पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि पातोळ्या खाण्याचा दिवस असं समीकरण आजही माझ्या डोक्यात घट्ट रुतून बसलेलं आहे
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • पातोळ्याचं एक छायाचित्र
  • Fri , 13 August 2021
  • पडघम सांस्कृतिक पातोळ्या गोवा मिस्साविधी स्वातंत्र्य दिन

उद्या पंधरा ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन.

स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या लहानपणाच्या काही आठवणी आहेत. या दिवशी श्रीरामपूरला आम्ही सकाळीच सातलाच देवळात जायचो आणि तिथं मिस्साविधीत सहभागी व्हायचो. ही खास मिस्सा असते, पवित्र मारियामातेच्या स्वर्गारोहणाच्या सणानिमित्त किंवा ‘द फिस्ट ऑफ द अझम्पशन ऑफ आवर लेडी मिस्सा’ झाल्या झाल्या सगळे लोक तिथल्या जर्मन हॉस्पिटल किंवा संत ल्युकस दवाखान्याच्या प्रवेशद्वारापाशी जमा व्हायचे. तिथं झेंडावंदन व्हायचं, राष्ट्रगीत गायलं जायचं आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा व्हायच्या. त्यानंतर शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा व्हायचा आणि घरातली इतर मंडळी चर्चला जाऊन तिथंच स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनात सामील व्हायची...

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

गोव्यात उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयात असताना स्वातंत्र्य दिनाच्या आणि मारियामातेच्या स्वर्गारोहणाच्या सणाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. गोव्यात मारियामातेच्या सणानिमित्त मिस्सा इंग्रजीतून व्हायची आणि शेवटचं गायन ठरलेलं असायचं.

चर्चमध्ये वर्षभर साजऱ्या होणाऱ्या काही सणांच्या मिस्साचं शेवटचं गीत विशिष्ट असतं. उदाहरणार्थ ख्रिसमसच्या मिडनाईट आणि इतर मिस्साचा शेवट ‘वी विश यू अ मेरी ख्रिस्मस’ या गाण्यानं होतो, तर सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या ३ डिसेंबरच्या सणाची मिस्सा ‘सान फ्रान्सिस शाव्हिएरा’ या कोकणी गीतानं होते. कारण गोवन ख्रिस्ती लोकांचा सेंट फ्रान्सिस झेव्हियर हा सर्वांत महत्त्वाचा संत. भारतातील बहुतेक चर्चेसमध्ये पंधरा ऑगस्टच्या इंग्रजी मिस्साचा शेवट होतो- रवीन्द्रनाथ टागोरांची पुढील प्रसिद्ध कविता गाऊन-

“Where the mind is without fear and the head is held high;

Where knowledge is free;

Where the world has not been broken up into fragments by domestic walls;

Where words come out from the depth of truth;

Into that heaven of freedom, my Father, let my country awake

गिटार किंवा कि-बोर्डच्या संगीताच्या सुरांवर गायली जाणारी ही कविता आपल्याला देवाच्या भक्तीकडून देशभक्तीच्या वाटेवर घेऊन जाते.

पिंपरी-चिंचवडच्या आताच्या आमच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चमध्येही पंधरा ऑगस्टला ‘अझम्पशन ऑफ आवर लेडी’ या सणानिमित्त होणाऱ्या मिस्सेची सांगता याच देशभक्तीपर कवितेनं होते. देशाच्या इतर कॅथोलिक चर्चेसमध्येसुद्धा असंच होतं.

टागोरांची ही आशयघन कविता गेल्या काही वर्षांत तर अधिकच महत्त्वपूर्ण बनली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील केवळ चर्चेसमध्ये नव्हे, तर विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांत ती गायली जायला हवी. त्याद्वारे भीतीमय  वातावरणाचा आणि विविध प्रकारच्या असमानतेचा कायमचा नाश व्हावा आणि सर्वांना आपलं डोकं उंचावून जगण्याची संधी मिळावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची भावना निर्माण व्हायला हवी.

काही पक्क्वानं विशिष्ट सणांनिमित्त बनवली जातात. त्या सणाचा तो खास मेन्यू असतो. गणेशोत्सव म्हटलं की, उकडीचे मोदक हवेतच. दिवाळीत फराळ, नाताळाच्या सणाला केक आणि रमझान ईदला शिरकुर्मा हवाच. अशा पक्क्वानांच्या जोड्या आपल्या मनात तयार झालेल्या असतात.  

माझी मुलगी आदिती लहान होती, तेव्हा दर होळीच्या सणाला संध्याकाळी आमच्या शेजारच्या शेडगेकाकूंकडून तिच्यासाठी पुरणपोळीचं ताट यायचं. त्यामुळे आजही होळी म्हटलं की, आदितीशी घट्ट नातं जुळलेल्या शेडगे काकूंच्या पुरणपोळीची हमखास आठवण येते.

अशाच एका पक्क्वानामुळे स्वातंत्र्य दिन माझ्या दृष्टीनं स्मरणीय झालेला आहे. हा खाद्यपदार्थ म्हणजे पातोळ्या. म्हणजे नारळाचं खोबरं आणि गूळ घालून हळदीच्या पानांत उकडलेलं पक्क्वान्न. हा पदार्थ उकडीच्या मोदकांसारखाच, मात्र घड्या घालून हळदीच्या पानांत उकडून तयार केला जातो. पंधरा ऑगस्टला मारिया मातेच्या सणानिमित्त गोव्यात कॅथोलिक समाजात पातोळ्या हे मिष्टान्न बनवलं जातं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

१९७०च्या दशकात गोव्यात मिरामारच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पहिल्यांदा पातोळ्या खाल्ल्या. त्या दिवशी सकाळीच गोव्यातील मुलांच्या आई-वडिलांकडून गरमागरम पातोळ्यांचे डबे आमच्या वसतिगृहात यायचे.

मागच्या वर्षी दमण शहराला भेट दिली. त्या शेजारी. दीवसह ही दोन्ही शहरं एकेकाळी पोर्तुगीज वसाहतीचा भाग होती. दमण आणि सिल्व्हासामध्ये गोव्याप्रमाणेच कॅथोलिक समाजात पातोळ्या बनवल्या जातात.

विशेष महत्त्वाचं म्हणजे गोव्यात हिंदू समाजातसुद्धा पातोळ्या करतात, तोही एका विशिष्ट सणाच्या दिवशी. हा सण म्हणजे ऑगस्टच्या आसपास श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या नागपंचमीला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

या शुक्रवारी झालेल्या नागपंचमीनिमित्त गोव्यात घराघरांत पातोळ्या बनवल्या गेल्या आणि उद्या पंधरा ऑगस्टला मारियामातेच्या स्वर्गारोहणानिमित्त ख्रिस्ती कुटुंबांत पातोळ्यांचा आस्वाद घेतला जाणार आहे.

या पातोळ्या हा गोव्यातील हिंदू आणि किरीस्तांव समाजातील खाद्यसंस्कृतीचा एक आगळावेगळा ठेवा आहे. पातोळ्या आणि उकडीचे मोदक करण्यासाठी वापरले जाणारे घटक सारखेच असतात. तांदळाचं पीठ, नारळाचं खोबरं आणि गूळ. त्यामुळे या दोन पदार्थांची चवही साधारणत: सारखीच असते. फरक असतो फक्त आकारात. पातोळ्या करताना तांदळाचं पीठ, खोबरं आणि गूळ यांचं सारण हळदीच्या पानांवर घालून मग भांड्यांत उकडलं जातं. त्यामुळे हळदीच्या पानाचा वास त्याला वेगळी चव आणतो.

त्यामुळे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि पातोळ्या खाण्याचा दिवस असं समीकरण आजही माझ्या डोक्यात घट्ट रुतून बसलेलं आहे.

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......