अजूनकाही
राज्यात काल महानगरपालिका, पंचायती समिती आणि जिल्हा परिषदा यांच्यासाठी मतदान झालं. त्याविषयी अनेक तर्क-कुतर्क लढवले जात आहेत. काल दिवसभर व्हॉटसअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर त्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं. फडणवीस जाणार, मुंबईत शिवसेना येणार, मनसेची पुन्हा धुळधाण होणार, पुण्यात राष्ट्रवादी येणार अशा अनेक प्रकारच्या चर्चा कालही रंगल्या होत्या, आजही रंगतील. उद्या निकालानंतर सर्व स्पष्ट होईलच. तोवर हा शेलका साज पहा.
----------------------------------------------------------------------------------------
मतदान करून व्यवस्था बदलता आली असती
तर व्यवस्थेने मतदानच करू दिले नसते...
...तरी पण, उम्मीद पे दुनिया कायम है।
- सत्यजित चव्हाण (फेसबुकवरून साभार)
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी काल मुंबईत, महालक्ष्मीला जिथं मतदान केलं, तिथं राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नव्हता, त्यामुळे पवारांनी मतदान केल्यापासून त्यांनी नेमकं कुणाला मतदान केलं, याविषयीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पवार अनेकांचं सॉफ्ट टार्गेट असल्यानं या चर्चेला काल दिवसभर चांगलाच जोर आला होता. आजच पवारांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. इतक्या वर्षांत पवारांनी काय कमावलं असेल तर हा असा संशय नि बेभरवसा.
पवारांनी मतदान तर केलंच आहे तेव्हा ते त्यांनी कुणाला केलं असेल याविषयी अनेकांनी तर्क लढवले गेले, त्यातील हा एक प्रातिनिधिक तर्क. हा तर्क इतरही अनेकांनी वर्तवला आहे. न जाणो पवारांच्या या खेळीनंही कुणाचा तरी तोटा होण्याची शक्यता अगदीच काही नाकारता येत नाही.
असो. पवारांनंतर पुढच्या छायाचित्राकडे काळजीपूर्वक वळू. हे छायाचित्र खरं की खोटं माहीत नाही. हे कुणी परस्पर तयार करून त्याची प्रिंट आऊट काढली असण्याची आणि ते कुठेतरी लावून त्याचं छायाचित्र काढलं असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पण त्यातून सूचित होणारा, ध्वनित होणारा इशारा मात्र खतरनाक आहे.
हा प्रकार तर वरच्यापेक्षाही जास्त आश्चर्यकारक आहे. ‘इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया’च्या नावाशी मिळत्याजुळत्या कुणा स्वयंसेवी संस्थेनं ही जाहिरात सदहेतूने केली असली तरी त्यातली दमदाटी अगदी स्पष्ट आहे. ‘...नाहीतर परिणाम भोगावे लागतील’ असंच त्यातून सरळ सूचित केलं जात आहे.
ही पोस्ट काल दिवसभर व्हॉटसअॅपवरून फिरत होती. ज्याने कुणी ती तयार केली, त्याच्या कल्पनाशक्तीला सलामच करायला हवा. कारण या पोस्टमधील भावनेशी बहुतांशी मध्यमवर्गीय सहमत होतील.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment