काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या निकालाचे बॉम्बगोळे फुलारतील!
पडघम - राज्यकारण
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 20 February 2017
  • राज्यकारण नगरपालिका नगरपंचायती नगराध्यक्ष Municipal council polls Municipal Corporation elections

राज्यातील मुंबईसह अन्य नऊ महागनरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. उद्या प्रत्यक्ष मतदान होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष विरुद्ध सत्तेत नसलेले पक्ष असे चित्र दिसायला हवे होते. मात्र तसे न होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध इतर सर्व राजकीय पक्ष असेच चित्र पाहायला मिळाले. शनिवारच्या पुण्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या भर दुपारच्या जाहीर सभेचा तर फज्जाच उडाला. त्याविषयी काल शनिवार-रविवार सोशल मीडियावर भरपूर चर्चाही झाली. असो. उद्या मतदानाला जाण्यापूर्वी आज थोडासा गृहपाठ म्हणून खालील लेख जरूर पहा, वाचा आणि शक्य झाल्यास त्यावर अंमलही करा.

------------------------------------------------------------------------------------------
१५ फेब्रुवारी २०१७
प्लीज गो वोट बाबा, प्लीज गो वोट, बट कुणाला डोन्ट वोट? : टीम अक्षरनामा
मतदार म्हणून आपण आपल्या योग्य निवडीतून नक्कीच बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी मतदान करायलाच हवं. पण कुणाला मत द्यावं असा प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकलेला असतो. तो संभ्रम दूर करणारा, कुणाला मत द्यायचं आणि कुणाला नाही याबाबत मार्गदर्शन करणारा ‘प्लीज गो व्होट’ हा अनोखा म्युझिक व्हिडिओ आहे....

------------------------------------------------------------------------------------------

१० फेब्रुवारी २०१७
मतदान कोणाला करावं? कोणाला करू नये? का करू नये? : संपादक अक्षरनामा
सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते भ्रष्टाचार करतात, गुन्हेगार उमेदवारांना पाठीशी घालतात. त्यांना तिकिटं देतात. जातीयवादाचं राजकारण करतात. राजकारणात, सत्तेत राहायचं असेल तर हे सर्व करावं लागतं, असं त्याचं खाजगीत समर्थनही करतात. हे दुष्टचक्र थांबवण्यापलीकडे गेलं आहे. पण सुजाण मतदार म्हणून आपण मतदानासाठी काहीएक निश्चित भूमिका ठरवली तर आपण या दुष्टचक्राला काहीएक प्रमाणात रोखू शकतो, पायबंद घालू शकतो....

------------------------------------------------------------------------------------------

१५ फेब्रुवारी २०१७
चेहरे, चरित्र, अजेंडे एकसारखेच; वोट दिये, तो दिये किसे? : राजा कांदळकर
विविध पक्षांची, नेत्यांची वक्तव्यं, त्यांचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप, आव्हानं, इशारे काय सांगतात? त्यांना एकमेकांवर कुरघोडी करण्याचीच ईर्ष्या लागलीय. मी दुसऱ्यापेक्षा बेहतर, प्रभावी कसा आहे, हे सिद्ध करण्याच्या नादात हे नेते गुरफटले आहेत. जनतेचं भलं कशात आहे, हे नेते, त्यांचे पक्ष जवळपास विसरलेत की काय, अशी शंका यावी इतपत त्यांच्या प्रचाराची पातळी तळाला गेलीय. हे नेते आम्ही एकाच माळेचे मणी आहोत, हे स्वत:हून दाखव...

------------------------------------------------------------------------------------------

५ फेब्रुवारी २०१७
नो पार्टी इज डिफरन्ट, ऑल आर इन द सेम बोट! : प्रवीण बर्दापूरकर
‘पार्टी वुईथ डिफरन्स’ असं कितीही म्हणवून घेतलं तरी भाजप अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा मुळीच वेगळा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून पराभव आणि चौकशींच्या भीतीच्या ग्लानीत आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेची अवस्था केविलवाणी झालेली आहे, तर रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट सत्तेसाठी प्रस्थापित पक्षांचा उदार आश्रय कसा मिळेल याच्या घोर काळजीत आहेत....

------------------------------------------------------------------------------------------

१७ फेब्रुवारी २०१७
मानसिकतेपक्षा केवळ ‘टायर’ बदलणारे भारतीय लोक... : डॉ. संध्या शेलार
निवडणुकीचे पडघम गावागावाच्या कानाकोपऱ्यात वाजू लागले. पक्षाचे उमेदवार जाहीर होऊ लागले आणि ते मतदारराजाच्या दारात जाऊन आपले जोडे झिजवू लागले. विनम्र होऊन, हात जोडून आपली ओळख सांगत मतदारराजाच्या मोठेपणाबद्दल तोंडभरून बोलू लागले. मतदारही या गोडगोड बोलण्यानं हुरळू लागला. त्यांनी दिलेल्या साड्या, भेटवस्तू पैसे घेऊ लागला. मतदार, कार्यकर्ता, त्यापेक्षा मोठा कार्यकर्ता यांचे रेट राजरोस चर्चेचा विषय होत राहिला....

------------------------------------------------------------------------------------------

१८ फेब्रुवारी २०१७
मुख्यमंत्री, ऐका ही अस्वस्थ समाजमनाची स्पंदनं... : प्रवीण बर्दापूरकर
निवडणुकीच्या काळात घेत असलेल्या अविश्रांत श्रमांचे पडसाद चेहऱ्यावर दिसणाऱ्या फडणवीस यांच्या ‘किचन कॅबिनेट’मधील लोकांचा उल्लेख मंत्रालयाच्या प्रेस रूममध्ये ‘लष्कर-ए-देवेंद्र’ असा होतो असं कळलं. सॅल्यूट करणं आणि हुकुमाचं पालन करणं एवढंच लष्करातल्या सैनिकांना माहिती असतं. त्यांच्याकडून कमांडरला वस्तुस्थितीची जाणीव परखडपणे करून देण्याचं धैर्य अपेक्षित नसतं! ...

------------------------------------------------------------------------------------------

३१ जानेवारी २०१७
सेना ‘इतिहासजमा’ होईल? : संजय पवार
सक्रिय राजकारणातून साहेब लांब झाले आणि उद्धवजी आले. तोवर भूयारी रस्ता राजमार्ग झाला होता. सेनेचा वापर योग्य तेवढा झाला होता. आणि पुराणकथेप्रमाणे हा राक्षस आता देवाच्याच जिवावर उठायला लागला याची जाणीव झाली. वेळही ठरली आणि आता मोदीपर्वात सेना ‘इतिहासजमा’ करण्याची पद्धतशीर कारस्थाने सुरू झालीत. काँग्रेस आणि भाजप एकमेकांना पाण्यात पाहत असले तरी देशात केवळ द्विपक्षीय लोकशाही असावी यावर अद्वैतासारखं एकमत आहे...

------------------------------------------------------------------------------------------

७ फेब्रुवारी २०१७
…मला बाई जायाचं नांदायला! : संजय पवार
एकटीने मला ही जड जाणार, तुम्हालाही. शेवटी धनी हवा, घरधणीन हवी, तर घराला शोभा. बरं मामंजींना वचन दिलं होतं, आता जातेय पण पुन्हा नक्की येईन. आले की नाही? आज सगळे दीर भेटले. सगळे विचारात पडले. म्हटलं वेळ लावू नका, आत सांगा मी आलेय. मी. मी स्वत:, स्वत:च्या पायाने, विनाअट…नांदगावकर स्वगत म्हणत होते. एका राजकीय महानाट्यातलं सम्राटाच्या अध:पतनानंतरचं स्वगत!...

------------------------------------------------------------------------------------------

११ फेब्रुवारी २०१७
‘राज, तुम्हारा चुक्याच!’ : प्रवीण बर्दापूरकर
राज यांचा प्रस्ताव नाकारून ‘एकही मारा मगर, क्या सॉलिड मारा’सकट आजवर झालेल्या सर्व उपमर्दांचा शिवसेनेनं सूड उगवला. सेनेला युतीचा प्रस्ताव देण्याची राज यांची कृती चुकलीच. पु. ल. देशपांडे यांच्या एका लेखाच्या शीर्षकाचा आधार घेऊन सांगायचं तर – ‘राज, तुम्हारा चुक्याच!’ या प्रस्तावामुळे मनसेच्या मनोधैर्याचं खच्चीकरणच झालं आणि हा प्रस्ताव स्वीकारुन वडीलधारा उमदेपणा दाखवण्याची संधी उद्धव ठाकरे यांनीही हातची गमावली.....

------------------------------------------------------------------------------------------

१० फेब्रुवारी २०१७
लोकशाहीची भिस्त केवळ निवडणुकांवर नको! : भास्कर लक्ष्मण भोळे
पुढचे काही दिवस निवडणुकांच्या रणधुमाळीचे असणार आहेत. राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांची धामधूम चालू आहे तर, देशपातळीवर उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी कधीचीच चालू झाली आहे. निवडणुका जाहीर झाल्या की, राजकीय पक्ष-नेते-कार्यकर्ते यांना जाग येते आणि भारतीय मतदारांनाही. त्यानिमित्ताने राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक असलेल्या लेखकाचा हा १७ वर्षांपूर्वीचा लेख...आजही तितकाच उपयुक्त आहे....

------------------------------------------------------------------------------------------

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......