‘कोटा फॅक्टरी’ जीवघेण्या स्पर्धेच्या जगात फक्त एक लहानसं बेट उभं करण्याचा प्रयत्न करते. या व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करत नाही
कला-संस्कृती - चलत्-चित्र
कुंडलिक विमल वाघंबर
  • ‘कोटा फॅक्टरी’ या वेबसीरीजचं एक पोस्टर
  • Tue , 28 September 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र कोटा फॅक्टरी Kota Factory आयआयटी IIT

‘आईआईटी में जाना तुम किसी का भी सपना नहीं होना चाहिए। सपने तो देखने के लिए होते हैं, जब मन किया तब देख लिया। आईआईटी में जाना सपना नहीं, लक्ष्य होना चाहिए। जब लक्ष्य बनाओगे तब उसे पाने का मार्ग भी ढूढोंगे।”

असे तरुणांच्या हृदयाला भिडणारे एकापेक्षा एक जबरदस्त संवाद ‘कोटा फॅक्टरी’ या वेबसीरीजमध्ये पावलोपावली विखुरलेले आहेत. या वेबसीरीजचा दुसरा सीझन २४ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या वेबसीरीजचा पहिला सीझन सुपरहिट होता, गेलं एक वर्षभर तो ‘टॉप १०’मध्ये आहे. त्यातील जीतू भैया, वैभव पांडे, वर्तिका, मीना, उदय ही पात्रं तरुणांच्या गळ्यातला ताईत झाली आहेत. त्यामुळे तरुण या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेनं वाट पहात होते. ती आतुरता आता संपली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या वेबसीरीजची तांत्रिक आणि तथ्यात्मक बाजू सांगण्याची आवश्यकता नाहीये. ती कुणाला जाणून घ्यायची असेल तर गूगलवर एका क्लिकवर मिळून जाईल. आपण ही वेबसीरीज तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय का आहे, ते या तिच्यावर आपला जीव ओवाळून का टाकत आहेत, हे पाहूया.

‘कोटा फॅक्टरी’ची कहाणी ही देशातील प्रसिद्ध अशा कोटा शहरातील कहाणी आहे. हे शहर आयआयटी कोचिंग क्लासेसचं देशातील सर्वांत मोठं आणि प्रसिद्ध केंद्र आहे. तिथं दरवर्षी लाखो विद्यार्थी आयआयटी कोचिंगसाठी येतात. ही वेबसीरीज या कोचिंग क्लासेसच्या बाजाराची, तिथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची अन् त्यांच्या मन:स्थितीची कहाणी आहे.

कोणताही चित्रपट, वेबसीरीज यांचा फक्त विषय चांगला असून चालत नाही, तर त्या विषयाला कथेत बांधणं, तिला कलात्मकतेची जोड देणं, त्या कथेला व त्यातील पात्राला हळूहळू फुलवत नेणं, समाजातील विरोधाभास मांडताना जबरदस्त संवादाची पेरणी करणं आवश्यक असतं. हे सर्व या वेबसीरीजमध्ये आहे. सुंदर कथेला कलाकारांच्या अभिनयानं ‘चार चांद’ लावले आहेत.

या वेबसीरीजचं नाव आहे ‘कोटा फॅक्टरी’. म्हणजे कोटा शहराचं रूपांतर फॅक्टरीमध्ये झालेलं आहे. कारखान्यात मशीन आणि असेम्ब्ली लाईन असते. कच्चा माल मशीनमध्ये घालून कामगार त्याचं रूपांतर पक्क्या मालात करतात. आयआयटीमध्ये जाण्याचं स्वप्न घेऊन कोटामध्ये येणारे विद्यार्थी हे कोचिंग क्लासेससाठी कच्चा माल आहेत. तिथं शिकवणारे शिक्षक हे कामगार आहेत, जे कच्चा मालाच्या रूपात आलेल्या विद्यार्थ्यांना क्लासेसच्या असेम्ब्ली लाईनमध्ये घालून पक्का माल करून सोडतात.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

अशा या क्लासेसच्या कारखान्यात वैयक्तिक स्वातंत्र्याला, मानवी भावनेला काहीही महत्त्व राहत नाही. त्या वेळी विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था काय होते, हे या वेबसीरीजमध्ये प्रखरपणे दाखवलं आहे. अशा अत्यंत घुसमटीच्या वातावरणात जीतू भय्या नावाचा एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून येतो, त्यांना प्रेरित करतो. जीतू भय्याचे संवाद गजब प्रकारे लिहिले आहेत. त्यांना तोड नाही. हे गजब संवाद जीतू भय्या ज्या पद्धतीनं म्हणतात, ते पाहून मजा येते. वेबसीरीजमधला एक प्रसिद्ध संवाद आहे की, ‘जीतू भय्या सांगत नाही, तर फील करायला लावतात’.

‘कोटा फॅक्टरी’च्या कथेबद्दल, पात्रांबद्दल, त्यातील प्रेमाबद्दल, मैत्रीबद्दल बरंच काही लिहिलं जात आहे. या वेबसीरीजने जे प्रश्न उपस्थित केले आहेत, समाजातील जे विरोधाभास समोर आणले आहेत, या त्यावरही चर्चा सुरू झालेली आहे.

त्यातील मुद्द्यांवर चर्चा होते आहेच, पण या वेबसीरीजमध्ये या सर्व प्रश्नांवर जे उपाय सुचवले गेले आहेत, त्यावर चर्चा होताना दिसत नाहीये. ‘कोटा फॅक्टरी’ प्रचंड स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची, शिक्षकांची होणारी अवस्था, यांवर सखोल आणि प्रखर असं भाष्य करते. या स्पर्धेमुळे होणाऱ्या परिणामांचा सूक्ष्मपणे उलगडा करते, पण यावर जे उपाय सुचवते ते विद्यार्थ्यांना परत त्याच स्पर्धेत ढकलण्याचं काम करतात. आणि या यासाठी या वेबसीरीजला जबरदस्त संवादांचा आधार घ्यावा लागतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

देशातील कोटा या एकट्या शहरामध्येच लाखो विद्यार्थी आयआयटी परीक्षेला बसतात, पण आयआयटीमध्ये जागा आहेत फक्त ४,०००. आता या लाखो विद्यार्थ्यांनी आयआयटी हे स्वप्न न मानता ध्येय मानलं, रात्रंदिवस प्रचंड मेहनत घेतली तरी फक्त ४,००० विद्यार्थी पास होणार आहेत. वेबसीरीजमध्ये आयआयटी पास होण्यासाठी ज्या ट्रिक्स सांगितल्या आहेत, जे मार्ग सांगितले आहेत, ते जसेच्या तसे विद्यार्थ्यांनी केले तरी फक्त ४,००० पास होणार. म्हणजे मूळ परिस्थिती तरी काही बदलणार नाही. या वेबसीरीजमध्ये ‘आयआयटी टफ है, इसलिए करना है।’ हा एक खूप प्रसिद्ध संवाद आहे. आता इथं मुद्दा हा आहे की, ही टफ आयआयटी किती विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षं करत राहणं परडवणार आहे. या देशात जे लाखो कमावतात, त्यांची मुलंच ही आयआयटी करू शकतात, ही वस्तुस्थिती आहे.

या वेबसीरीजमधला एकही विद्यार्थी शेतकऱ्यांचा मुलगा, कामगाराचा मुलगा किंवा गरीब घरातील नाही. त्यामुळे कोटा हे करोडपती, लखपती असणाऱ्या लोकांचं शहर आहे, जिथं फक्त त्यांचीच मुलं शिकायला जातात अन् त्यांनाच ही कठीण परीक्षा देण्याची संधी मिळते.

दुसरं म्हणजे या वेबसीरीजमध्ये गळेकापू स्पर्धेचं उत्तम चित्रण केलेलं आहे. खोलीत सोबत राहणारे, एकाच वर्गात आजूबाजूला बसणारे मित्र नाहीत, तर सर्वांत मोठे स्पर्धक आहेत, हे विदारक सत्य वेबसीरीजमध्ये तितक्याच ताकदीनं मांडलं आहे. आणि दुसरीकडे या स्पर्धेच्या वातावरणात मैत्रीही फुलताना दाखवलेली आहे. स्पर्धा आणि सहकार्य यांतील द्वंद यातून दिसतं. मित्रासोबत बाहेर फिरायला जायचं की नाही, याचा निर्णय घेण्यास वेळ लागतो, कारण आधीच अभ्यास करून मित्र पुढे जाण्याची शक्यता असते. आयआयटीमध्ये दुसरी रँक येऊनही तुम्ही आनंदी नसता, कारण जो सोबत असतो त्याची रँक पहिली आलेली असते. अशा स्पर्धेच्या वातावरणात मैत्रीचं नातं फुलायला मर्यादाच येतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात ‘कोटा फॅक्टरी’ फक्त एक लहानसं बेट उभं करण्याचा प्रयत्न करते. या स्पर्धेच्या व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करत नाही, तर उलट त्या स्पर्धेचं गौरवीकरण करते अन् फक्त या स्पर्धेमुळे होणाऱ्या परिणामावर टीका करते. असं बेट जास्त काळ टिकू शकत नाही. त्याला आजूबाजूचा स्पर्धेचा महासागर गिळून टाकणार. वाईट परिणामांना संपवायचं असेल तर त्यावर टीका करून काही होणार नाही, ते परिणाम ज्यामधून आले आहेत, त्याबद्दल बोलावं लागेल. आयआयटीच्या जागा कमी आहेत, तर त्यावर बोलावं लागेल. कारण म्हणून स्पर्धा जास्त आहे अन् स्पर्धेचे परिणाम आहेत. कोटा फॅक्टरी त्यावर काही बोलत नाही.

‘कोटा फॅक्टरी’मध्ये एक दृश्य असं आहे की, जे विद्यार्थी आयआयटी पास होत नाहीत, त्यांच्यासाठी जीतू भय्या एक पार्टी आयोजित करतात, त्यांना समजावतात. मर्यादित चौकटीत पाहिलं तर हे खूप चांगलं दृश्य वाटतं. पण ज्या स्पर्धेच्या व्यवस्थेमुळे व जागा न वाढल्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर ही अवस्था आलेली आहे, तो मुद्दा इथं बाजूला पडतो. १३० कोटींच्या देशात फक्त ४,००० आयआयटीच्या जागा आहेत? देशातल्या प्रत्येक जिल्हात आयआयटी का असू शकत नाही? एका बाजूला देशात मोठ्या प्रमाणात चांगल्या इंजिनीअर्सची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूला आयआयटीची संख्या खूप कमी आहे. या प्रचंड अशा विरोधाभासाबद्दल कधी बोलणार?

शेवटी एका वाक्यात बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की, ‘कोटा फॅक्ट्री’ म्हणजे भरत आंधळे आणि विश्वास नांगरे पाटील यांचं नवं व्हर्जन आहे. महाराष्ट्रात एकेकाळी भरत आंधळे आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या भाषषांनी प्रेरित होऊन हजारो तरुण स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रांत उतरले. आज महाराष्ट्रात एका बाजूला लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत, रात्रंदिवस अभ्यास करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सरकारी जागा कमी होत आहेत. जागा आणि विद्यार्थी यातलं अंतर खूप वाढत चाललं आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना वजनदार संवाद ऐकवून स्पर्धा परीक्षांच्या खाईत ढकलण्याऐवजी शासनाच्या धोरणावर चर्चा व्हायला हवी. ‘कोटा फॅक्टरी’ शासनाच्या धोरणामुळे जी गळेकापू स्पर्धा निर्माण झालेली आहे, त्यावर प्रश्न उपस्थित करत नाही, तर विद्यार्थ्यांना वजनदार संवाद ऐकवून अजून स्पर्धा परक्षांच्या चक्रव्यूहात ओढण्याचं काम करते. जे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत झालं, तेच काम आयआयटीच्या बाबतीत कलात्मक पद्धतीनं ‘कोटा फॅक्टरी’ या वेबसीरिजच्या माध्यमातून होताना दिसत आहे.

 

..................................................................................................................................................................

लेखक कुंडलिक विमल वाघंबर लोकायत संघटना (पुणे)चे कार्यकर्ता आहेत.

kundalik.dhok@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख