‘तालिब’ या शब्दाची पवित्रता आणि शुद्धता इतकी डागाळली आहे की, गेल्या काही वर्षांपासून ‘तालिबान’ हा शब्द ‘सैतान’ या शब्दाचा समानार्थी शब्द झाला आहे
पडघम - विदेशनामा
सतीश बेंडीगिरी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 18 August 2021
  • पडघम विदेशनामा तालिबान Taliban अफगाणिस्तान Afghanistan अमेरिका America

अफगाणिस्तान हा आपल्या महाभारताशी जुडलेला देश. महाभारतातल्या धृतराष्ट्राची पत्नी गांधारी आणि तिचा भाऊ शकुनी हे गांधार देशाचे, म्हणजे अफगाणिस्तानच्या आजच्या ‘कंदाहार’ प्रांतातले. आजूबाजूला हिंदुकुश पर्वतरांगा, उणे वीस ते पंचेचाळीस असं विषम तापमान आणि चारी बाजूला जमिनीने वेढलेला हा देश आजपर्यंत रक्तपातच बघत आला आहे. भारतावर स्वाऱ्या करणाऱ्या गझनी, खिलजी, तुघलक, तैमूर, सय्यद, लोधी आणि बाबर या अफगाण सम्राटांचा हा देश आता पुन्हा एकदा तालिबान्यांच्या हातात गेला आहे.

२००१पासून आतापर्यंत म्हणजे जवळपास २० वर्षे अफगाण नागरिक मोकळा श्वास घेत होते. तो आता पुन्हा घुसमटू लागला आहे. अफगाण जनता एक प्रकारच्या भीतीने आणि नैराश्याने वेढली गेली आहे. २० वर्षापूर्वी जेव्हा अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता होती, तेव्हा तेथील जनता मध्ययुगात वावरत होती. आता परत इतिहासाची पुनरावृत्ती होऊन तालिबान्यांनी अफगाणी जनतेला परत मध्ययुगात नेले आहे. तालिबान्यांचे धार्मिकीकरण पूर्वीपेक्षा जास्त प्रतिगामी, प्रसंगी जीव घेणारे ठरणार आहे किंवा कसे, हे येत्या काही दिवसांत आपल्याला कळेल. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतला. आता तालिबान स्वतःचा स्वार्थ साधण्यात मश्गुल होणार. त्यांना तिथं ‘शरिया कायदा’ लागू करायचा आहे. स्त्रिया आणि लहान मुलं यांना तालिबानच्या अन्याय-अत्याचाराची सर्वाधिक झळ बसणार आहे. त्यांना त्यांचा मतलब साधायचा आहे. तसे तालिबानी मतलबीच आहेत.

‘तालिबान’ या शब्दाचा इतिहास शोधायचा प्रयत्न केला, त्यानंतर जे हाती लागले ते असे-

काही शब्द असे असतात की, जे सामान्य संभाषणाचा एक अविभाज्य भाग बनतात. अशा शब्दांशिवाय संवाद होऊ शकत नाही. असाच एक हिंदी  शब्द ‘मतलब’. या शब्दाचा अर्थ आहे – ‘म्हणजे’ किंवा ‘तुला काय म्हणायचे आहे?’. लोकांच्या बोलण्याच्या विशिष्ट पद्धतीकडे लक्ष दिले तर हा शब्द वापरणारे हिंदी भाषिक शेकडोंच्या संख्येने असतील. बरेच हिंदी भाषिक ‘मतलब’ हा शब्द दिवसातून एवढ्या वेळा वापरतात की, तो त्यांचा एक प्रकारचा ‘कॅचफ्रेज’, ‘तकियाकलाम’ होऊन जातो.

हा शब्द वापरल्याशिवाय बहुतेकांचं संभाषणच पूर्ण होत नाही. ‘मतलब’ या शब्दाच्या अर्थामध्ये हेतू, उद्देश, अनुकूलता, इच्छा, प्रयोजन, इष्ट, मनोरथ, अभिप्राय, ध्येय, गोष्ट, विचार, लक्ष्य, विषय असे अनेक अर्थ सामावले आहेत. ‘तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे?’ किंवा ‘मला असे  म्हणायचे आहे/ म्हणायचे नव्हते की...’ या अर्थी हा शब्द वापरला जातो.

मराठी, गुजरातीपासून उत्तर भारतातील जवळजवळ सर्व भाषांमध्ये हा शब्द वापरला जातो.

या शब्दाचं सिमिटिक मूळ शोधलं तेव्हा समजलं की, या शब्दाने अरबीतून फारसी आणि फारसीतून मग भारतीय भाषांत प्रवेश केला आहे. सेमिटिक धातू त-ल-ब/ tā lām bā (ب ل ط) पासून व्युत्पन्न झालेला हा शब्द आहे. अल-सय्यद एम. बदावीच्या ‘कुराण’साठी तयार केलेल्या शब्दकोशानुसार या शब्दांत शोध, मागणी, चाचणी, प्रार्थना, विनम्रता, विनय इत्यादी अर्थ अभिप्रेत आहेत. यातूनच हिंदीमध्ये ‘तलब’ हा शब्द जन्माला आला. ‘तलब’ म्हणजे शोध घेणे. त्याच्या मुळाशी ‘तलाब’ (तलाव) आहे. ‘तलाश’ आहे. वाळवंटात तहान भागवण्यासाठी तलावाचा शोध घेण्याचे कार्य हा शब्द दर्शवतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

वाळवंटात टोळ्या करून राहणाऱ्या आदिम माणसाचे जीवन हा न संपणारा शोध आहे. जगातील सर्वांत मोठ्या वाळवंटात, जेथे कुठलेच निशाण दिसत नाही, तिथे शोध घ्यायचा. तलाश करायचा. आजूबाजूला फक्त वाळू आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य अशा जीवघेण्या परिस्थितीत, सर्वप्रथम पाण्याचा शोध, निवाऱ्याचा शोध, भटक्या प्राण्यांचा शोध, अशी प्राचीन काळात वाळवंटात भटकणाऱ्या बेदूईन जमातीच्या अनंत शोधांची एक मालिकाच होती. ‘तलब’ या शब्दाचा संबंध अजूनही ‘तहान’ या अर्थाशी जोडलेला आहे. आता हा शब्द अधिक प्रमाणात चहा किंवा मद्य पिण्याची ‘तल्लफ’, ‘तलफ’ या अर्थीही वापरला जातो.

‘तलब’ शब्दातून तयार झालेले इतर काही शब्द हिंदीमध्ये प्रचलित आहेत. जसे, ‘तलबगार’. म्हणजे इच्छुक, शोध घेणारा इ. ‘आरामतलब’ असा एक शब्द  ‘आळशी’ या अर्थाने देखील वापरला जातो. तलब म्हणजे एखाद्याला बोलावणे असाही अर्थ आहे. बऱ्याचदा त्यात एक निर्देशात्मक अर्थ असतो. ‘तलबनामा’ या शब्दातून तो अधिक स्पष्ट होतो. न्यायालयीन शब्दावलीमध्ये याचा वापर केला जातो. त्याचा अर्थ न्यायालयात हजर राहण्याचा आदेश. याला ‘समन्स’ असे म्हणतात. पूर्व उत्तर प्रदेशात ‘तलबाना’ ही रक्कम आकारली जाते (पावती, स्टॅम्प किंवा स्टॅम्प पेपर) साक्षीदारांना न्यायालयात आणण्याचा खर्च म्हणून. ‘तलब’मध्ये अरबीचा ‘म’ हा उपसर्ग लावून ‘मतलब’ शब्द तयार झाला. यामध्येदेखील इच्छा, प्रार्थना, तळमळ, मागणी, लालसा, अशा अर्थाच्या अभिव्यक्ती आहेत, ज्या थेट ‘तलब’शी संबंधित (चाह, तलाश, कामना, मांग इ.) आहेत.

‘मतलब’चा विशिष्ट अर्थ प्रत्यक्षात इच्छा, मागणी या पलीकडे जातो आणि त्याचा अर्थ, अभिप्राय, आशय, उद्देश, अशा कारणांशी जोडला जातो आणि बहुतेक भारतीय भाषांमध्ये याच संदर्भात वापरला जातो. ‘मेरा मतलब ये हैं’ आणि ‘मैं यह कहना चाहता हूँ’ या दोन्हीचा अर्थ एकच आहे. ‘मतलब’ आणि ‘इच्छा’ हे एकमेकांचे सोपे समानार्थी शब्द आहेत. मतलब अनेक प्रकारे वापरला जातो. स्वार्थी व्यक्तीला ‘मतलबी’ म्हणतात. म्हणजेच, तो केवळ त्याच्या हेतू किंवा इच्छा पूर्ण करण्याच्या शोधात गुंतलेला असतो. ‘मतलबपरस्त’हादेखील स्वार्थी व्यक्तीला लागू होणारा शब्द आहे. ‘मतलब की दोस्ती’, ‘मतलब की यारी’ अशा शब्दांचा वापरदेखील सामान्य आहे. मराठीत याचा समानार्थी शब्द आहे- ‘आपमतलबी’.   ‘मतलबदार’ आणि ‘मतलबीयार’ असे शब्द मराठीत वापरले जातात.

‘तलब’पासून ‘तालिब’ हा शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ साधक, शोधक, जिज्ञासू. तालिब-ए-इल्म म्हणजे ज्ञानाचा साधक अर्थात शिष्य, विद्यार्थी, चेला, इत्यादी. पश्तूनमध्ये या ‘तालिब’चे अनेकवचन ‘तालिबान’ आहे. ‘तालिब’ या शब्दाला ‘आन’ प्रत्यय जोडून, अनेकवचन ‘तालिबान’ बनले. इंग्रजी ‘मेंबर’चा उर्दूमध्ये ‘मेंबरान’ हा बहुवचनी शब्द केला गेला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

आज जगभर ‘तालिबान’ हा शब्द ‘दहशतवाद्यां’साठी समानार्थी शब्द झाला आहे. पण या शब्दाचा मूळ अर्थ ‘आध्यात्मिक विज्ञान शिकणारा विद्यार्थी’ असा आहे.

इथे सुमारे अडीच दशकांपूर्वी अफगाणिस्तानच्या अशांत राजकारणात मूलतत्त्ववाद्यांची एक अतिरेकी वैचारिक संघटना कशी उभी राहिली, याच्या तपशिलात जायचे कारण नाही. परंतु विशेष गोष्ट म्हणजे अशांततेच्या काळात कायदा आणि नियमांच्या स्थापनेच्या नावाखाली मुल्ला उमरने ‘तालिबान’ या नावाने आपल्या माथेफिरू शिष्यांची फौज उभी केली. त्यामुळे ‘तालिब’ या शब्दाची पवित्रता आणि शुद्धता इतकी खोलवर डागाळली आहे की, गेल्या काही वर्षांपासून ‘तालिबान’ हा शब्द ‘सैतान’ या शब्दाचा समानार्थी शब्द झाला आहे.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......