खलील जिब्रान हा लेबनीज-अमेरिकन लेखक त्याच्या काव्यात्म-गद्य रचनांसाठी ओळखला जातो. त्याच्या विचारांना कालातीत तत्त्वज्ञानाचं कोंदण आहे. ‘द प्रॉफेट’ हे त्याचं पुस्तक खूप गाजलं. मराठी वाचकाला श्रीपाद जोशी यांनी या लेखकाची सर्वप्रथम ओळख करून दिली.
माणसामाणसातील नातेसंबंध उलगडून दाखवणारं ‘द प्रॉफेट’ इंग्रजीतलं अगदी सावकाश वाचण्यासारखं केवळ एकशे अठ्ठावीस पानांचं संवादी पुस्तक आहे. अठ्ठावीस लहानशा संवादांतून त्याने मानवी-संबंधांतील तत्त्वज्ञान मांडले आहे. यात विविध विषयांना स्पर्श केला आहे- प्रेम, लग्न, संतती, दान, खान-पान, काम, सुख-दुःख, घर, वस्त्र, क्रय-विक्रय, शिक्षा, कायदा, स्वातंत्र्य, विचार आणि उत्साह, वेदना, आत्मज्ञान, शिक्षण, मैत्री, संवाद, वेळ, चांगले आणि वाईट, प्रार्थना, आनंद, सौंदर्य, धर्म, मृत्यू, निरोप इत्यादी.
त्याच्या प्रकटीकरणाचं स्वरूप त्रोटक असलं तरी त्यातील विचारांची व्याप्ती मोठी आहे, कारण हे एवढंसं पुस्तक त्याच्या अकरा वर्षांच्या चिंतनाचे फलित आहे. त्यातील एकही विचार त्यामुळे आगंतुक वाटत नाही.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘आपले ते जहाज एकदाचे येईल आणि आपल्याला निजधामी घेऊन जाईल’, असा ध्यास बारा वर्षांपासून सतत वाहणाऱ्या अलमुस्तफाला अखेर त्यांच्या प्रेमाच्या ऑर्फलीज शहरात समुद्रावर अथांग पसरलेल्या धुक्यातून त्याचे जहाज येताना दिसते आणि मग त्याचे मन उचंबळून येते. ‘आता हा आपल्याला सोडून जाणार’, या आविर्भावात त्या गावचे त्याच्या सान्निध्यात अनुभवसंपन्न झालेले लोक एकेक प्रश्न विचारतात आणि तो उत्तरं पुरवतो, असे कथासूत्र आहे. त्याच्या विवेकी मार्गदर्शतून जीवन-सार ओसंडत राहते, त्याचे सुहृद आणि वाचक ते भरभरून प्राशन करतात.
आपल्या प्रेमाचा गाव सोडताना तो म्हणतो- ‘And ever has it been that love knows not its own depth until the hour of separation.’
‘प्रेमाबद्दल काही सांग’, असे त्याचा सांभाळ करणारी अल्मित्रा त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो- ‘When you love, you should not say, ‘God is in my heart,’ but rather, ‘I am in the heart of God.’
जेव्हा ती ‘लग्न’ या संस्थेबद्दल विचारते तेव्हा हा म्हणतो- ‘Aye, you shall be together even in the silent memory of God. But let there be spaces in your togetherness, and let the winds of the heavens dance between you.’
आपल्या बाळाला कवटाळून असलेली एक आई त्याला ‘मूल म्हणजे काय?’ विचारते, तेव्हा तो म्हणतो- ‘Your children are not your children. They are the sons and daughters of Life’s longing for itself. They come through you but not from you, and though they are with you yet they belong not to you.’ ही विधाने आंतरजालावर सतत फिरत असतात.
एक श्रीमंत माणूस ‘दान म्हणजे काय?’ विचारतो. तेव्हा याचं उत्तर येतं- ‘There are those who give little of the much they have and they give it for recognition and their hidden desire makes their gifts unwholesome. And there are those who have little and give it all. These are the believers in life and the bounty of life, and their coffer is never empty.’
एक छोटं उपहारगृह चालवणारा म्हातारा माणूस ‘खान-पाना’संबंधी विचारतो, तेव्हा हा सांगतो- ‘Would that you could live on the fragrance of the earth, and like an air plant be sustained by the light. But since you must kill to eat, and rob the newly born of its mother’s milk to quench your thirst, let it then be an act of worship.’
एक शेतकारी ‘कामा’बद्दल विचारतो, तेव्हा हा म्हणतो- ‘Work is love made visible. And if you cannot work with love but only with distaste, it is better that you should leave your work and sit at the gate of the temple and take alms of those who work with joy.’
इतक्यात एक स्त्री विचारते, ‘सुख आणि दुःख म्हणजे काय’, याचे उत्तर असते- ‘Your joy is your sorrow unmasked…Some of you say, ‘Joy is greater than sorrow,’ and others say, ‘Nay, sorrow is the greater.’ But I say unto you, they are inseparable.’
एक गवंडी विचारतो, ‘घर म्हणजे काय?’, याचे उत्तर असते- ‘Your house is your larger body… you shall not dwell in tombs made by the dead for the living, and though of magnificence and splendor, your house shall not hold your secret nor shelter your longing…for that which is boundless in you abides in the mansion of the sky, whose door is the morning mist, and whose windows are the songs and the silences of night.’
एक विणकर ‘वस्त्रा’बद्दल विचारतो, तेव्हा हा त्याला सांगतो- ‘Your clothes conceal much of your beauty, yet they hide not the unbeautiful.’
एक व्यापारी ‘क्रय-विक्रया’बद्दल विचारतो, तेव्हा हा म्हणतो- ‘It is in exchanging the gifts of the earth that you shall find abundance and not be satisfied.’
त्या शहरातला एक न्यायाधीश त्याला ‘गुन्हा आणि शिक्षा’ यासंबंधी विचारतो, तेव्हा हा म्हणतो- ‘And as a single leaf turns not yellow but with the silent knowledge of the whole tree, so the wrong-doer cannot be wrong without the hidden will of you all… And if any of you would punish in the name of righteousness and lay the axe unto the evil tree, let him see to its roots; and verily he will find the roots of the good and the bad, the fruitful and the fruitless, all entwined together in the silent heart of the earth.’
एक वकील ‘कायद्या’बद्दल विचारतो तेव्हा अलमुस्ताफा म्हणतो- ‘And who is he that shall bring you to judgement if you tear off your garment yet leave it in no man’s path?’
एक व्याख्याता उत्सुकतेने ‘स्वातंत्र्य म्हणजे काय?’ असे विचारतो तेव्हा हा उत्तरतो- ‘You shall be free indeed when your days are not without a care nor your nights without a want and a grief…But rather when these things girdle your life and yet you rise above them naked and unbound.’
‘विचार आणि उत्साह’ याबद्दल थोडे सांग असे एक विदुषी त्याला विचारते, तेव्हा हा म्हणतो- ‘...let your soul exalt your reason to the height of passion, that it may sing; and let it direct your passion with reason, that your passion may leave through its own daily resurrection, and like the phoenix rise above its own ashes.’
‘वेदना म्हणजे नेमकं काय?’ असे एका स्त्रीने विचारले, तेव्हा हा म्हणाला- "And could you keep your heart in wonder at the daily miracles of your life, your pain would not seem less wonderous than your joy.’
‘आत्मज्ञान म्हणजे काय’ असे एका जवळच्या माणसाने विचारले, तेव्हा हा म्हणाला- ‘And seek not the depths of your knowledge with staff or sounding line. For self is a sea boundless and measureless. Say not, “I have found the truth.” But rather, “I have found a truth.’ तेव्हा ते शब्द ‘नेति नेति’चा उद्गार ठरतात.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
एका शिक्षकानेच ‘शिक्षण’ म्हणजे नेमके काय, असे विचारले, तेव्हा हा म्हणाला- ‘If a teacher is indeed wise he does not bid you enter the house of his wisdom, but rather leads you to the threshold of your own mind.’
एक युवा म्हणाला ‘मैत्री काय?’ तेव्हा हा म्हणाला- ‘And in the sweetness of friendship let there be a laughter, and sharing of pleasures. For in the dew of little things the heart finds its morning and is refreshed.’
जेव्हा एका विद्वानाने विचारले ‘संवादाचं महत्त्व काय आहे?’ तेव्हा हा म्हणाला- ‘When you meet your friend on the roadside or in the marketplace, let the spirit in you move your lips and direct your tongue. Let the voice within your voice speak to the ear of his ear; for his soul will keep the truth of your heart as the taste of wine is remembered.’
एक खगोलशास्त्री म्हणाला ‘वेळेचे महत्त्व काय?’, तेव्हा हा म्हणाला- ‘Of time you would make a stream upon whose bank you would sit and watch its flowing; yet the timeless in you is aware of life’s timelessness, and knows that yesterday is but today’s memory and tomorrow is today’s dream.’
‘चांगले आणि वाईट म्हणजे काय?’ असे एका वरिष्ठ नागरिकाने विचारले, तेव्हा हा म्हणाला- ‘For the truly good ask not the naked, ‘Where is your garment?’ ’
याची पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी नागेश किवळेकरांनी एकेठिकाणी यासंबंधी एक फार छान गोष्ट सांगितली आहे- ‘एकदा ‘खोटं’ ‘खऱ्या’ला म्हणतं, ‘विहिरीतील पाणी खूप छान आहे, आपण दोघेही आंघोळ करू.’ ‘खऱ्या’ला थोडी शंका येते, ते पाण्याची चव घेतं, पाणी खरंच छान आहे हे त्याला पटतं आणि ‘खरं’ आंघोळ करायला तयार होतं. दोघे विहिरीत आंघोळ करत असतात. तितक्यात ‘खोटं’ पटकन् विहिरीच्या बाहेर येऊन स्वतःचे कपडे घेतं आणि ‘खऱ्या’चे कपडे अंगावर चढवून पळून जातं. ‘खऱ्या’ला ‘खोटं’ मध्येच पळून गेल्याने खूप राग आलेला असतो. ते आपले कपडे घालावेत म्हणून विहिरीच्या बाहेर येतं. त्याचे कपडे गायब झाले असतात. त्यामुळे ‘खऱ्या’ला असं नागवं पाहून रागाने जग त्याला मूर्खात काढतं आणि त्याचा धिक्कार करतं. हे पाहून गरीब बिचारं ‘खरं’ लाजेपोटी पुन्हा विहिरीत जाऊन नाहीसं होतं. तेव्हापासून ‘खऱ्या’चे कपडे घालून ‘खोटं’ गावभरं फिरत असतं आणि जगसुद्धा त्यावर खूष असतं कारण नागवं ‘खरं’/सत्य पाहण्याची जगाला अजिबात इच्छा नसते.
विदुषीने पुन्हा ‘प्रार्थने’संबंधी विचारले तेव्हा हा म्हणाला- ‘For what is prayer but the expansion of yourself into the living ether?” “Our God, who art our winged self, it is thy will in us that willeth.’
एक साधू ‘आनंदा’बद्दल विचारतो, तेव्हा हा सहज म्हणतो- ‘Ay, in every truth, pleasure is a freedom-song… People of Orphalese, be in your pleasures like the flowers and the bees.’
‘सौंदर्य म्हणजे काय?’ असे एक कवी विचारतो. तेव्हा याचे उत्तर येते- ‘Beauty is not a need but an ecstasy. Beauty is life when life unveils her holy face. But you are life and you are the veil. Beauty is eternity gazing at itself in a mirror. But you are eternity and you are the mirror.’
‘धर्म म्हणजे काय’ असे मौलवी विचारतात, तेव्हा हा म्हणतो- ‘Your daily life is your temple and your religion. Whenever you enter into it take with you your all.’
शेवटी अल्मित्रा ‘मृत्यू’बद्दल विचारते आणि हा म्हणतो- ‘Your fear of death is but the trembling of the shepherd when he stands before the king whose hand is to be laid upon him in honour.’
अल्मित्रा त्याचा निरोप घेताना म्हणते, ‘तू एवढं मार्गदर्शन केलंस, त्याबद्दल आभार, तुझे भले होवो’. तो म्हणतो, ‘बोलविता धनी वेगळाचि, मी पण तर तुमच्यासोबत ऐकत होतो.’ तो पुढे म्हणतो, ‘ज्या ज्या वेळी माझा संदेश क्षीण होत जाईल, त्या त्या वेळी मी पुन्हा येईन.’ (For this I bless you most : You give much and know not that you give at all.)
च्वांगत्से या नावाचा एक चिनी विचारवंत होऊन गेला. त्याच्यासंबंधी एक मोठी गंमतीची गोष्ट सांगितली जाते. तो एका सकाळी आपल्या घरी मोठ्या सचिंत अवस्थेत बसलेला होता. शरीर आळसावलेले होते. तोंड उतरलेले होते. डोळे कुठे तरी शून्यात लागलेले होते. अनेक लोक त्याच्याकडे येत असत. त्याला फार मानीत असत. अनेक समस्यांसंबंधी, प्रश्नांसंबंधी त्याचे मार्गदर्शन आदराने स्वीकारीत असत. च्वांगत्सेची ती विषण्ण स्थिती पाहून काहींनी त्याला विचारले की, आम्हाला काही अडचण आली, अडले म्हणजे आम्ही तुमच्याकडे येतो. तुमचे बोलणे ऐकतो आणि नवा उत्साह घेऊन समाधानाने परत जातो. आज तुम्हीच स्वत: चिंताग्रस्त दिसता आहा. असे आम्ही तुम्हाला कधी पाहिले नाही. आज असे काय घडले आहे? च्चांगत्से म्हणाला, ‘आज पहाटे मला एक स्वप्न पडले. मी एक पाखरू झालो आहे, या झाडावरून त्या झाडावर झेपावत फिरतो आहे; किलबिलतो आहे. भक्ष्य मिळवून खातो आहे आणि मी जागा झालो.’ त्याचेकडे आलेले लोक तेव्हा हसून म्हणाले – ‘यात काय विशेष आहे? आम्हालाही अशी पुष्कळ स्वप्ने पडतात’. च्वांगत्से म्हणाला, ‘तुमचे ठीक आहे. तुम्ही विचार करीत नाही. पण मला प्रश्न पडला आहे की, कोण्या पाखराला तर मी च्वांगत्से आहे असे स्वप्न पडत नाहीय ना?’
रात्री च्वांगत्से झोपला होता आणि त्याला आपण पाखरू झालो असे स्वप्न पडत होते, आता ते पाखरू झोपले आहे आणि त्याला आपण च्वांगत्से झालो असे स्वप्न पडत आहे की काय? आणि हाच प्रश्न तो अनेकांना विचारीत असे.”
अशा उदाहरणांसहित खलील जिब्रानच्या एकेका ‘Farewell to you and the youth I have spent with you. It was but yesterday we met in a dream’, त्रोटक वाक्यांमागील विचारधारेचे दीर्घ विश्लेषण करता येण्यासारखे आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
‘द प्रॉफेट’मधील विचार दीर्घ चिंतनाची फलश्रुती आहेत. मानवी जीवनातील नात्यांची सांधेजोड करणारे. कोण्या एका देशाचे वा संस्कृतीचे वाहक नसलेले, तरी अखिल मानवतेला व्यापणारे, जगण्याचा अंतस्थ हेतू जाणणारे, त्याच्या परिपूर्णतेची कसोटी लावणारे.
थकल्या तृषार्त अवनीवरती पाऊस होऊन बरसणारे अन् मायेने एकेका बीजाला अंकुरणारे- कालातीत, कालजयी, त्रिकालाबाधित. एखाद्या विवेकी वाचकाला खलील जिब्रानमध्ये कदाचित लेह हंटचा ‘अबू बेन आदम’ गवसतो – ‘कल्याण जगाचे करिती जे जन, प्रेम-भावे जगता शिंपून, त्या सर्वांचे देव अवघ्राण, स्वयेंच करतो त्या दीपमान!’
थोडक्यात, खलील जिब्रान कसा वाटतो? याचं उत्तर बा. भ. बोरकरांच्या शब्दांत सापडतं, ‘आपत्कालीं अन् दीनांवर घन होऊनि जे वळले हो, जीवन त्यांना कळले हो.’
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment