताना ते तरुण होते आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या वाट्याला आलेली दुःख, हालअपेष्टा व वेदनांना व त्या निमित्ताने ज्यांच्यावर जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का ब्रिटिश काळापासून बसला होता, त्या भटक्या-विमुक्त (डी-नोटीफाईड ट्राइब्ज) समाजाचे विदारक चित्र मांडले होते, पण आयुष्याच्या उत्तरार्धात वयाच्या साठीनंतर एक भटक्या विमुक्त जमातींच्या हक्कासाठी लढे देणारे झुंझार कार्यकर्ता, देशभर ‘उचल्या’मुळे ख्यातकीर्त झालेला लेखक आणि राजकारण, समाजकारण आणि साहित्यकारण या तिन्ही आघाड्यांवर काम करणारा ‘उचल्या’कारांचा हा जीवनप्रवासही सोपा नव्हता. स्वतःच्या जगण्याची व अस्तित्वाची लढाई एका बाजूला, भटक्या-विमुक्तांचे संघटन बांधून त्यांच्या हक्कासाठी लढणं दुसऱ्या बाजूला आणि साहित्यिक, कार्यकर्ता म्हणून आलेले स्फोटक व गंभीर अनुभव तिसऱ्या बाजूला असा जीवनप्रवास लिहिताना त्यांच्या पुढील आव्हाने अधिक गंभीर होती. कारण लढे देताना, दलित-आदिवासी साहित्य चळवळ उभारताना आणि स्वकीयांशी लढताना आलेले जिवनानुभव सत्य स्वरूपात निर्लेप अलिप्ततेने मांडने कठीण आव्हान होते. पण ते पेलण्यात लक्ष्मण गायकवाड हे चांगल्या रीतीने यशस्वी झाले आहेत. ‘उचल्यानंतर...’ हे एक धीट, रोखठोक, सत्यकथन करणारं आत्मकथन झालं आहे. ते वाचताना वाचक अस्वस्थ नक्कीच होईल.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

पण या पुस्तकातून त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते अधिक चिंतनीय आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना भारतीय संविधानानं शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आरक्षण देत त्यांचा विकासाचा मार्ग प्रशस्त केला, पण एका गावी कधी स्थिर नसणारा (नव्हे समाजव्यवस्थेनं त्यांना स्थिर ठेवलं नाही) भटक्या-विमुक्त जमातीचा एक फार मोठा वर्ग स्वातंत्र्यानंतर ७० वर्षही किती दयनीय स्थितीत राहतो, याचं दर्शन गायकवाड घडवतात आणि वाचकांना विचार प्रवृत्त करतात.

त्यांनी ‘ ‘उचल्यानंतर’ची भूमिका’ या मनोगतात भटक्या-विमुक्त जातीचा इतिहास, त्यांचं जगणं आणि सत्ताकारणात मश्गूल असणारी त्यांची व्यवस्था (खासकरून महाराष्ट्राची राज्यव्यवस्था- जीवर गायकवाडांचा विशेष आणि राखून रोख आहे.) यावर एक्स-रे प्रमाणे नेमका प्रकाशझोत टाकला आहे. त्या पार्श्वभूमीवर गायकवाडांनी केलेले संघटनात्मक कार्य, दिलेली लढे, केलेली आंदोलने त्या निमित्ताने पादाक्रांत व मुख्यमंत्र्यांशी आलेले संबंध त्यांची वर्णने आणि आलेली निराशा- याचा अत्यंत सच्चेपणाने त्यांनी कथन केलं आहे. त्याचं एक उदाहरण इथे देऊन त्यांची खंत अधोरेखित करता येईल. स्वातंत्र्याच्या स्वर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबई शासकीय कार्यक्रमाच्यावेळी गायकवाडांनी शेकडो विमुक्त-भटक्यांचा मोर्चा काढला. त्यात सोबत गाढवे, कुत्री, डुक्कर, नंदीबैल, भविष्य सांगणारे पोपट घेऊन ‘हे स्वातंत्र्या तू कुठं आहेस? आम्हाला भाकरी दे, आम्हाला गुन्हेगार का समजलं जातं?’ अशा प्रश्नवाचक घोषणा देत त्यांनी संबंध देशाचं लक्ष वेधून घेतलं. त्याची फलनिष्पत्ती म्हणून भटक्या-विमुक्तांचे स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात आले. पण पुरेशा आर्थिक तरतुदीविना ते निष्प्रभच ठेवण्यात आले व भटक्या-विमुक्तांच्या तोंडांना ‘राजकीय व्यवस्थेत’ पानं पुसत घोर वंचना केली... हे वाचताना वाचक अस्वस्थ होतो!

लक्ष्मण गायकवाड हे अनेक सामाजिक लढे तडफेने लढले, त्याचाही रोखठोक वृत्तांत या पुस्तकात आहे. कळंब (जिल्हा उस्मानाबाद) येथील भर वस्तीत पारधी समाज मोक्याच्या जागेवर वर्षानूवर्ष राहत होता. ती जागा खाली करून तिचा व्यवसायिक वापर करण्याच्या इराद्याने पोलीस, शासन व व्यापाऱ्यांची झालेली अभद्र युतीने पारध्यांची घरे जाळून टाकली, मग त्यांचे गावाबाहेर पुनर्वसन करण्याचा घाट घातला गेला. म्हणजे ही मोक्याची जमीन व्यापाऱ्यांना मिळेल (अर्थातच त्यांचा आर्थिक मलिदा पुढारी व पोलिस यांना मिळेल) पण गायकवाड हा डाव आंदोलनाद्वारे उधळून लावतात. पण प्रत्येक लढ्यात असे यश मिळेलच असे नाही. किंबहुना समाजव्यवस्था अशी क्रूर आणि अनुदार आहे की, भटक्या-विमुक्तांना ती निर्दयपणे शरण यायला भाग पाडते. उदाहरणार्थ शिर्डीच्या मंदिराजवळ स्टेशनरीचं सामान विकणाऱ्या शन्नो काळेवर बलात्कार होऊन मारलं जातं, तिला प्रयत्न करूनही आरोपी पोलीसच असल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांना पाठीशी घालतात. एका काम करून जगणाऱ्या पारधी मुलीस न्याय काही शेवटपर्यंत मिळत नाही. गायकवाडांनी लढण्याच्या अनेक मन विषिण्ण करणाऱ्या हकीकती कथन केल्या आहेत. त्याद्वारे आताही भटक्या-विमुक्तांना सन्मानाचे जीवन जगता येत नाही, हे कटुसत्य अधोरेखित करतात.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

महाश्वेतादेवी व गणेशदेवींसोबत ‘विमुक्त घुमंतु’ संघटना बांधून त्याद्वारे देशभर लक्ष्मण गायकवाड यांना भटक्या-विमुक्तांना न्याय देण्यासाठी काम करताना आलेले कटू अनुभव, तसेच रेणके आयोगाला केलेल्या शिफारशी या भटक्या-विमुक्तांसाठी कशा कुचकामी व एक प्रकारे संविधानविरोधी आहेत, हे आपले अनुभवसिद्ध मत गायकवाड नावासकट सांगत, चुकांचे माप त्यांच्या त्यांच्या पदरात घालताना कुणाची भीड बाळगत नाहीत.

हे वाचकांना कदाचित कमालीचे स्फोटक वाटेल. त्यांची कदाचित दुसरी बाजू पण असू शकेल, असंही वाटू शकेल. तरीही गायकवाड जे कथन करतात, त्यात सत्य आणि प्रामाणिकपणा मोठ्या प्रमाणात आहे असे जाणकार वाचकांना हे पुस्तक वाचताना नक्कीच वाटेल!

‘भटक्या-विमुक्त चळवळीची शोकांतिका’, ‘सामाजिक लढे’, ‘कमिट्यांचे अनुभव’ आणि ‘मुंबईतील भटक्यांचे प्रश्न’ अशा अनेक प्रकरणांत गायकवाडांचा झुंझार-बंडखोर कार्यकर्ता, स्पष्टवक्तेपणा आणि त्यांच्या अनेक बड्यांचे पाय अंतिमतः मातीचेच असल्याचा आलेला खेदजनक अनुभव वाचकांना हे पुस्तक वाचताना येतो. आणि भारतातले सामाजिक-आर्थिक स्वार्थ, राजकारण, प्रसिद्धी, अहंकार आणि पुढे जाणाऱ्याचे पाय मागे खेचणे, टिपिकल भारतीय (आणि मराठी) वृत्तीमुळे का असफल होतात, याचं सहजच उत्तर मिळतं!

ऐन तरुणपणी ‘उचल्या’मुळे मिळालेलं यश, त्यांच्या पुस्तकांची झालेली भाषांतरे, देशभर साहित्यिक संस्था-विद्यापीठात व्याख्यान देणे आणि देश-परदेश भ्रमंती आणि साहित्य अकादमीवर केलेलं काम यावर लिहिताना साहित्य क्षेत्रातील राजकारण, टोळेबाजी आणि कंपूशाहीवर पण गायकवाडांनी हातचं काही राखून न ठेवता स्पष्टपणे लिहिलं आहे. तिथे इंग्रजी बोलणाऱ्या लेखकाची कशी चलती असते व दलित-भटक्यांच्या साहित्यावर त्या संदर्भाचे लेखक असताना सवर्णांना तो इंग्रजी उत्तम बोलू-लिहू शकतात म्हणून संधी देणं, पारितोषिक देणं हे अनुभव भारतीय साहित्य वर्तुळातील कंपूशाहीचा पर्दाफाश करणारे, अत्यंत स्फोटक आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

पण कोणत्याही लेखकाची कसोटी लागते, ती स्वतःबद्दल आणि कुटुंबियांबद्दल आत्मकथनात लिहिताना. तो किती सच्चेपणानं लिहितो व त्याचवेळी पुरेशी तटस्थता कशी पाळतो, त्यावर सदर आत्मचरित्राची गुणवत्ता ठरते. लक्ष्मण गायकवाडांनी ‘किशोर काळे : एक प्रकरण’, ‘माझ्या हॉटेलवरील गंडांतर’ आणि ‘निवडणुकीच्या रिंगणात’ अशा प्रकरणात वैयक्तिक अनुभव पुरेशा तपशीलात आणि मोकळेपणानं कथन केले आहेत. त्यातील सच्चाई मी व्यक्तिशः जाणतो. त्यामुळे प्रमाणिकपणाच्या कसोटीवर ‘उचल्यानंतर...’ हे पुस्तक मोठ्या प्रमाणात उतरते, असे मी म्हणू शकतो. त्यामुळे हे पुस्तक आत्मचरित्र दालनात मोलाची भर टाकणारे आहे.

मराठीतील बरीच आत्मकथने ही ऐन तारुण्यात लिहिलेली आहेत, तो जीवनाचा पूर्वार्ध होता. ते जगणं त्यांना दलित किंवा भटक्या समाजाचा भाग म्हणून जगावं लागलं होतं, त्याचं दर्शन घडवणारं होतं. ‘उचल्या’ त्याच वर्गात मोडणारं होतं, पण त्यानंतर प्रसिद्ध झाल्यावर, पण आजही खऱ्या अर्थानं प्रस्थापित न झालेल्या गायकवाडांचे हे उत्तरार्धाचे चळवळ, आंदोलन व वैयक्तिक जीवनाचे दर्शन घडवणारे आत्मकथन म्हणजे समाज चळवळी सुरुवातीनंतर कशा भरकटत गेल्या आणि आज त्यांना कशी मरगळ आली, त्याचा लेखाजोखा मांडणारं आत्मकथन आहे.

गायकवाडांनी त्यांना सर्व सामर्थ्यानिशी परिवर्तनाचा लढा दिला, काही यश मिळालं, पण अजूनही भटक्या-विमुक्तांना संविधानाप्रमाणे अनुसूचित जमातीमध्ये स्थान मिळण्याची रास्त मागणी प्रलंबित आहे, ही खंत त्यांना आहे. वैयक्तिक जीवनात साहित्यिक सन्मान मिळाले, पण तरीही ज्यावर त्यांची उपजिविका अवलंबून आहे, त्या चित्रनगरी गोरेगावमधील त्यांच्या हॉटेलला कायमस्वरूपी परवाना मिळत नाही. त्यामुळे साहित्य अकादमी प्राप्त लेखकाची सरकार दरबारी काय बुज राखली जाते, याचं वेदनादायी चित्र उभं राहतं, हे सुसंस्कृत म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्राला शोभणारं नाही.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

सत्यकथन आणि जीवन उद्देश नेमकेपणानं उलगडून दाखवणं ही श्रेष्ठ आत्मचरित्रकाराची दोन महत्त्वाची सूत्रं असतात. गायकवाडांनी पुरेशा सच्चाईनं लिहिलं आहे. भटक्या-विमुक्तांना न्याय देण्यासाठी आपलं जीवन आहे, हे समजलेले (व त्यानुसार वागत आलेले) जीवनसूत्र प्रत्ययकारक रीतीनं या पुस्तकात मांडलं आहे.

शेवटी मला एकच विचार मांडायचा आहे, लक्ष्मण गायकवाडांचं ‘उचल्यानंतर...’ हे आत्मकथन वाचल्यानंतर एखादी सामाजिक संस्था व कार्यकर्त्याला व वकील संघटनेला भटक्या-विमुक्तांना अनुसूचित जमातीमध्ये टाकण्यासाठी जनहितयाचिका दाखल करण्याची प्रेरणा मिळाली, व हा प्रश्न धसास लागावा, अशी मी अपेक्षा महाराष्ट्राकडून करावी का?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

लक्ष्मण गायकवाडांच्या जीवनाचं सार्थक यातच आहे, याची मला कल्पना आहे. जगण्यासाठी मजबुरीनं इच्छा नसताना कुणा वर्ग समूहावर उचलेगिरी करण्याची पाळी येऊ नये, अशी मानवतावादी, समतावादी समाजरचना निर्माण झाल्याखेरीज ‘उचल्या’ कालबाह्य होणार नाही आणि लक्ष्मण गायकवाडांचे ‘उचल्यानंतरचे’ अनुभवही! प्रश्न एवढाच आहे, तो दिवस केव्हा उजाडेल?

‘उचल्यानंतर’ - लक्ष्मण गायकवाड

संधिकाल प्रकाशन, मुंबई

पाने - १९२, मूल्य - २५० रुपये

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......