ज्याचा त्याचा गांधी!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • म. गांधी
  • Sat , 02 October 2021
  • पडघम देशकारण महात्मा गांधी Mahatma Gandhi छळछावण्या concentration camp हिटलर Hitler

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या हिन्दी अभ्यासक्रमासाठी ‘ब्लॉग लेखन’ या विषयावर एक धडा (lesson) लिहिण्याची संधी ज्येष्ठ अभिनेत्री प्रा. अनुया दळवी यांच्यामुळे मला मिळाली. ब्लॉगलेखनाचे प्रात्यक्षिक म्हणून ‘महात्मा गांधी’ याच विषयावर लिहावं असा, अनुया ताईचा आग्रह होता. तो हिन्दी ब्लॉग ज्या मूळ  मराठी मसुद्यावर आधारित आहे, तो हा मजकूर २ ऑक्टोबरच्या  निमित्ताने… या मसुद्याचा हिन्दी अनुवाद अनुया दळवी यांनीच केलेला आहे.

..................................................................................................................................................................

‘सॅल्झबर्ग सेमिनार २००७’चा विषय ‘द न्यू इन्फर्मेशन नेटवर्क : चॅलेजेन्स अ‍ॅण्ड अपॉर्च्युनिटी फॉर बिझिनेस, गव्हर्मेंट अ‍ॅण्ड मीडिया’ असा होता. जगभरातील ४२ देशांचे ५८ प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते. त्यात भारतातील ५, पाकिस्तानातील ३ आणि अमेरिकेतील ६ प्रतिनिधींचा समावेश होता. भारतातील पाच प्रतिनिधींपैकी अस्मादिक एक, भारतीय मुद्रित माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून निवड झालेले. फॅकल्टी मेंबर्समध्ये अमेरिकेच्या तज्ज्ञांची संख्या जास्त होती.

सॅल्झबर्ग हे ऑस्ट्रियातील एक निसर्गरम्य गाव. आल्पस् पर्वताच्या पायथ्याशी सॅल्झबर्ग सेमिनारची इमारत अठराव्या शतकातली आणि एकेकाळी ख्रिश्‍चन धर्मगुरूंचे वास्तव्य असलेली, अतिशय देखणी आणि खानदानी वास्तू आहे ती. या इमारतीची वास्तुशास्त्रानुसार रचना आणि कलाकुसर डोळे विस्फारून टाकणारी आहे. वास्तू जुनी, पण मजबूत आणि अद्ययावतही. ही चर्चा, त्यातून निघालेले निष्कर्ष, मते-मतांतरे पुस्तकरूपात प्रकाशित केली जातात. संबंधितांपर्यंत पोहोचवली जातात. ‘सॅल्झबर्ग सेमिनार’ या विश्‍वस्त निधीची स्थापना १९४७ मध्ये झालेली. जागतिक पातळीवरील अनेक महत्त्वाच्या विषयांवर, प्रसिद्धीच्या प्रकाशात न येता मूलभूत पातळींवर चर्चा घडवून आणण्याचं काम ही संस्था स्थापनेपासून करत आहे. अशा चर्चा घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात आणि त्यात सहभागी होण्यासाठी अनेक तज्ज्ञांना अभ्यासवृत्तीही (फेलोशिप) दिली जाते. अनेकदा अमेरिकन सेंटर अशा अभ्यासकांच्या प्रवास आणि निवासाच्या खर्चाची काळजी घेते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

सॅल्झबर्ग सेमिनारचं अ‍ॅकॅडेमिक पातळीवरील महत्त्व खूप मोठे आहे, याची जाणीव मला फारशी नव्हती; असण्याचे कारणही नव्हते; आपली कधी या सेमिनारसाठी निवड वगैरे होण्याची कल्पनाही मराठी पत्रकारितेत कोणाला सुचण्याचं कारणच नव्हते! मात्र, एकदा त्या प्रक्रियेत अडकल्यावर आणि विशेषत: सनदी सेवेतील अधिकारी आणि मूलभूत संशोधन करणार्‍या काही संशोधकांशी चर्चा करताना हे महत्त्व आणि गांभीर्य अधोरेखित झाले. मग मीही या अभ्यासवृत्तीबद्दल जरा गांभीर्यानेच घेतलं. तेव्हा अमेरिकन काऊन्सिलचा ‘प्रेस अ‍ॅडव्हायझर’ म्हणून काम करणारा ‘इंडियन एक्सप्रेस’मधील एकेकाळचा सहकारी, प्रमोद पागेदारसोबतच शेतकरी संघटनेचे एकेकाळचे विदर्भातील नेते आणि इंग्रजीचे प्राध्यापक शरद पाटलांकडूनही तिथं सादर करावयाच्या प्रेझेन्टेशनचे ड्राफ्ट वगैरे तपासून घेतले. जी आकडेवारी वापरणार होतो, तिच्याबद्दलची खात्री अधिकृत खात्यांकडून किंवा त्या-त्या वेबसाईटवर जाऊन करवून घेतली.

सॅल्झबर्गच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंतचा वेळ प्रतिनिधींच्या आगमनाचा होता आणि दुपारी बारानंतर परस्परांच्या ओळखीचा कार्यक्रम होता. साडेपाच-पावणेसहा तासांचा ‘जेट लॅग’ असूनही आयोजकांनी पोहोचलेल्या प्रतिनिधींना आरामाची फारशी संधी न देता लगेच कामाला लावलं. परस्पर ओळखीच्या सत्रानंतरही संध्याकाळी सातपर्यंत काही कार्यक्रम नसल्याने प्रतिनिधीही परस्परांच्या अधिक तपशिलाने ओळखी करून घेण्यात आणि आपापले ‘गोट’ कसे फॉर्म करता येतील, याची चाचपणी करत फिरत होते. भारत आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींचा गोट लगेचच स्थापन झाला.

ओळखीच्या सत्रात मी स्वत:ची ओळख नागपूरहून आलो, अशी करून देतानाच नागपूरची भूमी जवळच असलेल्या वर्ध्याच्या सेवाग्राम आणि पवनार आश्रमामुळे पुनीत झालेली आहे. कारण, महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे वास्तव्य या ठिकाणी प्रदीर्घ काळ होते, हे आवर्जून नमूद केले. आमच्या फॅकल्टीचे एक मेंबर ‘योची बँकर’ हे होते. भली मोठी दाढी आणि चेहर्‍याची उभी ठेवण असणारा हा गुटगुटीत अमेरिकन इसम मीडियामध्ये बदलणार्‍या नेटवर्कच्या संदर्भातला जाणकार माणूस. या संदर्भातली त्यांची काही पुस्तके प्रकाशित झालेली अहोत आणि त्या विषयावर त्यांनी डॉक्टरेटही संपादन केली आहे. चहाच्या वेळेस गप्पा मारताना नेमका ‘महात्मा गांधी’ या एका शब्दाच्या आधारे हा गृहस्थ माझ्याजवळ आला आणि चर्चा सुरू झाली, ती सेवाग्रामचा आश्रम कसा आहे, तिथं महात्मा गांधी किती काळ वास्तव्याला होते, मी तिथं किती सातत्यानं भेटी देतो वगैरे वगैरे.

खरं तर, अलीकडच्या काही वर्षांत सेवाग्राम-पवनारला मी गेलेलोही नाही. मात्र, राजीव गांधी पंतप्रधान असेपर्यंत आणि त्यातही विशेषत: विनोबा भावे हयात असेपर्यंतचा एक काळ असा होता की, राज्य काय किंवा केंद्र काय, या दोन्ही ठिकाणच्या सरकारातील नेतृत्वापासून अन्य कुणालाही पवनार किंवा सेवाग्रामला महिना-दोन महिन्यातून एकदा खेप घातल्याशिवाय सत्तेत जणू राहताच येत नसे! नेमक्या याच काळात हे बीट माझ्याकडे असल्यानं या दोन्ही आश्रमांविषयीची माहिती मला होतीच. नाही तरी महात्मा गांधी माहीत नसणारा कुणी भारतीय माणूस आहे? या पुंजीच्या आधारे मी बरंच काही सांगितलं.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

शिवाय, माझ्याजवळ महाराष्ट्र सरकारनं १९९४ साली प्रकाशित केलेली ‘गांधीजींची विचारधारा’ ही पुस्तिकाही बहुसंख्य वेळा असते. सॅल्झबर्गमध्येही ती होती. त्या आधारेही मी बरंच काही बोलू लागलो. त्या लोकांना वाटलं मी महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान कोळून का काय म्हणतात ते प्यायलो आहे आणि माझा भाव अधिकच वाढला. थँक्स टू ‘गांधीजींची विचारधारा’ आणि ती प्रकाशित करणारे महाराष्ट्र सरकार!

मग महात्मा गांधी आणि आजचे समाजजीवन, बेन किंग्जलेचा गांधी हा चित्रपट, गांधींचं आजचेही भारतातले महत्त्व आणि अस्तित्व वगैरे अनेक पैलू या चर्चांना फुटले. बँकरसोबत अनेक युरोपियन्स विशेषत: ऑस्ट्रिया, जर्मनी, हंगेरीचे त्या चर्चेत उत्साहानं सहभागी होऊ लागले. त्यांना माहीत नसलेले आणि मला माहीत असलेले गांधी, असे एकमेकांत एक्स्चेंज होऊ लागले. गांधीजींची विचारधारा या मराठीतील पुस्तिकेच्या झेरॉक्सही काहींनी काढून घेतल्या, इत्यादी इत्यादी. महात्मा गांधी युरोपियन्सना एवढे का जाणून घ्यावेसे वाटतात, हे कोडे काही मला उलगडलं नाही. या सर्वांना आणि विशेषत: युरोपियन्सना महात्मा गांधी एवढ्या असोशीनं का जाणून घ्यावेसे वाटतात, याची उत्सुकता मला वाटू लागली.

मध्य युरोपातील निसर्गरम्य स्थळं पाहण्यापेक्षा विशेषत: मला उत्सुकता होती ती छळछावण्यांची. हिटलरने १९३३  ते १९४५  या काळात अक्षरश: लाखो लोक जिथं छळ करून मारून टाकले, त्या माणुसकीला काळिमा फासणार्‍या छळछावण्यांविषयी खूप ऐकलं होतं. अशीच उत्सुकता पाकिस्तान आणि म्यानमारमधून आलेल्या फेलोंमध्ये निर्माण करण्यात मला यश आलं. एक शनिवार-रविवार जर्मनीला भेट द्यायची ठरलं, तेव्हा या छळछावण्या बघण्याची संधी मिळू शकते, हे समजलं आणि त्याप्रमाणे दौर्‍याचं नियोजन करून म्युनिचला जाताना एका ठिकाणी थांबून आम्ही क्रौर्याची परिसीमा गाठणारे दोन कॉन्सन्ट्रेशन कॅम्प पाहिले. ५०  लोकही मावू शकणार नाही, अशा जागी दीड-दोन हजार लोक कोंबणे येथपासून ते हजारो लोकांना चेंबरमध्ये कोंडून गॅसच्या साहाय्याने ठार करणे, अशा क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या कथा शालेय शिक्षणात वाचल्या होत्या. हिटलरचे चरित्र, दुसर्‍या महायुद्धाचा इतिहास अभ्यासताना हे सगळे वाचनात आले होते.

तळहातावरचा दिवा भर वादळातही जपून ठेवावा त्या पद्धतीने मध्य युरोपात आणि त्यातही प्रामुख्याने जर्मनीत असे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पस् जागोजागी जपून ठेवले आहेत. त्या छळवणुकीत जीव गमावलेल्यांपैकी कुणाचा चष्मा, कुणाचा पेन, कुणाच्या शर्टाचं बटन, कुणाचा शर्ट, कुणाची सिगारेट केस, अशा एक ना अनेक लाखो वस्तू एकेका कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये आहेत. या वस्तू बघताना अक्षरश: गलबलून येते. आपल्या रक्तामांसाचे कोणी गमावले त्यासारखी होणारी हुंदकाभरली आठवण होते.

तिथे खूप छायाचित्रं आहेत, त्या छळासंबंधीची आणि पुढे त्या छळाच्या चौकशीची हजारो कटिंग्ज आहेत आणि या संपूर्ण परिसरात एखाद्या समुद्रावर भीषण तांडव यावे; त्या रौद्र वादळाचे दु:ख पोटात पचवून आतल्या आत घुसमट सहन करत समुद्रानं सळसळही न करता झोपी जावं, तशी अभद्र शांतता असते.

त्या छळाचंही युरोपियन्सनी अतिशय गांभीर्याने, पण तितक्याच व्यावसायिकतेनं मार्केटिंग केलेले आहे. कारण, अशा एकेका कॅम्पला दररोज हजारो लोक भेटी देत असतात आणि ते बघण्यासाठी पैसेही मोजावे लागतात. एकेकाळी हिटलरने केलेल्या छळवणुकीचा एकप्रकारे मांडलेला तो व्यापारच आहे!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आम्ही पाहिलेल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये २ लाख ६ हजार २६६ कैदी होते आणि त्यापैकी ८० हजारांचा मृत्यू ‘हिटलर सेने’च्या छळामुळे झाला. युरोपच्या भूप्रदेशात माणुसकीचा गळा घोटला गेला असताना सांस्कृतिक सुबत्तेच्या आणि सभ्यतेच्या आजच्या मारल्या जाणार्‍या गप्पा किती तकलादू आधारावर उभ्या आहेत, हे या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये गेल्यावर सहज लक्षात येते. युरोपियन देशांच्या आजच्या आर्थिक सुबत्तेच्या पायातल्या अदृश्य अश्रूंचा उष्ण स्पर्श अस्वस्थ करतो, त्या क्रौर्याचे बळी ठरलेल्यांचे हुंकार, उसासे ऐकू आल्याचे भास होतात आणि गलबलून येते... कालच्या छळ आणि क्रौर्याचे मळभ आजही वातावरणात दाटलेले असते आणि आजची सुबत्ता व संस्कृती शरमेने काळी ठिक्कर पडली आहे, असंच वाटतं.

अहिंसेच्या मार्गानंच संघर्ष केला पाहिजे, याचा आग्रह धरणार्‍याच नव्हे तर, हा आग्रह आयुष्यभर श्रद्धेनं व्रत म्हणून सांभाळणार्‍या महात्मा गांधींबद्दल आजच्या युरोपियनांना एवढी उत्सुकता का आहे, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी हे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पस् बघितल्यावर कुठं जाण्याची गरजच उरत नाही. महात्मा गांधींच्या देशात आपण राहतो, याचा मग सार्थ अभिमान मला वाटू लागला आणि त्या महात्म्याला मनोमन पुन्हा एकदा वंदन केले.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......