भारत तालिबानशी बोलणी करतोय, लवकरच ‘गोदी मीडिया’ तालिबानचं स्वागत करणार?
पडघम - देशकारण
रवीश कुमार
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 09 September 2021
  • पडघम देशकारण तालिबान Taliban अफगाणिस्तान Afghanistan भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi

हा मूळ हिंदी लेख प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या फेसबुक पेजवर ३१ ऑगस्ट २०२१ रोजी लिहिला आहे. त्याचा हा मराठी अनुवाद...

..................................................................................................................................................................

कतारची राजधानी दोहामध्ये भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्तानिकझाई यांच्याशी बोलणी केली आहे. ते दोहामधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख आहेत. ही माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्यांच्या वेबसाईटवरही दिली आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, भारत तालिबानला मान्यता देण्याच्या आणि त्याच्याशी संपर्क ठेवण्याच्या दिशेनं पावलं टाकत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार तालिबानकडून बोलणी करण्यासाठी प्रस्ताव आला होता.

प्रश्न अगदी साधा आणि छोटा होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तालिबानला ‘आतंकवादी’ मानतात की नाही? जग काय म्हणतं ते सोडा. जगभरातल्या अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष तालिबानविषयी निदान स्वत: प्रतिक्रिया देत होते. त्यांच्या देशहित आणि भौगोलिक राजकारणावर परिणाम झालाय, तरीही ते बोलत होते. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की, भारत खूप मोठी रणनीती तयार करतो आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी तालिबानला आतंकवादी वा आपला दोस्तही म्हणत नाहीयेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

त्यांचं मौन संपण्याचीही ‘गोदी मीडिया’ने वाट पाहिली नाही. या गोदी मीडियाने हेही विचारलं नाही की, तालिबान आतंकवादी आहे, हे पंतप्रधान त्याविषयी का बोलत नाहीत? उतावीळ गोदी मीडिया रात्रंदिवस तालिबानच्या निमित्तानं भारतातील मुसलमानांना ‘तालिबानी’ म्हणू लागला. जेणेकरून बेरोजगार हिंदू तरुण मुसलमानांविषयी वेगवेगळ्या कल्पना करायला आणि त्यांचा द्वेष करायला लागावेत. एका टीव्ही वाहिनीनं तर तालिबानची स्थापना करणाऱ्या मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकुबच्या छायाचित्राच्या जागी मेरठमधील याकुब कुरेशीचंच छायाचित्र लावून टाकलं. तालिबानचं स्वागत केल्याचा ठपका ठेवत काही लोकांविरोधात तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. त्याचा आधार हाच असला असता की, तालिबान आतंकवादी असेल तर त्याचं स्वागत कसं काय केल जाऊ शकतं. पण आता तर भारत सरकारच तालिबानशी चर्चा करत आहे, तेव्हा या तक्रारींचं काय होणार? भारत सरकार आतंकवाद्यांशी कसं काय चर्चा करू शकतं?

हा मूर्खपणा कमावण्यासाठी गेल्या सात वर्षांत आपण काही कमी मेहनत केलेली नाही. जरा जास्तच मेहनत घेतली आहे, त्यामुळेच हे सगळं होत आहे. गोदी मीडियाला वाटलं की, त्यांचा नेता तालिबानला आव्हान देईल. त्यांच्या मौनाचा फायदा उठवत भाजपचे नेते, आयटी सेल आणि गोदी मीडिया तालिबानविषयी आलतूफालतू प्रोपगंडा पसरवण्याच्या मागे लागले. प्रेक्षक हिंदू बनून मोठमोठ्या डोळ्यांनी ते पाहत राहिले. आपल्या शेजाऱ्यांना तालिबानविषयी सांगू लागले. दुसरीकडे त्यांच्या खिशातून खाद्यतेलासाठी दोनशे रुपये आणि पेट्रोलसाठी शंभर रुपये कापले गेले.

अखेर भारताने थेट तालिबानशीच बोलणी केलीय, आता गोदी मीडिया आणि आयटी सेल काय करणार? तालिबानचं स्वागत करणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचं गुणगान जोरजोरात करत म्हणणार – ‘आतंकवादी तालिबानशी बोलणी करून त्यांनी शहाणपण दाखवलं आहे! मास्टरस्ट्रोक आहे.’ जे लोक रोज इनबॉक्समध्ये येऊन विचारत होते – तुम्ही तालिबानविषयी गप्प का आहात, ते काय करतील आता? मी काय परराष्ट्र मंत्री आहे का? मी पण हेच विचारत होतो की, पंतप्रधान मोदी तालिबानला आतंकवादी का म्हणत नाहीयेत. अगदी साधा प्रश्न होता. मग अडचण नेमकी काय आहे? ते तर आपल्या पक्षाच्या नेत्यांनाही थांबवत नाहीयेत की, येता-जाता मुसलमानांना आणि विरोधकांना ‘तालिबान’ म्हणणं बंद करा म्हणून. तालिबानच्या नावावर ‘वोट’देखील आणि आतंकवादी म्हणण्यासुद्धा मौनधारणा. कमाल आहे!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आज आणखी एक बातमी आली आहे. पंतप्रधानांनी अफगाण प्रश्नांविषयी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. यापुढे तालिबानशी जी काही बोलणी होतील, त्याचं उत्तरदायित्व या समितीवर असेल. भारताच्या हिताच्या दृष्टीनं जे योग्य असेल, त्याचं पालन होतं की नाही, हेही समिती पाहिल. या समितीला पुढे करून मोदीजी पुन्हा एकदा तालिबानला ‘आतंकवादी’ किंवा ‘शेजारी आलेला नवा पाहुणा’ असं काही म्हणण्यापासून वाचतील. त्यांनी ‘स्टेटसमॅन’ बनण्यासाठी किती मेहनत घेतली, पण तालिबानविषयी एक ‘स्टेटमेंट’ येऊ शकलं नाही.

आता हिंदी प्रदेशातील तरुण आणि घरांमध्ये बसलेल्या निवृत्त लोकांचं जग उदध्वस्त होईल. गेल्या काही दिवसांपासून त्यांना तालिबानच्या नावावर फेक न्यूज पसरवण्याचं काम मिळालं होतं. त्यांना वाटलं होतं की, आर्थिक संकट आणि बेरोजगारी यामुळे त्रस्त झालेल्या जनतेला पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम वादात गुंतवलं जाऊ शकतं. ते असं काय कठीण काम आहे म्हणा! पण आता तुम्ही बाहेर येऊन स्वागत करा की, आतंकवादी तालिबानशी बोलणी करून भारताने चांगलं काम केलंय. हारसुद्धा घालायला हवेत.

ईडी आणि गोदी मीडिया मागे लावून विरोधी पक्षांना संपवता येऊ शकतं, निवडणूक निधीवर नियंत्रण कायम ठेवून मैदान खाली करून विजेता होता येऊ शकतं, पण रिकाम्या मैदानात गर्जना करणारा योद्धा विजेता असला पाहिजे, हे गरजेचं नाही. मागेपुढे कुठलंही आव्हान नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ सांगू शकत नाहीयेत की, भारताच्या दृष्टीनं तालिबान काय आहे?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

मी हा लेख इथेच संपवतो. तुम्ही तुमच्या इनबॉक्समध्ये आतंकवादी तालिबानशी पंतप्रधान मोदी सरकारने साधलेल्या संवादाच्या समर्थनार्थ येणाऱ्या पोस्टची वाट पाहा. लवकरच गोदी मीडियाचा अँकर गर्जना करत तालिबानचं स्वागत करेल. म्हणेल की, तालिबानशी हात मिळवणी करून मोदीजींनी पाकिस्तानला धूळ चारली. तुम्ही टाळ्या वाजवा. वाजवा. थाळ्या आणि टाळ्या वाजवण्याचा राष्ट्रीय अनुभव कधी उपयोगाला येणार नाही तर!

आतंकवादी संघटना अल कायदाने तालिबानला शुभेच्छा दिल्या आहे. आजच भारताने तालिबानशी बोलणी केली आहेत.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

तालिबानची दाढी कुरवाळणार का मोदी सरकार?

भारत या पूर्वीही तालिबानविरोधी उत्तर आघाडीचा प्रमुख समर्थक राहिलेला आहे. आताही तालिबानचा विरोधच केला पाहिजे

खरा मार्ग आणि खरे देशप्रेम हे दोन्ही रविन्द्रनाथांच्या ‘काबुलीवाल्या’चेच असू शकते, आत्ताच्या का‘बुली’(bully)वाल्यांचे नव्हे!

सप्टेंबर २०२१नंतरचा अफगाणिस्तान, तालिबान, अमेरिका आणि भारत 

अफगाणिस्तानात आधी तालिबानचा उदय झाला, त्यानंतर अस्त झाला आणि आता पुन्हा उदय झालाय... त्याची गोष्ट

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......